इम्पिरिकल डाटा गोळा करून ओबीसींची फरफट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ओबीसी जनमोर्चाचा इशारा
इम्पिरिकल डाटा गोळा करून ओबीसींची फरफट थांबवा
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ओबीसी जनमोर्चाचा इशारा
उस्मानाबाद :- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार कडून अक्षम्य दुर्लक्ष होत असून ओबीसींची फरफट होत आहे. ही फरफट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने देण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार इम्पेरिकल डेटा गोळा करून स्थानिक संस्थांमधील ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने अक्षम्य दुर्लक्ष व दिरंगाई केल्याबद्दल ओबीसी जनमोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,
दोन वर्षापूर्वी आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाचविण्यासाठी यापूर्वीच्या महायुतीच्या सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. आपल्या सरकारकडून ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकारसुद्धा ओबीसींचे स्थगित झालेले आरक्षण वाचवू शकलेले नाही. कोणतेच सरकार ओबीसींच्या आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची भावना तीव्र नाराजी समाजामध्ये निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०१९ पूर्वीच कोर्टाच्या निर्णयाला अधिन राहून जिल्हा परिषदांच्या निवडणूका घेण्यास राज्य सरकारला कोर्टाकडून परवानगी देण्यात आली होती. तेव्हा राज्य सरकारने सन २०१० मधील के कृष्णमूर्ती खटल्याच्या निकालाला अनुसरून इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोग नेमणे आवश्यक होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात तारखांवर तारखा घेण्याव्यतिरिक्त सरकारने काहीच केले नाही. ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालाने ओबीसींच्या राखीव जागांवर निवडून आलेण्यांचे सदस्यत्व रद्द ठरविले. एवठेच नव्हे तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणच कोर्टाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्ट पूर्ण करीपर्यंत स्थगित झाले. तरीही सरकारचे डोळे उपडले नाहीत.या निकालानंतर राज्यसरकारने गरज नसताना फेरविचार याचिका दाखल केली. ती न्यायालयाकडून अपेक्षेनुसार फेटाळण्यात आली तरीही समर्पित आयोग नेमण्याबाबत सरकारने गांभीर्याने विचारच केला नाही.निकालानंतर ४ महिन्यानी जुलै २०२१ मध्ये राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्यांना इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची जबाबदारी दिली. पण राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याबाबत कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत.कारण राज्य शासनाकडून मागासवर्ग आयोगाला पुरेसा कर्मचारी वर्ग कार्यालयासाठी पुरेशी जागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डेटा गोळा करण्यासाठी निधीही राज्यशासनाकडून दिला गेला नाही. दरम्यानच्या काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुट्टीवर गेले. आयोगाच्या तज्ञ सदस्याने राजीनामा दिला आहे.अशा परिस्थितीत राज्य मागासवर्ग आयोग कोणतेच काम करू शकत नाही.ऑक्टोबर २०२१ मध्ये नागपूर, धूळे,नंदुरबार, वाशिम, अकोला जिल्ह्यातील पोटनिवडणूका ओबीसी आरक्षणाविनाच झाल्या ओबीसींवर अन्याय चालूच राहिला.
