इम्पिरिकल डाटा राज्य सरकारकडे सुपूर्द करा अन्यथा तिव्र आंदोलन करू – डॉ. काकासाहेब सोनटक्के
उस्मानाबाद -केंद्र सरकारने ओबीसीचा इपिरीकल डाटा (अनुभवजन्य माहिती / प्रायोगीक माहिती व प्रवेश योग्य माहिती) त्वरीत राज्य सरकारकडे सुपूर्द करावी अन्यथा तिव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयाचा पुर्नरविचार करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ओ.बी.सी चे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून आरक्षण सुरू ठेवले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयात अध्यादेशाने मिळणा-या राजकीय आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिली असून केंद्र सरकारने ओबीसींचा इंपिरीकल डाटा (अनुभवजन्य माहिती / प्रायोगीक माहिती व प्रवेश योग्य माहिती) राज्य सरकारकडे सुपूर्द करावा. अन्यथा तिव्र आंदोलनाथा सामाना करावा लागेल असा इशारा कॉग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. काकासाहेब धनाजी सोनटक्के आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार यांनी दिला आहे. सन 1931 नंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नसल्याने आरक्षण स्थगित केले गेले आहे. विनाकारण देशातील बहुसंख्य 50 टक्के पेक्षा जास्त असलेले ओबीसी वर्गाला वेठीस धरले जात असून केंद्र सरकारचा (मोदी सरकारचा) तीव्र विरोध आहे असे लक्षात येते.
तरी ओबीसी समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असेही जिल्हाध्यक्ष डॉ. काकासाहेब धनाजी सोनटक्के आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष तथा कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार यांनी म्हटले आहे. सन 2010 साली डॉ. कृष्णमुर्ती विरुध्द भारत सरकार निवाडयात न्यायालयाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देताना ट्रिपल टेस्ट करून वैधानिक दृष्टीने योग्य प्रकारे आरक्षण देण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी राज्य सरकारने राज्य मागास आयोग नेमला. परंतु आयोगाला साधारण 400 कोटी रूपयांची गरज होती. ते अर्थ मंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षण कोर्टाने नाकारले नाही तर कायदेशीर व तांत्रिक बाबी पूर्ण करून आरक्षण द्यावे असा निकाल दिला होता. परंतु तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे.
जनगणना दर 10 वर्षांने केंद्र सरकार करून घेत असते. त्यामुळे सदरील संपूर्ण माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध असते.
तरी केंद्र सरकारने तात्काळ इंभिरीकल डाटा (अनुभवजन्य माहिती / प्रायोगीक माहिती व प्रवेश योग्य माहिती) उपलब्ध करून दयावा अन्यथा तीव्र आंदोलनाला आणि ओबीसी समाजाचा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा कॉंग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. काकासाहेब धनाजी सोनटक्के आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार यांनी दिला आहे.
१० डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागाती १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये
टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
०९ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागाती १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..
मुलाच्या निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा? भाजपने केली ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
उस्मानाबाद – ऊर्जामंत्री मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभारले आहेत त्यांच्या प्रचारासाठी विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला असून या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न कैल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे. हे योग्य नाही. सरकारी पदाचा गैरवापर कैल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत याचा त्यरित राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,ओम नाईकवाडी, राज निकम, गणेश एडके, प्रितम मुंडे ,हिम्मत भोसले, मनोज सिंह ठाकूर, स्वप्नील नाईकवाडी, अमरसिंह ढोबळे, देवकन्या गाडे, प्रज्ञा परिट आदी उपस्थित होते.
आरोग्य विभाग पेपरफुटीचे उस्मानाबाद कनेक्शन भूम ग्रामीण रुग्णालयाच्या दोघांचा समावेश
उस्मानाबाद – आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी उस्मानाबादचे कनेक्शन समोर आले आहे. भूम ग्रामीण रुग्णालयाच्या सहायक अधिक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप आणि ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड, या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. संदीप जोगदंड यांची महिन्यापूर्वी अंबेजोगाई येथे बदली झाली आहे. क्लार्क सानप आणि डॉ. जोगदंड बदलीनंतर देखील संपर्कात होते. डॉ. जोगदंड यांना २१ सप्टेंबर रोजी भूम ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त केले आहे तर राजेंद्र सानप १ डिसेंबर पासून ग्रामीण रुग्णालयात गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काल एकूण पाच जणांना अटक झाली आहे तर यापूर्वी सहा जणांना अटक झाली आहे. आरोग्य विभाग गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली होती. हे पेपरफुटी चे प्रकरण आरोग्य विभागाची नाचक्की करणारे ठरले होते. या पेपर फुटी प्रकरणी पैश्यांची देवाणघेवाण कशी झाली आणखी यात कोणाचा समावेश आहे का याचा तपास सायबर पोलीस करत असून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
०८ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागाती १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .





































