Home Blog Page 190

दैनिक जनमत ०१ डिसेंबर २०२१ E paper

औद्योगिक न्यायालयाच्या निकालाने २१ महिलांना मिळाला न्याय

सेवेत कायम करण्याचे आदेश, नगरपालिकेने केला सत्कार


 उस्मानाबाद (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून सेवेत कायम करावे या मागणीसाठी कामगार न्यायालयात लढा देणाऱ्या २१ महिलांना न्याय मिळाला आहे. सेवेत कायम करून घेण्याचे आदेश आल्याने सदर महिलांचा नगरपालिकेत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,उपाध्यक्ष अभय इंगळे, शिक्षण सभापती सिद्धेश्वर कोळी, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी एकत्रितपणे यथोचित सत्कार केला.

       नगरपरिषदेच्या बालवाडी सेविका या रोजंदारी कामगार म्हणून कार्यरत होत्या. या रोजंदारीवर असलेल्या बालवाडी सेविकांचा न्यायालयीन लढा त्यांच्या बाजूने लागला असून त्यांना आज रोजी नगरपरिषद उस्मानाबाद येथे रोजंदारी वरून कायम करण्यात आले. न्यायालयीन लढा जिंकणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व यापुढेही अशीच लहान बालकांची सेवा आपल्या हातून घडावी  अशी अपेक्षा व्यक्त करून आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली. व वर्षानुवर्ष लढणाऱ्या या महिलांना आता कायम सेवेत घेतल्याने त्यांना सेवेत शाश्वत आधार मिळाला आहे .

०१ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०१ डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १३   लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०१ डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.  

शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांकडे वेधले लक्ष


उस्मानाबाद – शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ताजा व गरम आहार मिळालाच नाही,विद्यार्थ्यांना जो बिस्किटरूपी आहार देत आहात त्यामध्ये कोणतेही जीवनसत्त्वे भेटत नाही ही बिस्किटे खाऊन मुलांचे पोट भरत नाही त्यामुळे त्यांना ताजा व गरम आहार  मुलांना शाळेतच देण्यात यावा,शालेय पोषण आहार कामगारांना अकरा हजार मानधन द्यावे,शालेय पोषण आहार कामगारांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे,सेंट्रल किचन प्रणाली रद्द करावी या निवेदनात म्हटले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


नगराध्यक्षांनी शब्द पाळला, स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रासाठी उपलब्ध करून दिली नगर परिषदेची 4000 चौ.मी. जागा

 

उस्मानाबाद – उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिलेला शब्द पाळला असून स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रासाठी 4000 चौ.मी. जागा नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे याचा फायदा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  उस्मानाबाद येथे आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता यावेळी  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांच्यासह  आमदार कैलास पाटील व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे देखील उपस्थित होते
सदर बैठकीमध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एम पी एस स्सी व यु पी एस सी च्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एकही मोठी अभ्यासिका किंवा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध नाही अशी माहीती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली व याविषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास  अभ्यासिका व मार्गदर्शन केद्र देऊ असा शब्द दिला. त्यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद नगर परिषदेचा अध्यक्ष या नात्याने या अभ्यासिकेसाठी नगर परिषदेच्या मालकिची 4000 चौ.मी. जागा  देण्याचा शब्द दिला होता. तसेच सदर जागा देण्याच्या कार्यवाही साठी आमदार कैलास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे पत्राद्वारे पाठपुरावा करुन उस्मानाबाद नगर परिषदेला जागा मागणी ची कार्यवाही करण्यास सागितली.  त्या अनुषंगाने नगर परिषद उस्मानाबाद येथे 30 ऑक्टोबर 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका (लायब्ररी)  व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे बाबतचा ठराव पारित करण्यात आला.
  सदर ठरावा अन्वये नगर परिषद वाचनालया लगतची नगरपरिषद उस्मानाबाद च्या मालकीची सर्वे नंबर 146 मधील 4000  चौरस मीटर एवढी जागा ही नगर परिषद उस्मानाबाद  यांनी उपलब्ध करून दिली आहे असा फलक कायमस्वरूपी असावा या अटीवर  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांना कायदेशीर बाबी पुर्ण करून सदर जागा हस्तांतरणाची कार्यवाही करणे संदर्भात त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून ठरावासह पत्र देण्यात आले.तसेच त्यांनी जागेची पाहणी देखील केली.
याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुंबई विभागाचे सहाय्यक कुलसचिव टि.के. सोनवणे साहेब, कुलसचिव डॉ. कैलास बोरसे, विभागीय संचालक औरंगाबाद डॉ. रमेश शेकोकार यांच्यासह मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे उपस्थित होते.

