Home Blog Page 195

पावसाने बाजार उठवला ; शेतकऱ्यांसाठी नुकसानवार

 



उस्मानाबाद – कोव्हिड मुळे बंद असलेला बाजार दिवाळीपूर्वी सुरू झाला. मात्र त्यानंतर लाल परीचा संप सुरू झाला त्याचा फटका शेतकरी व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे मात्र आज उस्मानाबाद येथील आठवडी बाजारात पावसाने हजेरी लावली आणि अक्षरशः बाजार उठवला. पाऊस सुरू झाल्याने अनेक ग्राहक बाजाराकडे फिरकले नाहीत त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा नुकसानवार ठरला.
शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ च्या दरम्यान हलक्या सरी पडून गेल्या होत्या. आठवडी बाजारात खरी गर्दी दुपारी दोन वाजेनंतर च होते. २.३० च्या दरम्यान पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला तो ३० मिनिटे सुरू होता. शहरात सगळीकडेच पाऊस असताना आठवडी बाजार त्यातून कसा सुटणार सगळीकडे चिखल झाल्याने ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी अडचण येत असल्याचे पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर

बटाटे ३० ₹/किग्रॅ.

वांगी ४० ₹/किग्रॅ.

भेंडी, गवार ,दोडका ६० ₹/किग्रॅ.

पालक मेथी, शेपू  १० ₹ तीन पेंडी

२२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक २२  नोव्हेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  २२ नोव्हेंबर   २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. (सार्वजनिक आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने)

२) दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

         उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


 लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

      

कौडगाव औद्योगिक क्षेत्र विकासात खीळ घालणाऱ्यांना सदबुद्धि लाभो !

 


आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे कौडगावचे ग्रामदैवत बजरंगबलीला महाआरती करून साकडे


 उस्मानाबाद

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आलीदोन टप्याचे भूसंपादन देखील पूर्ण झाले. 50 मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होऊन कामही सुरू झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे सदरील काम रेंगाळले असून टेक्निकल टेक्सटाईल हबचा प्रस्ताव देखील राज्य सरकारने प्रलंबित ठेवला आहे. जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी व येथील अर्थकारणाला बळ देण्यासाठी या  औद्योगिक क्षेत्राचा विकास करून येथे मोठे प्रकल्प आणणे आवश्यक आहे. राज्याचे उद्योग मंत्री शिवसेनेचे जेष्ठ नेते आमदार सुभाष देसाई यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी करूनही याबाबत बैठक बोलावली जात नाही अथवा निर्णय होत नाहीत्यामुळे या राज्यकर्त्यांना सदबुद्धि द्यावी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांनी ग्रामदैवत हनुमानजींची महाआरती करून साकडे घातले.

 

यावेळी बोलताना आ.राणाजगजिसिंह पाटील साहेब म्हणाले कीतुमच्या सर्वांच्या साथीने कौडगाव एम आय डी सी मध्ये १५०० एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून बार्शी तालुक्यातील १००० एकरचे भूसंपादन अंतिम टप्यात आहे. उच्चदाब वीज वाहिनीगॅस पाईपलाईनपाणी या पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री ना.  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी येथील गरज लक्षात घेऊन आपल्या मागणीप्रमाणे या भागातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल टेक्स्टाईल उभारण्यास मान्यता दिली व एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसीने केपीएमजी संस्थेच्या माध्यमातून प्रारूप आराखडा तयार करून राज्य सरकारकडे दाखल केलापरंतु सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रस्तावावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. आजवर सदरील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. उद्योगमंत्री नामदार सुभाषजी देसाई यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केलाभेटून विनंती केलीअधिवेशनामध्ये सातत्याने हा विषय मांडला मात्र ना याबाबत बैठक बोलावली जातेना ही काही निर्णय घेतला जा तो. उद्योग मंत्री यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने माननीय मुख्यमंत्री ना.  उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे या विषयात लक्ष घालून बैठक बोलावण्याची मागणी केलीपरंतु दुर्दैवाने त्यांच्या कडूनही काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्यावर नुकतीच शस्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावीअशी देखील प्रार्थना यावेळी करण्यात आली.

 

तसेच या प्रसंगी ‍बोलताना नितीन काळे म्हणाले कीजिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. ज्यामुळे या भागातील १०००० तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करत असताना जाणून बुजून धाराशिव जिल्हयाकडे दुर्लक्ष करणा-या महाविकास आघाडी सरकारमुळे हा प्रश्न प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगीतले.

