६ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२) दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १८ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
घराचा पत्रा फाडून विज घरात घुसली,घराची मोठी पडझड
नाशिब बलवत्तर अपघात टळला कुटुंबात कोणासही इजा नाही मात्र कुटुंब भयभीत
घरातील टीव्हीसंच सह इतर जीवनावश्यक साहित्य जळून खाक
परंडा ( दि ३ ऑक्टोबर ) तालूक्यातील खासगावचे शेतकरी मधुकर सुदाम जगदाळे यांच्या घराचा पत्रा फाडून विज घरात घुसल्याने घरातील टीव्ही संचचा स्फोट होऊन,मिक्सर कपाटासह इतर जिवनवशक साहित्याचे जळुन नुकसान झाले ही घटना दि २ ऑक्टोबर रोजी रात्री ९-३० दरम्यान खासगाव येथे घडली.
या अपतकालीन घटनेमुळे शेतकरी जगदाळे कुटूंबाचा थरकाप उडाला घरातील विद्युत उपकरणासह वायरींग बोर्ड सर्व जळून खाक झाल्याने भयभीत शेतकरी कुटूंबाला काळोखात रात्र जागुन काढावी लागली.
मधुकर जगदाळे हे पत्नी सुवर्णा मुलगा अजय व त्यांच्या घराच्या शेजारील धनाजी शिंदे यांचा दिड वर्षाच्या नातु सह झोपले होते रात्री ९ वाजेच्या सुमारास वादळदी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली आणी कडकडती विज घराचा वरचा पत्रा फाडून घरात शिरली या मुळे घराची पडझड झाली तर घरातील टीव्ही संच,मीक्सर जळून खाक झाले तर कपाटाच्या काचा फुटून घरात काचेचा खच पडला तर घरातील अन्य धान्यांच्या वस्तु घरात विखुरल्या घराचा पत्रा फाडून घरात घुसलेली विज भिंला होलपाडुन बाहेर निघून गेली.
या घटनेची माहिती मिळताच बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी खासगाव येथे सदर घराला भेट देऊन घराची पाहणी केली व शेतकरी मधुकर जगदाळे यांना तात्काळ ५ लाख रुपयाची आर्थीक मदत देन्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नसीम पटेल , कानिफनाथ सरपने,भीमराव जाधव,फुलचंद ओव्हाळ,सचिन गायकवाड,रामा भोसले , विनायक होरे आदी उपस्थीत होते.खासगाव येथील शेतकरी जगदावे यांच्या घरावर विज पडल्याची माहिती मिळाल्याने राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अॅड.सुभाष वेताळ,गोविंद जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यास आर्थीक मदत मिळऊन देन्यासाठी मा.आ. राहूल मोटे यांच्या माध्येमातुन मंत्रलय स्तरावर प्रयत्न करू असे यावेळी सांगीतले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारत थाटे,धर्मा जगदाळे,बबन दत्तू लिककर,पंडीत जगदाळे, पोलिस पाटील विठ्ठल सातपूते, धनाजी शिंदे,आदिंसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थिती होते.
या घटनेची माहीती पोलीस पाटील विठठल सातपुते यांच्या मार्फत महसुल विभागाला मिळताच तहसिलदार देवनीकर यांच्या आदेशाने खासगाव सज्जाचे तलाठी विनोद चुकेवाडव यांनी घटना स्थळाचा व झालेल्या नुक्सानीचा पंचनामा केला आहे.यावेळी खासगाव ग्रामपंचायतीचे ग्रामशेवक उल्हास देवकते,बापु,जगदाळे व ग्रामस्थ उपस्थीत होते.
जगदाळे यांच्या घरावर विज कोसळल्या मुळे जिवीत हानी झाली नाही मात्र घरासह घरातील जिवनवश्यक वस्तुचे मोठे नुकसान झाले आहे.
