Home Blog Page 197

खंडोबा यात्रा व पालखी सोहळ्याचे किलज येथे आयोजन ; ग्रामपंचायतने सहकार्य करण्याचे यात्रा कमिटीचे आवाहन

सलगरा, (प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणारा श्री.खंडोबा याञा पालखी सोहळा महोत्सव यावर्षी ही साजरा करण्यात येणार असल्याचे याञा कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.     डिसेंबर महिन्यातील दि. ०१ ते १५ तारखेच्या दरम्यान यात्रा व पालखी उत्सव साजरा होणार असून याकरिता किलज ग्रामपंचायतने सहकार्य करावे असे आवाहन याञा कमिटीने ग्रामपंचायतकडे केले आहे. यासाठी श्रमदान व साफसफाई करून ज्या मार्गावर पालखी मार्गस्थ होणार आहे त्या ठिकाणी तात्पुरते स्वरूपाचे लाईटचे फोकस लावून किंवा दिवा बत्ती करून सदर पालखी उत्सवाच्या दरम्यान आपल्याकडील ग्रामस्थांना सहकार्य करण्यास आपल्या माध्यमातून आवाहन करावे तसेच स्वतः व ग्रामपंचायत सर्व सदस्य हजर राहून सहकार्य करावे. सदरचा पालखी उत्सव शांततेत पार पाडण्यात आम्हाला सहकार्य करावे असे खंडोबा याञा उत्सव कमिटीने किलज ग्रामपंचायतला आवाहन केले आहे, तसेच उत्सवा दरम्यान लाईटच्या समस्येबाबत विद्युत मंडळास अगोदरच पूर्व कल्पना द्यावी गावातील गटारे स्वच्छ करावेत असेही कळविण्यात आले आहे.

दैनिक जनमत १५ नोव्हेंबर २०२१

किलज येथे पार पडले लाळ्या खुरकूत लसीकरण व सर्व रोग निदान मोफत शिबीर

सलगरा,दि.१३(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे बळीराजा चॅरिटेबल ट्रस्ट किलज आणि पशुसंवर्धन दवाखाना श्रेणी – २ होर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ नोव्हेंबर रोजी किलज गावातील सर्व पशु, जनावरे यांच्यासाठी लाळ्या खुरकूत लसीकरण व सर्व रोग निदान मोफत शिबीर पार पडले. या शिबिरात पशुसंवर्धन दवाखाना होर्टी येथील डॉ.एन.जे.वागदकर हे उपस्थित होते, डॉ.वागदकर यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले, या मोफत शिबिरात गावातील एकूण २०० पशु, जनावरे यांची तपासणी पार पडली, या कार्यक्रमाचे आयोजन बळीराजा चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा संगीता राठोड, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिव आनंद निर्मळे यांनी केले होते, तर या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे,आनंद निर्मळे, तुकाराम शिंदे, नागनाथ शिंदे, दत्ता सोमवंशी, शरद शिंदे, धनराज येलुरे, अशोक शेळके, दयानंद कुठार, जनार्धन शिंदे, सचिन बिडवे, धनराज शिंदे, हनुमंत मोजगे, शिवाजी पांचाळ, राम भोसले, साहेबराव दुधंबे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज – प्रा. हरी नरके

