Home Blog Page 202

२५ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  २५ ऑक्टोबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २५ ऑक्टोबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

         उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी विक्रमी ३८७ अर्ज दाखल

 


चेअरमन दिलीपतात्या पाटील, खासदार संजय काका पाटील व सुरेश भाऊ पाटील यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

तासगाव/ सांगली प्रतिनिधी

सांगली  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक तथा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदींसह १३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष बी.के. पाटील, उदयसिंह देशमुख, झुंझारराव शिंदे या तिघांनी अर्ज दाखल न करता निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तर कालच खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे तासगाव कवठेमहांकाळ चे नेते संचालक सुरेशभाऊ पाटील, डॉ. प्रताप नाना पाटील, कमलताई पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ पाटील, कवठेमहांकाळ तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती अनिता ताई सगरे, शिवसेनेचे नेते अरुण नाना खरमाटे, त्यांच्या पत्नी सौ खरमाटे इत्यादी दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत बँकेच्या आज अखेरच्या इतिहासात विक्रमी संख्येने एकुण ३८७ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता.२५) छाननी असून माघारीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.


बँकेच्या २१ जागांच्या निवडणुकीत दुसऱ्या दिवशी ७, तिसऱ्या दिवशी ४२, चौथ्या दिवशी २०४ तर आज शेवटच्या दिवशी १३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज शेवटच्या दिवशी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक विशाल पाटील, संचालक बाळासाहेब होनमोरे, संचालक श्रद्धा चरापले, सांगली चे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आटपाडी पंचायत सभापती हर्षवर्धन देशमुख, तानाजी पाटील, मनोज शिंदे, ऋषिकेश लाड, सुयोग सुतार, नगरसेवक राजेंद्र कुंभार, वैभव शिंदे, वैभव पवार, अमित पाटील, सुरेश खोलकुंबे, योजना शिंदे, अलकादेवी पवार, जमील बागवान, भक्तराज ठिगळे, मन्सूर खतीब, आकाराम मासाळ, प्रेमलाताई साळी, जयकर कदम, गजेंद्र कुल्लोळी आदींचे १३४ अर्ज दाखल झाले. विद्यमान संचालक बी.के. पाटील, उदयसिंह देशमुख, झुंझारराव शिंदे यांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे सध्या तरी विद्यमान २१ संचालकांपैकी १८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. माघारीपर्यंत आणखी काही संचालकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिवाळीनंतर ९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.


 *निवडणुकीसाठी दाखल अर्ज* 


गट एकुण अर्ज


विकास संस्था गट ‘अ’ १०७


महिला राखीव गट ‘ब’ ३६


अनुसूचित जाती-जमाती गट ‘ब’ २२


इतर मागासवर्ग गट ‘ब’ ३२


विमुक्त जाती, भ.ज. गट ‘ब’ २७


शेती संस्था ‘क’ १ २८


कृषी पणन प्रक्रिया ‘क’ २ १३


नागरी बँका, पतसंस्था ‘क’ ३- ७०


इतर संस्था, व्यक्ती सभासद ‘क’ ४ -५२


एकुण ३८७

सदरची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेना एकत्रित येत भा.ज.प च्या विरुद्ध निवडणूक लढणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.

विधी सेवा माहितीच्या फलकाचे परंडा तालूक्यात अनावरण

 

परंडा  (भजनदास गुडे) स्वातंत्र्याच्या अमृत महोतस्व वर्षा निमीत्त राष्ट्रीय विधिसेवा प्राधीकरन यांच्या वतीने संपूर्ण देशभर प्लॉन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत विधी सेवा माहिती साठी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

        याचाच भाग म्हणुन नागरीकांनी कायदे विषयी सहाय्य कसे मिळवीता येईल याची माहिती देणाऱ्या तसेच नागरीकांच्या आधिकाराची माहिती देनाऱ्या फलकाचे अनावरण परंडा तालूका विधी सेवा समितीच्या वतीने पोलिस ठाणे परंडा पंचायत समीती,नगर परिषद,तहसिल कार्यालय,पोस्ट कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी करन्यात आले.परंडा  पोलिस ठाण्यात आपलेअधिकार माहिती फलकाचे अनावरण परंडा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधिश (क) स्तर आय .जी महादेव कोळी यांच्या हस्ते करन्यात आले .