राज्य शासनाने अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचविण्याचा तात्पुरता प्रयत्नकेला असला तरी अध्यादेश न्यायालयाच्या कसोटीवर अपेक्षेनुसार टिकला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या नोटीफिकेशननुसार २१ डिसेंबर रोजी १०५ नगरपंचायतींच्या निवडणूका आहेत. त्या निवडणूका सुध्दा कोर्टाच्या निकालानुसार ओबीसी आरक्षणा विनाच होतील होतील.फेब्रुवारी २०२२ मध्ये अनेक महानगरपालिका व जिल्हापरिषद-पंचायत समित्यांची मुदत संपत आहे.१५ डिसेंबरच्या न्यायालयाच्या निकालाने राज्याला इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी ३ महिन्याची मुदत दिली आहे जर निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या नाहीत तर पुन्हा जिल्हा परिषदा पंचायत समित्या,महानगर पालिका व नगर पालिकांच्या निवडणूकांत ओबीसी आरक्षण पासून वंचित रहावे लागेल.ओबीसींच्या अन्य प्रश्नांबरोबरच राजकीय आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी २१ जुलै २०२०,९ ऑक्टोबर आणि १० ऑगस्ट २०२१ रोजी चर्चा करण्यात आली होती.परंतु परंतु वरवरच्या
मलमपट्टशिवायही विशेष काही हाती लागले नाही.राज्य शासनाकडून ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचा बांध कधी फुटेल हे सांगता नाही त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरील विराट मोर्चाने झालेली आहे अशाप्रकारचे मोर्चे राज्यातील सर्व जिल्ह्यातून आगामी काळात निघतील तरी येणाऱ्या २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र नाराजी व्यक्त केली जाणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे, इंद्रजीत देवकते,दत्ता अप्पा बंडगर, अॅड खंडेराव चौरे,शाम तेरकर, गणेश येडळे,भारत डोलारे मुकेश नायगावकर,बालाजी तेरकर, नामदेव वाघमारे, पांडूरंग लाटे, दत्ता सोनटक्के आदी उपस्थित होते.
अल्पसंख्यांकांची संकल्पना संख्यावाचक नसून दर्जा वाचक- डॉ सूर्यकांत घुगरे
झाडबुके महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
कारी (दि१८) प्रतिनिधी
सामान्यतः अल्पसंख्यांक या शब्दाच्या अर्थात बाबत समाजामध्ये अपरिचित पणा जाणवतो अल्पसंख्यांक म्हणजे असा समुदाय की, ज्यांना स्वतंत्र धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभलेले असते. धर्म, अल्पसंख्यांक आणि जनगणना अल्पसंख्यांकांच्या दर्जासाठी महत्त्वपूर्ण बाबी आहेत. अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळणे हा समुदायाच्या विकासाचा जणू राजमार्ग होय. वस्तूत: अल्पसंख्यांक ही एक प्रमुख मध्यमवर्गीय व महत्त्वाची संकल्पना आहे असे मत डॉ सूर्यकांत घुगरे यांनी व्यक्त केले.
ते श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात आयोजित अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बी. आर. काळे होते. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विशाल लिंगायत यांनी करून दिला.
यावेळी प्रा. डॉ. संजय नाईनवाड , डॉ वैभव वाघमारे, प्रा. जे. के. काशीद, ग्रंथपाल अनिल जेवळीकर, प्रा. एस. एस. मुळे, डॉ. कविता गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
वैराग ,उपळे दुमाला, कारी, गौडगाव ,भागातील सोयाबीन चोरणाऱ्या तीन चोरांना पांगरी पोलिसांनी चार तासात घेतले ताब्यात
कारी: (दि१८) प्रतिनिधी
प्रभाकर महादेव गादेकर राहणार कारी यांच्या फिर्यादीनुसार चार लाख 56 हजार तीनशे रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून पांगरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पांगरी पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाने एका पथकास गोपनीय बातमीदार मार्फत पांढऱ्या रंगाच्या पिकअप मध्ये येडशीकडून ढोकीच्या दिशेने चालला असल्याची माहिती मिळाल्याने ढोकी पोलीस स्टाफचा मदतीने सदरचा पिकप आरोपी नाव (१)नागनाथ अनिल चव्हाण वय 24 राहणार तांबरी तालुका जिल्हा उस्मानाबाद (२) सुरज रामलिंग पवार वय 21 राहणार एकुरका तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद बोलोरो पिकप क्रमांक एम. एच.25 पी. 24 61 मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक तपासाकरिता चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातील पिकप मधून सोयाबीनचे ५९कट्टे जप्त करण्यात आले तपासादरम्यान त्यांनी आणखी एक अशोक लेलँड कंपनीचा पिकआप हा आरोपी नंबर (3 )श्रीकांत विठ्ठल घुगे व 26 राहणार इंदापूर तालुका बार्शी हा विक्रीकरता गेल्याचे सांगितले . त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले असता मा .कोर्टापुढे उभे केले असता कोर्टाने चार दिवसाचे रिमांड दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले , सखोल तपासादरम्यान त्यांनी कारी, वैराग , गौडगाव ,येथील सोयाबीन चोरी, उपळे दुमाला येथील सोयाबीनचे चोरी, वैराग ते सोलापूर रोडवरची सोयाबीनची चोरी यातील आरोपी व इतर साथीदारांसह केल्याचे सांगत असल्याने गुन्ह्यात गेलेल्या सोयाबीन कट्या पैकी 91 कट्टे सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले दोन पिकअप एकूण दहा लाख ५४ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखीन साथीदार व चोरीचे ठिकाणे याचा अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
