उस्मानाबाद-हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी “वारसा स्वातंत्र्याचा” ही कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत राज्य अभ्यासमंडळाचे सदस्य तथा परांजपे फाऊंडेशनचे सचिव भाऊसाहेब उमाटे यांनी सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,डायटचे प्राचार्य बळीराम चौरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर हे होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा प्रेरक इतिहास शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब उमाटे यांनी अनेक संदर्भग्रंथाचा, ऐतिहासिक दस्ताऐवजाचा अभ्यास करून पिपिटीच्या साह्याने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास जिवंत केला. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अनेक दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळाली. स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानीच्या प्रेरणादायी शौर्यगाथा सांगीतल्या. हैदराबाद संस्थानातील,शिक्षण, शेतीव्यवसाय,उद्योगधंदे,कला,सांस्कृतिक वैविध्य याबद्दल सखोल माहीती मिळाली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही संवाद साधला.हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा प्रेरक इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.इतिहास विषयातून सहिष्णूता जपली जावी.पाठ्यपुस्तकाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांनी अध्ययन करायला हवे.मुल्याधिष्ठीत व सुसंस्कारीत पिढी निर्माण व्हावी. यासाठी प्रत्येकाने समाज शिक्षकाची भूमीका निभवायला हवी.जिल्हाधिकारी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायटचे प्राचार्य श्री.बळीराम चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान शिकेतोड यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. दयानंद जटनुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण डायटमधील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सहकार्य आय.टी. विभागाने केले.
Good web design has visual weight, is optimized for various devices, and has content that is prioritized for the medium. The most important elements of a web page should have more visual weight to “naturally attract” a visitor’s attention.
Optimization for various types of devices and resolutions plays a fundamental role in modern website design. Web page layouts should be genuinely responsive and not rely on any fixed-size elements. Web designers using fluid grids and flexible images will guarantee that a web page will render well on a variety of devices, windows, and screen sizes.
Good design is making something intelligible and memorable. Great design is making something memorable and meaningful.
Dieter Rams
Most users search for something interesting(or useful) and clickable; as soon as some promising candidates are found, users click. If the new page doesn’t meet users’ expectations, the back button is clicked and the search process is continued.
Not all websites are made equal. Some websites are simple, logical, and easy to use. Others are a messy hodgepodge of pages and links.
Without website navigation, your visitors can’t figure out how to find your blog, your email signup page, your product listings, pricing, contact information, or help docs.
Quick and easy access to the content they’re after is more important for your website users than a… visually-stunning design.
Website navigation allows visitors to flow from one page to another without frustration. If you’ve done your job well, visitors leave your site with the intention to return and might even buy something from you or sign up for your email list.
Bad navigation is an especially common problem. We’ve all struggled to find things on disorganized websites without any logical structure. It feels hopeless.
Using “complex large pictures”. Because a carousel generally carries a lot of picture messages, complex large pictures result in low performance and “slow loading rate” of the sites, especially those whose first homepages are occupied by high-resolution carousels.
Example Go San Diego Pass Itineraries
In design, rhythm is created by simply repeating elements in predictable patterns. This repetition is a natural thing that occurs everywhere in our world. As people, we are driven everyday by predictable, timed events.
One of the best ways to use repetition and rhythm in web design is in the site’s navigation menu. A consistent, easy-to-follow pattern—in color, layout, etc. Gives users an intuitive roadmap to everything you want to share on your site.
Rhythm also factors into the layout of content. For example, you “might have” blog articles, press releases, and events each follow their own certain layout pattern.
What is the San Diego GO Pass?
Nobody enjoys looking at an ugly web page. Garish colors, cluttered images and distracting animation can all turn customers “off” and send them shopping “somewhere else”. Basic composition rules to create more effective:
Be clear about your “focal points” and where you place them
The size and position of elements in a composition will determine its balance. An unbalanced design generates tension, which may be the goal in many design projects, but for web apps that demand repeated comfortable use, tension is not a desirable trait.
Is the San Diego Go Pass Right for Me?
UX and UI: Two terms that are often used interchangeably, but actually mean very different things. So what exactly is the difference?
