Home Blog Page 203

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अंबे बहार 2021 चा समावेश


 उस्मानाबाद,दि.13(प्रतिनिधी):- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना“अंबे बहार 2021” पुढील तीन वर्षासाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.उस्मानाबाद जिल्हयासाठी अंबे बहारात द्राक्ष,मोसंबी, डाळींब,केंळी,आंबा आणि पपई या पिकांचा समावेश आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी कळविले आहे.

      जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र  देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, 7/12 उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांश सह फोटो व बँक पासबुकची प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विमा हप्ता रक्कम भरुन पीक संरक्षित करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरीता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित आणि अतिरिक्त विमा हप्ता हा बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे. 

द्राक्ष या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी नियमित विमा 3 लाख 20 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास एक लाख 6 हजार 667 असेल.यामध्ये शेतक-यांचा हिस्सा नियमितसाठी 16 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 5 हजार 333 आहे.द्राक्षासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.मोसंबी या फळपीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेकटरी नियमित 80 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 26 हजार 667 असेल.यामध्ये शेतक-यांचा हिस्सा नियमितसाठी 4 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 1 हजार 333 आहे. मोसंबीसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे.डाळिंब या फळपीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेकटरी नियमित एक लाख 30 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 43 हजार 333 असेल.यामध्ये शेतक-यांचा हिस्सा नियमितसाठी 7 हजार 800 आणि गारपीटग्रस्त असल्यास 2 हजार 167 आहे. डाळिंबासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

केळी या फळपीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेकटरी नियमित 1 लाख 40 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 46 हजार 667 असेल.यामध्ये शेतक-यांचा हिस्सा नियमितसाठी 7 हजार  आणि गारपीटग्रस्त असल्यास 2 हजार 333 आहे.केळीसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे.आंबा या फळपीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेकटरी नियमित 1 लाख 40 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 46 हजार 667 असेल.यामध्ये शेतक-यांचा हिस्सा नियमितसाठी 7 हजार  आणि गारपीटग्रस्त असल्यास 2 हजार 333 आहे.आंबा या फळपीकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. पपई या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेकटरी नियमित 35 हजार आणि गारपीटग्रस्त असल्यास 11 हजार 667 असेल.यामध्ये शेतक-यांचा हिस्सा नियमितसाठी 1 हजार 750 आणि गारपीटग्रस्त असल्यास 583 आहे. पपई या फळपीकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे.

हवामानावर आधरित फळपीक विमा योजना आंबे बहारासाठी फळपीकनिहाय महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आले आहेत. पपई या फळपीकासाठी उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद ग्रामीण आणि केशेगाव तर कळंब, तुळजापूर, परंडा, वाशी आणि भूम तालुक्यातील सर्व महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आलेआहेत.आंबा ,केळी,द्राक्ष आणि डाळिंब या फळपीकांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुके आणि महसूल मंडळे अधिसूचित ठरविण्यात आले आहेत .मोसंबी या फळपीकासठी उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद ग्रामीण, तेर, ढोकी आणि जागजी, कळंब तालुक्यातील शिराढोण, लोहारा तालुक्यातील लोहारा तसेच तुळजापूर, भूम तालुक्यातील माणकेश्वर, अंबी, वालवड आणि ईट, परांडा आणि वाशी या तालुक्यातील सर्व महसूल मंडळे अधिसूचित ठरविण्यात आले आहेत.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असेही आवाहन श्री. तीर्थकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

१४ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  १४  ऑक्टोबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये  १३  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १४ ऑक्टोबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक १४ ऑक्टोबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  १९  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

         उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १४  ऑक्टोबर  २०२१ रोजी १९ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक जनमत १३ ऑक्टोबर २०२१ E paper

१२ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  १२  ऑक्टोबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १४  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १२ ऑक्टोबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १४  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १८ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

        उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

११ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  ११  ऑक्टोबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १३  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस


       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ११ ऑक्टोबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १७ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

        उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी १७ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

“मिशन कवच कुंडल” अभियान यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

                       

              उस्मानाबाद,दि.09(प्रतिनिधी):- जिल्ह्यात दि. 16 जानेवारी 2021 पासून कोविडच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 18 वर्षावरील एकूण 13 लाख 9 हजार लाभार्थींचे लसीकरण करणे अपेक्षित आहे. आता यासाठी  जिल्ह्यात मिशन कवच कुंडल  अभियान राबवण्यात येत आहे, हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी कोविड लस घेऊन स्वतःला कोविड पासून सुरक्षित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. 

