Home Blog Page 229

दैनिक जनमत ०९ ऑगस्ट २०२१ E paper

महापुरामध्ये जीव धोक्यात घालून विज चालू करणाऱ्यांचा शिवसेनेने केला सन्मान

गांधीनगर ( प्रतिनिधी )

पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी वीज वितरण कंपनीच्या उचगाव व गांधीनगर येथील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून विजपुरवठा चालू केल्याबद्दल करवीर शिवसेनेनेच्या वतीने सलाम ठोकून सन्मान केला.

वीज वितरणचे उचगाव येथील कर्मचारी किरण कोळी, विशाल ठाकूर व गांधीनगर येथील कर्मचारी नितीन कांबळे, अमित चौगुले,  अमित पवार, सुनील खटावकर, सुशील कांबळे या कर्मचाऱ्यांनी महापुराच्या पाण्यात उतरून विजेच्या पोलवर चढून अनुक्रमे उंचगाव व गांधीनगर येथील वीज पुरवठा पूर्ववत चालू केला. जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल तमाम जनतेच्या वतीने करवीर शिवसैनिकांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.

  अशा धाडसी लोकसेवकांचा आदर्श सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले. उचगावचे शाखा अभियंता रघुनाथ लाड  व गांधीनगरचे शाखा अभियंता अतुल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरणच्या या सहा कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही. 

यावेळी  युवासेनेचे विनायक जाधव, संतोष चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, महेश खांडेकर, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, विराग करी, महादेव चव्हाण, बाळासाहेब नलवडे,  सचिन नागटीळक व प्रफुल्ल घोरपडे, फेरीवाले संघटनेचे कैलास जाधव, दत्ता फराकटे, अजित चव्हाण, अजित पाटील, बंडा पाटील, दत्तात्रय विभुते, नितीन कांबळे यांनी उचगाव येथील वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

काटेगाव येथील पहिल्या आयएसओ अंगणवाडीची ३ वर्षातच दुरावस्था

 

काटेगाव (नितीन गाढवे)          

      बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील ISO अंगणवाडीच्या सिमेंट कांक्रीट छताचे प्लास्टर ढासळे आहे  व आतील बाजूस भिंतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत आतील बाजूस असणाऱ्या छताचे प्लास्टर फुगले आहे त्यामुळे ते छताचे प्लास्टर पावसाळ्यात कधीही कोसळू शकते,सुदैवाने लॉक डाऊन असल्यामुळे शाळा बंद आहेत त्यामुळे होणारा अपघात टळला परंतु काटेगाव ग्रामस्ता कडून या अंगणवाडीत आपली मुले पाठवण्यास पूर्वीपासूनच विरोध आहे त्याचे कारण हि तसेच आहे या पूर्वी ची अंगणवाडी मारुती मंदिराजवळ होती ,आता जी नवीन अंगणवाडी बांधण्यात आली आहे ती म्हणजे नदीच्या वरच्या बाजूस आहे व  अंगणवाडी शेजारीच मोठी गटार आहे या गटारीतून पावसाळ्यात नदी नाल्या सारखे पाणी वाहते यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ISO अंगणवाडीच्या उद्घाटन समारंभाला तत्कालीन गटविकास अधिकारी गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता ,परंतु सध्या परिस्थिती पाहता मुलांकडे व अंगणवाडी कडे कोणाचे लक्ष्य आहे कि नाही असा सवाल पालक वर्ग विचारत आहे,या संदर्भात पालकांनी गटविकास अधिकारी यांना तक्रारी अर्ज करणार असल्याचे सांगितले. ज्यावेळेस छताचे प्लास्टर पडले होते या मध्ये मुलांची काही दुर्घटना झाली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार होते असा प्रश्न आता पालकवर्ग विचारत आहे.

      परंतु ३ वर्षा मध्येच अंगणवाडीची दुरवस्था होण्यास सुरुवात होणे म्हणजे कामात झालेला गहाळ पणा दर्शवित आहे,यावर वरिष्ठ अधिकारी आता काय कार्यवाही करणार याकडे सर्व काटेगाव ग्रामस्थाचे लक्ष्य लागले आहे.

