Home Blog Page 194

‘त्या’ अदृश्य शक्तीचे राजकीय अस्तित्व संपवून टाकू तेरणा बचाव संघर्ष समितीचा इशारा



ढोकी 22 (प्रतिनिधी) – गेल्या चार महिन्यांपासून तेरणाची लिलाव प्रक्रिया चालू आहे. तेरणा च्या मागून तुळजाभवानीचा लिलाव होऊन गोकुळ ग्रुपने चालवण्यास घेतला, मात्र तेरणाची तीन वेळा निविदा निघुनही लिलाव प्रक्रिया अद्यापही झाली नसून उद्या तारीख 25 रोजी  लिलाव प्रक्रियेत अदृश्य शक्तीने अडथळा आणल्यास आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,ग्रामपंचायत व विधानसभा, लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकून व अशा अदृश्य शक्तीचा तेरणा सभासद व अवलंबित घटक पूर्णपणे राजकीय अस्तित्व संपवून टाकतील असा इशारा तेरणा च्या गेट वर सोमवार तारीख 22 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेरणा संघर्ष समितीने दिला आहे.

तेरणाचालू व्हावा यासाठी राजकारण विरहित सर्व गटांनी तेरणा बचाव संघर्ष समिती गठित केली नऊ-दहा महिन्या खाली आंदोलन मोर्चा काढून बँक व प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले होते, त्यास यश म्हणून तेरणाची उस्मानाबाद जिल्हा बँकेने कारखान्याकडे असलेल्या सव्वा तीनशे कोटी रुपये थकीत कर्जापोटी निविदा काढली तीन वेळा निविदा निघाली ,भैरवनाथ शुगर ने एकमेव निविदा भरली होती मात्र ती प्रसिद्ध निविदेच्या कमी असल्याने नाकारण्यात आली होती. तेरणा च्या मागून तुळजाभवानीची निविदा प्रक्रिया एकदाच प्रसिद्ध झाली व त्यात गोकुळ ग्रुपला देण्यात आली मात्र तेरणा च्या लागोपाठ तीन वेळा निविदा निघूनही अद्याप ही ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही यात काही अदृष्य शक्ती असल्याचे समजले आहे तेरणा बंद असलेनेया भागाचा अक्षरशः भकास झाला असून 32 हजार सभासद व अवलंबित घटक पूर्णपणे होरपळून निघाला आहे उद्या तारीख 25 रोजी च्या लिलाव प्रक्रियेत बँकेचे संचालक मंडळ व कुण्याही राजकीय मंडळींनी यात आडकाठी आणल्यास व संबंधित मंडळींचा सहभाग आढळून आल्यास त्यांचे राजकीय अस्तित्व 32000 तेरणा चे सभासद त्यांचा परिवार अवलंबित घटक व त्यांचा परिवार संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा तेरणाबचाव संघर्ष समितीने या मंडळींना पत्रकार परिषदेतून दिला आहे या पत्रकार परिषदेस सर्व तेरणा संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते सदर पत्रकार परिषद मध्ये दिलेल्या इशाऱ्याने अशा अदृश्य शक्ती कोण असाव्यात याचा शोध तेरणा सभासद घेत असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले आहे.

दैनिक जनमत २३ नोव्हेंबर २०२१ ई पेपर

२३ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक २३ नोव्हेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  २३ नोव्हेंबर   २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.      

२) दिनांक २३  नोव्हेंबर   २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

         उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २३ नोव्हेंबर  २०२१ रोजी २१ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


  लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीमध्ये घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करा – खा. राजेनिंबाळकर

 

दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योत योजनेचे ३७.७९ कोटी निधी खर्चा अभावी परत ! 

शौचालय वापरासाठी पुन्हा गुड मॉर्निंग पथके होणार तैनात 

उस्मानाबाद दि.२२ (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी दिल्यानंतर ज्या वर्ग खोलीच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. ते काम न करता परस्परच मनमानीपणे इतर गावच्या वर्गखोलीसाठी तो निधी वापरून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा व फसवणूक केल्याची बाब समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी अशा सक्त सूचना जिल्हास्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष तथा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.२२ नोव्हेंबर रोजी दिल्या. 

येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हास्तरीय दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्ता साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी संबंधित गावचे ग्रामस्थ जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करीत होते व आहेत. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठविला. तो प्रस्ताव आल्यानंतर त्यास नियोजन समितीने आवश्यक त्या रकमेची मंजुरी दिली. मात्र मंजुरी मिळाल्यानंतर  काही मंडळींनी या वर्गखोल्या दुरुस्त करण्याऐवजी दुसऱ्याच गावच्या वर्गखोल्यांची नावे त्यामध्ये परस्पर समाविष्ट करुन तू निधी इतरत्र खर्च केला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या वर्गखोल्या दुरुस्त झाल्याच नाहीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. ही बाब गंभीर असून ज्यांनी गाढवपणा केला आहे. त्यांच्यावर  जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन कारवाई करावी. तसेच यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी देखील दक्षता घ्यावी अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. तर दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योत योजने आयपीडीएस अंतर्गत २८ कोटी ८८ लाख कोटी निधी जिल्ह्यासाठी देण्यात आला होता. मात्र त्यापैकी १७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला. तर ग्रामज्योत योजनेसाठी ५६ कोटी १९ लाख  निधी उपलब्ध असताना त्यापैकी २० कोटी ६ लाख रुपये निधी अखर्चित राहिला.  तो दोन्ही मिळून ३७ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत जमा करण्याची नामुष्की विद्युत वितरण कंपनीच्या नालायक अधिकार्‍यामुळे ओढावल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र विद्युत, तारा जोडणी यासह विविध पायाभूत सुविधा असलेली कामे करणे अपेक्षित होते. त्यासाठी त्या कामांच्या वर्क ऑर्डर देखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र ही योजना २०१९ साली बंद झाल्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. 

पीक विम्यासाठी जिल्हा सरकारी कंपनीकडे द्यावा – आ. पाटील

बजाज अलायन्झ पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना देखील जाणून बुजून ती नुकसानीची टक्केवारी मान्य करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे व होत आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत वाईट बाब असून जिल्ह्यातील ठिकाण चे विमा कवच सुरक्षित राहण्यासाठी यापुढे खासगी कंपनी ऐवजी संपूर्ण जिल्हा सरकारी कंपनीकडे देण्यात यावा, अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी यावेळी केली. तसेच शासनाकडे कर्मचारी रिक्त असलेल्या जागांची माहिती पायाभूत मंजूर पदाच्या आधारित कळविली जाते तर बिंदु नामावली संच मान्यतेनुसार तयार केली जात आहे. त्यामुळे आंतर जिल्हा बदली पद्धतीने पात्र असलेल्या शिक्षकावर अन्याय होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे त्यांनी नमूद करून बिंदु नामावली शासनाच्या प्रचलित नियमानुसार तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या. तर मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकासच्या माध्यमातून कौशल्य विकास अधिकाऱ्यांनी मनमानीपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच प्रशिक्षण दिल्यामुळे गरजू वर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे – कांबळे

कोरोना विषाणूंच्या महामारीत जिल्ह्यातील अनेक कर्ते पुरुष व महिला यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आले असून त्या कुटुंबातील महिला किंवा इतर सदस्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्यास त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे अशा कुटुंबातील सदस्यांनाच प्राधान्याने कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या २५० लाभार्थ्यांच्या विहीरवर डिमांड भरून घेऊन विद्युत वितरण कंपनीने अद्याप पर्यंत विद्युत जोडणी दिली नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 

जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 25 नोव्हेंबर पर्यंत स्वीकरणार



उस्मानाबाद,दि.22(प्रतिनिधी):- जात पडताळणीसाठी दि.16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु आहेत. त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची, जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने तसेच अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑनलाईन आणि ऑॅफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्याची माहिती संबधित विभागाने कळवली  आहे.दि.17 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. तसेच ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन फॉर्म नंबर 16  barti.gov.in या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अर्जदारांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत जेणेकरुन विहित कालावधीत उमेदवारांचे जात वैधता प्रकरणी कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव तथा संशोधन अधिकारी   एस.टी.नाईकवाडी यांनी  केले आहे.

एस. टी. संपाचा विविध स्तरांवर फटका


उस्मानाबाद (कुंदन शिंदे) – मागील १६ दिवसांपासून एस.टी.कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्व स्तरावर परिणाम होत असल्याचे दिसत आहेत बसस्थानकातून एकही बस आगराबाहेर न पडल्याने रिक्षाचालक, व्यापारी,रूग्ण तसेच बसस्थानकात व्यवसाय करणाऱ्या वर झाला आहे.बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांना विविध ठिकाणी पोचविण्यासाठी ठिय्या मांडून बसणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे मागील १६ दिवसांपासून बसस्थानकातून बस सुटल्या नसल्यामुळे रिक्षा चालक शहरात फिरून व्यवसाय करत आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी दररोज शहरात येतात हे शेतकरी बसला कमी तिकीट असल्याने  हा भाजीपाला बसमधून शहरात आणून विकत असत मात्र खाजगी वाहनातून भाजीपाला शहरात आणून विकता येत नाही कारण की खाजगी वाहनधारक दुप्पट तिकिटाचे पैसे घेत आहेत त्यातच जे कामगार दररोज शहरात येऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागत होता अशा कामगारांना ये जा करण्यासाठी वाहनधारकांना जास्त पैसे द्यावे लागत आहेत.नागरिकांची कामे विविध कार्यालयांत असतात कोणाची कोर्टात तारीख असते कोणाचे तहसील कार्यालय कामे असतात अशा नागरिकांना बस बंद असल्याने हे कामे करण्यासाठी सकाळी पासून इतरांच्या हातपाय जोडावे लागते त्यातच कोणतेही वाहन न भेटल्यास ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी धडपड करून यावे लागत आहे.एस.टी.कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे सामान्य माणसाला याचा जास्त फटका बसत आहे त्यांची एकच मागणी आहे की बससेवा लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी होत आहे

