Home Blog Page 207

विटयात महिलेचा मनोरुग्ण पतीकडून खून,पतीला अटक


विटा (शिराज शिकलगार) विटा कराड रोड वरील शिवार धाब्याच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बिहार येथील कुटुंब वास्तव्याला होते सदर नरेश रघुवीर सहा हा युवक अनेक दिवसापासून आजारी व मानसिक संतुलन त्याची वारंवार बिघडत होती. किरकोळ कारणावरून नवरा बायकोचे सारखेच भांडण होत असल्याचे आजूबाजूला नागरिकातून घटनास्थळी  चर्चा होती .. कधी चांगला तर कधी मनोरुग्ण प्रमाणे हा नरेश वागत होता असेही त्या ठिकाणी नागरिकातून बोलले जात होतं. गेली दोन दिवस झालं. नरेश असा एकदम शांत होता परंतु चिडचिड करणे हा त्याचा स्वभाव होता या रागाच्या भरातच पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झालं यावेळी नरेश रघुवीर सहा याची पत्नी लीलावती देवी नरेश सहा वय 32 या दोघांमध्ये गुरुवारी सकाळी पुन्हा वाद झाला या वादाचे रूपांतर किरकोळ हाणामारी वर गेले पती पत्नीचे भांडण लागल्याचे आजूबाजूला काही आपापल्या घरा समोर उभा राहून आजूबाजूचे नागरिक पाहत होते. परंतु हे किरकोळ पती पत्नीचे भांडण वरच्या टोकाला गेल्याने आणि राग मनामध्ये धरलेला नरेश रघुवीर सहा वय 36 हे कुटुंब बिहारचे आहे विटा शहरांमध्ये कामानिमित्त काही महिन्यापूर्वी आल्याचे समजते नरेश यांचा तापट स्वभाव असल्याने तो वारंवार संतुलन बिघडल्या सारखेच वागत होता याच रागाच्या भरात सकाळी साडेसातच्या दरम्यान पुन्हा नवरा-बायकोमध्ये जोराचे भांडण झाले या भांडणांमध्ये रागाच्या भरात असणारा नरेश याने हातामध्ये चाकू घेऊन आपली पत्नी लीलावती देवी सहा यांच्या पोटामध्ये खूपसल्याने ती जागीच मृत्यू झाली.


 ही माहिती ्या परिसरात वार्‍यासारखी पसरली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा घात घडताच सुभाष सहा यांनी तातडीने विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली सदर या सर्व प्रकारची माहिती विटा पोलिसांना रीतसर तक्रार द्वारे दिली पोलीस विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी ज्या ठिकाणी या महिलेचा खून झाला त्याठिकाणी घटनास्थळी पाहणी केली यावेळी विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम  यांनी घटनास्थळी तातडीने पाहणी करून सदर आजूबाजूला थोडी माहिती घेतली. किरकोळ वादातूनच आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याने सदर जबर जखमी झालेली पत्नी तिला हॉस्पिटल मध्ये आणि घेऊन येताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची ही समजले.

तसेच लीलावती यांचा पती नरेश रघुवीर सहा हा वारंवार आजारी असल्याने बिहार येथे पत्नी लीलावती यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या अनुषंगाने आपल्या पतीस बिहार येथे परत नेण्यासाठी पत्नी बिहार येथून आपल्या तीन मुलींसह एक मुलगा घेऊन विटा येथे आले असताच बुधवारी रात्री या दोघांमध्ये घरातच किरकोळ वाद चालला होता असे तेथील नागरिकातून बोलले जात होते. किरकोळ वाद सकाळी झाल्याने या रागाच्या भरातच आरोपी नरेश रघुवीर सहा याने  घराकडे जाणारा रस्त्यावरच पत्नीवर हल्ला केला. हल्ला होताच काही तेथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.. तातडीने विटा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पत्नी वरती चाकूने हल्ला करणाऱ्या पतीला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्या खून झालेल्या परिसरामध्ये आजूबाजूला तातडीने काही माहिती घेतली. किरकोळ कारणावरून या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता या वादा मध्येच सदर मानसिकता संतुलन बिघडलेल्या पतीनेच आपल्या पत्नी लीलावती देवीचा खून केल्याचे समजले . सदर लीलावती देवी सह या खून झालेल्या महिलेला विटा शहरातील सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकेचे मधून हलवण्यात आले.. तोवर या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले… विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे साहेब यांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवून तात्काळ आरोपी नरेश रघुवीर सह वय 36 याला ताब्यात घेतले पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत.