शेतकरी चिंताग्रस्त ; बदलत्या वातावरणाचा सलगरा सह परिसरातील पिकांना फटका
सलगरा,दि.१८(प्रतिनिधी)
खरिपाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने पिकाची नासाडी केल्यानंतर रब्बीची पिके तरी चांगली येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र मागील पंधरवड्यापासून होत असलेल्या ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील , सलगरा, किलज, गंधोरा, वाणेगाव, वडगाव देव सह परिसरातील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. हरभरा आणि ज्वारीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने ही पीके मार खात आहेत.
दरम्यान मागील काही महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची पूर्णपणे वाट लागली असताना रब्बीच्या पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या वातावरणात सतत बदल होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.आता जोमात आलेली पीके गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण या मुळे ज्वारी व हरभरा पीकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या मुळे पिकांना रोगांची लागण झाली असून कितीही महागडी औषधे फवारणी केली तरी हा रोग लवकर जात नसल्याने ज्वारीचे व हरभऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, यामध्ये शेतात हरभरा पीक वाढीच्या वेळेस असताना पिकाला मर येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत आहे. त्याच बरोबर हरभरा पिकावर बारीक अळ्या दिसून येत आहेत, पानांवर पांढरे डाग सुद्धा दिसत आहेत, त्या मुळे हरभरा पिकाला मर लागल्याने नुकसान होत आहे. याविषयी आम्हा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
शेतकरी – लोमटे नागनाथ ज्ञानदेव
सध्या ज्वारीवर अज्ञात रोगांचा / किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने या रोगांमुळे ज्वारीच्या पिकामध्ये जवळपास ३० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते, जर योग्यवेळी आणि योग्यपद्धतीने नियंत्रण केले तर नक्कीच या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविता येऊ शकते, ज्वारी पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत आहेत, या रोगांमुळे ज्वारीच्या पिकाचे नुकसान होत असल्याने उत्पादन कमी होण्याची भीती आहे. म्हणून या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
शेतकरी – लोमटे अभिजित चंद्रकांत
किड व्यवस्थापनाबाबत कृषी सहायक संतोष रंदवे यांचे मार्गदर्शन
ज्वारी किड व्यवस्थापन – अमेरिकन लष्करी अळींवर नियंत्रण मिळविण्यासाठी १०-२० टक्के प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टिन बेन्झोएट पाच एसजी चार ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के, अधिक लॅमडा साहलोथ्रीन ९ .५ टक्के, झेडसी पाच मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के , एस.सी. ४ मिली किंवा स्पायनोटोरम ११.७ एस. सी. पाच मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा किड व्यवस्थापन – पहिली फवारणी साधारणता चाळीस ते पन्नास टक्के फुलोऱ्यावर हरभरा असताना, पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करून पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत १-२ अळ्या आढळून आल्यास अथवा ५ टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच एक हेक्टर क्षेत्रात ८-१० फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवून सलग २ ते ३ दिवस प्रत्येक सापळ्यात ८-१० पतंग येत असल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. पिक फुलोऱ्यात आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य झाल्यास अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात . पेरणी बरोबर ज्वारीची दाणे मिसळली नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच इंग्रजी (टी) आकाराच्या काठ्या पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षीथांबे म्हणून रोवाव्यात . रासायनिक कीटकनाशकांची फवारणी / धुरळणी शक्यतो पट्टा पद्धतीने पिकाच्या १ ते १.५ मी. रुंद एका आड एक पट्ट्यावर करावी व राहिलेल्या पट्ट्यावर 5-7 दिवसांनी परत फवारणी करावी जेणेकरून परोपजिवी / परभक्षी किडींचे संवर्धन होऊन त्यांची कीड नियंत्रणास मदत होईल.
