Home Blog Page 191

कुस्ती निवड चाचणीत पौर्णिमा खरमाटेला सुवर्णपदक



उस्मानाबादची सुवर्ण कन्या ठरली अजिंक्य !!

उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित दि. 28 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद मुक्कामी 15 वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड चाचणी घेण्यात आली.यामध्ये उस्मानाबादची महिला कुस्तीगीर पोर्णिमा प्रभाकर खरमाटे हिने 62 किलो वजनीगटात प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. अटीतटीच्या सामन्यात पोर्णिमा हीने सुवर्ण पदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. पोर्णिमा ही शरद पवार हायस्कुलमध्ये सध्या दहावीत शिकते. तर सह्याद्री कुस्ती संकुलात कुस्ती प्रशिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षात तिने विविध पदकांची कमाई केली होती. पोर्णिमाच्या सार्थ निवडीबददल शासकिय क्रिडा मार्गदर्शक  संदिप वांजळे सर,कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव पै.वामनराव गाते , मार्गदर्शक गोविंद घारगे ,सुंदर जवळगे व उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले . झारखंड येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक जनमत २९ नोव्हेंबर २०२१ E paper

काकांच्या पालखी सोहळ्याचे तेर मध्ये रोषणाई फटाक्यांची आतषबाजी ने स्वागत




तेर प्रतिनिधी :तेर येथील  श्री संत शिरोमणी  काकांचा पालखी सोहळा मजल दरमजल  करीत रवीवार दि.२८  रोजी सांयकाळी  तेर नगरीत दाखल झाला शिवाजी चौकात  सरपंच नवनाथ नाईकवाडी उपसरपंच रविराज चौगुले यांनी पालखीचे स्वागत केले. 

तेर त येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काका यांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे आयाही भाऊबीजेला पंढरपूरातील कार्तिक  एकादशी साठी शेकडो वारक-यासह  रवाना झाला होता. 

 पोर्णिमा  पर्यंत चा  कार्तिक सोहळा संपवून  दिनांक १९ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने मार्गस्थ  झालेल्या संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा येवती , खंडोबाचीआवाडी , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , सावरगाव पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा या मार्गे पायी प्रवास करत  दिनांक २८ रोजी  टाळ मृंदगाच्या तालावर हरी नामाचा जयघोष करत सायंकाळच्या सुमारास दाखल झाला।सडा रांगोळी व रोषणाई सह फटाक्यांची आतषबाजी ने पालखीचे स्वागत करण्यात आले

  यावेळी तेरसह परिसरातील भाविकांनी पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी  सर्वत्र भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते यावेळी परंपरेने ठरलेल्या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्रिवीक्रम मंदिरात   कीर्तन सेवा संपन्न झाली गोरोबा काकांच्या राहत्या घरी पालखीची आरती झाल्यानंतर तब्बल २२ दिवसांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळा विसावला.

बसस्थानक बाचाबाची; तिघांवर गुन्हा दाखल

 

उस्मानाबाद : काल दि २७ रोजी उस्मानाबाद बसस्थानकात एका कंडक्टरला चक्कर येऊन पडल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांत झालेल्या बाचाबाची प्रकरणात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळच्या उस्मानाबाद बस आगावरातील व्यवस्थापक- पांडुरंग मच्छिंद्र पाटील हे दि. 27.नोव्हेंबर रोजी 12.00 वा. सु. कर्तव्यावर असतांना उस्मानाबाद- तुळजापूर प्लॅटफॉर्म वरील बस सोडत होते. यावेळी उस्मानाबाद आगारातील वाहक- दत्ता सुखदेव माने, शंकर रामराव पडवळ व चालक- गणेश भगवान मंडोळे यांनी तेथे आंदोलकरण्यासाठी हजर राहून पांडुरंग पाटील यांना शिवीगाळ करुन मारहान करुन ठार मारण्याची धमकी देउन पाटील यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन पांडुरंग पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

२९ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक २९    नोव्हेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १३  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  २९    नोव्हेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.