           यावेळी तालूका विधी प्राधिकरण समितीचे बी व्ही जाधव,एस सी घोळवे,पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे,पोकॉ बळी शिंदे,पोकॉ हावळे महिला पोलिस नाईक शबाना मुल्ला,ॲड.कांबळे,पोकॉ घोळवे,पांडूरंग गवळी,पोकॉ गायकवाड,पोकॉ,मोटेगावकर , रामराजे शिंदे,पोकॉ अप्पा माने यांच्या सह पोलिस कर्मचारी उपस्थित होते .

     तर तहसिल कार्यालयात विधी सेवा प्राधिकरन माहिती फलकाचे अनावरण नायब तहसिलदार प्रदिप पाडूळे यांच्या हस्ते कान्यात आले यावेळी नायब तहसिलदार सुजितवाबळे,न्यायविधी विभागाचे गवळी,देवा वाघमारे यांची उपस्थिती होती.

        तर पंचायत समिती येथे न्यायविधी माहिती पालकाचे अनावरण लेखाधिकारी आनंदराजे निंबळकर, यांच्या हस्ते करन्यात आले. यावेळी वग्गे जे.टी.ग्रामपंचायत विस्तार अधिकारी,पाकले सी जे सहाय्यक प्रशासन अधिकारी, श्रीमती आर.एन.कदम,नवले बांधकाम अभियंता यांची उपस्थिती होती .

पालकमंत्र्यांनी शुभारंभ केलेल्या बियाणे वाटप कार्यक्रमाचा देखावा शासनाचा की प्रशासनाचा?

 


जमिनीतील ओलावा संपल्यावर बियाणे येऊन काय उपयोग? शेतकऱ्यांचा सवाल..

 पारा (राहुल शेळके ): कृषी विभागाकडून रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्यासाठी सन 2021- 22 मध्ये हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणे वाटपाचा कार्यक्रम 18 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने वाशी तालुक्यात हरभरा पिकाचे 574 क्विंटल ज्वारीचे 204 क्विंटल प्रमाणित बियाणे परमिट द्वारे शेतकऱ्यांना वितरित केले आहे. याचा शुभारंभ वाशी तालुक्यातील पारा येथे गुरुवारी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री  शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कमी किमतीमध्ये बियाणे मिळण्याचे परमिट वाटप करण्यात आले. परंतु  शेतकऱ्यांना परमिटवर लिहून दिलेले बियाणे संबंधित दुकानदाराकडून मिळाले नाही.वाशी तालुक्यातील कृषी मांडवा मंडळातील तीनशे शेतकऱ्यांना  हरभरा वाणाचे राजविजय, फुले विक्रम याचे परमिट कृषी विभागाकडून देण्यात आले आहे . यापैकी 86 परमिट हे पारा येथील शेतकऱ्यांना दिले गेले आहे.दुकानदाराकडे गेले असता दुकानदाराने हे वाण आमच्याकडे आले नसल्यामुळे पारा येथील तब्बल 86 शेतकऱ्यांना वाशी येथून बियाणे न घेताच रिकाम्या हाताने घराकडे परतावे लागले. त्यामुळे पारा येथे घेतलेल्या पालकमंत्री यांच्या कार्यक्रमाचा देखावा शासनाचा की प्रशासनाचा असा प्रश्न सामान्य शेतकरी विचारत आहे. सध्या कृषी खाते शेतकऱ्यांची फरफट करत आहे, संबंधित शेतकरी चार दिवस झाले या बियाणांची वाट बघत आहे.या गंभीर गोष्टीकडे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी लक्ष देऊन ताबडतोब शेतकऱ्यांना बियाणे वाटप करावे. आधीच  अतिवृष्टीने शेतकरी पुरता मेला आहे त्यात या कृषी विभागाकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या  क्रूर चेष्टेला पूर्णविराम द्यावा अशी मागणी वाशी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

        याबाबत उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांच्याशी सम्पर्क केला असता त्यांनी सांगितले की “आम्ही वरिष्ठ स्तरापर्यंत ही बाब कळवली आहे.महाबीजच्या राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांनाही ही बातमी पोस्ट केली आहे.उद्यापर्यंत पुरवठा सुरळीत होईल असे महाबीजकडून सांगण्यात आले आहे असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.”

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील : पालकमंत्री शंकरराव गडाख


उस्मानाबाद,दि,21(प्रतिनिधी):- शेतक-यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानाची महाराष्ट्र शासनाला जाणीव आहे,त्यामुळे शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कळंब तालुक्यातील मौजे खोंदला येथे केले. 

जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.सावंत, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, वाशीचे तहसीलदार एन.बी.जाधव, कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे आदी उपस्थित होते.

मराठवाडा हा दुष्काळी भाग असल्याने येथील प्रकल्प आणि बंधारे कमी क्षमतेचे आहेत. त्यात उस्मानाबाद आणि बीड हे जिल्हे अतिशय कमी पावसाचे असल्याने पूर्वी बांधलेले बंधारे आणि केटीवेअर त्या धर्तीवरच बांधण्यात आले असावेत. म्हणून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे क्षतिग्रस्त झाले आणि अनेक गावांमध्ये पूर आल्याने कृषीधन आणि पशुधनाची मोठ्याप्रमाणात हानी झाली. शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आता जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.यात आता लातूर जिल्ह्याप्रमाणे बॅरेजेस आणि केटीवेअरला एकत्रित स्वयंचलित गेटस बसविण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा आणि मांजरा नदीवरील 24 प्रकल्पांची एकाचवेळी दुरुस्ती करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी सर्व 24 प्रकल्पांचा सर्व्हे करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सर्व्हेसाठी मी जिल्ह्याधिक-यांना डीपीडीसी च्या माध्यामातून 1 कोटी 25 लाख रुपये निधी तात्काळ मंजूर करून वितरीत करण्याबाबत आदेश दिले आहेत. या प्रकल्पांचे काम परिपूर्ण आणि अतिशय दर्जेदार करण्यात येणार आहे. यासाठी कमीत कमी 100 कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यक्ता लागेल . जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे आदेशही मी दिले आहेत, असेही श्री. गडाख यावेळी म्हणाले. 

या पाहणी दौ-यादरम्यान वाशी तालुक्यातील पारा या गावात महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या  “प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह 18 ते 24 ऑक्टोबर” या कार्यकमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी हे शासन प्रमाणिकपणे प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाकडून शेतक-यांच्या उद्धाराच्या दृष्टीकोणातून अनेक योजना राबविल्या जात आहेत.कितीही अडचणी आल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ,असेही श्री.गडाख यावेळी म्हणाले.

निसर्गाच्या अवकृपेमुळे 2021 च्या खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मात्र आता जिल्ह्यात पाणी आवश्यक्तेनुसार उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात शेतक-यांना योग्य प्रमाणात पीक उत्पादन मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत प्रात्याक्षिक बियाणे वितरण योजना राबविली जात आहे. यामध्ये महाडिबीटी अंतर्गत लॉटरीपद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना शासन सबसिडीतून हरभरा,ज्वारी आणि इतर बियाणे वितरीत करीत आहे, असेही ते म्हणाले. वाशी तालुक्यातील 400 लाभार्थ्यांना हरभरा बियाणे आणि 800 लाभार्थ्यांना ज्वारी बियाणे वितरीत केले जाणार आहे.

पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानाबाद –

सकाळी ७.३० वाजता शासकीय मोटारीने सोनई ता. नेवासा, जि. अहमदनगर येथून पारगाव ता. वाशी, जि.उस्मानाबादकडे प्रयाण. (मार्गे सोनई-पाडळशिंगी-बीड बायपास मार्गे) 

सकाळी १० वाजता पारगाव ता. वाशी येथे आगमन व को. प. बंधारा पाहणी

स.१०.४० वाजता पारा, ता. वाशी येथे आगमन व कृषी विभागामार्फत आयोजित हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.

स.११.३० वा. बहुला, ता. कळंब येथे आगमन व को. प. बंधारा पाहणी

दु.१२.०० वा.खोंदला, ता. कळंब येथे आगमन व को. प. बंधारा पाहणी

दु.०१.००.वा.शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव

दु.०२.००.वा.शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथून स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद कडे प्रयाण

दु.०२.१०.वा.स्त्री रुग्णालय येथे आगमन व मॉडयुलर ओ. टी. चे लोकार्पण.

दु.०२.४०.वा.जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे आगमन व लिक्विड मेडिकल ऑक्सीजन टॅक प्रकल्पास भेट 

दु.०३.००.वा. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथून अणदूर, ता. तुळजापूर कडे प्रयाण

दु.०४.००.वा.अणदुर ता. तुळजापूर येथे आगमन व मा. मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री यांचे निवासस्थानी भेट

 सोयीनुसार.अणदुर, ता. तुळजापूर येथून अहमदनगर कडे प्रयाण.