रासायनिक नियंत्रण – हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोर अँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आटपाडी मोटारी व आर्मीचर चोरी प्रकरणी सहा जण अटकेत
आटपाडी (अंकुश मुढे)
आटपाडी येथिल शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटारी व आर्मीचर चोरीप्रकरणी आटपाडीतील चंचलकुमार सिंह रा. मापटेमळा मुळ गाव बलना उत्तर प्रदेश, भाऊसाहेब श्रीमंत पाटील रा.गोंदिरा, निखिल राजेंद्र खरात. रा बोराटामळा, आटपाडी. दामोदर धनिराम वय. रा. मापटेमळा,मुळ गाव बलना उत्तर प्रदेश, रावसाहेब शिवाजी सागर, सागरमळा आटपाडी. पवनकुमार अशोक जाधव, विठ्ठलनगर.आटपाडी यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की पो. कॉ. गावडे यांनी वरील आरोपी चंचल कुमार सिंह यास ताब्यात घेऊन तपास केला असता. भाऊसाहेब श्रीमंत पाटील व निखील राजेंद्र खरात यांच्या मदतीने वरील गुन्हा केला असल्याचे सांगितले. चंचल कुमार, भाऊसाहेब पाटील, निखिल खरात या आरोपींना अटक करून अधिक तपास केला असता, वरील गुन्ह्याची कबुली देताना इलेक्ट्रीक मोटारी,पाण्यातील मोटारी व आर्मिचर आटपाडी येथील भंगार विक्रेते दामोदर धनीराम वय यांना विकल्याचे त्यांनी सांगितले भंगार विक्रेते दामोदर धनीराम वय यांना कौशल्याने अटक करून अधिक तपास केला असता. रावसाहेब शिवाजी सागर व पवन कुमार अशोक जाधव यांना त्याच मोटारी विकल्याचे कबुल केले आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आर्मिचर व 9 इलेक्ट्रीक मोटारी असा एकूण एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपास कामी आरोपींना अटक करण्यात आली असून, आटपाडी तालुक्यातील शेतकरी यांच्या चोरीस गेलेल्या मोटारींचा व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे..
विज चोरी विरोधात विजवितरण कंपनीची धडक कारवाई
कपिलापूरी,आवार पिपरी येथील ४३ विजचोरांवर दंडात्मक कार्यवाही
दंडात्मक रक्कम न भरल्यास गुन्हे दाखल करणार -अमेय वनारी
परंडा (भजनदास गुडे )दि १८ विज वितरण कंपनीचे औरंगाबाद येथिल सह व्यावस्थापकीय संचालक गोंधवले यांच्या आदेशा नुसार व परंडा विज वितरण कंपणीचे उपकार्यकारी अभियंता अमेय वनारी यांच्या मागदर्शना खाली विज चोरा विरुध्द परंडा तालुक्यात धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे .
दि १८ डिसेंबर रोजी विज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता अमेय वनारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सिराळा शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन बुरूंगे,यांच्या नेतृत्वाखाली विज चोरी रोखन्या साठी पथक प्रमुख कनिष्ठ अभियंता सुरज नायर, कनिष्ठ अभियंता,अंकुश जाधव कर्मचारी अशोक विभुते,राजेंद्र वाघमारे,इरफान शेख,देवीदास अलाट,ज्ञानेश्वर जाधव,मनिष वाघमोडे,समाधान शिंदे,कृष्णा मुळीक,जोगदंड यांच्या पथकाने आवार पिपरी,कपिलापुरी येथे पहाटे पाचच्या दरम्यान धाडी मारल्या
या घाडीत आवार पिपरी येथे २३ ठिकाणी तर कपिलापुरी येथे २० ठिकाणी आकडे टाकुन विज चोरी करीत असल्याचे आढळून आले आहे.