खाद्यपदार्थ व फळ विक्रेत्यांना परवाना घेणे बंधनकारक

 उस्मानाबाद.30(प्रतिनिधी):अन्न व औषध प्रशासनातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर या कालवधीत अन्न परवाना आणि नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व किरकोळ आणि घाऊक अन्न व्यवसायिक,हॉटेल व्यवसायिक,फळ विक्रेते,मद्य विक्रेते,केटरर्स,शालेय पोषण आहार अंतर्गत अन्न पुरवठा करणारे,डेअरी व्यवसायिक,स्वीट मार्ट,फिर्ते आणि इतर अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार परवाना किंवा नोंदणी घेवूनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. 

     ज्या अन्न व्यवसायिकाची वार्षिक उलाढाल  12 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनी 100 रुपये प्रती वर्ष भरून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आणि ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांनी 200  प्रती वर्ष, उत्पादक असल्यास तीन हजार रुपये प्रती वर्ष भरून अन्न परवाना घेणे आवशयक आहे.व्यवसायिकांनी परवाना अथवा नोंदणी किंवा नुतनीकरणासाठी www.foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.नोंदणीसाठी अर्जदाराचा फोटो व आधार कार्ड,परवानासाठी अर्जदाराचा आधार कार्ड, जागेचा उतारा,भाडेपट्ट,ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा नाहरकत प्रमाणपत्र,दुकानाचा फोटो,ज्या ठिकाणी पाण्याचा वापर होतो. त्या पाण्याचा विश्लेषण अहवाल आवश्यक असेल.

  अन्न पदार्थ उत्पादक,घाऊक विक्रेते यांनी अन्न पदार्थ फक्त नोंदणीकृत किंवा परवानाधारकास विक्री करणे तसेच तसेच अन्न पदार्थ खरेदी करतांना फक्त नोंदणीकृत किंवा परवानाधारकाकडूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद शि.बा कोडिगिरे यांनी केले आहे. 

                              

दैनिक जनमत ३० सप्टेंबर २०२१ E paper

शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शासन आपल्या पाठीशी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन योग्य मदत केली जाईल – पालकमंत्री शंकरराव गडाख



उस्मानाबाद,दि.29(प्रतिनिधी):- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यातून आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्ह्यातील उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली. शेतकरी आणि नुकसानग्रस्थांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेऊन शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त नुकसानीची सरसकट पंचनामे करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवन गोरे,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,तहसीलदार गणेश माळी, इत्यादी उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री.गडाख यांनी आज उस्मानाबाद तालुक्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त दाऊतपूर, इर्ला, रामवाडी आणि तेर तर कळंब तालुक्यातील वाकडी (इस्थळ) आणि सौंदणा (आंबा) या गावांना भेटी देऊन पाहणी केली. श्री.गडाख यांनी दाऊतपूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानीबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.तसेच पशुधनाबाबत पंचनामे करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घ्यावी,अशी सूचनाही श्री.गडाख यांनी यावेळी केली.तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या लवकरात लवकर पंचनामे करावेत, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.

तालुक्यातील 42 सर्कल पैकी 35 सर्कल अतिवृष्टी झाली आहे. तसेच काही ठिकाणी काही सर्कलमध्ये 140 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विमा कंपन्यांना 72 तासांच्या आत पंचनामा किंवा तक्रार करण्याची अट शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी चिंता करु नये. त्यांना विम्याची रक्कम मिळेल, असे आश्वासनही श्री.गडाख यांनी यावेळी दिले.

कालपर्यंत जीवित हानी होऊ नये यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील होते आज पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. या अतिवृष्टीत फक्त पिकांचे नुकसान झाले नव्हे तर पशुधन आणि नदीकाठातील गावकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे एकूण किती नुकसान झाला आहे हे अद्याप निश्चित झालेले नसून पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानाची आकडेवारी समोर येईल. घरांची पडझड झालेल्या पूरग्रस्तांना आठ दिवसांच्या आत मदत करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पिकांच्या बाबतीत साधारणपणे संपूर्ण मराठवाड्यात अशीच अवस्था आहे पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे काही दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले

पालकमंत्री श्री.गडाख यांनी इर्ला येथे ग्रामस्थांशी चर्चा केली आणि येथील बाधित बंधाऱ्यावरचे आणि रस्त्याची पाहणी केली. गावाला शंभर केव्हीचे दोन डीपी आणि पाण्यासाठी टँकर चालू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.येथील रस्त्याचे आणि बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना निर्देश दिले. यानंतर त्यांनी इर्ला गावातील घरांचे आणि वस्त्यांची पाहणी केली. नुकसान झालेल्या घरांना लवकर मदत करुन यावेळी गावातील आगसखांड नाल्याचे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कळंब तालुक्यातील वाकडी (इस्थळ) आणि सौंदणा (आंबा) येथेही भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