विजेच्या धक्याने घराच्या भिंतीना तडे जाऊन घराचा काही भाग कोसळला आहे.सद्या जगदाळे यांना आर्थीक मदतीबरोबरच घराची नितांत गरज आहे.त्यांना खासबाब म्हणुण अपत्ती वेवस्थापणातुन घरकुल मंजुर करावे आशी मागणी खासगाव ग्रामस्थातुन करण्यात येत आहे
उस्मानाबाद जिल्ह्यातील विजांचे अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. दामिनी ॲप वापरून तुम्ही तुमच्या भागात वीज पडणार आहे की नाही हे पाहू शकता. ज्यांच्याकडे हे ॲप नाही त्यांना आम्ही अपडेट देत आहोत. दिनांक ०३ ऑक्टोबर
रात्री. ८.२७
८ .३१
८.३७
श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिरचे पत्रे उडून गेले; वीस लाखाचे नुकसान
कुची,दि.2 (जगन्नाथ सकट)
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे कवठेमंहाकाळ तालुक्यातील कुची येथील श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिरचे पत्रे उडून गेल्याने सुमारे वीस लाखांपर्यंत नुकसान झाले आहे.अशी माहिती हायस्कूल चे मुख्याध्यापक व्ही.टी.पाटील यांनी दिली.दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि शुक्रवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.या झालेल्या अतिवृष्टीमुळे
कुची येथील श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिरचे तीन खोल्यांचे सुमारे सत्तर ते ऐंशी पत्रे ऑगलसह सुमारे सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत लांब उडून गेले त्याचबरोबर फर्निचर,पुस्तके,इतर शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक व्ही. टी.पाटील,संतोष पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली.तसेच गट शिक्षण अधिकारी विश्वास साबळे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सांगली विभागप्रमुख एस. व्ही.पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. गावकामगार तलाठी बी.ए.माने यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.इमारत पुन्हा उभारण्यासाठी,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नुकसान भरुन काढण्यासाठी संस्था,प्रशासन व ग्रामस्थांनी व आमदार खासदार या लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त सहकार्य करावे.अशी अपेक्षा कुची येथील पालकांनी ग्रामस्थांनी व्यक्त करीत आहेत यावेळी कुची येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
आपत्तीग्रस्त सामान्य माणसाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास शासन मदत करणार -अमित देशमुख
उस्मानाबाद,दि.02(प्रतिनिधी):- अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर व इतर कांही गावात जाऊन आज पहाणी केली, ग्रामस्थ शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, आपत्तीग्रस्त सामान्य माणूस लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभा राहील या दृष्टीने महाविकास आघाडीचे शासन सर्वतोपरी मदत करेल, दिलासा दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या नुकसानीची पाहणी केलेल्या नंतर त्यांनी उस्मानाबाद येथे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली, तेंव्हा ते बोलत होते. अपद्ग्रस्तांच्या भावनेशी महाविकास आघाडी सरकार एकरूप असून, आगामी एक महिन्याच्या आत विमा कंपन्या आणि शासनाकडून सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
शासकीय यंत्रणानी मंगळवारपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करावा. विमा कंपन्यांनी, गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तक्रारी स्वीकाराव्यात. महसूल आणि कृषी विभागाचे अहवाल विमा कंपन्यांनी सँपल सर्वे म्हणून स्वीकारावेत. ज्यांच्या घरात पाणी घुसले होते, किंवा घराची पडझड झाली आहे, त्या अपद्ग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून त्यावर कार्यवाही करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.
नुकसानभरपाई देताना अल्पभूधारक, भुभूधारक असा भेदभाव होऊ नये. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही, त्यांना शासनाच्या आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी कार्यवाही करावी, असे सांगून श्री.देशमुख म्हणाले अतिवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करावे. पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे, तो तातडीने पूर्ववत करावा. धरणातून पाणी सोडल्यानंतर संगमाच्या ठिकाणी पाणी पातळीत वाढ होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाय योजना कराव्यात, आदी सूचनाही बैठकीदरम्यान संबंधित विभागांना त्यांनी दिल्या. या बैठकीस माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तीर्थकर, तहसील गणेश माळी आदी उपस्थित होते.
बैठकीतील महत्वाच्या सूचना:
अभूतपूर्व नुकसानीचे ३-४ दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. विमा कंपन्यांनी, गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत. एकही शेतकरी किंवा अपद्ग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता. ज्यांच्या घरात पाणी घुसले होते, त्या कुटुंबांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. अतिवृष्टीमुळे, शहरातील रस्तेही खराब झाले आहेत, नगरपरिषदा आणि महापालिकेने हे रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा युद्धपातळीवर मोहीम राबवून पूर्ववत करुन घ्या. जलव्यवस्थपणासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून भविष्यातील नुकसान टाळता येईल.
जि.प.केंद्रिय पारा शाळेत नवोदय धारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
पारा (राहुल शेळके ) रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पारा शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेतील कुमारी अफिफा अय्युब शेख व ऋषिकेश प्रवीण जाधव या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
दि 02ऑक्टोबर रोजी या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक काकासाहेब बाबुराव गावखरे यांचा शाळा व शालेय व्यवस्थापन समिती पारा यांच्यातर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश खोले, उपाध्यक्ष संजय भराटे, दैनिक जनमतचे पत्रकार राहुल शेळके, दत्तात्रय भराटे, दादाराव भराटे, जेष्ठ नागरिक बारीकराव शेळके , तसेच मुख्याध्यापक जोगदंड, रविंद्र गायकवाड ,कांबळे ,देशमाने ,पाळवदे मॅडम ,आयुब शेख , विशाल गायकवाड ,गिरी ,बनसोडे ,ठोंबरे ,फेरे ,भोसले मॅडम ,ओव्हाळ मॅडम यांच्यासह गावातील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
मार्गदर्शक शिक्षक काकासाहेब गावखरे यांनी आपल्या मनोगतातून नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी व महत्त्व त्याचबरोबर पालकांची व विद्यार्थ्यांची जबाबदारी स्पष्ट केली, पालक या नात्याने शेख सर यांनी गावखरे सर यांचा सत्कार केला व आपल्या मनोगतातून त्यांचे आभार मानले. शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष संजय भराटे यांनीही शाळेच्या यशाबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
शेवटी शाळेचे उत्तम प्रशासक, मुख्याध्यापक यांनी अध्यक्षीय समारोप केला आणि आपल्या मनोगतातून शाळेच्या यशाची परंपरा अशीच वाढवण्याची ग्वाही दिली. देशमाने सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

































































