Home Blog Page 188

पोलीस बंदोबस्तानंतरही एसटी वर दगडफेक;दोन बस फोडल्या


उस्मानाबाद – विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप दिवसेंदिवस चिघळत आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तानंतरही दोन बसवर दगडफेक करण्यात आली. गेल्या जिल्ह्यातील महिनाभरापासून एसटी सेवा ठप्प आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने आज उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात अकरा बस सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी उस्मानाबाद उमरगा ही बस उमरगा येथून परतत असताना उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे दगडफेक करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद- पुणे या बसवर कौडगाव जवळ दगफेक करण्यात आली आहे.


उद्या बस सेवा सुरूच राहणार

आज दोन बसवर दगडफेक झाली असली तरी पोलीस बंदोबस्तात उद्या बस सेवा सुरू राहणार आहे. दगडफेक करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.



जि. प. प्राथमिक शाळा सलगरा येथे महापरिनिर्वाण दिनी करण्यात आले अभिवादन



सलगरा,दि.६(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरा (दि.) येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक डी.व्ही. खांडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी एस.बी. इंगळे, भोसले जि.व्ही. चव्हाण पी.डी., भक्ते एस.वाय.लोभे जि.ए.,  पोपळभट के.सी. ढवारे ए.के., बिराजदार एस.पी. आदी उपस्थित होते.

दैनिक जनमत ०७ डिसेंबर २०२१ E paper

पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा उद्या जिल्हा दौरा


उस्मानाबाद,दि.6(प्रतिनिधी):- राज्याचे मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री शंकरराव गडाख उद्या दि.07 डिसेंबर 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 7.00 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगर येथून उस्मानाबादकडे प्रयाण.सकाळी 10.00 वाजता उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.

गर्भलिंग प्रतिबंधक कायद्यान्वये डॉक्टरास एकवर्ष; सहा महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड

उस्मानाबाद,दि.06(प्रतिनिधी) :- गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी येथील भागवती हॉस्पीटलचे  डॉ. तुकाराम रामकृष्ण करडे यास भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सहा महिने शिक्षा आणि दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

डॉ.करडे यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा 1994 चे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात वाशी येथील तत्कालीन प्रथम न्याय दंडाधिकारी  यांनी डॉ.करडे यास एक वर्ष सहा महिने शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड इतकी शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेच्या विरोधात डॉ. करडे यांनी भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागीतली होती. या प्रकरणात सरकारी पक्ष आणि डॉ.करडे यांची बाजू ऐकून घेवून आरोपीने दाखल केलेले अपील फेठाळण्यात आले आहे. वाशी येथील प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी यांनी दिलेली एक वर्ष सहा महिने कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ही शिक्षा भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयान कायम ठेवली आहे.

यावेळी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड.किरण कोळपे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के. पाटील,डॉ.दत्तात्रय खुणे,डॉ.सचिन बोडके, PCPNDT सेलच्या विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यापुढे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सोनोग्राफी धारकांनी आणि एमटीपी धारकांनी कोणतेही गैरप्रकार होणार नाही तसेच कायद्याचे उल्लघंन होणार नाही यांची दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी (PCPNDT) डॉ.धनंजय पाटील यांनी केले आहे.

****

०७ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०७   डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १३   लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १६   लसीकरण केंद्रावर १८    वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०७  डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १६  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०६ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

०६ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०६   डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत   १३   लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १७   लसीकरण केंद्रावर १८    वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०६  डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १७  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

शेतकर्‍यांनी अधिक नफ्यासाठी आधुनिक पीक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करावा – तीर्थकर

 


जागतिक मृदा दिवस भुसणी येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला

उमरगा दि.५ (प्रतिनिधी) – जमिनीची वाढती धूप, मातीचा कर्ब व शेती न करता शेतीला देखील आपण एका व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून अधिक नफा कशा पद्धतीने घेता येईल ? यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक महेश तीर्थकर यांनी दि.५ डिसेंबर रोजी केले.

उमरगा तालुक्यातील मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व कृषी विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उस्मानाबादचे उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड, प्रा. अपेक्षा कसबे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी दीपक दहिफळे, उमरगा व लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग व मंडळ कृषी अधिकारी अभिजीत पटवारी आदी उपस्थित होते. 

यावेळी उमेश बिराजदार म्हणाले की,  महाडीबिटी व इतर योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी वर्गाने घेतला पाहिजे. विभागून शेती न करता गट शेती करण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तर माती परीक्षणाचे फायदे व जमिनीला लागणाऱ्या अन्न घटकांची संतुलित मात्रा देण्याचे अवाहान दीपक दहिफळे यांनी केले. तसेच पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये असणारे मातीचे महत्त्व, उसाच्या पाचट कुट्टीचे उत्पादनामध्ये होणारे फायदे याविषयी भगवान अरबाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर 

 वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम तूर व हरभरा पिकावर दिसून येत असून मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे. या रोगाचा शिरकाव बुरशीमुळे होतो व त्या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तसेच पारंपरिक वाण न वापरता आधुनिक वाणाची निवड शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन प्रा.अपेक्षा कसबे यांनी केले. यावेळी ज्वारी पिकांवर येणाऱ्या लष्करी अळी व उन्हाळी सोयाबीन लागवडी बाबत सविस्तर मार्गदर्शन मिलिंद बिडबाग यांनी केले.

तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता किमान आपल्या कुटुंबासाठी सेंद्रिय शेती करावी व सेंद्रिय शेतीचे आपल्या आरोग्याशी असलेले महत्व याविषयी अभिजित पटवारी उपस्थितांना उदाहरणासह पटवून दिले. 

या कार्यक्रमास भुसणीचे सरपंच महेश हिरमुखे, जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे, साहेबन्ना हिरमुखे, श्रीमंत पाटील, सुभाष बिराजदार, शशिकांत व्हनाजे, उमाकांत बिराजदार, सचिन बिराजदार, मोशिन मुगळे, अजित पाटील बालाजी संगसट्टे, योगेश स्वामी, मुकेश व्हनाजे, आर.एस. पाटील कृषी सहाय्यक भूसणी  व आदी शेतकरी उपस्थित होते.



 गट शेती ही काळाची गरज आहे असे आवाहन स्वामी चिदानंद यांनी केले. तर गावातील सर्व युवक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करण्यावर भर द्यावा असे आवाहन सरपंच महेश हिरमुखे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी पारंपारिक वाण न वापरता आधुनिक वाणाची निवड करुन उत्पादनात वाढ करावी असे आवाहन तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले.

अवकाळी पावसाने द्राक्ष बागायातदारांचे कंबरडे मोडले

प्रति हेक्टरी एक लाख रुपयाची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना मदत द्या शेतकऱ्यांची मागणी 


परंडा (भजनदास गुडे )  साऱ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा असं म्हटलं जातं पण गेल्या पंधरा दिवसापासून हवामानात होत असलेल्या बदल,ढगाळ वातावरण आणि गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. १, २ ,३,४ डिसेंबर या चार दिवसांमध्ये परांडा तालुक्यामध्ये ठिकठीकाणी पाऊस झाला यामध्ये तालुक्याचे नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील द्राक्षाचे व बेदाण्याचे माहेरघर अशी ओळख असलेले परंडा तालूक्यातील शिराळा गाव या गावामध्ये जवळपास ६०० ते ७०० एकर क्षेत्राव द्राक्ष बागा असून द्राक्ष बागांचे या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थीक अडचणीत सापडले आहेत.

     या चार दिवसांच्या पावसामुळे ज्या द्राक्ष बागा पोंगा स्टेजमध्ये आहेत,फुलोरा अवस्थेमध्ये आहेत या सर्व बागांना अवकाळी पावसाचा जोराचा फटका बसला आहे.या पावसामुळे द्राक्ष बागेतील घड जिरणे,गळ,कुज, पाकळ्या रिकामे होणे,डाऊनी, भुरी अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव द्राक्षबागेवर झालेला आहे.शिराळा गावातील व आसपासच्या द्राक्ष बागायतदारांचे द्राक्ष पिकांचे अंदाजीत ३० ते५० टक्के नुकसान झाले आहे.याचा फटका जवळपास ३० ते५० टक्के उत्पन्न घटण्याचा अंदाज द्राक्ष उत्पादक  शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

           महागड्या औषधांची द्राक्षबागावर फवारणी करून आधिच आर्थीक अडणीत आला असताना पून्हा द्राक्षबागेवर बेमोसमी पावसामुळे आलेल्या संकटाचा सामना कसा करावा आणि झालेला खर्च कसा भरून काढावा या चिंतेत आहे. तालुक्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्षे बागा बरोबरच इतर पिकांनाही बसलेला फटका याची नुकसान भरपाई तातडीने पंचनामे करून द्राक्ष बागांना हेक्टरी ५० हजार ते १ लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी द्राक्ष बागातदार शेतकरी करीत आहेत.   

      शासनाने त्वरीत प्रशासनास आदेश देशन द्राक्षबागाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन द्राक्ष बागायतदारांना आर्थीक नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.


तीन दिवसाच्या बेमोसमी पावसामुळे द्वाक्ष बागेचे गळ,कुज यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.अगोदरच माहागडया औषधाची पवारणी करुन जास्तीचा खर्च झाला असतानाच आता पावसामुळे उत्पान्नाला फटका बसला आहे. या नुकसानीची शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थीक मदत करावी.

स्वप्नील बोबलट,द्राक्ष उत्पादक शेतकरी शिराळा


अवेळी पावसामुळे शिराळा गावातील शेतकऱ्यांच्या द्वाक्ष बांगाचे खुप मोठे नुकसान झाले आहे.शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपया पर्यत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक द्यावी आशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. शिराळा येथील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे दि ६ डिसेबर रोजी तहसिलदार यांना निवेदन देणार आहोत.

 

रेवन औदुंबर ढोरे,उपसरपंच,द्राक्ष उत्पादक शेतकरी शिराळा