रामवाडी येथील पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतांची आणि बंधाऱ्यांची पाहणी केली. याबाबत जलसंधारण विभागाला पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली, त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यांना दिलासा दिला आणि लवकरात लवकर आपल्याला नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले. सोयाबीन आणि ऊस ही पिके 100 टक्के नष्ट झाल्याने, शेतकऱ्यांना मावेजा किंवा मोबदला मंत्रिमंडळात चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना नुकसानीबाबत तक्रार केली नाही किंवा याबाबत त्यांचे पंचनामे झाले नाहीत,त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून विशेष पत्र विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे. सरसकट पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग, तलाठी आणि ग्रामसेवक हे पूर्ण गतीने कामं करतील.त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शासन त्यांच्या पाठीशी आहे,असा दिलासाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

३० सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  ३० सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस


       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक ३०  सप्टेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २०  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

        उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ३० सप्टेंबर  २०२१ रोजी  २०  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.


नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख, यांचा दि. २९ सप्टेंबर रोजीचा उस्मानाबाद दौरा,


उस्मानाबाद – स११.०० वा.-  दाऊतपूर, ता. उस्मानाबाद येथे आगमन व पूरग्रस्त भागाची पाहणी.

स.११.२० वा. इर्ला, ता. जि. उस्मानाबाद येथे आगमन व नुकसानग्रस्त पिकाची पाहणी.

स. ११.४० वा.ईर्ला येथून तेर, ता. जि. उस्मानाबाद कडे प्रयाण

दु. १२.०० वा.तेर, ता. जि. उस्मानाबाद येथे आगमन व (१) अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची पाहणी (२) ग्रामीण रुग्णालय, तेर येथे भेट (३) नुकसानग्रस्त पिकाची पाहणी.

दु.१२.२५ वा.तेर येथून वाकडी (इस्थळ), ता. कळंबकडे प्रयाण

दु.०१.२५ वा.वाकडी (इस्थळ) ता. कळंब येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी

दु.०१.४० वा.वाकडी (इस्थळ) येथून सौंदना (आंबा), ता. कळंबकडे प्रयाण

दु.०१.४५ वा.सौंदना (आंबा), ता. कळंब येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी

सोईनुसार सौंदना (आंबा) येथून अहमदनगरकडे प्रयाण



उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात जिल्हा प्रशासनास यश


एन.डी.आर.एफ.च्या टीमकडून 16 जणांचे बचाव कार्य यशस्वी



         उस्मानाबाद,दि.28(प्रतिनिधी):- जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे.आज जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीतीरावरच्या गावांत पाणी शिरले. काही गावांत ग्रामस्थ अडकून पडले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने ग्रामस्थांच्या बचावाचे कार्य सुरु केले. त्याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने एन.डी.आर.एफ.च्या टीमची मागणी केली त्याही टीमने पूरग्रस्तांच्या बचावाचे काम करुन 16 जणांचा बचाव करुन सुरक्षित स्थळी हलविले तर जिल्ह्यातील 459 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. 

मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे दि.27 सप्टेंबर 2021 रोजी उघण्यात आले. त्यामुळे धरणाखालील गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे तीन कुटुंबातील एकूण 20 व्यक्ती शेतातील घरामध्ये अडकली होती. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांची सुटका केली आहे. तेरणा नदीकाठी असलेल्या तेर,रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना शाळेमध्ये आणि इतर सुरक्षित ठिकाणी प्रशासनामार्फत हलवले आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केल्यानुसार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दाऊतपूर येथील शेतामध्ये अडकून पडलेल्या सहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यात चार मोठ्या माणसांचा तर दोन बालकांचा समावेश होता. तसेच कळंब तालुक्यातील सौंदणा येथील पुरामुळे अडकलेल्या 10 व्यक्तींना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची टीम आणि एक बोट तसेच एन.डी.आर.एफ. (NDRF) ची टीम तसेच तीन बोटीच्या माध्यमातून व हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथील अंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यात आज उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी 66.3,पाडोळी-81, केशेगाव-71, ढोकी-139.5, जागजी-123.8 तर तेर मंडळात 127.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-65.5, इटकळ-83.3, कळंब तालुक्यातील मोहा-66.3,शिराढोण-171, गोविंदपूर-107.5 तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात 69 मिलीमीटर पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली. 

जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबरच्या रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील 30 वर्षीय बालाजी वसंत कांबळे हे भंडारवाडी येथील पूलावरुन तोल जाऊन वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. जिल्ह्यात या अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड झाली आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा सतर्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रयत्नाने एन.डी.आर.एफ.ची टीम जिल्ह्यात वेळेत पोहचली. प्रथम एन.डी.आर.एफ.च्या 20 जवानांचे एक पथक वाहनाद्वारे आणि तीन बोटी घेऊन दाखल झाले. त्यांनतर हेलिकॉप्टरने आणखी एक टीम दाखल झाली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टीने व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने विशेष मदत द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील

 


उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबर, २०२१ मध्ये अतिवृष्टीने व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने विशेष मदत उपलब्ध करून देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यात अभूतपूर्व असा पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने हाहाकार माजविला आहे, अनेक गावात अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या अनुषंगाने मी अनेक गावांत जाऊन पाहणी केली असता पूर परिस्थितीमुळे या भागातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होवून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे खास करून सोयाबीन पिकाचे. काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असून ऊसा सारखे नगदी पिक देखील आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, गोठा, गावातील छोटे व्यावसायिक तसेच शेतीतील इतर नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते. रस्ते, पूल, बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचं देखील मोठे नुकसान झाले आहे.

१५ दिवसापूर्वी पिकांची परिस्थिती थोडी सुधारलेली होती त्यामुळे शेतकरी या हंगामात कांही प्रमाणात तरी उत्पन्न मिळेल या आशेवर बसले होते. मात्र पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने अजून भर पडली आहे. एकीकडे गत वर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नाही. चालू हंगामातील झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी पीक विम्याची अग्रीम मंजुरीचा आदेश काढून देखील अग्रीम निधी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने नुकसानीची व्याप्ती पाहता यावर चर्चा न करता सरसकट भरीव निधी देणे अपेक्षित आहे व ती तातडीने देणे योग्य राहील.


यावर्षी कोकणात तर २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात महापुर आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठीचे १ हेक्टरपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच नुकसानभरपाई म्हणून स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन दुपटीने नगदी स्वरूपात मदत केली होती.

सणासुदीचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. ऑक्टोबर, २०१९ मध्ये अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी असेच नुकसान केले होते. तेंव्हा औरंगाबाद येथे नुकसानीची पाहणी केल्यावर आपण सरकारला कोणत्याही अटी न ठेवता तातडीने हेक्टरी ₹ २५,००० ते ₹ ५०,००० मदत देण्याची मागणी केली होती. आता मुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आहेत त्यामुळे आपण त्वरेने शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्यावर्षी केलेल्या न्याय्य मागणीची पूर्तता करून “जे बोलतो ते करून दाखवतो” हा आपला बाणा सत्यात उतरवाल ही अपेक्षा आहे.


आपण पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेच्या पदरात या जिल्ह्यातील जनतेने नेहमीच मोठं माप टाकलेले आहे याची जाण ठेवून आपण तातडीने खालील बाबी करणे अपेक्षित आहे. 


१)       सणासुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने कोरडवाहू पिकांना सरसकट हेक्टरी ₹ २५,०००/-  तर बागायती व फळपिकांना हेक्टरी ₹ ५०,०००/-  मदत (पीक विम्या व्यतिरिक्त) १५ दिवसाच्या आत देण्यात यावी.

२)       अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्व पिकांसाठीचे १ हेक्टरपर्यंत बँक कर्ज तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी २०१९ मध्ये केल्याप्रमाणे माफ करण्यात यावे.

३)       ज्यांचे घर पाण्यात बुडाले आहे, घर वाहून गेले आहे, किंवा घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे अशा व्यक्तींना सानुग्रह अनुदान म्हणून ₹ १५,००० प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात यावी. 

४)       दुकानदार, टपरीधारक, कारागीर/बारा बलुतेदार, छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक यांना नुकसानीपोटी सरसकट ₹ १,००,००० पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी.

५)       गोठ्यांच्या पडझडीबाबत मदत म्हणून ₹ ५,००० प्रति गोठा देण्यात यावे. 

६)       पशुधन मोठी जनावरे/दुधाळ जनावरे यांसाठी  ₹ ५०,००० व मेंढी-बकरी यांच्यासाठी  ₹ १०,००० प्रत्येकी मदत देण्यात यावी. 

७)       ज्या भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे अशा भागातील नागरिकांसाठी तात्काळ गहू, तांदूळ व इतर अन्नधान्याचा पुरवठा मोफत स्वरूपात करण्याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात. 

८)       जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे, रस्ते, पूल ,वीज वितरण व्यवस्था व बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा व याची  कालबध्द अंमलबजावणी व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमण्यात यावा.

हे फक्त जाहीर करूनच नाही तर १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा व्हावी यासाठी प्रशासनाला आपण आदेश द्यावेत व आपले देखील यावर वैयक्तिक लक्ष राहावे असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

२९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  २९ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


 लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.