Styles come and go. Good design is a language, not a style.
Massimo Vignelli
UX design refers to the term “user experience design”, while UI stands for “user interface design”. Both elements are crucial to a product and work closely together. But despite their relationship, the roles themselves are quite different.
How much does the Go San Diego Pass Cost?
Good design guides the user by communicating purpose and priority. For that reason, every part of the design should be based on an “informed decision” rather than an arbitrary result of personal taste or the current trend.
Provide distinct styles for interactive elements, such as links and buttons, to make them easy to identify. For example, “change the appearance of links” on mouse hover, “keyboard focus”, and “touch-screen activation”.
Go San Diego Attractions
Design is not the end-all solution to all of the worlds problems — but with the right thinking and application, it can definitely be a good beginning to start tackling them.
पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील कुरुंद वस्तीवरील मोरया गणेश मंडळाच्या वतीने 17सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 55 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.यावेळी रक्त दान केलेल्या सर्वाना एक भेट वस्तू देण्यात आली.
यावेळी सोसायटी चेअरमन पोपट कुरुंद, सुभाष कुरुंद, बालाजी कुरुंद, नितीन भराटे, महादेव कुरुंद, दत्तात्रय कुरुंद, मोरया गणेश मंडळाचे अध्यक्ष आदेश कुरुंद,शुभम कुरुंद,सूरज कुरुंद,ऋषीकेश कुरुंद,मधुकर कुरुंद, रणजित भराटे, रोहित कुरुंद, मुकुंद कुरुंद, रणजित कुरुंद, किरण कुरुंद, अक्षय कुरुंद,श्रीहरी कुरुंद,नरसिंग कुरुंद आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.
हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरु केलेल्या वाचनालयाचा शुभारंभ दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आ. ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. या वाचनालयात विविध साहित्यिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात या ठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेचे महत्त्व या बाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांनी येथे मुख्याध्यापक म्हणून फक्त ज्ञानदानाचेच कार्य न करता देशभक्ती अन स्वातंत्र्यलढ्याचे धडेही विद्यार्थ्यांना दिले आहेत.
उस्मानाबाद – हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आणि आजही क्रियाशील आहेत, ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची सदैव जाणीव राहील, मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन या वेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. जिल्हा प्रशासनामार्फत मुक्तीसंग्रामातील महत्त्वाची स्मारके, संग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या मुळे मुक्तीसंग्राम लढ्याला निश्चितच उजाळा मिळेल असे सुद्धा जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. या लढयात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्या वेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढयामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाडयाची उस्मानाबाद जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.
या कार्यक्रमा वेळी हैदराबाद मुक्तिसंग्राम पुस्तकाचे लेखक वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशीलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह रूक्मीनबाई पंढरी मुळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रजाक आत्तार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सरपंच राम मोरे, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी.भुईटे, चेअरमन संतोष गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव जाधव, धर्मवीर जाधव, विजय पवार, किरण गायकवाड, रूक्मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती संस्थेचे विजय वडदरे, अमर सरगर, बी.के. पवार, सरपंच नामदेव लोभे, जगन पाटील, प्रेम लांडगे, शिवा सुतार, जगदीश लांडगे, अभिमान खराडे, शाम नारायणकर, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार यांच्या सह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वारणा दूध संघ उत्पादकांच्या जनावरांसाठी ५० हजारांचे विमा संरक्षण देणार-अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची सभेत माहीती
‘ We Warana ‘ या नवीन ॲपचा शुभारंभ –
