Home Blog Page 182

परंडा तालुका शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात संपन्न




धनंजय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

परंडा,(भजनदास गुडे)  : तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण २६ शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत व सभापती अनुजा दैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

           शिक्षण विभाग,पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय यांच्या वतीने हा सोहळा शनिवारी  दि.१ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती अनुजा दैन ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत,प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम, प्रभारी गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे,विस्तार अधिकारी योगेद्र खराडे,अनिता जगदाळे, सतिश संगमनेरकर,दत्तात्रय निर्मळे,रमेश बारसकर,भागवत घोगरे,दत्तात्रय गरड,ज्ञानेश्वर देवराम,रामदास होरे,लहू मासाळ आदी मंचावर उपस्थित होते.सन २०१९-२० व २०२०-२१ मधील एकूण २६ पुरस्कार शिक्षकांना उपाध्यक्ष धनंज सावंत व सभापती अनुजा दैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

     त्यात प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,विषय तज्ञ,मोबाईल टिचर, परिचर यांचा समावेश होता. सावात्रीबाई फुले व डॉ.राधाकृष्णण यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन मान्य वारांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे यांनी केले.यावेळी बोलताना त म्हणाले,शिक्षण विभागाने तालुक्यातील अनेक राबविलेल्या शैक्षणिक उपक्रम,कोविड काळात शिक्षकांनी केलेल्या कामांचा आवर्जून उल्लेख केला.यावेळी सूत्रसंचालन अरविंद बाराते व मनिषा जगताप यांनी अत्यंत समर्पक शब्दात  केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार नागनाथ गटकळ यांनी मानले.

     यावेळी शिक्षक हजगुडे ,साबळे, शिक्षिका हेगडकर,श्रीमती सुषमा गोरे,डोके सर,कवडे सर,शिवाजी शिदे,जयदेव गंभीरे,राहूल अंधारे,हेमंत मस्के, नागनाथ देशमुख,वैनिनाथ सावंत, श्रीमती संजिवनी पाटील, श्रीमती राखीताई देशमुख,श्रीमती शांता ठाकुर,श्रीमती मनोरमा जाधव यांच्यासह शिक्षक,शिक्षीका व पुस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीयण उपस्थीत होते.


चौकट…..यांना तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….

    पल्लवी चव्हाण परंडा,संगिता शिंदे डोमगाव, प्रभावती केमदारणे वाकडी,भारत केमदारणे वागेगव्हाण,माधुरी शिंदे आरणगाव,अंबॠषी कदम खासगाव,मनिषा कुलकर्णी  शेळगाव,अंकुश गवळी  गोसावीवाडी,लक्ष्मण काळे  इनगोंदा,विशाखा तावरे सक्करवाडी,सुरेखा भोसले वाटेफळ,गिता शिंदे-पाटील परंडा, नागनाथ उकिरडे सोनारी,श्रीपाद दुधाळ पिंपळवाडी,परमेश्वर जगताप वडनेर,कल्याणी तांबे जवळा,मनोज कोळी राजुरी, महादेव गाडे तांदुळवाडी,सचिन माळीआलेश्वर,पांडुरंग साबळे  आनाळा, गोकुळ कोकाटे देवगाव बु,उज्वला सोनवणे भांडगाव, सिध्देश्वर मेदने,वाटेफळ, विलास थोरात सोनारी,अंकुश डांगे व सारिका बेडके विषय साधनव्यक्ती,सुषमा माने  परिचारिका यांचा तालुकास्तरीय पुरस्काऱ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

०३ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण, १५ ते १८ वर्षाच्या मुलांना मिळणार या ठिकाणी लस

 १) दिनांक ०३  जानेवारी २०२२  रोजी उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत  १३  लसीकरण केंद्रावर  १५ वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑनलाईन व  ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 


उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०३ जानेवारी २०२२  रोजी शहरी भागामध्ये  १३   लसीकरण केंद्रावर १५  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १५  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

  


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व 

 पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.       

दैनिक जनमत ०१ जानेवारी २०२२ E paper

उस्मानाबाद जिल्ह्यात १ जानेवारी रोजी असे असेल लसीकरण

 १) दिनांक ०१ जानेवारी २०२२  रोजी उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत  १२  लसीकरण केंद्रावर  आणि  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०१ जानेवारी २०२२  रोजी शहरी भागामध्ये  १२   लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील १३  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..   

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व 

 पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे

वाहतूक नियम मोडणाऱ्या ३६११ जणांवर कारवाई १५ दिवसांत २२ लाखाचा दंड वसूल

 


उस्मानाबाद -( कुंदन शिंदे) वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढली आहे याची जाणीव असताना देखील वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा खिसा रिकामा होतो आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यात १२ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान केलेल्या ३६११ कारवाया मध्ये २२,६३,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे यामध्ये उस्मानाबाद शहर वाहतुकीने १३२८ केसेस मध्ये एकूण ७,९६,३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 उस्मानाबाद शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना या नव्या नियमानुसार दंड आकारला आहे. वाहतूक  नियमांचे पालन जे वाहनधारक करत नाहीत अशा वाहनधारकांवर धडक मोहिम वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत आहे उस्मानाबाद शहरातील १३२८ केसेस पैकी लायसन्स नसणे १५ केसेस दंड ७५०००, लायसन्स सोबत न बाळगणे ५३४ केसेस दंड २७५०००, ट्रिपल सीट केसेस ९५ केसेस दंड ९५००, मोबाईल वापर केसेस २० दंड २१०००, पोलिसांचा हुकूम न मानने केसेस ८८ दंड ४७०००, विना हेल्मेट केसेस ३३ दंड १६५००, विना सिटबेल्ट केसेस ३६ दंड ९९००, रहदारीस अडथळा केसेस ९२ दंड ४७०००, विना नंबर केसेस २०९ दंड १०५५००, विना साईड ग्लास केसेस ११७ दंड ५८५००, इतर कलमान्वये केसेस ८९ दंड ४५९०० इतका दंड आकारण्यात आला आहे.