जिल्ह्याच्या दृष्टीने टेक्निकल टेक्सटाईल हब हा विषय अत्यंत महत्वाच असल्याने तो मार्गी लावण्यासाठी बैठक बोलावण्याची सदबुध्दी राज्यकर्त्यांना द्यावी यासाठी आज ग्रामदैवत हनुमानजी यांना महाआरती करुन साकडे घातले. या विषयाबाबत येत्या १५ दिवसाच्या आत बैठक घेवून राज्य सरकारने  निर्णय घ्यावा अन्यथा मारुती रायाचे दुसरे नाव बलभीम आहे याची प्रचिती जनता देईल असा सज्जड इशारा याप्रसंगी देण्यात आला.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळेनेताजी पाटीलअँड. खंडेराव चौरेनितीन भोसलेअभय इंगळेराजसिंह राजेनिंबाळकरयुवराज नळेबालाजी सुतार,‍ माजी सरपंच  राजाभाऊ थोरात माजी उपसरपंच  नितीन थोरात, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत थोरात, हनुमान मंदीराचे माजी  विश्वस्त भारत थोरात, राहुल काकडेप्रवीण पाठकपांडुरंग लाटेओम नाईकवाडीइंद्रजित देवकतेनाना घाटगेरोहित दंडनाईकसंतोष क्षिरसागरसुजित ओव्हाळलक्ष्मण मानेमेसा जानरावप्रीतम मुंडेप्रवीण शिरसाठेसागर दंडनाईकअमोल राजेनिंबाळकरगणेश एडकेगणेश इंगळगीमहेश बागलहिम्मत भोसलेस्वप्नील नाईकवाडीसंदीप इंगळेसुनील पंगूडवालेराज निकमसुरज शेरकरअमोल पेठेअनिल शिंदेबालाजी जाधवराजेसाहेब देशमुख, विश्वास नाईकवाडी, चंद्रकांत थोरात,  ज्ञानेश्वर थोरातगणेश जाधवसचिन चव्हाणकुमार तानवडे, भारत थोरात, ‍ विरसिग थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मी कृषी अधिकारी आहे अशी बतावणी करून एकाला ५० हजाराला फसवले

लोहारा तालुक्यातील घटना; गुन्हा दाखल

लोहारा पोलीस ठाणे :

उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. प्रशासन जनजागृती करत असून देखील अश्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना लोहारा तालुक्यात घडली आहे 

 एका अनोळखी व्यक्तीने, “मी उस्मानाबाद येथे कृषी अधिकारी असुन तुमचे सिंचन साहित्याचे अनुदान आले असल्याने त्यासाठी तुम्हाला 50,000 ₹ चलन भरावे लागेल, अनुदान मिळाल्यास तुमच्या चलनाची रक्कम तुम्हाला परत मिळेल.” असे बेंडकाळ ग्रामस्थ- राम साधु कदम, वय 72 वर्षे यांना दि. 18.11.2021 रोजी बतावणी केली. यावर काहीएक विचार न करता राम कदम यांनी त्याच्या कारमध्ये बसून त्या अनोळखी व्यक्तीस आपल्या घरी नेउन नमूद चलनाची रक्कम त्या व्यक्तीस दिली. यावर त्या व्यक्तीने ती रक्कम ऑनलाईन भरण्याची शाश्वती देउन अनुदानाच्या रकमेचा धनादेश उद्या घेउन येण्याचे कदम यांना आश्वासीत केले व आपला फोन क्रमांक कदम यांना देउन निघून गेला. यानंतर कदम यांनी त्या व्यक्तीस संपर्क साधले असता त्याचे प्रतीउत्तर येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या राम कदम यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 170, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

महागाई विरुद्ध जिल्हा काँग्रेसच्या वतीने जनजागरण अभियानाची सुरुवात

 