जयंती साजरी करण्याच्या वादातून झालेल्या मारामारीत तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू

 कुंडल  (प्रतिनिधी)

दुधोंडी (वसंतनगर)ता.पलूस येथे शाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याच्या वादातून झालेल्या मारामारीत सनी आत्माराम मोहीते ( वय 27),अरविंद बाबूराव साठे (वय 45 ),विकास आत्माराम मोहीते (वय 32)सर्व रा.दुधोंडी या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.तसेच संग्राम विकास मोहीते (वय 17),आकाश आत्माराम मोहीते (वय 28),दिलीप आनंदा साठे (वय 42) सर्वजण राहणार दुधोंडी,ता.पलूस या जखमींना शासकीय रूग्णालय,सांगली येथे उपचारासाठी दाखल केले आहे. 

 याबाबत कुंडल पोलीसांतून मिळालेली माहीती अशी,शनिवार दिनांक 31 जुलै 2021 रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यावरून  दोन गटात किरकोळ वाद झाला होता. या वादाची खोटी तक्रार कुंडल पोलीसांत   का दिली या कारणांवरून आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान संशयित आरोपी प्रविण विलास मोहीते,अदित्य विलास मोहीते,हिम्मत मधुकर मोहीते, विजय मधूकर मोहीते,किशोर प्रकाश मोहीते, वनिता विलास मोहीते,संगिता मधुकर मोहीते,मधूकर धोंडीराम मोहीते यांनी आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली असे म्हणत शिवीगाळ व मारहाण  करण्यास सुरूवात केली.या झालेल्या मारामारीत संशयित आरोपींनी धारदार शस्रे,लोखंडी पाईप,काठ्या घेत तुम्हाला मस्ती आहे.आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली.यातील सनी मोहीते,अरविंद साठे,विकास मोहीते यांच्या छाती,पोटावर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात अतिरक्तस्राव झाल्याने आरोपींनी पलायन केले.सर्व जखमींना स्वप्निल साठे व त्यांच्या मित्र,नातेवाईकांनी दुचाकीवरून पलूस येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिका-यांनी प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.मात्र सनी आत्माराम मोहीते, अरविंद बाबूराव साठे,विकास आत्माराम मोहीते यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागून अतिरक्त स्राव झाल्याने मयत झाल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले.तसेच इतर जखमींवर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत स्वप्निल अरविंद साठे यांनी कुंडल पोलीसांत फिर्याद दिली आहे.संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तासगाव पालिकेचा फुटपाथवर गाळे बांधण्याचा विषय पत्रिकेवर न घेता ठराव, विरोधकांच्या कडून जिल्हाधिकारी यांच्याकडे ३०८ दाखल करण्यात येणार

नागरिकांसहीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचा प्रखर विरोध

सत्ताधारी भाजप विरोधात सर्व पक्ष व नागरिक एकवटणार बेकायदेशीर ठराव हाणून पाडणार


तासगाव प्रतिनिधी/ राहुल कांबळे

तासगाव शहरामध्ये प्रशासकीय इमारती कडील रस्त्यावर क्रीडा संकुल असून त्यालगत एक सुंदर फुटपाथ बांधण्यात आला आहे. त्या फूटपाथवर ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक व महिला सायंकाळी व्यायामासाठी येत असतात तेथे लावण्यात आलेल्या झाडाच्या सावलीखाली नागरिक विश्रांती घेत असतात, तेथे एक शाळा आहे हा सदरचा रस्ता दीडशे दोनशे मीटर प्रशस्त आहे. पुढे वृंदावन कॉलनी असून त्या फुटपाथवर पालिकेने १५ लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केले आहे परंतु तासगाव नगरपालिकेतील भाजपचे सत्ता सत्ताधारी मंडळींनी चार पाच महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐन वेळच्या विषयात हा विषय घुसडूण त्या सुंदर फुटपाथवर दहा फूट लांबी-रुंदीचे पत्र्याचे तीस ते पस्तीस गाळे बनवण्याचा घाट घातला आहे त्या फुटपाथवर चार दिवसापूर्वी खोक्याचे मार्किंग ही करण्यात आले आहे त्या वेळी स्थानिक नागरिक व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस  व शिवसेनेचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत काँग्रेसने तर नगरपालिकेत तक्रार दाखल करीत तालुका अध्यक्ष महादेव पाटील, रवी शेठ साळुंखे अजय पवार शरद शेळके यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे ३०८ दाखल करण्याची तयारी केली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव नगरपालिकेतील गटनेते नगरसेवक बाळासाहेब सावंत, अभिजीत माळी, तानाजी पवार वैभव भाट,शहराध्यक्ष एॅड.गजानन खुजट, अभिजीत पाटील, कमलेश तांबेकर अमित पवार स्वप्नील जाधव, राहुल शिंदे,अक्षय धाबुगडे,सौ नलिनी पवार शुभांगी साळुंखे सौ पुनम माळी व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, विशाल शिंदे, सुशांत पैलवान, कृष्णा म्हेत्रे व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी क्रीडा संकुलाला लागत असलेल्या फुटपाथवरच शनिवारी सायंकाळी एकत्र येत आपल्या त्या खोक्यांना असलेल्या विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.सदरचा ठराव रद्द न केल्यास एकत्रित होऊन तासगाव नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी क्रीडा संकुल शेजारी असलेल्या वृंदावन कॉलनीतील नागरिक बापू धोत्रे, रंगा बापू धोत्रे,नारायण धोत्रे रघुनाथ पाटील, फाळके साहेब, इत्यादी सह नागरिक उपस्थित होते.मुळात हा सुशोभित केलेला फुटपाथ पालिकेच्या मालकीचा आहे किंवा  क्रीडा संकुलाचा भाग आहे हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे सत्ताधारी मंडळी चे म्हणणे आहे की ही जागा पालिकेची असून तेथे बोंड राईटर,अपंग व्यक्ती,आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या तरुणांना रोजगारासाठी हे गाळे बांधणार असल्याचे थातुरमातुर उत्तर देण्यात येत आहे मुळात शहरात पालिकेचे मालकीचे अनेक शेकडो गाळे धूळ खात पडतात पडून असून अनेक जागा विकसित न करता पडून आहेत उदा. सांगली नाका येथील म्हेत्तर वसाहत त्याकडे मात्र पालिकेच्या सत्ताधारी मंडळींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे परंतु चांगल्या स्वच्छ व सुंदर फुटपाथवर गाळे बांधून पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे  की ठेकेदाराचे उखळ पांढरे करणार आहेत हा विषया बद्दल तासगावात नागरिकांच्या मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. परंतु या गाळ्याना मात्र भाजप सोडून सर्व पक्षांचा व नागरिकांचा प्रखर विरोध असून पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी मंडळींना सुचलेली ही दुर्बुद्धी आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी या फुटपाथवरच पत्रकार परिषद घेत आपली तीव्र विरोधाची भूमिका स्पष्ट केली असून यात आमदार सुमनताई पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे ज्या उद्देशाने स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी क्रीडा संकुल उभे केले आहे त्या क्रीडा संकुलाच्या बाहेर बेकायदेशीरपणे गाळे उभा करून मूळ उद्देशात भाजपची सत्ताधारी मंडळी बहुमताच्या जोरावर हरताळ फासू पाहात आहेत परंतु त्यास सुरु असलेला तीव्र विरोध पाहता आहे ही चालू असलेली ठेकेदारी पोसण्याचे कटकारस्थान सत्ताधारी भाजपची भूमिका तासगाव शहरातील सुज्ञ नागरिक हाणून पडल्याशिवाय राहणार नाहीत सत्ताधारी पक्षाचे नेते खासदार संजय काका पाटील हे नागरिकांचा विरोध असलेल्या कामाला स्थगिती देणार का व सत्ताधारी नगरसेवक मंडळींचे कान उपटणार की नाही याकडे तासगाव शहरातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी लक्ष घातल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यासंदर्भात लवकरच ते मा. जिल्हाधिकारी सांगली व पालक मंत्री यांना शिष्टमंडळासह भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.