Home Blog Page 198

केतन पुरी यांची अभ्यासगटाच्या सदस्यपदी निवड

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील पुरातन ऐतिहासिक स्थळांच्या सर्वेक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी स्थापन अभ्यासगटात केतन पुरी यांची निवड झाली आहे.

औरंगाबाद विभागात जगप्रसिध्द पुरातन स्थळे असुन अनेक ऐतिहासिक पुरातन स्थळे देखील आहेत. पुरातत्व विभागाच्या यादीत नोंद नसलेली परंतु दुर्लक्षित स्वरुपात असलेली व ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार असलेली अशी अनेक स्थळे जसे की स्मारक, शिलालेख, शिल्प, बारव, समाधी, ऐतिहासिक घटना घडलेले स्थळ इत्यादी अस्तित्वात आहेत. ऐतिहासिक वारस असलेल्या अशा दुर्लक्षित स्थळांचे जतन व संवर्धन न केल्यास सदर स्थळे काळाच्या ओघात नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या ऐतिहासिक वारसाचे जतन केल्यास हा अमूल्य ठेवा येणा-या पिढयांसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच या स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास पर्यटन वृध्दी व त्याअनुषंगाने रोजगार निर्मितीस देखील चालना मिळेल. यासाठी औरंगाबाद विभागातील सर्व ऐतिहासिक पुरातन स्थानांचे सर्वेक्षण करुन त्याचे दस्तऐवजीकरण करणे, सदर ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे व पर्यटनाच्या दृष्टीने विकास करुन पर्यटन वृध्दी करणे  यासाठी विभागात उपक्रम राबविण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे.

शिल्प, यास्तव उपरोक्त उपक्रम राबविण्यासाठी जिल्हयातील पूरातन स्थळे जसे की, स्मारक, शिलालेख, बारव, समाधी, ऐतिहासिक घटना घडलेले स्थळ इत्यादी चे सर्वेक्षण करण्यासाठी इतिहास संशोधक/ इतिहास अध्यापक व पूरातत्व विभागाचे प्रतिनिधी व पर्यटन विभागाचे प्रतिनिधी यामध्ये केतन पुरी यांचा समावेश करुन जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या अभ्यासगटात सहायक अभिरक्षक पुरातत्त्व तेर, उपसंचालक पर्यटन औरंगाबाद यांचा समावेश आहे तर सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हे आहेत.

दैनिक जनमत १२ नोव्हेंबर २०२१ E paper

दैनिक जनमत दिवाळी अंक २०२१

 

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवारी भव्य महामेळाव्याचे उस्मानाबाद शहरात आयोजन

 महामेळाव्याचा लाभ घेण्याचे प्रमुख जिल्हा न्यायधीश पेठकर यांचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.9(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार Pan India Awareness And Outreach Programme  अंतर्गत येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,  जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद, परिसरातील नाटयगृहाच्या प्रांगणात  दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते 5.00 वाजेपर्यंत शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी व लाभ देण्यासाठी महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या महामेळाव्याचा  जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्याना , असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश के .आर .पेठकर यांनी आज येथे केले .

       या महामेळाव्याचीसाठी आज  पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते .यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील आणि सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाशी संबंधित  योजनांची माहिती देण्याकरिता मेळाव्याच्या ठिकाणी डेडीकेटेड  स्टॉल लावावेत , असे आदेश दिले . 

          या मेळाव्यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.त्याच बरोबर विविध शासकीय कार्यालयातील लघू उद्योग, रेषीम उद्योग,पशुपालन, कृषी विषयक,समाज कल्याण इत्यादी योजनांची माहिती आणि पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.तसेच आरोग्य तपासणी आणि कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या महामेळाव्याचा जास्तीत  जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन यावेळी  न्यायधीश पेठकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनीही केले आहे.

उस्मानाबाद जिल्हा माताबाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये प्रथम स्थानी

 

उस्मानाबाद

राज्याच्या आरोग्य विभागांतर्गत कुटूंब कल्याण कार्यालय पुणे यांचे मार्फत मातावाल संगोपन आणि नियमीत लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या कामाचे जिल्हा निहाय मुल्यमापन करुन जिल्हयांचा गुणानुक्रम ठरविण्यात येतो. चालू वर्षात माहे सप्टेंबर २०२१ अखेर झालेल्या कामाचा मुल्यमापन अहवाल नुकताच प्रकाशीत करण्यात आला असून सदर अहवालातील गुणनूक्रमानुसार उस्मानाबाद जिल्हा हा राज्यामध्ये ८३ गूण मिळवून प्रथम क्रमांकावर आलेला आहे.

सध्या सर्वत्र कोविड- १९ महामारीचा काळ असताना व कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दररोज कामकाज करत असताना जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था व तेथील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी माताबाल संगोपन आणि नियमीत लसीकरण कार्यक्रमांच्या विविध निर्देशांकामध्ये जसे की, माता आरोग्य कार्यक्रम, बाल आरोग्य कार्यक्रम, नियमीत लसीकरण कार्यक्रम इत्यादी नॉन-कोविड कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता , यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फुर्तीने दिलेल्या उधिष्टानुसार काम प्रामाणिकपणे करत आहेत. या बाबत डॉ. नितीन बोडके जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. धनंजय पाटील जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. कुलदीप मिटकरी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी आणि डॉ. सचिन बोडके निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.) यांनी आरोग्य विभागांतर्गत जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे अभिनंदन करुन कामात सातत्य राखण्याचे आवाहन केले.