०५ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण, १५ ते १८ वर्षाच्या मुलांना मिळणार या ठिकाणी लस
१) दिनांक ०५ जानेवारी २०२२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १४ लसीकरण केंद्रावर १५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑनलाईन व ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०५ जानेवारी २०२२ रोजी शहरी भागामध्ये १४ लसीकरण केंद्रावर १५ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १५ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व
उस्मानाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई नगरपालिकेकडून केली जात आहे शहरात ओमीक्राॅन या नवीन व्हॅरीयंट चा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रतिबंधात्मक खरबरदारी म्हणून शहरातील नागरिक विना मास्कचे फिरत असल्यामुळे ही कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी नगरपालिकेची ३ पथके नेमली आहेत या पथकामध्ये २१ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असून या संदर्भातील आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी दिले आहेत या २१ कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पाहिले पथक छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलिस स्टेशन, छत्रपती शिवाजी शाळा, सांजा रोड,उंबरे कोठा,बार्शी नाका इतर भागाची व्याप्ती दिली आहे या पथकाचे प्रमुख एस.पी.कांबळे हे आहेत.तर दुसरे पथक नेहरू चौक,बाजार चौक,दर्गा रोड,खाजा नगर,आडत लाईन, देशपांडे स्टॅण्ड,भिम नगर,सईस गल्ली,खाटीक गल्ली या भागात कारवाई करेल. या पथकाचे प्रमुख व्ही एस.गोरे आहेत तर तिसरे पथक समता कॅलनी,राम नगर ,समर्थ नगर, डी आर सी रोड,गालीब नगर, महात्मा नगर, आनंद नगर,एम आय डी सी दोन्ही भाग शाहू नगर या भागात कारवाई करेल. याचे पथक प्रमुख गोरख रणखांब हे आहेत. गेल्या दोन लाटेचा अनुभव पाहता जिल्हा रुग्णालय आणि मोठे दवाखाने शहरात असल्याने रुग्ण वाढीचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
केरळातील नौकानयनात राघूचीवाडीतील आयर्न करवर प्रथम
उस्मानाबाद (प्रतिनिधी )
केरळ राज्यातील कलिकट येथे आयोजित केलेल्या पहिल्या नौकायन स्पर्धेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील राघूचीवाडीचा आयर्न करवर पहिला आला आहे.
कलिकट केरळ मध्ये पहिली नौकायान चॅम्पीयनशीप आयोजीत करण्यात आली होती ही स्पर्धा २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ घेण्यात आली. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र,गुजरात, तेलंगणा, केरळ, गोवा या राज्यातून १८ वर्षा आतील (ज्युनियर) नाविक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत उस्मानाबाद येथील राघुचीवडी या गावातील आर्यन विनोद करवार (वय ११ वर्ष) याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच या वयोगटातून सर्वात ज्यास्त ४ पारितोषिक घेण्याचा मान मिळवला आहे.सर्वात कमी वयाचा नाविक,निशपक्ष नाविक, सर्वात लांब पल्यावरून आलेला नाविक आणि प्रथम पुरस्कार विजेता नाविक असे आयर्न करवार याचे वैशिष्ट्य सांगता येईल
०४ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण, १५ ते १८ वर्षाच्या मुलांना मिळणार या ठिकाणी लस
१) दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर १५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑनलाईन व ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १५ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १५ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व
पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.