ओबीसीचे अज्ञान हेच भाजप व आरएसएसचे राजकीय भांडवल

ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका उघड

उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) – देवेंद्र फडणवीस यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून उपचार करण्याची गरज असल्याचा खोचक सल्ला प्रा. हरी नरके यांनी पत्रकार परिषदेत दिला. ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत चर्चेला येत नाहीत. हरी नरके मोठे विचारवंत आहेत. कधी कधी ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याचा भास होतो असे म्हणतात. अभ्यासू आणि तरुण नेत्याला कमी वयात भास होत असतील तर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून उपचार घेण्याची आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या कुटिल कारस्थानामुळे गेलेले आहे. ओबीसींच्या जनगणनेची माहिती केंद्र सरकारकडे आहे. ती माहिती त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रोहिणी आयोगास दिली. मात्र तीच माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला देण्यास केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला ओबीसी जनगणना मान्य नाही. जर ओबीसी समाज जागा झाला तर तो सत्तेवर येईल याची भीती भाजप व आरएसएसला आहे. त्यामुळे ओबीसींना देव व देवतांमध्ये अडकविण्यात भाजपची मंडळी प्रयत्न करीत असून त्यांना त्यामध्ये यश आलेले आहे. ओबीसीचे अज्ञान हेच भाजप व आरएसएसचे राजकीय भांडवल असल्याचा घणाघाती आरोप देखील प्रा. हरी नरके यांनी यावेळी केला.

येथील यशराज लॉन्समध्ये ओबीसी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी ते आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी, कोषाध्यक्ष कुणाल निंबाळकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा नरके म्हणाले की, ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात इंपिरियल डाटा दाखल करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दि. १८ सप्टेंबर २०१९ व दि.१८ नोव्हेंबर २०१९ रोजी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी केली होती. केंद्राने माहिती न दिल्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या बरोबरच राज्याचे सचिव असीम गुप्ता यांनी देखील तब्बल २० वेळा पत्राद्वारे मागणी केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी केंद्राकडे मागणी केली होती. मग आता ते केंद्राकडे विद्यमान राज्य सरकारला मागणी करू नका ? असे सांगत आहेत असा सवाल विचारीत फडणवीस खोटे बोलतात असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इम्पेरियल डेटा द्यायचा नाही असा निर्णय दि.१२ जुन २०१८ साली मोदी सरकारने घेतला आहे. मात्र देशातील जनतेला हा निर्णय तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या काळात झाला असल्याचा कांगावा करून जनतेची भाजपवाले एक प्रकारे फसवणूक करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य घटनेच्या कलम ४२ चा वापर करून ओबीसी आरक्षणाचा निकाल दिल्यामुळे हा निकाल संपूर्ण देशाला लागू होत आहे. ही सर्व बाब वकील असलेल्या फडणवीस यांना पुरेपूर माहीत असून ते खोटे बोलतात. त्यामुळे त्यांची वकिलीची पदवी बोगस असावी असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 

केंद्राने ओबीसी जनगणनेची माहिती दिल्यास ९० टक्के काम होऊ शकते. मात्र त्यामध्ये आठ कोटी चूका असल्याचा डांगोरा फडणवीस पिटत आहेत. वास्तवामध्ये या चुकापैकी साडेसहा कोटी चुकांची दुरुस्ती झालेली आहे.  जागतिक स्तरावर अशा चुका १० ते १२ टक्के ग्राह्य धरल्या जातात. कारण देशांमध्ये २६०० जाती असून त्यांच्या अनेक भाषा असल्यामुळे या चुका होणे स्वाभाविक आहे. मात्र दुरुस्ती नंतर चुकांचे हे प्रमाण केवळ सव्वा टक्के आहे. 

मातंग समाजातील सुधाकर शेंडगेंची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व कुटुंबांचे पुनर्वसन झाल्याशिवाय शांत बसणार नाही:- अजिनाथ राऊत

 

जवळा नि दि 13 प्रतिनिधी

मौजे सांगवी काटी ता तुळजापुर जि उस्मानाबाद येथील मातंग समाजातील बांधकाम मिस्त्री सुधाकर शेंडगे यांच्या हत्येप्रकरणी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असुन या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक परांडा यांचे मार्फत महामहिम राज्यपाल महोदय यांना कायदेशीर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

