Home Blog Page 257

पहिल्या टप्यातील कोविड लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्णत्वाकडे -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- कोविन ॲपवर नोंद केलेल्या वैद्यकीय सेवांशी संबधित शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना पहिल्या टप्यात कोविड-19 ची लस दिली जाणार आहे. या दृष्टीने उस्मानाबाद जिल्हयाची तयारी पुर्णत्वास येत आहे. जिल्हयाचा आरोग्य विभाग यासाठी जोमाने तयारी करत आहे. परंतु या लसीबाबत काही घटक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

कोरोना लसीकरण मोहिम राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा कृती दल (Task Force) च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डी.के. पाटील, पोलिस उपअधिक्षक मोतीचंद राठोड, डॉ. स्मिता शहापूरकर, डॉ. मिना जिंतूरकर ,सुविधा हॉस्पीटलचे डॉ. स्वप्नील यादव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी तथा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. के.के. मिटकरी, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. रफिक अन्सारी आदी उपस्थित होते.

          कोविड-19 च्या अनुषंगाने लसीकरणाबाबत राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हयात तयारी करण्यात येत आहे. पहिल्या टप्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोविड लसीची साठवणूक करण्यासाठी जिल्हयात सद्यस्थितीत 57 शितसाखळी केंद्र आहेत. या 57 शितसाखळी केंद्रामध्ये 77 आयएलआर आहेत. या शितसाखळी केंद्रामध्ये 78 डिपफ्रिजर आहेत. 96 कोल्ड बॅाक्स उपलब्ध आहेत. ही सर्व साधनसामग्री सुस्थितीत आहे. याशिवाय जिल्हयातील सर्व शितसाखळी केंद्रात 1748 व्हॅक्सिन कॅरिअर उपलब्ध्‍ आहे, अशी माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे डॉ. मिटकरी यांनी यावेळी दिली.

          लसीकरणाची प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेप्रमाणे करण्यात येणार आहे.पहिल्या दालनात लसीकरणासाठी आलेल्यासाठी प्रतिक्षा कक्ष असेल तेथे त्यांची ठरल्याप्रमाणे ओळख पटविली जाईल. नंतर  त्यांना लसीकरण कक्षात पाठवले जाईल. लसीकरण झाल्यानंतर संबधितास तिसऱ्या कक्षात 30 मिनीटे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. 30 मिनीटांनी त्या कक्षातून त्यांना बाहेर पडता येईल,अशीही माहिती दिवेगावकर यांनी यावेळी दिली.

 

          लसीकरण केंद्रात प्रवेश करण्याचा मार्ग आणि लसीकरण झाल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असेल सोशल डिस्टन्स आणि इतर सर्व खबरदारी घेऊन लसीकरण केले जाईल. पोलीस, होमगार्ड, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक आदींची नेमणूक यासाठी केली जाणार आहे. को-विन ॲपवर नोंद केलेल्यानाच ठराविक दिवशी, ठरावीक वेळी लसीकरण केंद्रावर बोलविण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याची  काळजी घेण्यात येणार आहे. तेव्हा ज्यांनी को-विन ॲप वर नोंद केली नाही किंवा ज्यांना लसीकरणासाठी बोलवलेले नाही अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

 जिल्ह्यात नियमित अधिकारी कर्मचारी संख्या 1288 असून अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 658 आहे. आशा सेविकांची संख्या 1207 असून आशा गटप्रवर्तकांची संख्या 66 आहे. अंगणवाडी सेविका 1866  असून,अंगणवाडी मदतनीस 1648 आहेत. आरोग्य सेवा देणारे इतर बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 198 आहे. जिल्ह्यात शहरी भागात 768 तर ग्रामीण भागात 297 खासगी दवाखाने आहेत. को-विन ॲपवर  आतापर्यंत 8268 जणांनी जिल्ह्यातून नोंद केली आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, आयुर्वेदिक रूग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय येथे लसीकरण केंद्र असतील, अशीही माहिती जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिली .

जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरण शितसाखळी ही उत्तम दर्जाची ठेवून लसीचे वितरण,लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लसीचे  नियोजन इतर माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली तर शहरी भागातील लसीकरणाची सविस्तर माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांनी यावेळी दिली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत एन.एस.राताळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी( महिला व बालकल्याण) बी.एस.निपाणीकर, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, जिल्हा समाज कल्याण निरीक्षक ए.ए.जगताप,माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, आय. एम. ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, फॉक्सी  संघटनेचे अध्यक्ष डॉ.एस.एस.सरडे,आय.ए.पी. संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुळे, शल्यचिकित्सक सर्वश्री डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. प्रविण डुमणे, डॉ.गजानन परळीकर, श्री आप्पासाहेब सोनवणे इत्यादी उपस्थित होते.

