Home Blog Page 255

बेंबळी ग्रामपंचायतच्या अपहार प्रकरणी ग्राम विकास अधिकाऱ्यांवर कारवाईचे विभागिय आयुक्तांचे आदेश

 

उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील बेंबळी ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोग व दलित वस्ती सुधार  निधीमध्ये झालेल्या एक कोटी ३८ लाख रुपयांच्या अनियमिततेप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश अपर विभागिय आयुक्त क्र. २ यांच्या न्यायालयाने पारित केले आहेत. तसेच तत्कालिन सरपंचांवर सुनावणी घेऊन कारवाई करण्याबाबतही बजावण्यात आले आहे.   यासंदर्भात पंचायत समितीस्तरावरून कारवाईला टाळाटाळ होत असल्यामुळे विभागिय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती.
बेंबळी येथील शिवसैनिक शामसुंदर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यामध्ये बेंबळी ग्रामपंचायतीला प्राप्त १४ व्या वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेच्या  निधीमध्ये अपहार व अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. एच. देशमुख यांनी चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. या अहवालात नमुद केल्यानुसार ग्रामपंचायतने  वित्त आयोग व दलित वस्तीच्या निधीतून विविध विकास कामांसाठी एक कोटी २४ लाख १० हजार ४९१ रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये पाणीपुरवठा कामासाठी १२ लाख खर्च केला असून यामध्ये बेकायदेशिर फोड करण्यात आली आहे. तसेच याचे ई टेंडर न केल्यामुळे अनियमितता झाली आहे. रस्ते बांधकाम कामात ५४ लाख ७७ हजार ८२० खर्च दाखवण्यात आला आहे. परंतु, यामध्ये केवळ १७ लाखांचे अंदाज पत्रक तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. शाळा दुरूस्तीसाठी आठ लाख ८७ हजार खर्च करण्यात आले आहेत. याचाही तपशिल सादर करण्यात आलेला नाही. पाणीपुरवठा पंप खरेदी,आरोग्य विद्युतीकरण आरओ प्लांट, पाणी पंप दुरूस्ती, अंगणवाडी लाईट फिटींग, खेळणी, टीव्ही खरेदी, फर्निचर खरेदीचे कागदपत्र तपासणीसाठी देण्यात आलेले नाहीत. विद्युतीकरणाच्या कामावर १२ लाख, रस्ता दुरूस्तीसाठी सहा लाख, स्टोन क्रशरसाठी सहा लाखांची बिले दिले आहेत. परंतु, यामध्ये कसलीही नियमानुसार कारवाई न केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
दलित वस्ती सुधार योजनेतून १४ लाख पाच हजार ७८५ रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. यामध्ये सात लाख ७६ हजार खर्च कसा वर्ग केला, याचा बोध होत नसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. फोड करून नियमबाह्य कामे करणे, कागदपत्र सादर न करण्याबाबत ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात शिवसैनक शामसुंदर पाटील यांनी विभागिय अायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अपर विभागिय आयुक्त क्र. २ च्या न्यायालयाने तत्कालिन सरपंचांची सुनावणी घेऊन तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांवर नियमानुसार थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक जनमत ८ जानेवारी E पेपर

 

दैनिक जनमत ७ जानेवारी ई पेपर

 

रेवनाळचे सरपंच पाटील यांनी अविश्वास ठराव जिंकला; काँग्रेसकमिटीने केला सत्कार

 

जत:प्रतिनिधी:जत तालुक्यातील रेवनाळ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त  सरपंच धनाजी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.शुक्रवार दि.१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.यामध्ये १६ मतांची आघाडी घेत सरपंच पाटील यांनी अविश्वास ठराव जिंकला. विजयानंतर जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विक्रमदादा सावंत व पदाधिकाऱ्यांनी सरपंच पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

      याबाबत अधिक माहिती अशी की,रेवनाळ ग्रामपंचायतची निवडणूक २०१७मध्ये झाली.त्यावेळी धनाजी पाटील यांचा   लोकनियुक्त सरपंच म्हणून विजय झाला होता.   त्यांच्या गटाचे ४ सदस्य निवडून आले. गावाचा कारभार चांगला चालला होता.मात्र गावातील भाजपा व राष्ट्रवादी नेत्यांनी  सरपंचाच्या गटातील सदस्यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले.त्यामुळे अविश्वास ठराव डिसेंबर 2020 मध्ये पारित केला.हा  ठराव जिल्हा अधिकारी यांच्या कडे पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी परत लोकनियुक्त सरपंचाच्या पदाविषयीचा निर्णय गावातील जनतेने मतदान प्रक्रिया  घेऊन करावा असे आदेश दिले. त्याप्रमाणे दि.१ जानेवारी २०२१ ला निवडणूक घेण्यात आली. गावातील नागरिकांनी  मतदान केले.त्यामध्ये परत विद्यमान सरपंच धनाजी पाटील १६ मतांनी आघाडी घेऊन निवडून आले.

       यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले.  गावातील काही माजी जि.प. व पं.स.सदस्य आणि  ग्रामपंचायत ९ सदस्य इतके मातब्बर  नेते असताना राष्ट्रीय काँग्रेस च्या कार्यकर्त्यानी मोठी ताकत लावली. विद्यमान सरपंचांच्या बाजूने कौल दिला. या निवडणुकीत काँग्रेसची ताकत जनतेने दाखवून दिली. यामुळे तालुक्यातील होणाऱ्या  ग्रामपंचायत निवडणुकीवर याचा  चांगला परिणाम होणार असल्याची  भावना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

      यावेळी सरपंच धनाजी पाटील यांचा जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विक्रमदादा सावंत , जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब  कोडग यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

जत तालुक्यात ३० ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे.या पार्श्वभूमीवर रेवनाळ येथील सरपंच धनाजी पाटील यांनी अविश्वास ठराव जिंकला.यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल असल्याचे चित्र असून  रेवणाळच्या या राजकीय घडामोडीत माजी सभापती बाबासाहेब कोडग हे किंगमेकर ठरले आहेत.नवीन वर्षात कोडग यांनी काँग्रेसला न्यू इयर गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे.

सराफाला धाक दाखवून लूटणारा पोलिसांच्या ताब्यात

 

एकाला अटक, तिघांचा शोध सुरु ; सपोनि केंद्रेच्या पथकाला यश

कुर्डूवाडी दि.०१(प्रतिनिधी)

कुर्डूवाडीतील २ व्यापाऱ्यांना पिस्तुलासह शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करून फसलेल्या ४ फरारी आरोपींसह मदतनीसचा पर्दाफाश करून १ ला पकडण्यामध्ये तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे सह पथकाला यश आले आहे त्या अरोपीस दि.३ जाने पर्यत ४ दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे यामध्ये पुण्यातील सराईत गुन्हेगारांपैकी ३ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत यांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३ /१२ /२०२० रोजी घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेबाबत तसेच दि ९/ १२ /२०२० रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथील गुन्हा दाखल क्रमांक ४५३/२० भादवि कलम ३९२,५११,३४ मधील गोपनीय माहितीचे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग निष्पन्न केलेला आहे.

या दाखल गुन्ह्यांमध्ये पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश विजय गायकवाड,मनोज हाडे,अशोक कसबे यांनी किशोर उर्फ आप्पा बाळू ढवळे वय २४ वर्ष रा- कुर्डूवाडी याच्या मदतीने कुर्डूवाडी तील सराफ व्यवसायिक शुभंकर पाठक याचे डोळ्यात मिरची पूड टाकून प्रसंगी कोयत्याचा व पिस्तुलीचा वापर करून लुटण्याची योजना आखून योजना प्रत्यक्षात आमलात आणली होती.सदर आरोपींचा प्रयत्न फसल्याने आरोपींनी पोबारा केला होता सदरची योजना आखण्यापूर्वी आरोपी ४ दिवस कुर्डूवाडी शहरात गोपनीय ठिकाणी वास्तव्य करून रेकी करीत होते.

दि. १६/११/२०२० रोजी संध्याकाळी चे सुमारास सराफ व्यवसायिक विशाल भारत पुरवत यांनाही पिस्तूलीचा,शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे.या घटनेमध्येदेखील सदर आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे अटक आरोपीचे नाव किशोर उर्फ आप्पा बाळू ढवळे वय २४ वर्ष रा- कुर्डूवाडी उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत

डॉ. विशाल हिरे उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांचाकड़े तपास सूत्र दिली यावर पोलीस डिटेक्शन टीम ने तपासी अधिकारी सह पोलीस शिपाई दत्ता सोमवाड,सागर गवळी संभाजी शिंदे, सोलापूर सायबर क्राईम चे अन्वर आतार व पोलीस शिपाई माळी याांनी ही मोहीम फत्ते केली या सर्वांचे शहर परिसरातील व्यापारीतून कौतुक होत आहे