                   निवेदनात म्हटले आहे की तामलवाडी पोलीसात दाखल गुरनं 195/2021 मधील आरोपींकडे सुधाकर शेंडगे यांचे बांधकामाचे राहिलेले केवळ 7 ते 8 हजार रु मागीतल्याच्या कारणावरुन आरोपींनी सुधाकर शेंडगे व त्यांच्या पत्नीस जातीवाचक शिवीगाळ करुन सुधाकर शेंडगे यांच्या डोक्यात लोखंडी फावडे (खोऱ्याने) मारुन गंभीर जखमी केले होते. सदर प्रकरणी सांगवी काटी ता तुळजापुर सुरेखा शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी ता. तुळजापूर जि उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये दि. 30/10/2021 रोजी गुरनं 195/2021 कलम भादवी 307,323 504,506,34 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2) va, 3(1) r,s, कलमान्वये गुन्हा दाखल झाला असुन तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापूर हे करत आहेत. सुधाकर शेंडगे यांचे डोक्यास गंभीर मारहाण दुखापत झाल्यामुळे त्यांचेवर तुळजापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करुन पुढील उपचार सिव्हील हॉस्पीटल सोलापुर येथे ICU विभागात चालु होते. उपचारादरम्यान अखेर त्यांचा सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुधाकर शेंडगे यांनी केवळ बांधकामांचे राहिलेले पैसे मागीतल्यामुळे त्यांचे डोक्यात लोखंडी फावड्याडे गंभीर मारहाण करुन त्यांची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी कायदेशीर विविध मागण्यांचे निवेदन परांड्याचे तहसिलदार रेणुकादास देवणीकर तसेच पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे मार्फत राज्यपालांना देण्यात आले आहे निवेदनातील मागण्यांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर दि 25 जानेवारी 2022 रोजी अमरण उपोषण करणार इशारा देण्यात आला आहे.

               निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा कोषाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, परांडा तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, परांडा तालुका संघटक आशोक चव्हाण, समता सैनिक दलाचे परंडा तालुकाध्यक्ष आश्रू वाघचौरे, सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले, अक्षय गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी—प्राचार्य अभयकुमार साळुंखे

 

उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.१३

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय म्हणजे एक ज्ञानमंदीर असून या ज्ञानमंदीरातून सुसंस्कारित विद्यार्थी घडवावेत त्यातूनच संस्कारित माणसं घडतील फुले,शाहू,आंबेडकर व संतांचा विचार हाच डाॅ.बापूजींचा विचार आहे डाॅ,बापुजी साळुंखे यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवून आजच्या शिक्षकांनी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधक बनवावे व विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी असे प्रतिपादन  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अतिथी गृहाचे उदघाटना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना १३नोव्हेंबर रोजी, प्राचार्य अभयकुमार साळुंखे(कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर)यांनी केले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी मकरंद राजेनिंबाळकर(नगराध्यक्ष न.प.उस्मानाबाद)हे होते.यावेळी कौस्तुभ गावडे(सी.ई.ओ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,) प्राचार्य व मराठवाडा विभाग प्रमुख डाॅ.जयसिंगराव देशमुख,श्रीराम साळुंखे( कोल्हापूर विभाग प्रमुख),माजी प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,नानासाहेब पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी डाॅ.बापुजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे,श्री विवेकानंद यांचे प्रतिमांचे पुजन केले.प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.पुढे बोलतांना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या ईमारतीची उभारणी करतांना उस्मानाबाद मधील अनेक दानशुरांनी एक एक दगड प्रेमाने दिला आणि हे महाविद्यालय उभारले त्यामुळे हे महाविद्यालय विद्यापीठात व संस्थेत नाव टिकवून आहे.आज कोरोना काळात माणुसकी हरवली आहे पुंन्हा चांगली संस्कृती उभारली पाहिजे,आजचे विद्यार्थी इंटरनेटचा वापर करत आहेत त्यामुळे आजच्या शिक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे.त्यामुळे शिक्षकांनी तयारी करायला हवी व आपले ज्ञान बळकट करायला हवे.अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले की,आपले महाविद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम राबवत असते आपणास सहकार्य लागत असेल तर आंम्ही आपल्या पाठीशी आहोत.भविष्यात आपधास सहकार्य करू.प्रास्ताविक करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,या महाविद्यालयात के.जी.टू पी.जी शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी हायस्कूल सुरू करण्याची गरज आहे.या महाविद्यालयात संशोधन सेंटर झेप घेत आहे.त्याचा फायदा भविष्यात परिसरातील शेतक—यांना होईल.यावेळी नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्या डाॅ.सुलभा देशमुख,प्र.प्राचार्य पवार,प्र.प्राचार्य शिंदे उपस्थित होते.यावेळी मराठवाडा येथील विविध शाखेतून मुख्याध्यापक,माजी प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.सूञसंचालन प्रा.वैभव आगळे यांनी केले आभार प्रा.केशव क्षीरसागर यांनी मानले.

सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन

 

पाडोळी(प्रतिनिधी)उस्मानाबाद तालुक्यातील (टाकळी बेंबळी) येथे आज (दि.१३) जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाल्या बंधाऱ्यातील जलसाठ्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

   सक्षणा सलगर यांच्या प्रयत्नामुळेच तेरणा नदीला मिळणाऱ्या ओढ्यावर हा सिमेंट नाला बंधारा बांधण्यात आला असून, आज या बंधाऱ्यात पूर्ण क्षणतेने पाणी थांबले आहे, याचा टाकळी(बेंबळी) शिवारातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हे समाधान व्यक्त करत आहेत. या जलपूजना वेळी माजी सरपंच काकासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रताप गायकवाड, मलिक शेख, बालाजी माने, महादेव गाडेकर, शिवशांत काकडे, प्रशांत सोनटक्के, सुरज नरवडे, अरुण खटके यांच्या मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक चार मध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राहुल कांबळे यांच्या पुढाकाराने रक्त तपासणी मोहीम उत्साहात संपन्न

पागा गल्ली, शिंदे गल्ली येथील नागरिकांच्या सह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तासगाव प्रतिनिधी/

मुथूट फायनान्स कंपनी च्या वतीने दिवंगत एम जी जॉर्ज मुथ्युट यांच्या स्मरणार्थ तासगाव तालुका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकप्रिय आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघासाठी एक सुसज्ज ॲम्बुलन्स व्हॅन त्यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या करण्याची सुविधा असलेली अंबुलन्स लोका अर्पण सोहळा नुकताच पार पडला होता

तासगाव शहरांमध्ये सध्या विविध प्रभागांमध्ये सदरच्या सुसज्ज अंबुलन्स च्या माध्यमातून नागरिक बंधू भगिनींचे रक्त तपासणी मोहीम त्यामध्ये पाच प्रकारच्या तपासण्या होऊन शहरामध्ये काय दोष असतील ते दाखवण्याची उत्तम कामगिरी या मुलींच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. से शुक्रवार दिनांक 12 व शनिवार दिनांक 13 रोजी प्रभाग क्रमांक चार सांगली नाका येथे पहिल्या दिवशी ९०, तर दुसर्‍या दिवशी ८५ नागरिक बंधू भगिनी यांनी आपली रक्त तपासणी करून घेऊन सदरच्या मोहिमेस उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता.