उस्मानाबाद:- जिल्हा काँग्रेस कार्यालय गांधी भवन उस्मानाबाद येथे  केंद्रसरकरच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेले निरीक्षक माजी आमदार मा.विश्वनाथ चाकोते, सहनिरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा जनजागरण अभियान रथाची पूजा करून व रथाला हिरवा झेंडा दाखहून शुभारंभ करण्यात आला.
  या वेळी मार्गदर्शन करताना चाकोते यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगून काँग्रेस व भाजपा सरकारमधील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यामधील फरक मांडला
 काँग्रेस झोपडीतील गरीब माणूस केंद्र बिंदू समजून योजना अंमलात आणत होती, तर भाजपा सरकार अदानी ,अंबानी याना समोर ठेहून सरकार चालवत असल्याचा आरोप केला,
 डिझेल, पेट्रोल,गॅस,शेती औजारे,खाद्यपदार्थ, मशनरी,यांच्या किमती काँग्रेसच्या काळातील किमतीशी तुलना केली तर तीन पट किमती वाढल्या असल्यामुळे जनतेचे बजेट कोलमडले असल्याचे दिसून येत आहे.
  या वेळी सह निरीक्षक डॉ रॅपनवाड यांनीही मार्गदर्शन केले काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेला जाग करावे असे आवाहन केले.
 जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून जनजागरण अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वी करू असे आश्वासन दिले.
 निरीक्षकांनी प्रत्येक तालुकाध्यक्ष यांचेकडून तालुकानिहाय आढावा घेहून अभियान प्रत्येक जि.प गट आणि गणात पोहचविण्याचे नियोजन करावे असे आवाहन केले.
  यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने कार्याध्यक्ष खलील सय्यद उपाध्यक्ष भागवत धस प्रशांत पाटील तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे ॲड. हनुमंत वाघमोडे पांडूरंग कुंभार बाळासाहेब गपाट सेवा दल अध्यक्ष विलास शाळू  सचिव जावेद काझी ॲड. विश्वजीत शिंदे शामराव भोसले प्रणित डिकले आनंद घोगरे मिलिंद गोवर्धन गोविंद पाटील ॲड.राहूल लोखंडे ॲड.अतुल देशमुख पोपट अंबिरकर उपस्थित होते
 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले कार्यक्रमास जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महावितरण कडून वीज पुरवठा चार दिवसापासून बंद

   पिंपळगाव (लिं) (शिवराम शिंदे) 

        वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येतील सब टेशन मधून पिंपळगाव पिंपळगाव परिसरातील गेल्या चार दिवसापासून महावितरण कडून वसुलीसाठी वीज पुरवठा चार दिवसापासून बंद केला आहे त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे मात्र पाण्याविना पिके वाया जाण्याची शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे यावर्षी खरीप हंगाम सुरुवातीला चांगला पाऊस झाला परंतु मध्ये एक ते दीड महिना पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात कसे बसे आलेल्या पिकाची काढणी चालू असता ने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने वाया गेला त्यात कसाबसा शेतकरी सावरतो न सावरतो तर महावितरण कंपनीकडून वसुली साठी चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

            रब्बी हंगाम हरभरा ज्वारी गहू इत्यादी पिके पाण्याविना वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडल्यासारखे आहे त्यातच शासनाकडून नुकसानीपोटी मिळालेली तुटपुंजा त्यातच आत्ता वीज वितरण कंपनीकडून वसुली साठी शेतकऱ्याची क्रूर चेष्टा चालवली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे एकीकडे आपला देश कृषीप्रधान याच कृषिप्रधान देशामध्येअसून सु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन वीज तोडणी थांबून शेतकऱ्याला जीवदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ जागांसाठी पोटनिवडणूक होणार


उस्मानाबाद –   निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदे विविध कारणांमुळे रिक्त आहेत.दिनांक १८/०२/२०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुक कार्यक्रम राबविण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.

१. ज्या ग्रामपंचायतीमध्ये कोवीड अॅक्टीव्ह रुग्ण संख्या नगण्य आहे.

२. ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपण्यास सहा महिन्याचा पेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. अश्याच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या पदावर पोटनिवडणुका होणार आहेत.

निवडणुकीचे टप्पे

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त  जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक  दिनांक २२/११/२०२१ (सोमवार) पर्यंत


तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार)


नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ३०/११/२०२१ (मंगळवार) ते दिनांक ०६/१२/२०२१ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० ते दु. ३.००


नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी )दिनांक ०७/१२/२०२१ (मंगळवार) वेळ सकाळी ११.०० वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत


नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत


निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. नंतर


आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक २१/१२/२०२१ (मंगळवार) सकाळी ७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत 


मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दिनांक २२/१२/२०२१ (बुधवार)


जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक दिनांक २७/१२/२०२१ (सोमवार) पर्यंत





२० नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  २० नोव्हेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांगयांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेचज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १७ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस


उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी १७ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेचज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे तत्वतः रद्द केल्यामुळे जिल्हा काँग्रेस कडून आनंदोत्सव

 

उस्मानाबाद

केंद्र सरकार मधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारित केले होते त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष गेली १४ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले होते अखेर केंद्र सरकारने हे प्रस्तावित केलेले काळे कायदे तत्वतः मागे घेत असल्याचे जाहीर केले केंद्र सरकार अखेर शेतकरी व विरोधकांच्या आंदोलना समोर झूकले म्हणून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्यावतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून   आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला 

    यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने,कार्याध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव जावेद काझी, ॲड.विश्वजीत शिंदे ॲड.राहुल लोखंडे ॲड.अतुल देशमुख बालाजी नायकल प्रभाकर लोंढे कपील भाई ॲड.गणपती कांबळे अहमद चाऊस यांचेसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.