सचिन देशमुख यांची युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती

उस्मानाबाद – तालुक्यातील वरवंटी येथील सचिन देशमुख यांची शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे या पदाचा उपयोग स्व.शरद जोशी यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व शेतकरी संघटना मजबूत करण्यासाठी करण्यात यावे यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ललीत बहाळे,मराठवाडा   अध्यक्ष,रामजीवन बोंदर,शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते ॲड नेताजी गरड,उस्मानाबादचे नुतन जिल्हा अध्यक्ष नवनाथ जाधवर, लातूर जी . अध्यक्ष आशोक पाटील,रुपेश शंके,भारत पाटील,सिध्देश्वर सुरवसे,जीवन देशमुख ,संतोष राठोड ,विनोद बिक्कड,सचीन खडके . महेश गव्हाणे ,हानमंत बोंदर,सचीन सौदागर बंन्टी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

२८ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक २८    नोव्हेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १२  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  २८    नोव्हेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.   



उस्मानाबाद बसस्थानकात पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू,कंडक्टर चक्कर येऊन पडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत बाचाबाची

 


उस्मानाबाद – उस्मानाबाद बसस्थानकात आज बस सेवा सुरू झाली मात्र ही बस सेवा सुरू होताच एक पुरुष कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी चक्कर येऊन पडल्याने गोंधळ उडाला.

आज सकाळी पहिली बस उस्मानाबाद ते तुळजापूर रवाना झाली त्यानंतर उस्मानाबाद ते उमरगा ही बस फलाटावर येऊन थांबली. या बस चे कंडक्टर मनोज खवळे चक्कर येऊन पडल्याने गोंधळ निर्माण झाला यामध्ये एस टी चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आणखी एका महिला कर्मचाऱ्याला देखील चक्कर आल्याने दोघानाही दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

 उस्मानाबाद विभागातील सत्तावीसशे कर्मचाऱ्यांपैकी 350 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यात यांत्रिकी , प्रशासकीय विभागात काम करणारे कर्मचारी यांचा समावेश असून कामावर हजर झालेल्या ड्रायव्हर , कंडक्टर च्या मदतीने तुळजापूर आणि उमरगा आगारातील प्रत्येकी दोन बसेस सोडण्यात आल्या आहेत. चक्कर येऊन पडलेले कंडक्टर मनोज खवळे यांना शुद्ध आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


पोलीस बंदोबस्तात बस सेवा


उस्मानाबाद बस स्थानकात दोन कर्मचाऱ्यांना चक्कर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी निर्माण केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आनंद नगरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली



महागाईचा फटका, हिवाळा सुरु होऊनही अंडी विक्री कमीच



उस्मानाबाद (कुंदन शिंदे) – संडे हो या मंडे रोज खाओ अंडे म्हणून ताव मारणाऱ्या व्यक्तींनी सध्या अंडी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. हिवाळा सुरू होऊन देखील अंडी महागल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र उस्मानाबाद शहरात दिसत आहे.

अंडी हे प्रोटीन मिळवण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय मानला जातो त्यामुळे अनेकजण अंड्यांची खरेदी करत असतात. सर्वच गोष्टींना जाळ्यात घेणाऱ्या महागाई तून अंडीही सुटली नाहीत उस्मानाबाद शहरात वाशी आणि नान्नज पोल्ट्री फार्ममधून तसेच सोलापूर येथूनही अंडी येतात शहरात चार ते पाच होलसेल दुकाने आहेत या एकाऐक दुकानातून दररोज ५००० ते ६००० हजारांपर्यंत अंड्यांची विक्री होते सध्या उस्मानाबाद शहरात घाऊक बाजारात अंड्यांचे शेकडा दर ४६० रूपयांपर्यंत आहेत डझनाचे दर ६० रूपये इतके आहे किरकोळ बाजारात एका अंड्यांची किंमत पाच ते सहा रूपये इतकी आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी अंड्यांचे दर ३८० ते ४०० रूपये होते हिवाळ्यात अंड्यांना मोठी मागणी असते पण दरवाढीमुळे अंडी परवडत नसल्याने अनेक लोक अंडी घेत नाहीत पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका आम्हाला बसला आहे खर्च वाढला आहे गेल्या वर्षी कोरोना काळात अंड्यांना मागणी होती मात्र महागाई मुळे पण ग्राहक अंडी खरेदी साठी येत नाहीत असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. येत्या काळात थंडी वाढली तर ग्राहक खरेदीसाठी येतील अशी आशा विक्रेत्यांना आहे.


पेट्रोल डिझेल दरवाढीचा विक्रीवर परिणाम झाला सध्या अंड्यांची खरेदी कमी झाली.महागाई झाल्यामुळे अंडी खरेदीसाठी ग्राहकांकडून पाठ फिरवली आहे 

अमीज पठाण विक्रेता