Home Blog Page 196

कारी येथील हजरत बरकतअली शहा बाबा उरुसास उत्साहात प्रारंभ


विद्युत रोषणाई मुळे दर्गाह उजळला

कारी: दि१९ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले ग्रामदैवत हजरत बरकत अली शह बाबा यांच्या उरुसास गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.उरूस निमित्त दर्गाहला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघत आहे.गुरुवारी संदल मिरवणूक, शुक्रवारी चिराग यादिवशी उरूस कमिटीकडून भाविकांना प्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते., ग्रामस्थांनी हजरत बरकत अली शहा बाबा यांच्या दर्गाहवर जाऊन चादर चढवून आशीर्वाद घेतले.तसेच शनिवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने दुवाचा कार्यक्रम पार पडून उरुसाची सांगता होणार आहे.

यावेळी माजी सरपंच इम्रान मुलाणी, ग्रा. पं. सदस्य ईलाई मुलाणी, तय्यब सय्यद , तांदूळजाचे मौलाना गुलाब हुसेन, रिजवान सय्यद राजू आतार, सुभाष पाटील,खंडू शिंदे, संतोष कावळे, शीराज मुलाणी, अलीम मुजावर, रमजान मुजावर, सोहेल मुलाणी, सय्यम सय्यद, शहाजान कोतवाल, अझहर मुलाणी, रमजान आतार, अस्लम शेख, राजू शेख, निहाल मुलाणी, सज्जाद मुलाणी, अजिज मुलाणी, बशीर मुलाणी,आदम मुलाणी, मुख्तार मुलाणी, जमीर मुलाणी आदीची उपस्थिती होती.

लग्न समारंभासाठी जात असताना अपघात; पती पत्नी जागीच ठार



सलगरा (प्रतिक भोसले ) – लग्न समारंभासाठी जात असताना अपघात होऊन पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून ११ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

सचिन भावसार (४०) आणि राणी भावसार (३४) मुलगा कौस्तुभ(११) रा. देऊळगाव राजा ह.मु. औरंगाबाद तिघे औरंगाबादहून गुंजोटी ता. उमरगा येथे लग्नसमारंभासाठी पहाटे एम एच २० सी एस ०६७० या चार चाकी वाहनातून निघाले होते सकाळी ८.३० गंधोरा पाटीजवळ झाडावर गाडी धडकली यात पती पत्नी दोघांचा मृत्यू झाला असून मुलगा कौस्तुभ याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात भरधाव वेगाने गाडी चालवताना वाहनावरील ताबा सुटल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत पती पत्नी चे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून गंभीर दुखापत झालेल्या मुलाला तुळजापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिस मदत केंद्र नळदुर्ग चे सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड आणि त्यांचे पथक दाखल झाले असून. पुढील तपास करत आहेत.

दैनिक जनमत १९ नोव्हेंबर २०२१ E paper

विशाल जमाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


 कसबे तडवळे – उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे शिवसेनेचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य विशाल जमाले यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 6.00वाजता बाजारपेठ येथे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक व शेती तज्ञ  पंजाबराव डख यांचे शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.



तर दिनांक 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वाजता शिवाजी चौक येथे महाराष्ट्रातील प्रख्यात शिवशाहीर संतोष साळुंके टीव्ही स्टार यांच्या बहारदार पोवाड्याचा कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी याचा सर्व शेतकरी बंधू व शिवप्रेमींनी याचा आवश्यक लाभ घ्यावा.असे अवाहन विशाल दादा जमाले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

एस. बी. आय डेप्युटी मॅनेजरची मुजोरी शेतकऱ्याच्या तोंडावर फेकली कर्जाची फाईल!

 

खासदारांनी बँकेत जाऊन घेतला समाचार!


उस्मानाबाद – उस्मानाबाद शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया ची मुजोरी कशी चालते याचा अनुभव अनेक शहरवासीयांना यापूर्वी आला आहे. मात्र आज वेगळाच प्रकार समोर आल्याने खुद्द खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना बँकेत यावे लागले.