अनुदानास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई शेतकऱ्यांची मागणी

 



उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथील शेकडो शेतकऱ्यांना खरीप अनुदान हे वेळेत न मिळाल्याने  येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट झाली होती.

 या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे राज्य सरकारने सर्व बाधित शेतकऱ्यांना अनुदान म्हणून ७५ टक्के पहिला हप्ता म्हणून हेक्टरी ४९०० रुपये दिवाळी सणा दरम्यान दिले होते. मात्र टाकळी (बेंबळी) येथील शेकडो शेतकऱ्यांना दिवाळी झाली तरी अनुदान मिळाले नव्हते, तेव्हा गावातील अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आणि अनुदान जमा करण्याचा ठेका दिलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेत हेलपाटे मारले होते, अनुदान लवकर जमा व्हावे यासाठी सतत पाठपुरावा केला होता आणि अनुदान त्वरित जमा व्हावे म्हूणन माध्यमांनी देखील ही लावली होती, त्यानंतर २२ नोव्हेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते.

राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना दिवाळी दरम्यान अनुदान जमा होईल  असे आश्वासन दिले होते, इतर अनेक गावचे अनुदान जमा ही झाले मात्र टाकळी(बेंबळी) येथील शेकडो शेतकरी हे अनुदानापासून वंचित होते.  अनेक शेतकऱ्यांनी अनुदान आज जमा होईल, उद्या जमा होईल या आशेवर तहसील कार्यालयात , अनुदान जमा करायला ठेका दिलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेत हेलपाटे मारून स्वतःची फरफट करून घेतली होती. अनेक शेतकऱ्यांनी वेळेत अनुदान जमा न झाल्यामुळे बेभाव सोयाबीन विकून, काहींनी हात उसने करून, कोणी व्याजाने पैसे काढून दिवाळी साजरी केली तर अनेकांनी दिवाळीच साजरी केली नव्हती. 

त्यामुळे आज टाकळी(बेंबळी) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनटक्के यांनी आज (दि.२९)उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे अनुदान वेळेत जमा न करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून मागणी केली आहे.

राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

 परिपत्रक :

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, दि. ७ जुलै २०२१ अन्वये ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावात इ. ८ वी ते इ. १२ वीचे दि. १० ऑगस्ट २०२१ अन्वये ग्रामीण भागात इ.५ वी ते इ.७ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते इ. १२ वी तसेच दि. २४ सप्टेंबर, २०२१ अन्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दि.०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. एकुणच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील व इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. या विभागाच्या दिनांक ०७ जुलै २०२१ च्या परिपत्रकामध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तर दि. १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत/ ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

२.१ सदर समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.

(i) शाळा सुरु करण्यापूर्वी संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

(ii) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. (iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.

(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे. २.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी

किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. २.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.

3. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट, २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील • अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करून वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.

५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. ६. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड- १९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे.

थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर (Physical distance) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे, जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादीच्या ठिकाणी करण्यात यावा.

शारीरिक अंतर (Physical distance) राखण्यासाठी जेथे शक्य असेल तेथे येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात

५. शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध :

परिपाठ, स्नेह संम्मेलन, व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात.

पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता :

विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या किंवा लक्षण असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.

(9. विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-१९ च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुक करणे:

• शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करुन पुढील मुद्द्यांबाबत कार्यवाही करावी:

वैयक्तिक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण इत्यादीबाबत काय करावे किंवा काय करु नये याबाबतच्या सुचना.

शारीरिक अंतर पालनाचे (Physical distancing) चे महत्व. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छताविषयक सवयी.

कोविड-१९ बाबतच्या गैरसमजुती.

कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे.

• मास्कचा वापर करावा

• हात सातत्याने साबणाने स्वच्छ करावेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड १९च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध उपचार घेत आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.

८. शाळेतील उपस्थितीबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे:

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमती वर अवलंबून असेल.

• १००% उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके कोविड- १९ परिस्थितीमुळे सद्य परिस्थितीत देऊ नये. भविष्यामध्ये कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर नियमित शाळा सुरु झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील.

९. शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करणे आवश्यक

• शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छत्ता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना

१. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे : शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

• तापमापक (Thermometer), जंतूनाशक, साबण- पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावे.

वापरण्यात येणारे तापमापक हे calilbrated contactless infrared digital thermometer असावे. • ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार आहे अशा शाळांनी मुख्याध्यापकांच्या

नियंत्रणाखाली वाहतुक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता वाहतुकीसाठी वापरात येत असलेल्या वाहनांचे वेळो-वेळी निर्जंतुकीकरण करावे.

• एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) / कोविड सेंटर असल्यास स्थानिक • प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतर करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करुन हस्तांतर शाळेकडे करावे. २. शिक्षकांची कोविड- १९ बाबतची चाचणी:

• संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची RTPCR चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी

• ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी कोविड मुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी.

ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित

राहताना कोविड- १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड-१९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी. • शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण ( दोन लसी) झालेल्यांनाच शाळा /

कार्यालयामध्ये प्रवेश द्यावा.

३. बैठक व्यवस्था : वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.

वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यां दरम्यान ६ फुटांचे अंतर असावे.

• विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. ४.

शारीरिक अंतर (Physical distancing) च्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे :

. शाळेत दर्शनी भागावर Physical distancing, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित कराव्यात.

शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना

१. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परीस्थिती सतत राखणे:

शाळेचा परीसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.

शाळेतील वर्गखोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठभाग जसे स्वच्छतागृहे, हॅण्डल, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टॅबलेट्स, खुर्च्या, वाहने इ. वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

शाळेतील व शाळेच्या परीसरातील सर्व कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावी.

• हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात यावे.

सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात यावी.

विद्यार्थ्यांनी सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे.

 • शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये. २. शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे:

जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत तसेच, शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज Thermal Screening चाचणी घेण्यात यावी.

विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिला शाळेच्या परिसरात व शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये.काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणावे.

कोविड१९ प्रसार टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळण्यात यावी. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षात घेऊन मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी.

शाळेत जलतरण तलावाचा वापर करण्यात येऊ नये. ३. प्रत्येक शाळेमध्ये वैद्यकीय मदत कक्ष (Health Clinic) सुरु करणे :

. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.

हेल्थ क्लिनीकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परिचारीकांची मदत घ्यावी. • शक्य असल्यास वैद्यकीय मदत कक्ष (Health Clinic) सुरु करावे.

• शक्य असल्यास यासाठी इच्छूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी.

• विद्यार्थ्यांचे दररोज तापमान तपासणी करावी. ४. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे :

• कोविड- १९ संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वतः त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे.

वाहन चालक व वाहक यांनी स्वतः तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील

दक्षता घ्यावी.

याची

१००% लसीकरण झालेल्या वाहनचालक व मदतनीस यांचीच सेवा घ्यावी. दोन लस घेतले

नसलेल्या वाहनचालक व मदतनीसांना सेवेमध्ये घेऊ नये.

बस / कार यांच्या खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात. वातानुकूलित बसेस मध्ये २४ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान राखावे.

शक्य असल्यास वाहनात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावे

५. कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षीत प्रवेश व गमन (Entry and Exit) :

• दर दिवशीच्या दोन सत्रांच्या मध्ये योग्य तो कालावधी देण्यात यावा ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये

योग्य ते शारिरिक अंतर राखणे शक्य होईल.

शाळेस एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जातांना सर्व प्रवेशद्वारांचा वापर

करावा. कुटुंबातील एखादा सदस्य ताप/खोकला यांनी आजारी असल्यास आपल्या मुलांना पालकांनी

शाळेत पाठवू नये. ६. वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करावी :

• १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक (Practicals) शक्यतो घेऊ नये. तथापि आवश्यक

असल्यास विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करुन घेण्यात यावेत म्हणजे शारीरिक अंतराचे (Physical Distancing) पालन करणे सुलभ होईल.

विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, शाळेत येताना

सोबत आणावे व त्यांची अदलाबदल करू नये.

वर्गखोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. उदवाहन (lift) व व्हरांड्यांतील उपस्थित व्यक्तीच्या संख्येवर निर्बंध आणावेत.

स्वच्छतागृहामध्ये अधिक गर्दी होऊ नये, याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुण्यासाठी त्यांना वारंवार सूचना देण्यात याव्यात.