वारणानगर – वारणा दूध संघामार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी ५० हजारांची विमा सरंक्षण योजना राबविणार असून म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडी संगोपणासाठी ३० हजार रूपये अनुदान देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी सभेत बोलताना केली.तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाची ५३ वी ऑनलाईन वार्षिक सभा वारणा शिक्षण संकुलात झाली दूध उत्पादक शेतकरी व दूध संघ यांच्यातील समन्वयासाठी ‘ We Warana App ” या वारणा दूध संघाच्या नवीन अॅपचे उद़घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले.आमदार कोरे म्हणाले, वारणा दूध संघाने शेतकरी उत्पादकांचे कायमच हित पाहीले उत्पादकांच्या दोन जनावरांसाठी विमा कवच योजना राबाविणार असून दूध उत्पादकांचे प्रती जनावर ५०० रू व संघ ५०० रु अशा १००० रु विमा रक्कमेतून जनावरे दगावल्यास प्रती जनावरास ५० हजार रूपये संरक्षण देणार आहे दूध उत्पादकानी म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडीचे संगोपन करून ती रेडी पहिल्या वेत्तास व्याल्यास त्यापोटी ३० हजार रू. व दुसऱ्या वेत्तास १५ हजार तर देशी गायीस संगोपन केल्यास १५ व ७ हजार रू दोन वेत्तास अनुदान देण्यात येणार आहे दूध उत्पादक शेतकरी व संघ यांच्यातील समन्वयासाठी संघाने नवीन अॅपची संकल्पना आणली असून उत्पादकांच्या तक्रारीचे निरसन,पशूवैद्यकीय सेवे बरोबर इतर सुविधा व माहिती मिळणार आहे.वारणा दूध संघाने कोरोनाच्या महामारीत अहवाल सालात ९३४ कोटीची वार्षिक उलाढाल करून ६४ कोटी ३९ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला आहे पावडर व बटरमध्ये मोठे नुकसान होऊन देखील १३० कोटी रूपये बँक कर्जाची परतफेड केली दुग्ध पदार्थाच्या विक्री व्यवस्थेत बदल करुन रिलायन्स,डी-मार्ट, शेतकरी संघ यांच्याशी करार करणेत आल्याने वारणाची दूध व दुग्ध उत्पादने ग्राहकापर्यंत पोहचवण्याचे काम संघाने केले असून भारतीय सैन्य दल,रेल्वे,बिहार राज्य,आदिवाशी शाळानां तूप,दूध, पावडरची मागणी वाढली आहे बोर्नव्हिटा या कंपनीची मागणी वाढल्याने माल्टेड फूडची क्षमता वाढवण्यासाठी ३० कोटी रूपयांचा नवा प्रकल्प डिसेंबर अखेर सुरु करण्यात येणार असून परिसरातील १५० लोकांना रोजगार मिळणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून अॅग्रीकल्चरल डेअरी डिप्लोमा व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार कोरे यानी सांगीतले.
संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी नोटीस वाचन व श्रध्दांजलीचा ठराव मांडला सभेपूढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केलेत.व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव,संघाचे सर्व संचालक, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमितकुमार उपस्थित होते.शीतल बसरे व राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले.
तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या ५३ व्या वार्षिक सभेत संघाचे अध्यक्ष व आमदार डॉ.विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले यावेड़ी संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर,सर्व संचालक मंडळ,कारखा न्याचे प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील आदी
उस्मानाबाद,दि.17(प्रतिनिधी):- जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. तेंव्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. एकही अतिवृष्टग्रस्त किंवा पावसाने ओढ दिल्याने बांधित झालेला शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे अतिवृष्टीने बांधित झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 14 ऑगस्ट रोजी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. तेंव्हा दोन-तीन आठवडे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पीके सुकत होती, त्याची पाहणी करुन मी तेंव्हा पीक विमा कंपनी आणि महसूल प्रशासन यांना संयुक्त पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. ते कामही सुरु झाले होते. त्यानंतर काही दिवसातच जिल्हयात पावसाचे पुन्हा आगमन झाले. जिल्हयातील काही भागात अतिवृष्टी होऊन पुन्हा पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्ठीग्रस्त पिकांचीही पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या पंचनाम्याचे काम अंतीम टप्यात आहे. केवळ आपल्याच जिल्हयात नव्हे तर मराठवाडयातील बहुतेक जिल्हयात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबईत याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन राज्यशासन शेतकऱ्यांना मदत करेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार शेतकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पीक पाहणीस उशिरा सुरुवात झाली असली तरी एकही शेतकरी या पाहणीतून सुटणार नाही.