या सर्व विज चोरा विरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन दंडाची रक्कम न भरल्यास विजचोरी कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता सचिन बुरंगे यांनी दिली आहे .
विज चोरा विरूध्द कारवाई करण्यासाठी परंडा तालूक्यातील सर्व गावामध्ये धाडी मारून तपासणी करण्यात येणार आहे .
विज चोरी केलेल्या लोकांचे विजेचा वापर बघून ५ हजार ते २० हजार रुपये पर्यंत दंड करण्यात येत आहे .
परंडा तालूक्यातील ज्या लोकांनी आधिकृत विज जोडणी केलेली नाही त्यांनी विज वितरण कार्यालयात रितसर अर्ज दाखल करून अधिकृत विज जोडणी करून घ्यावी व ज्यांची विज जोडणी कायम खंडीत करण्यात आलेली आहे त्यांनी थकबाकी भरून विज जोडणी कऊन घ्यावी असे आवाहन परंडा विज वितरण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे .
विज चोरांना आता सावध होण्याची गरज असुन आकडे टाकलेले आढळल्यास कडक कारवाई करन्यात येणार आहे. विज चोरी विरूद्ध चे पथक अचानक धाडी मारुन कारवाई करणार आहे .
शालेय समितीच्या अध्यक्षपदी मोहिनी सोनटक्के तर उपाध्यक्षपदी मतीन पठाण यांची बिनविरोध निवड
पाडोळी( प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बेंबळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या आज (दि.१८) झालेल्या बैठकीत एकमुखाने अध्यक्षपदी सौ. मोहिनी प्रशांत सोनटक्के तर उपाध्यक्षपदी मतीन शहाबुद्दीन पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य म्हणून स्वाती भैरवनाथ भालेराव, अनुराधा गणेश सूर्यवंशी, नफीसा आदम शेख, शाहूराज श्रीमंत सोनटक्के, विलास संगाप्पा सोनटक्के, जमील रशीद पठाण, राजाराम ज्ञानदेव माने आणि शिक्षक तज्ञ म्हणून तानाजी योगीराज शेंद्रे आदी सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणात काहींची चिट्या टाकून तर काहींची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व शिक्षकांच्या वतीने निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळे ने आयोजित केलेल्या शालेय समितीच्या निवडीच्या बैठकीचे अध्यक्ष हे माजी शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष आदम शेख, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय सोनटक्के,उपसरपंच महादेव सूर्यवंशी, प्रमुख उपस्थित तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काकासाहेब सोनटक्के, शालेय समितीचे उपाध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामसेवक नेताजी सांगवे यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री.एच.एन.जगताप यांनी केले,शालेय समितीचे महत्त्व हे शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.एस.माशाळकर यांनी केले तर आभार श्री.सी. के.मस्के यांनी मांडले.
ही समिती गठीत करणेसाठी तानाजी थोरे, दादाराव जाधव, सुरज पठाण, अरुण सुर्यवंशी, नेताजी थोरे,ज्योतिराम जाधव, जलील पठाण, बळीराम खटके,सूर्याजी गायकवाड, उद्धव खटके,जुबेर पठाण यांच्यासह अन्य पालकांनी परिश्रम घेतले. यांच्यासह श्रीमती एम.बी.पवार, एस.पी.तानवडे,श्रीमती एम.एच. सय्यद, श्रीमती एम.एफ.शेख, श्री.जहागीर सर, कुलकर्णी मॅडम, हाजगुडे सर, फरताडे मॅडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
झरेगाव येथील श्री विठ्ठल बिरुदेव मंदिर कलशारोहण समारंभ
झरेगाव प्रतिनिधी