आत मध्ये ‘दिशा’ ठरत होती आणि बाहेर ‘दशा’ ;सीईओंच्या गाडीला दे धक्का

 


उस्मानाबाद – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या शासकीय गाडीला आज दे धक्का करत गाडी सुरू करावी लागली. झाले असे की आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी व्हावी यासाठी दिशा समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्याला आढावा घेतला जातो. एकंदरीत या बैठकीत रखडलेल्या योजनांना दिशा देण्याचे काम यंत्रणेकडून होत असते ते आत मध्ये सुरूच होते मात्र खुद्द जिल्हा परिषद सी ई ओं  च्या गाडीला धक्का देण्याची वेळ यावी यातून यंत्रणेची दशा काय असेल अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू होती. 

सी ई ओंची एम.एच.25 सी.6494 ही शासकीय गाडी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह समोर बंद पडली त्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून ही गाडी धक्का देत स्टार्ट केली. ती गाडी बंद पाडण्याचे तांत्रिक कारण समजू शकले नाही. मात्र स्वयंचलित यंत्राच्या जमान्यात ढकल स्टार्ट असणे हे काळाच्या मागे आहे. प्रशासकीय यंत्रणा हाताखाली असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनाबाबत अश्या घटना घडत असतील तर दुर्गम भागात काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या, आरोग्य यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रुग्णवाहिका या सुस्थितीत आहेत का हे पाहावे लागेल.

हिंसक घटनेच्या विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

 

उस्मानाबाद – 

भारतीय जनता पार्टी  उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिसंक घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

   तसेच  शेतक-यांचे महावितरण काढून सक्तीने होत असलेल्या वीज तोडणीच्या विरोधात,      पिक विमा न देता शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात तसेच  पेट्रोल व डिझेल मधील करामध्ये कपात न केल्यामुळे सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, राजसिंहा राजेनिंबाळकर, अर्चना अंबुरे, खंडेराव चौरे, ॲड नितीन भोसले, इंद्रजित देवकते, रामदास कोळगे, प्रदीप शिंदे,विजय शिंगाडे, पांडुरंग लाटे, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त


जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. या पार्श्वभूमीवर आनंद नगर पोलीस स्टेशन च्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तासभराच्या आतच हे आंदोलन आटोपते घेण्यात आले.


भाजप जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न

 

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद वतिने प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय धाराशिव येथे जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न झाली .या बैठकीस भाजपा मराठवाडा संघटन मंत्री  संजय कोडगे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली .सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, या कोरोना सारख्या महामारी मध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऍड खंडेराव चौरे यांनी शोकप्रस्ताव घेतला, भाजप जिल्हा समन्वयक नेताजी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन ठराव सादर केला ,त्यानंतर भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी राजकिय अराजकता या विषयावर सखोलपणे विश्लेषण केले .नंतर संजय कोडगे यांनी भाजपच्या विविध कार्यक्रमांचे मार्गदर्शन करताना ते यशस्वी पणे राबविण्यात यावेत असे सांगितले. शेवटी काळे यांनी सर्व उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येवून 2 वर्षे उलटली परंतु एकही निर्णय जनतेच्या  हितासाठी घेण्यात आलेला नाही. वारंवार केंद्र सरकारला बोट दाखवणा-या राज्य सरकारने मात्र पेट्रोल व डिझेल वरील अबकारी कर देखील कमी केला नाही. राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात शेतक-यावर आलेल्या संकटात फक्त आणि फक्त बघ्याची भुमीका घेतलेली आहे. ना शेतक-यांना पिकविमा ‍मिळाला ना शेतक-यांना ठरल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतक-यांना  रु. १० हजार रुपयामध्येही अर्धवटच म्हणजे ४००० ते ५००० हजार इतकीच मदत देण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री हे फक्त झेंडावंदन करण्यासाठीच येतात परंतु जिल्हयातील चालू समस्या जानुन घेण्यासाठी अथवा बैठकीसाठी त्यांच्याकडे वेळच नाही असेही नितीन काळे यांनी सांगीतले. सत्तेत राहून एकही निर्णय जनतेच्या हितासाठी न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करावे असे सांगितले.वाशी तालुक्यातील कॅप्टन संकेत चेडे यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल भाजपा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने संजय कोडगे व नितीन काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,उस्मानाबाद जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी सौ. अर्चना अंबुरे यांची निवड झाल्या बद्दल भाजपा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने संजय कोडगे व नितीन काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,तसेच जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे यांची पंचायत समिती धाराशिवच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील विविध मोर्चा अध्यक्ष ,सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष,मंडळ अध्यक्ष ,जिल्हा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.