 

*****

 

 

वृत्त क्रमांक-814                                                     दिनांक-23 डिसेंबर -2020

 

गायरान जमिनीच्या विकास

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.23(जिमाका):-केंद्रशासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत  गायरान जमीनीच्या विकासासाठी हेक्टरी  30 हजार ते एक लाखापर्यंत  निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.  यामध्ये कुंपन ,जमीन सपाटीकरण , कृषी अवजाराची खरेदी ,सिंचन सुविधा , बियाणे आणि खते खरेदी, लागवड खर्च, पर्यवेक्षिय खर्च, किरकोळ खर्च ईत्यादी बाबीचा समावेश आहे. गायरान जमीन विकासाची आवश्यकता लक्षात घेवून या योजनेचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत. शासकीय विभागामार्फत प्रस्ताव सादर करीत असताना संबधित जमीनीच्या सात बाराची प्रती व ग्रामसभेचा ठराव ईत्यादी आवश्यक सहपत्रे प्रस्तावासोबत सादर करावी. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्तांनी केले आहे.

 जिल्हयातील अशासकीय  सेवाभावी  संस्था , सहकारी संस्था यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात येत असल्यास संकेत स्थळावरील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे संस्थेची सर्व आवश्यक सहपत्रे प्रस्तावासोबत सादर करावी. या योजनेची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या संकेत स्थळा  www.ahd.maharashtra.gov.in वर स्किम आणि पॉलीसी यामध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन व बुकलेट-स्किम पुस्तिका यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.   

            शासकीय विभाग , अशासकीय  सेवाभावी  संस्था , सहकारी संस्था , लाभार्थी संस्था , वैयक्तिक लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेवू ईच्छित असल्यास सदरील योजनेचे सविस्तर प्रस्ताव नजीकच्या  पशुवैधकीय  दवाखान्यामार्फत संबधित  तालुक्याचे  पशुधन  विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती  यांच्याकडे सादर करावे असे अवाहन करण्यात आले आहे . अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे , अटी  आणि  शर्ती बाबतचा तपशील पशुसंवर्धन विभागाचे संकेत स्थळावर आणि  लाभार्थीशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यात आणि  संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाचे संकेत स्थळ व  संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार आणि  नजीकच्या पशुवैधकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक जनमत २३ डिसेंबर E पेपर

दैनिक जनमत २२ डिसेंबर E पेपर

 

विठ्ठलाच्या चेअरमन पदी भगिरथ दादा भालके यांची बिनविरोध निवड करा – शिवाजी हुंगे-पाटील

                  

 मगरवाडी-( विठ्ठल जाधव )            

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै.भारत नाना भालके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदाकरिता विद्यमान आमदार तथा विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके यांचे चिरंजीव व विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक भगिरथ दादा भालके यांची बिनविरोध संचालक मंडळानी निवड करावी असे मत विठ्ठल परिवाराचे नेते शिवाजी हुंगे-पाटील यांनी दैनिक जनमत ला बोलताना हि माहिती दिली. आ.भारत नाना भालके यांनी विठ्ठल सह साखर कारखाना लवकर चालू व्हावा व सभासद बांधवांची एफ आर पी लवकरच  देण्यासाठी शेवटच्या घटका प्रर्यत प्रयत्न केले. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील  यांना काही ही करा पण माझ्या शेतकर्याचा राजवाडा चालू झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा मंञालयामध्ये फेरया मारत असताना अचानक आ. भारत नाना भालके यांची तब्येत ढासळला लागली होती .परंतु कारखाना अडचणीतून बाहेर काढणे महत्वाचे होते .म्हणून भारत नानांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता ते शेवटच्या क्षणापर्यंत कारखाना, सभासद ,कामगार यांचाच विचार करत होते .आणि नाना अचानक पुणे येथे रूबी हाॅस्पिटला अॅडमिट झाले आणि त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली  शेतकर्याच्या व कारखान्याच्या हिताचा निर्णय घेणार आमदार व चेअरमन भारत नाना भालके हे सर्वांना सोडून गेले आज विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन पदाची निवड होते जर आ. भारत नाना भालके यांचे चिरंजीव व विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक मा भगिरथ दादा भालके यांना संचालक मंडळानी  बिनविरोध चेअरमन केले तर खर्या अर्थानी भारत नानांना श्रद्धांजली अर्पण केले जाईल . भगिरथ दादा भालके हे भविष्यात चांगल्या प्रकारे कारखाना चालवून नावारूपाला आणतील त्यांत शंका नाही .आणि कारखान्याचा सिझन चालू आहे त्यामुळे सर्व संचालक मंडळानी कुठल्याही प्रकारची संकुचित भावना मनामध्ये  निर्माण होऊ न देता .त्यांच्याच संचालक मंडळातील सहकार्याला आशिर्वाद व सात देऊन भगिरथ भालके यांना चेअरमन करावे आणि विठ्ठल सह साखर कारखाना सोलापूर जिल्हात नाही तर महाराष्ट्रात पुन्हा नावारुपाला आणावा भारत नानांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुसकान झालेले आहे .आता विठ्ठल परिवारातील नेत्यांनी व  कार्यकर्तेनी एक मेकांच्या हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे .

