Home Blog Page 186

जिल्हाधिकारी कार्यालयात नो व्हॅक्सिन नो एंट्री मोहिमेची कडक अंमलबजावणी

 

 प्रशासनाने कोरोना निर्बंध शिथिल केले असल्याने गेल्या काही दिवसात  नागरीक बेफिकीर पणे फिरताना दिसत होते.  प्रशासनाने कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी जनजागृती केली असली तरी  अनेक नागरिक लसीचे डोस न घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या नागरिकांचे शासकीय कार्यालयात कामे आहेत अशा नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवून आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. ज्यांनी लसीकरण अद्याप केले नाही अशांना गेटवर थांबवले गेल्याने काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ज्यांचे जिल्हाधिकारी  कार्यालयात कामे होती  ज्या नागरिकांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते अशा नागरिकांना गेट वरून आपली कामे न करताच माघारी जावे लागले आहे. यापुढे ज्या नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयात कामे आहेत अशांना लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र गेटबाहेर दाखवून आतमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५,०६,८२२ कोव्हिड डोस देण्यात आले आहेत पाहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०,१४,५६७ एवढी आहे तर ४,९२,३१५ नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत.


दैनिक जनमत १५ डिसेंबर २०२१ E paper

१५ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक १५  डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत  १२  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागाती  १७  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १५   डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १६  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

शहराची ३० वर्षाची गरज भागवणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा डीपिआर सर्वसाधारण सभेत मंजूर

पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला जाणार प्रस्ताव

उस्मानाबाद – उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली या सभेत तब्बल चारशेहून अधिक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.  या सभेच्या प्रारंभी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हजर नसल्याने  नगरसेवक शिवाजी पंगुडवाले यांनी ही सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली मात्र इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांशिवाय सर्वसाधारण सभा सुरू ठेवण्यास  हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर  सभेचे कामकाज  सुरू करण्यात आले. येणाऱ्या काळात नगरपालिकेचे स्वताचा ॲप तयार करणार आहे त्यासाठी निविदा काढण्यासाठी एकमताने परवानगी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज पाहता ५४ एम एल डी पाणी याजनी धरणातून मिळावे यासाठी डी पी आर तयार केला आहे यावर देखील सर्वसाधारण सभेत चर्चा झाली.


ती कामे होणार का? 

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कधी नव्हे ते ४०० हून अधिक विविध विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सर्वानुमते ते विषय मंजूर करण्यात आले असले तरी त्या कामांना आवश्यक असणारी तांत्रिक मंजुरी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यकाळ संपत आला असताना सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करुन घेऊन विकासकामांचा पाठपुरावा केल्याचा भ्रम निर्माण केला जात असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.


दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा रुग्णांलयाची विशेष मोहिम

 उस्मानाबाद ,दि.14(प्रतिनिधी): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियाना निमित्त दि.15 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेची औचित्य साधून जास्तीत जास्त दिव्यांगानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.याला प्रतिसाद म्हणून उस्मानाबाद येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हांतर्गत विशेष मोहिमेचे आयेाजन करण्यात आलेले आहे.यानुसार उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय आणि तुळजापूर उप जिल्हा रुग्णालय यांनी उमरगा येथे चालू महिन्यात दि.15,17,22,24,29 आणि उप जिल्हा रुग्णालय कळंब दि.17,24, व 31  तसेच ग्रामीण रुग्णालय भूम येथे दि.15,22, आणि 29 डिसेंबर 2021 रोजी  तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून निश्चित केलेल्या तारखानुसार शिबिराचे आयोजन केले आहे. करिता त्या त्या तालुक्यातील आणि जवळच्या परीसरातील दिव्यांग लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले आहे.

१४ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत  १२  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागाती  १७  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १४  डिसेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १६  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक १३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.      

भाजपा च्या उपाध्यक्ष पदी प्रशांत लोमटे तर चिटणीस पदी अनिल मुळे यांची निवड



सलगरा,दि.१२(प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) गावचे विद्यमान उपसरपंच प्रशांत लोमटे यांची भाजपा च्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर अनिल मुळे यांची तालुक्याच्या चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे, दोघांना निवडीचे पत्र तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त १२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात देण्यात आले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुका पातळीवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आभारी असुन येणाऱ्या काळात पक्षबांधणी, पक्षाचे विचार, आचार, ध्येय – धोरणे तसेच केंद्र शासनाने जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजना या आ. सुजितसिंह ठाकूर आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे म्हणत तालुका उपाध्यक्ष उपसरपंच प्रशांत लोमटे आणि तालुक्याचे चिटणीस अनिल मुळे या दोघांनी आभार व्यक्त केले. 

या वेळी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगरसेवक अभिजित कदम, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे भाजपा शिक्षक आघाडीचे सदस्य प्रभाकर मुळे यांच्या सह अनिल मुळे, गोविंद व्हंदारणे, ज्ञानेश्वर बोधणे, तात्या केदार, दस्तगीर मुलाणी, अनिल लोमटे, भागवत लोमटे,  मनोज लोमटे, दिलीप मुळे, पापा मुलाणी, सुनिल अंदगावकर, अभिजित लोमटे, तानाजी पुजारी आदी उपस्थित होते.

चोरीच्या ट्रकसह आरोपी अटकेत


उस्मानाबाद –    6 ब्रास वाळू भरलेला ट्रक क्र. एम.एच. 13 आर 3459 हा दि. 07- 08.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री जळकोटवाडी (नळ), ता. तुळजापूर येथे रस्त्याकडेला उभा असतांना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- देवीदास हरीदास चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत 405 / 2021 हा गुन्हा नोंदवला आहे.

            सदर गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, शेळके, कवडे, पोकॉ- ढगारे, ठाकूर, उंबरे यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अफकपूर, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील वकील शंकर चव्हाण यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद ट्रक जप्त केला आहे.