वातानुकुलित वर्ग खोल्यां असल्यास तापमान २४ ते ३० डिग्री सेंटिग्रेड ठेवावे.

७. अभ्यासवर्गांची व्यवस्था:

• जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात • प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गांकरिता जेवणाची सुट्टी नसेल.

८. कोविड- १९ संशयित आढळल्यास करावयाची कार्यवाही :

शिक्षक, कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे • ठेवावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी.

कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे. शाळेजवळील कोविड सेंटर/आरोग्य केंद्राबद्दलची माहिती मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकांच्या मोबाईलमध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी, संपर्क अधिकारी, रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक व कृती आरखडा असावेत.

९. खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन :

सद्य:स्थितीत १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येवू नयेत.

१०. आजारी विद्यार्थी शोधणे :

ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शारिरावर ओरखाडे, डोळे लाल झालेले ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलटया- जुलाब व पोटदुखी • असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा.

११. विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे – खालील लक्षणे दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी.

जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोटयाश्या गोष्टीत निराश होणारे वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे,

• वयाशी विसंगत वर्तणूक दर्शविणारे उदा. अंगठा चोखणे इ.

खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शविणारे

शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शविणारे,

असहाय्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी.

• अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्याच्याशी संवाद साधावा. अशा

विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करावे.

१२. विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कोविड- १९ सदृश्य लक्षणे निर्माण झाल्यास शाळेतील कोणाला कोविड- १९ सदृश्य लक्षणे दिसू लागल्यास घाबरुन जाण्याचे किंवा अशा व्यक्तीला भेदभावाने वागविण्यात येऊ नये.

• पालक आणि वैद्यकीय सुविधा केंद्रास कल्पना द्यावी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होई पर्यंत किंवा पालक येई पर्यंत अशा विद्यार्थ्याला मास्कसह शाळेतील वेगळया खोलीत ठेवावे.. कोविड बाधित विद्यार्थी वर्गामध्ये आढळल्यास पुढील प्रमाणे कृती योजना करण्यात यावी

• तो विद्यार्थी वर्गामध्ये ज्या रांगेत बसतो त्यांच्या मागील पुढील आणि दोन्ही बाजच्या

३• रांगेतील विद्यार्थ्यांना निकट सहवासित मानावे. याशिवाय इतर कारणामुळे बाधित विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची /शिक्षकांची यादी करावी.

• अशा निकट सहवासित विद्यार्थ्यांना २ आठवडयांकरिता होम क्वारंटाईन करावे. या काळात ज्यांना कोविड सारखी लक्षणे आढळतील त्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी. ज्यांच्या मध्ये • कोविड लक्षणे दिसून येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ५-१० दिवसांनंतर कोविड चाचणी करुन घ्यावी.

• ज्या वर्गात विद्यार्थी कोविड बाधित आढळून आले त्या वर्गातील बाके १% सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच स्वच्छतागृहे, सामायिक जागा यांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे.

शाळेत काही विद्यार्थी/ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोणी कोविड बाधित आढळल्यास शाळेत आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी शाळा मुख्याध्यापक व प्रशासनाने घ्यावी.

१३. विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्यबाबत शिक्षकांना मार्गदर्शन :

पहिल्या १ ते २ आठवडयामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होवू द्यावी. त्यासाठी आंनददायी शिक्षणांवर भर द्यावा. ज्यामुळे मुलांना शाळेची गोडी निर्माण होईल.

प्रत्येक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अवगत करुन त्यानुसार विद्यार्थ्याशी परस्परसंवाद साधावा. कोविड होवून गेलेल्या विद्यार्थ्यांशी सहानुभूतीने वागणे.

विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे. 

१४. शिक्षक पालक बैठकीत चर्चा :

कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत पालकांना माहिती द्यावी. पालकांच्या प्रश्नांना परस्पर संवादाने उत्तरे द्यावीत.

• मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे.

• लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे. मुलांना कमीत कमी पुस्तके / वह्या न्याव्या लागतील अशी व्यवस्था करावी.

१५. घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी : • घरात आल्यानंतर थेट वॉशरुमकडे जाणे,

• स्नान करुन युनिफॉर्म बदलणे,

.. आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा संबंधित शाळेने विद्यार्थ्यांना युनिफॉर्म ऐच्छिक करावा. मास्कसुध्दा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा,पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमबाबत अवगत करुन मुलांना पुढील दिवसासाठी तयार करावे.