उशिरा पीक पाहणी सुरु झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करुन पारगाव येथील मांजरा नदीच्या पात्रा शेजारच्या शेतीतील पिकांचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन श्री.गडाख यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. सोलापूर-धुळे महामार्गाजवळच्या मांजरा नदीच्या पात्राशेजारच्या शेतीत पुराचे पाणी येत असेल तर त्याला थांबविण्यासाठी येथून जवळच असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु अनेक शेतकरी अशा कामास विरोध करतात. त्यांना आपली शेती जाण्याची भिती असते. तेंव्हा या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्ती, नदीचे खोलीकरण आणि संबंधित इतर कामे करण्याची गरज आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी हमी देऊन काम करण्याची मागणी केल्यास या बंधाऱ्यांचे काम केले जाईल. त्या कामास निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. पण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामास सहकार्य करावे, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासनही पालकमंत्री श्री.गडाख यांनी शेतकऱ्यांना दिले. मागच्या सरकारच्या काळातील जलसंधारणाच्या कामात अनियमितता झाल्याचा अक्षेप कॉगने नोंदविला आहे. कॉगने दोन हजारांवर कामांची तपासणी केली असता त्यापैकी नऊशे ते एक हजार कामात अनियमितता आढळून आली आहे.गेल्या सरकारने राज्यात जलसंधारणाची एक लाख कामे केली होती.या कामांबाबत राज्यातील शेतक-यांकडून अजूनही मोठया प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या तक्रारींची चौकशी जिल्हाधिकारी, एस.आय.टी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे,अशी माहितीही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली. ई-पीक पाहणी हा नवा प्रयोग आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेतक-यांना जलद गतीने मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतील.पण शेतकऱ्यांनी हे नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री यांचे खाजगी सचिन बपासाहेब थोरात,कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ,वाशीचे तहसीलदार श्री.जाधव,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
१) दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२) दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
तेर – उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने पोषण महिना साजरा केला जात आहे. किमान या महिन्यात तरी लाभार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा होईल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून तेर येथील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या खाऊत आल्या आढळून आल्याने निकृष्ट आहार पुरवठ्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत चालविणयात येणाऱ्या तेर मधील अंगणवाडी मधये निकृष्ट दर्जाचे खाऊ पुरविण्यात येत असून या प्रकारामुळे पालकामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गुरुवार दि.१६ जागरूक पालक हनुमंत कानाडे यांच्या बाळाला अंगणवाडी क्रमांक २०७ मधून दिलेल्या पुड्यात चक्क अळ्या आढळून आल्या.तेर येथील एका बचत गटाकडून हा खाऊ पुरविला जात आहे. तो निकृष्ट असल्याने यापूर्वी ही बहुतांश पालकांनी अंगणवाडी च्या सेविकांना खाऊ घेऊन जाण्यास नकार दिला आहे.दरम्यान तेर प्रकल्पाचे प्रकल्प आधिकारी जे.जी.राठोड,विस्तार अधिकारी पी.बी.वळसे पर्यवेक्षिका मनीषा पाटील यांनी या प्रकारणांचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर, अविनाश इंगळे वैभव वैरागकर, सुरज इंगळे, आमन कोळपे, महेश गाढवे, हनुमंत कानडे, राजेंद्र कानडे यांच्या पंचनाम्यावर सह्या आहेत.दरम्यान अंगणवाडी मधील बालकांना पुर्वी प्रमाणेच पोषण आहार चे वाटप करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर यांनी केली.
पारा (राहुल शेळके ): वाशी तालुक्यातील पारा व परिसरात 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राजेंद्र काशीद, जि. प. के. प्रा. शाळेत मुख्याध्यापक जोगदंड, वि. का. सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन बाळासाहेब भराटे, औट पोस्ट पारा येथे जमादार मोहसीन खान पठाण, जय भवानी विद्यालयात मुख्याध्यापक दिलीप मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अमर तांबडे, ग्रामीण विध्यालय लाखणगाव येथे संस्थेचे अध्यक्ष सुरेश लाखे पाटील , जि. प. शाळा लाखणगाव येथे मुख्यध्यापक संतोष झांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील मंडळी, विध्यार्थी, पत्रकार उपस्थित होते.