Home Blog Page 183

दैनिक जनमत २८ डिसेंबर २०२१ E paper

२८ डिसेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक २८  डिसेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत  १२  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागाती  १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २८  डिसेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व 
 पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.


राष्ट्रवादीची ताकद बघूनच शिवसेनेला धसका ; युती अघाडीचा प्रयत्न सुरू

 माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आरोपाला नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांचे उत्तर

मा.आ.राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नगरपरीषदेची सत्ता काबीज करणार – नगराध्यक्ष जाकीर सौदागर


परंडा (भजनदास गुडे )राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद बघून शिवसेनेने धसका घेतला असल्यानेच शिवसेना युती आघाडीची भाषा करीत आहे,जर राष्ट्रवादीने विकास कामे केले नाही तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील युती अघाडी ची भाषा का करीत आहेत असा सवाल करून मा.आ.राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली परंडा नगरपरिषदेची निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार निवडून आणून पुन्हा नगर परिषदेची सत्ता काबीज करणार असा दावा नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

         दि २६ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करन्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,शहर अध्यक्ष वाजीद दखणी,नगरसेवक सरफराज कुरेशी,संजय घाडगे,बब्बू जिनेरी, शफी पठाण,बच्चन गायकवाड, शरीफ तांबोळी,तनवीर मुजावर, राजकुमार माने,संतोष माळी, किरण डाके यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते .

         परंडा नगर परिषदेच्या निवडणूका जाहिर होण्यापूर्वीच परंडा शहरातील राजकारण तापले असुन शिवसेना राष्ट्रवादी मध्ये आरोप प्रत्यारोच्या फैरी झडू लागल्या आहे.

         परंडा नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असुन राष्ट्रवादी ने शहरात विकास कामे केली नसल्याने कोणत्या मुद्दयावर मते मागणार असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दि २५ डिसेंबर रोजी पत्रकारांची बोलताना केला होता .

         ज्ञानेश्वर पाटील यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर देताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश्वर पाटील १० वर्ष आमदार असताना शहरासाठी कोणते कामे केले दाखवुन दयावे असे आव्हान केले .

           राहुल मोटे आमदार असताना शहरातील अनेक ठिकाण च्या स्मशान भुमी,मंदीरा साठी रस्ते अशी अनेक विकास कामे केली असल्याचे सांगीतले आहे.

       नगर परिषदेच्या वतीने शहरातील माळी गल्ली,मंडई मुजावर गल्ली अश्या,अनेक ठिकाणी रस्ते,रेवणी भिमनगर, कवठे भिम नगर दलीत वस्ती भागात सुधारना करन्यात आली तसेच रमाई घरकुल योजने अंतर्गत १६५ घरकुले मंजुर करन्यात आली तर ३६ घरकुलुंच्या कामाला वर्क आर्डर दिली तसेच पंतप्रधान अवास योजने अंतर्गत ६६५ घरकुलांना मंजुरी देन्यात आली तर २४७ अवास पुर्ण करण्यात आले आहेत तर दर्गाह व कासीमबाग रस्त्याचे रुंदीकरण व मजबुती करण करन्यात आले आहे पुढील काम निधी अभावी बंदअसुन ते रस्ते पुर्ण करण्यात येतील त्या रस्त्या साठी एक रुपया ही उचलन्यात आलेला नाही अशी माहिती जावीर सौदागर यांनी यावेळी बोलताना दिली .

      दोन वर्ष कोरोना मुळे निधी न मिळाल्याने पोलिस ठाणे ते एस.टी स्टॅण्ड रस्त्याचे काम करता आले नाही पुढील काळात सर्व कामे करणार असल्याचे सौदागर यांनी सांगीतले

         राष्ट्रवादीने सुडबुध्दीचे राजकारण कधीच केले नाही शिवसेनेची सत्ता असताना शहरातील अनेकांचे दुकाने तोडली जनतेला दिलेला त्रास जनता विसरली नसल्याचे सौदागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले .

            राष्ट्रवादी कॉग्रेस नगर परिषद निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने व विकासाच्या मुद्यावर पुर्ण जागा जिंकेल असा दावा नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हॅरीयंट रुग्णांची संख्या पाच वर,तर एक रुग्ण झाला बरा


उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हॅरीयंट रुग्णांची संख्या पाच वर पोहचली असून त्यातील बावी येथील १३ वर्षीय मुलीची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आली आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथे घाना येथून आलेल्या  व्यक्तीचा ओमिक्रॉन व्हॅरीयंट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तसेच त्या व्यक्तीच्या २ वर्षीय लहान मुलाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या दोघांची प्रकृती चांगली आहे.

बावी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले होते. प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हयातील शेतकऱ्यांना आवाहन

 


 उस्मानाबाद,दि.23(प्रतिनिधी):-राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येता.उत्पादकतेत वाढ करण्यात येते. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.  

सध्याच्या पीकस्पर्धेतल महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत-

पीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.रब्बी हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पीके – ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ असे एकूण सहा पिके आहेत.प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी दहा आणि आदिवासी गटासाठी पाच पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पीकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पीकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या – सर्वसाधारण गटासाठी पाच आणि आदिवासी गटासाठी चार स्पर्धेत भाग घेणा-या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. 

      प्रवेश शुल्क-सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम तीनशे रुपये.अर्ज दाखल करण्याची तारीख – रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ – 31 डिसेंबर 2021.पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  7/12, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. 

पीकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीस स्वरुप-

   स्पर्धा पातळी -सर्वसाधारण आणि आदिवासी गट बक्षिस रुपये- 

तालुका पातळी पहिले बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस-तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस-दोन हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले बक्षिस दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस सात हजार रुपये,तिसरे बक्षिस-पाच हजार रुपये, विभाग पातळी पहिले बक्षिस-25 हजार रुपये, दुसरे बक्षिस-20 हजार रुपये, तिसरे बक्षिस-15 हजार रुपये, राज्य पातळी पहिले बक्षिस-50 हजार रुपये, दुसरे बक्षिस-40 हजार रुपये, तिसरे बक्षिस-30 हजार रुपये असे आहेत.

      पीकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

       रब्बी हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ – 31 डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज सादर करुन पीकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.