Home Blog Page 189

चेअरमन पदी हनुमंत जायभाय तर व्हा. चेअरमन पदी उमेश दुरूंदे यांची निवड



परंडा (प्रतिनिधी)परांडा विद्युत मंडळ तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था (सोसायटी) संचालक मंडळाची बिनविरोध निवड होऊन,संस्थापक चेअरमन रामभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक अधिकारी प्रशांत प्रकाश चंदणे यांच्या   अध्यक्षेखाली सभा घेण्यात येऊन आज   हनुमंत जायभाय यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमन पदी उमेश दुरूंदे यांची बिनविरोध निवड  झाली आहे.चेअरमन व्हा.चेअरमन व निवडणूक अधिकारी चंदणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मा. व्हा चेअरमन गोकुळ गरड, सचिव विशाल पवार संचालक प्रशांत माने, नागेश गोजांरे, आनंद लिमकर, धनंजय चोरगे, गणेश तारळकर, राजेंद्र वाघमारे, देवीदास आलाट, कांताबाई पवार, संस्थेचे व्यवस्थापक विष्णू नरवणे , सुरज नायर, सुचीत देशपांडे, संदिप देशमुख, कृष्णा मुळीक, विश्वास इनामे, अमोल जाधव, सुर्यकांत कुंभार, भाऊसाहेब कांबळे,पांडुरंग कोरे,रणजीत देवराम उपस्थित होते

दैनिक जनमत ०४ डिसेंबर २०२१ E paper

 

भीमा कारखान्याच्या कामगारांच्या वतीन चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार

मगरवाडी (प्रतिनिधी )

मोहोळ तालुक्यातील भीमा सह साखर कारखान्याच्या कामगारांच्या आठ पगारी कामगारांच्या खात्यावर जमा केल्याबद्दल भीमा कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबा गावडे यांच्या वतीने व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना जगताप म्हणाले की येत्या काळात कामगारांच्या राहिलेल्या पगारी देखील लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सध्या भिमाचा हंगाम जोरात चालू असून कामगार  यापुढे गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी असेच सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले . याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री शिंदे साहेब उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या वेळी सर्व संचालक मंडळाचा व अधिकाऱ्यांचा सत्कार कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला संचालक बिबीशन पवार तुषार चव्हाण दादा शिंदे अनिल गवळी भाऊसाहेब जगताप संघटनेचे अध्यक्ष बाबा गावडे उपाध्यक्ष अशोक पवार महादेव बाबर पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील उत्तम भंडारे समाधान पवार मुकुंद गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्या ताठे यांनी केले. तर आभार हरी काळे यांनी मानले

०४ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०४ डिसेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १५ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०४ डिसेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १५ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या- वीटभट्टी उद्योग मालक संघटनेची मागणी

उस्मानाबाद – नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा विट भट्टी मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही जिल्ह्यातील विट निर्माती करणे, लघुउद्योग करत असून यासाठी लागणारा कच्चा माल (दगडी कोळश्याची राख बग्यास, फ्लॅश, मीठ) पाऊसामुळे मातीमोल झाला आहे. यामुळे विटभट्टी मालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या चिंतेत आज लघु उद्योजक मानसिक तणावाखाली आहे. तरी या बाबीची शासनाला कळूवन मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत पंचनामे करुन नुकसान भरपाई शासनाने द्यावी. तसेच रॉयल्टी पासून आम्हाला या वर्षी सुट देण्यात यावी. मुळातच शासकीय नियमानुसार आम्ही ३ फुटाखालचे गौण खनिज उचलत नसून शेतकऱ्यांची तांबडी माती घेवून त्यांना तलावातील काळी माती शेतकऱ्यांना सुपीक जमीन करून देतो. तरी ऊस कामगार कायद्याच्या धरतीवर विटभटटी कामगारांनासुद्ध ऊस कामगार कायद्यामध्ये समाविष्ट करून विटभटटी मालकांचे होणारे नुकसान टाळण्यास शासनाने मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत साळुंखे, उपाध्यक्ष शौकत शेख, सचिव शंकर साळूंके,प्रमोद गायकवाड ,खाजामिया मुलांनी, बापूसाहेब घोंगडे, श्रीनिवास रणदिवे, किशोर बाकले,असलम शेख, हणूमंत खळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.



उस्मानाबाद – सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात भाजपचे चक्काजाम आंदोलन

 पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर दिशा ठरवू – आ. राणाजगजितसिंह पाटील






उस्मानाबाद –

कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी  आज उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकार कडून दिलेल्या शब्द न गेला नाही. एकही शेतकऱ्याला हे. १० हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही. अशामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस पकडून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करत महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरु केली आहे हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दि.१७ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवून देखील या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. राणाजगतजिसिंह पाटील, नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, प्रदीप शिंदे, रमेश रणदिवे,अमर बाकले, प्रशांत रणदिवे,राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास काळगे, इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी,सतीश दंडनाईक, विजय शिंगाडे, आनंद कंदले, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, पूजा देडे आदी उपस्थित होते.




०३ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०३  डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १३   लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १८  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०३ डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १८ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

०२ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०२  डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १३   लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २०   लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०२  डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  २०   लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०१ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.