Home Blog Page 258

दैनिक जनमत १६ डिसेंबर E पेपर

 

दैनिक जनमत १५ डिसेंबर E पेपर

सद्गुरु श्री श्री मध्ये विस्तारित नवीन बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभ संपन्न

 विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी- 

सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या कृपाशीर्वादाने सांगली, सातारा,सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील शेतकरी राजाला वरदायिनी ठरलेल्या सद्गुरु श्री श्री सा.का.लि. श्री श्रीनगर राजेवाडी या कारखान्याने बळीराजाच्या भवितव्याचा विचार करून चालू वर्षी ऊस उत्पादकांच्या आग्रहास्तव कारखान्याच्या विस्तारीकरणाचा अवलंब करून नवीन बॉयलर अग्नीप्रदीपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनोज कापरे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली चेअरमन शेषागिरी राव,बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शनाने जनरल मॅनेजर व सर्व खातेप्रमुखांच्या वतीने संचालक श्री व सौ सतीश दडस यांचे हस्ते धार्मिक व विधीयुक्त पूजेने कार्यक्रमाचा सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन एस के माळी, संचालक शहाजी नलावडे, सुरेश माळी, रामचंद्र जाधव, शिवदास गायकवाड,संजय फडतरे, तानाजी पवार या मान्यवरांच्या हस्ते चेअरमन एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालक श्रावण दादा वाकसे यांच्या समवेत बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. सदर प्रसंगी डी.जी.एम. शहाजी पाटील, केन मॅनेजर सुनील सावंत,चीफ इंजिनियर महंतेश लोकनवार, प्रोजेक्ट मॅनेजर सूर्यतेज नारा, एच आर व ॲडमिन मॅनेजर समीर सय्यद, डेप्युटी चीफ इंजिनियर तानाजी देवकते, सिव्हिल इंजिनियर अवधूत जमदाडे,डिस्टलरी मॅनेजर लालासाहेब पाटील, डेप्युटी इलेक्ट्रिक इंजिनीयर श्री कट्टी, वामने साहेब, चीफ अकौंटंट बी. के.वाडेकर,व्ही.एस. गुंजवटे,एच आर व एडमिन चे सचिन खटके, शेती अधिकारी शरद देवकर,दत्ता क्षीरसागर सचिन मुंडफणे,आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक राजेंद्र वाघमारे,सुरक्षा अधिकारी श्री बोडरे उपस्थित होते. सांगोला अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने कारखाना कामकाजाचे कौतुक करून सद्गुरु कारखान्यास हवे ते  सहकार्य देण्याचे मान्य केले.

ऑडिओ रेकॉर्डिंग वरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची मुद्रांक विक्रेत्या वर कारवाई

वाशी (शहाजी चेडे )- मोबाईल संभाषणाच्या  ऑडिओ रेकॉर्डिंग वरून  वाशी येथील  मुद्रांक विक्रेत्या वर आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून मुद्रांक विक्रेता अशोक चेडे याच्यावर वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदाराच्या भावाची जमीन नावे खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक वाशी या कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करणाऱ्या अशोक विनायक चेडे यांनी  २५ हजाराची मागणी केली होती आणि १८ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली होती. ती रेकॉर्डिंग लाचलुचपत विभागाला सादर करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या देखरेखीखाली पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, विष्णु बेळे सिध्देश्वर तावस्कर आणि चालक करडे यांनी केली.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटमध्ये मराठी भाषेची मागणी..

कुर्डुवाडीत मनसेच्या वतीने प्रांताना निवेदन

कुर्डुवाडी दि.११(प्रतिनिधी) 

ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाईट व अँँप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा वापर नसल्याने मनसे कडून मराठी भाषेचा आग्रह करण्यात आला आहे याचे निवेदन प्रांताधिकारी यांना मनसे शहर संघटक आकाश लांडे यांनी दिले आहे.

भारता मधली ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटमध्ये मराठी भाषा चा पर्याय नाही सदर मराठी भाषा यांच्या वेब पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये असावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन करण्यात आले असून अद्याप सदर एकाही कंपनीचे मराठी भाषेचा पर्याय त्याच्या वेब पोर्टलमध्ये दिसला नाही

यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्डुवाडी शहराच्या वतीने आज रोजी पासून कुर्डुवाडी व माढा तालुका परिसरातील सर्व ऑनलाईन शॉपिंगच्या डिलिव्हरी बंद करण्यात येतील जोपर्यंत मराठी भाषेचा वापर या वेबवरील पोर्टलमध्ये होत नाही तो पर्यंत सर्व  डिलिव्हरी बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सागर बंदपट्टे उपाध्यक्ष गणेश चैधरी सागर लोकरे शहर सचिव विनायक सांतव ओमराज लांडे उपस्थित होते