एस.पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील यांच्यावर चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचे प्रशासनाचे आदेश

 

उस्मानाबाद – एस.पी शुगर चे चेअरमन तथा तडवळा गावचे उपसरपंच सुरेश पाटील यांच्यावर अधिकार नसताना दोन बोगस वारसा प्रमाणपत्र दिले बाबत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत.

याबाबत माहिती अशी की सुरेश पाटील यांनी अधिकार नसताना मयत मुरलीधर कदम यांच्या नावाचे दोन वेगवेगळे वारसा प्रमाणपत्र दिगंबर कदम यांना दिले होते. याला आक्षेप घेत  तडवळा येथील ग्रामस्थ सुभाष कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. तसेच तक्रारीची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. आज उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा. पं) यांनी उपसरपंच सुरेश पाटील, लिपिक रवींद्र घोरपडे, आणि प्रमाणपत्र हस्तगत करणारे दिगंबर कदम यांची चौकशी करून गुन्हे नोंद करण्याचे पत्र गट विकास अधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे. 

तासगाव नगरपालिकेचे आक्रमक माजी नगराध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच व प.स.माजी उपसभापती शिवसेनेच्या गळाला?

 

खासदार संजयकाका पाटील  गटाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता

तासगाव –

तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तासगाव नगरपालिकेचे एक आक्रमक माजी नगराध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक हे मुंबई येथे शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सोबत तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका मोठ्या गावातील लोकनियुक्त सरपंच व तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती हे तिघे व अन्य काही कार्यकर्ते खासदार संजय काका पाटील यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे तासगाव शहरासह तालुक्यात एकच चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायत व तासगाव नगरपालिका च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  खासदार संजय काका पाटील यांना हा धक्का मानला जाऊ शकतो, तासगावचे माजी नगराध्यक्ष हे मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या परंतु त्यांनी त्यावेळी प्रवेश केला नाही तर पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत या तीन नेत्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा उघड प्रचार करीत निवडणूक दिवशी तासगाव येथील बूथवर दिवसभर ठिय्या मांडला होता हे विशेष होय, भाजपच्या खासदार संजय काका पाटील यांच्या कट्टर नेते यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे यह तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असे म्हटले तर वावगे ठरू नये, या भाजपच्या तिन्ही नेत्यांचा भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचे किती नुकसान होणार व शिवसेनेच्या प्रवेशानंतर तासगाव शहर, तालुक्यातील शिवसेनेला किती फायदा होणार हा येणारा काळच ठरवेल तसेच तासगाव पालिकेची निवडणूक नऊ ते दहा महिन्यावर येऊन ठेपली आहे त्या पार्श्वभूमीवर कोणकोण नेते राज्याच्या सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीत प्रवेश  करणार आहेत हे लवकरच तालुक्यातील व शहरातील जनतेला समजेल तासगाव तालुक्यात सत्ता असणाऱ्या पक्षात कार्यकर्ते व नेतेमंडळी प्रवेश करत असतात हे सर्वांना ज्ञात आहे. सदरच्या कार्यकर्त्यांच्या भाजप सोडचिट्टी मुळे भाजपला किती नुकसान तर शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला तालुक्यात व शहरात किती फायदा मिळणार याबद्दल  सध्यातरी अंदाज बांधणे कठीण आहे.