Home Blog Page 256

दैनिक जनमत ३१ डिसेंबर E पेपर

येरमाळा दरोड्यातील 3 आरोपी 24 तासांत मुद्देमालासह अटकेत.”

  उस्मानाबाद 

काल दि. 29.12.2020 रोजी 00.30 वा. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन येरमाळा- उस्मानाबाद अशा जाणाऱ्या कार समोर दरोडे खोरांनी वाहन जॅक टाकल्याने ती कार त्यास धडकून थांबली असता बाजूस अंधारात लपलेल्या 6 बुरखाधारी तरुणांनी त्या कारमधील प्रवाशांना मारहाण करुन, धाक दाखवून एकुण 190 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 मनगटी घड्याळे, 4 भ्रमणध्वनी व 61,000 ₹ रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. यावरुन येरमाळा पो.ठा. गु.र.क्र. 164 / 2020 भा.दं.सं. कलम- 395, 341 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

            गुन्हा तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री निलंगेकर, पोउपनि- श्री पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, ठाकुर, कवडे, पोना- शेळके, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले, आरसेवाड, होळकर यांसह येरमाळा पो.ठा. चे सपोनि- श्री पंडीत सोनवणे व येरमाळा पो.ठा. च्या अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने गतीमान तपास चक्रे फिरवली. लुटमार प्रकरणाचा पोलीसांनी अवघ्या 24 तासांच्या आत छडा लावून मोहा ता. कळंब येथून 1)महेश शिवाजी पवार उर्फ चेल्या, वय 20 रा. बोरखेड, ता. बीड 2)बबन शहाजी काळे उर्फ लल्ल्या, वय 22 वर्षे, 3)प्रकाश शहाजी काळे, वय 19 वर्षे, दोघे रा. मोहा, ता. कळंब यांना ताब्यात घेउन दरोड्यात लुटलेल्या नमूद माला पैकी 4 भ्रमणध्वनी जप्त केले आहेत. गुन्ह्यातील त्यांचे अन्य साथीदार व लुटीतील उर्वरीत माल याविषयी येरमाळा पो.ठा. मार्फत पुढील तपास केला जात आहे.

दैनिक जनमत ३० डिसेंबर E पेपर

 

चक्क लग्न मंडपातच चुलीवर स्वयंपाक करीत गॅस दरवाढीचा निषेध

 

उस्मानाबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केले आंदोलन

उस्मानाबाद दि.२७ (प्रतिनिधी) – केंद्र सरकार सतत गॅसच्या किमती वाढवित असून ती दरवाढ शंभर रुपयांवर गेली असून सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे व त्याचा वापर करणे आवाक्याच्या बाहेर होऊन बसले आहे. सदरील गॅसची दरवाढ तात्काळ माघारी घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुरेखा नंदकुमार जाधव व अल्पसंख्याक राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ डिसेंबर रोजी येथील जिजाऊ चौकातील मंगल कार्यालयातच अर्थात लग्न मंडपातच चक्क चुल पेटवून चुलीवर स्वयंपाक करीत या दर वाढीचा निषेध नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे या लग्नासाठी आलेली वऱ्हाडी मंडळी या अनोख्या आंदोलनाकडे आश्चर्याने पाहून या दरवाढीचा निषेध करीत होती.

मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. तर मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना  परिस्थिती केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशिलता दाखवित मनमानीपणे भरमसाठ दरवाढ करुन महामार्ग च्या काळात सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात येत असल्यामुळे  सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.                                                      

त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ यास दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापुढे आमचे लक्ष्य प्रत्येक पेट्रोलपंपावर लावण्यात आलेले प्रधानमंत्री मोदी यांचे  फ्लेक्स असतील, एवढे लक्षात असू द्यावे असा खणखणीत इशारा यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. 

या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुरेखा जाधव, अल्पसंख्यक महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, देवकन्या गाडी संध्या सूर्यवंशी यांच्यासह इतर कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक/मालक असोसिएशनची बैठक संपन्न

उस्मानाबाद – 

      आज २७ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक/मालक असोसिएशनची बैठक श्री सिध्दीविनायक हाउस, छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबाद येथे पार पडली.सदरील बैठकीमध्ये संघटनात्मक तसेच व्यावसायिक अनेक विषयावर चर्चा झाली. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध रसायन मिश्रित बायोडिझेल च्या विक्रीबाबत सविस्तर चर्चा झाली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार पेट्रोल मध्ये इथेनॉलचे प्रमाण १० % येत आहे, यामुळे वाहनाच्या टाकीत असललेल्या पाण्याच्या संपर्कात येऊन इथेनॉल चे वेगळे रसायन तयार होऊन वाहन धारकांच्या तक्रारी येत आहेत तसेच व्यवसायातील अन्य काही अडचणी संदर्भात लवकरच शिष्ठमंडळ घेऊन मा.जिल्हाधिकारी यांची भेट घेण्याचे ठरले.

      यावेळी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक/मालक असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, बाळासाहेब क्षीरसागर, प्रशांत कुदाळ, गिरीश हंबीरे, अभिजित शेरखाने, वैभव उंबरे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.