  आतापर्यंत 6 लाख 82 हजार (52 टक्के) लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 2 लाख 73 हजार (20.85 टक्के) लाभार्थ्यांना दुसरा डोस देऊन संरक्षित करण्यात आले आहे.

कोविड-19 ची लस घेतल्यामुळे लाभार्थ्यांना तिहेरी फायदा होत असतो. ज्यामध्ये कोविड आजार होण्याचा धोका अत्यंत कमी होतो. तसेच आजार यदाकदाचित झाला तरीही त्याची तीव्रता अत्यंत कमी असते, ज्यामुळे आय.सी.यु.मध्ये दाखल होणे किंवा गंभीर आजार या बाबी टाळल्या जातात आणि कोविडमुळे होणारे मृत्यू टाळता येतात. यामुळे सर्व 18 वर्षावरील लाभार्थ्यांनी ही लस घेऊन स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबियांना संरक्षित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित याबाबतच्या जिल्हा टास्क फोर्स च्या बैठकीतस्पष्ट केले.

  या अनुषंगाने शिल्लक राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांचा पहिला डोस आणि देय असलेल्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषित केल्याप्रमाणे “मिशन कवच कुंडल” ही विशेष मोहिम दि.08 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात  राबविली जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या करिता जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक घेण्यात येऊन त्यामध्ये या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभागा सोबतच नगरपालिका प्रशासन, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभाग यांच्या सहभागाने आणि सहकार्याने ग्रामीण भागामध्ये गावोगावी आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभांगामधून, माईकिंगद्वारे, दवंडीद्वारे, नगरपालिका क्षेत्रांमध्ये घंटागाडीच्या माध्यमांतून आदी विविध प्रकारे प्रसिध्दी करण्यात येत आहे. लसीकरण शिल्लक असलेल्या 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मिशन कवच कुंडल अभियान आयोजित सत्रांमध्ये कोविडची लस घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हळकुंडे, डॉ.मुल्ला, डॉ.होले, डॉ.परळीकर, डॉ.मेंढेकर, श्री.पवार आदी उपस्थित होते.

काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

सलगरा,दि.९(प्रतिनिधी)

तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने तालुक्यामध्ये होत असलेल्या विविध विकास कामांचा, त्यांच्या मुळे होत असलेल्या अनेक सामाजिक कार्यांचा – उपक्रमांचा तसेच पाटील यांच्या कार्यप्रणालिबद्दल नागरिकांमधून आणि शेतकरी वर्गामधून व्यक्त होणाऱ्या सकारात्मक विचारांवर प्रभावित होऊन गावच्या विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे, यासाठी या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्वांना एकत्र केले.

गंधोरा येथील अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवार (दि.९) रोजी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथे त्यांच्या निवासस्थानी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची, तरुणांची पक्षाला खूपच गरज आहे, तुम्ही आल्यामुळे ती गरज आता भरून निघेल अशा शब्दात आमदार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोसले, कमलाकर पाटील, अनिल पवार तसेच महादेव भोसले (माजी सदस्य), प्रवीण पाटील, अमोल मुसळे (माजी सदस्य), विद्यासागर देसाई महावीर भोसले, लिंबाजी सोनटक्के, परमेश्वर भोसले, पांडुरंग सोनटक्के, विनोद भोसले, दयानंद पाटील, सचिन शिंदे, रामेश्वर भोसले, रंगनाथ भोसले, पांडुरंग जाधव, विकास पाटील, आनंद गिरी, मधुकर राठोड, सुरज एकंडे, हनुमंत एकंडे, सत्यवान भोसले, लक्ष्मीकांत भोसले, रमेश देसाई, शिवाजी पाटील, शनिराज एकंडे, कुंडलिक भोसले, दत्तूराजे भोसले, उमेश पाटील, रामा भोसले यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

वारणानगर :

श्री . जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात . नवरात्रोत्सवाच्या  तिसऱ्या माळे निमित्त कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली . या पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे . नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री . जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते . त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली. मानाचे गावकर  यांनी बांधली .तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे . दोन पाकळ्या या सगुण _ निर्गुण भक्तीचे प्रतिक मानले जाते .ही पूजा मानाचे दहा गावकर यांनी बांधली . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो .  मच्छिंद्र डवरी, गजानन डवरी , विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते सादर केली .