धारूर येथील शेतकरी विश्वनाथ पवार आणि तुकाराम मोरे यांची पीक कर्जाची फाईल डेप्युटी मॅनेजर कांबळे यांनी तोंडावर फेकून मारली कारण दोन्ही शेतकऱ्यांनी बळजबरी माथी मारत असलेल्या १०२५० रू हेल्थ इन्शुरन्स घेण्यास नकार दिला होता. हा घडलेला प्रकार त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना देखील फोनवर सांगितला डेप्युटी मॅनेजर यांना फोनवर बोलण्याची विनंती केली मात्र त्यांनी नकार दिल्याने खुद्द ओमराजे निंबाळकर बँकेत आले. यापूर्वी पीक कर्ज घेणाऱ्या किती शेतकऱ्यांना बळजबरी ने हे हेल्थ इन्शुरन्स घेण्यास भाग पाडले याची चौकशी करण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची मागणी त्यांनी डी डी आर यांच्याकडे केली. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत जो फाईल तोंडावर फेकण्याचा प्रकार घडला त्याचे सीसीटिव्ही फुटेज घेऊन वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना बँकांकडून जी वागणूक मिळते जो त्रास सहन करावा लागतो त्याबद्दल तारांकित प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज घडलेल्या प्रकाराबद्दल एस बी आय मुख्य शाखा यांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास बाईट देण्यास नकार दिला.

लस न घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही? वेतन का रोखू नये खुलासा घेण्याच्या सूचना

उस्मानाबाद – जिल्ह्यात लस न घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यवाहीचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना पत्र लिहून लस न घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देखील लस घेतली आहे का नाही याची माहिती मागवली आहे. तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही त्यांचे वेतन का रोखू नये असा खुलासा देखील घेतला जाणार आहे.

दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड १९ लसीकरण मोहिम राबविली जात आहे. तथापी अद्यापही जिल्हयातील पहिली मात्रा न मिळालेल्या लोकांची टक्केवारी ३७% इतकी आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज रोजी जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये कोव्हीड- १९ प्रतिबंधात्मक लसीकरण सत्रांच्या माध्यमातुन सर्व १८ वर्षे वयावरील नागरीकांसाठी मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध असूनही काही शासकिय अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांनी अद्याप लस घेतली नसल्याचे आढळून येते ही बाब अत्यंत खेदजनक आहे. सर्व कर्मचारी, त्यांचे कुटूंबिय व जवळचे नातेवाईक यांनी लस घेतली किंवा नाही याचे लेखी प्रमाणपत्र घ्यावे. तसेच लस घेतली नसल्यास वेतन का रोखू नये या बाबतचा खुलासा संबंधिताकडून घ्यावा. या सुचनेप्रमाणे कार्यवाही अनुसरण्यात यावी आणि आपल्या अधिनस्त सर्व शासकिय अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे तात्काळ लसीकरण पुर्ण करून घ्यावे. आपल्या अधिनस्त शासकिय अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यापैकी लसीकरणापासून कोणीही वंचित राहिल्याचे आढळल्यास यासाठी आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही अनुसरण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.

उस्मानाबाद शहरातील तीन उद्यानांसाठी सात कोटींचा निधी मंजूर ; आमदार कैलास पाटील यांची माहिती



उस्मानाबाद – वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उस्मानाबाद शहरातील दोन उद्यानाच्या विकासासाठी आणि एका नव्याने करण्यात येणाऱ्या उद्यानासाठी सात कोटींचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

 शिवसेनेचे पालकमंत्री शंकरराव गडाख, आमदार प्रा. तानाजीराव सावत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीतून शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान या दोन उद्यानाचा विकास करण्यात येणार असून, नगर परिषद शाळा क्रमांक 18 येथे नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

राज्यातील नगर परिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत उस्मानाबाद नगरपालिकेला सात कोटींचा निधी नगर विकास विभागाने मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये, नगरपालिका शाळा क्रमांक 11 जवळील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नगरपालिका शाळा क्रमांक 18 जवळ नवीन उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहरामध्ये सध्या एकही उद्यान सुस्थितीत नाही. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ट नागरिकांना विरंगुळासाठी एकही ठिकाण नाही. उस्मानाबाद शहरात लहान मुलांपासून ज्येष्ट नागरिकांना विरंगुळा म्हणून उद्यानांची गरज होती. ही गरज ओळखून शहरात असलेली दोन उद्याने विकसित करण्यासाठी आणि नगरपालिका शाळा क्रमांक १८ जवळ नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे. शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यान हे सर्वात जुने उद्यान आहे. या उद्यानाची दुरावस्था झाल्याने त्याचा कायापालट करण्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न सुरु केले होते. या उद्यानाचा विकास करावा, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात येत होता समतानगरमधील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या उद्यानाचा विकास करण्यासाठी नगरपालिकेने नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. पालकमंत्री गडाख, आमदार प्रा. सावंत, खासदार राजेनिंबाळकर, आमदार घाडगे -पाटील, नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी उद्यानांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांची ही मागणी लक्षात घेता नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्मानाबाद शहरातील तिन्ही उद्यानांसाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून या तिन्ही उद्यानांचा कायापालट करण्यात येणार आहे.  निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले आहेत.