१६. मानसिक व सामाजिक कल्याण :

चिंता आणि निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदविणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नियमित समुपदेशन केले जाईल, याचे नियोजन करावे. उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी.

३० नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ३०  नोव्हेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १२  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  ३०  नोव्हेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २१  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



तेर मध्ये विकासकामात अनियमितता ! ग्रामस्थांची चौकशी आणि कारवाईची मागणी

 

उस्मानाबाद – तालुक्यातील तेर येथे विविध कामात अनियमितता झाली असून त्या कामाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

     तेर ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून 2015- 16 आणि 2020-2021 या वर्षांमध्ये राबवलेल्या विविध विकास कामांची गुणवत्ता आणि लोकेशन तपासणी व्हावी,   तेर धरण पाईप लाईन करिता 12 कोटी 51 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असताना 37 कोटी 96 लाख रुपये खर्च करून देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही,या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाचे कारवाई करावी याकडे लक्ष वेधले आहे.


    या उपोषणासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते पृथ्वीराज आंधळे म्हणाले, विविध विकास कामे दाखवण्याचे चित्र उभे करून तेर येथील गाव कारभाऱ्यांनी आणि येथील राजकीय नेत्यांनी कोट्यावधी रुपये भ्रष्टाचाराच्या मार्गाने लुटले आहेत. तेर येथील संत गोरोबा काका च्या मंदिर परिसरात उभारलेले सांस्कृतिक सभागृह ग्रामपंचायतीने करार करून एका व्यापाऱ्यास भाड्याने दिलेली आहे त्या संदर्भातील चौकशी किंवा कारवाई राजकीय दबावापोटी केली जात नाही.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उभारलेली ४ लाख रुपयांचे अभ्यासिका जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडीत काढली. कोणत्या कारणासाठी ही अभ्यासिका मोडीत काढले याची कोणीही माहिती देत नाही याची चौकशी व्हावी,शासनाचे चार लाख रुपये पाण्यात जाऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. तेरणा नदी मध्ये शिरपूर पॅटर्न राबवून या कामाचे देयक रक्कम 17 लाख रुपये ग्रामपंचायतीचे नावे थकबाकी दाखवलेली आहे. या कामामध्ये लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झालेला असतानाही ही थकबाकी ग्रामपंचायतीच्या नावे कोणत्या नियमावलीच्या आधारे ठेवली याचीही माहिती प्रशासनाने द्यावी अशी आमची मागणी आहे. असे पृथ्वीराज आंधळे यांनी सांगितले.

गावचा विकास खरा अर्थाने होण्यासाठी शासनाकडून दिलेल्या निधीचा योग्य कामासाठी वापर व्हायला हवा,मात्र सत्ताधारी मंडळींनी स्वतःच्या फायद्यासाठी गावच्या निधीचा दुरुपयोग केला आहे.अशी माहिती माजी सरपंच महादेव खटावकर यांनी दिली. उपोषणामध्ये प्रशांत फंड, मसुद काझी,सचिन डोंगरे, सचिन कोळपे,आकाश नाईकवाडी,अमोल कसबे अविनाश इंगळे,अमोल थोडसरे,नामदेव कांबळे, शशिकांत सोनवणे, कानिफनाथ देवकुळे, विशाल फंड,नजीब मासुलदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध होऊन अपात्र झालेली व्यक्तीच दोषारोप करते, ही बाबच अत्यंत हास्यास्पद आहे. सरकार तुमचेच आहे कुठल्याही कामाची चौकशी करायला अडचण काय ?तेरणा बंद पाईप लाईन च्या विषयावर काही महिन्यापूर्वी मा. जलसंपदामंत्री यांच्याकडे चर्चा झाली होती, त्याचा इतिवृत्त अत्यंत बोलका आहे.जिल्ह्यात सर्वप्रथम शिरपूर पॅटर्नचे आदर्शवत काम तेरे येथे झाले आहे. मागील भीषण दुष्काळात गावाला पुरेसे पाणी व या अतिवृष्टीत गावाचा बचाव याच कामामुळे झाला, याची तरी जाणीव विरोधकांनी ठेवायला हवी होती.राजकीय वैफल्यातून होत असलेली ही उपोषणाची नौटंकी विरोधकांनी बंद करावी.



नवनाथ नाईकवाडी

सरपंच, ग्रा. प. तेर