सदरच्या तपासण्या जुलाब मध्ये करण्यासाठी नागरिक गेले तर या सर्व तपासणी करण्यासाठी एक हजार रुपये पेक्षा जास्त खर्च येत असतो परंतु आमदार सुमनताई पाटील युवा नेते रोहित दादा पाटील सुरेश भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सदर सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या होत्या सदर चे तपासणी कॅम्प सामाजिक कार्यकर्ते स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीचे माजी संचालक तथा दैनिक जनमत चे तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल भैय्या कांबळे यांच्या पुढाकाराने सदरचे तपासणी मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेस सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बोबडे, नरेंद्र आबा मोरे, संजय घोरपडे, ज्ञानू पवार, सचिन शिंदे, मिलिंद कांबळे, रोहित गोळे, अनिल काळे,अजय पवार, तुषार कांबळे, विनीत कांबळे, आदित्य कांबळे, परशुराम वाघमारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे इत्यादींनी विशेष सहकार्य केले होते. तर रक्ततपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर व त्यांच्या सर्व शिक्षक,शिक्षीका  स्टाफ तसेच पार्वती कार्यालयाचे मालक प्रताप शेठ पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक बटु पवार सर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष एडवोकेट गजानन गुजर साहेब तासगाव नगरपालिका राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक बाळासाहेब सावंत, माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील, अमोल नाना शिंदे, बंडू काका शेटे एडवोकेट तुकाराम कुंभार, कमलेश तांबेकर स्वप्नील जाधव, अगं गल्लीतील राष्ट्रवादीचे नेते युनूस भाई, ज्येष्ठ मार्गदर्शक रशीद भाई, अमित पवार राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अभिजित पाटील,उदय पाटील,व पागा गल्ली सांगली नाका यशवंत हायस्कूल परिसर शिंदे गल्ली येथील नागरिकांनी विशेष सहकार्य केले होते. तर प्रभाग क्रमांक चार मध्ये शिंदे गल्ली परिसरा मध्ये दि.११ रोजी यादव व घाडगे सरकार यांच्या विशेष प्रयत्नातून ७६ नागरिकांचे रक्त तपासणी पार पडली होती. मुथूट फायनान्स चे तासगाव ब्रांच शाखाधिकारी अभिनंदन मडके साहेब, मुथूट फायनान्स अंबुलन्स चे स्टाफ जीवन प्रवीण कांबळे, अक्षय केशव चव्हाण, राकेश नानासाहेब कांबळे,गजानन दत्‍तात्रेय होनमोरे, इत्यादी चे विशेष सहकार्य मिळाले होते. सर्वात विशेष बाब म्हणजे दोनशेपर्यंत या नागरिक बांधवांनी व बहिणीने रक्त तपासणी केली असता ९६ ते ९७ टक्के नागरिकांची रिपोर्ट अतिशय उत्तम असल्याचे निदर्शनास आले आहे ही समाधानाची बाब आहे. कारण सध्या गेले दीड ते दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर ही तपासणी मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली असल्याने नागरिकांच्या मध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे प्रभाग चार मधील सांगली नाका पागा गल्ली, यशवंत हायस्कूल परिसर, मुरसल गल्ली येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राहुल कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.

रेल्वे प्रश्न शक्य तितक्या वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील खासदार राजेनिंबाळकर

 

 उस्मानाबाद (प्रतिनिधी) २०१४ मध्ये लोकसभेच्या प्रचारा निमित्त तुळजापूरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या तुळजापूर रेल्वेमार्गासाठी आपण क्य तितक्या वेगाने काम करून हा प्रश्‍न सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मार्गी लावणार असल्याचे तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

      तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तुळजापूर रेल्वेने जोडावे यासाठी आपण दर महिन्याला महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेत आहोत या रेल्वे मार्गातील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे ६० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच महत्त्वाची प्रक्रिया होते आणि त्यासाठी आपण स्वतः इतर लोकप्रतिनिधींच्या मदतीने हे काम शक्य तेवढ्या वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले.

     तुळजाभवानी मंदिरातील दर्शनानंतर मंदिर संस्थान समितीच्या कार्यालयात व्यवस्थापक योगिता कोल्हे महसूलचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्याशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

    मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांची गरज आणि सोय याकडे साफ दुर्लक्ष असल्या संदर्भात खासदारांनी समितीच्या कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त केली तसेच यापुढील काळात मंदिर समितीने स्वतःचे कायदे भाविका वर न लागता भाविकांची गरज काय आहे हे ओळखून मुख्य दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेश बैठकीत दिले. आणि त्यानंतर लागलीच या आदेशाची अंमलबजावणी देखील मंदिरात सुरू झालेली आहे.भाविकांना आता मुखदर्शन सोय उपलब्ध झालेली आहे.

     सर्व लोकप्रतिनिधी समवेत महसूल अधिकाऱ्यांनी एक समान वागणूक द्यावी,स्वतःच्या मर्जीने सपत्नीक वागणूक देऊ नये.असे देखील खासदार राजेनिंबाळकर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्षा योगिता कोल्हे आणि उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत सुनावले.