Home Blog Page 180

पिकविम्यासाठी मल्हार आर्मीचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

 


उस्मानाबाद 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बजाज अलियांझ कंपनीला पिकांचा विमा भरला आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना हा विमा समान न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी अद्यापही विम्यापासून वंचित असल्याने त्यांना तातडीने विमा देण्यात यावा या मागणीसाठी मल्हार आर्मी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. पिक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा तसेच शेतकऱ्यांना समान विमा न मिळाल्यास  जिल्ह्यात ठिकठिकाणी मल्हार आर्मीच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे या लाक्षणिक उपोषणाला आरपीआय ने जाहीर पाठिंबा दिला आहे. उपोषणाला मराठवाडा अध्यक्ष अण्णासाहेब बंडगर,राम जवान, वैभव लकडे,समाधान पाडूळकर,अशोक गाडेकर, विठ्ठल खटके,शहाजी हाके, रामकिशन खटके, धनंजय खटके, नारायण बंडगर,बालाजी वगरे यांनी उपस्थित रहात आंदोलन तीव्र केले.


दैनिक जनमत ०७ जानेवारी २०२२ E paper

 

०७ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण, १५ ते १८ वर्षाच्या मुलांना मिळणार या ठिकाणी लस

१) दिनांक ०७   जानेवारी २०२२  रोजी उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत  १९   लसीकरण केंद्रावर  १५ वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑनलाईन व  ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०७  जानेवारी २०२२  रोजी शहरी भागामध्ये  १९  लसीकरण केंद्रावर १५  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १५  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व 

 पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.     

०६ जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण, १५ वर्षांवरील नागरिकांना मिळणार या ठिकाणी लस

 १) दिनांक ०६ जानेवारी २०२२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १९ लसीकरण केंद्रावर १५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑनलाईन व ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०६ जानेवारी २०२२ रोजी शहरी भागामध्ये १९ लसीकरण केंद्रावर १५ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १५ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .



लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक ०५ जानेवारी २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व 

 पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.    

सलगरा येथील जिल्हा परिषद शाळेत सिंधूताईंना वाहण्यात आली श्रध्दांजली



सलगरा,दि.५ (प्रतिनिधी)

अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. 

स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं, अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी यांपासून उद्योगपती पर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली.

सिंधुताईंच्या याच अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय ९०० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, मानाचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने देऊन त्यांना नुकतच गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त करून माईंच्या या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करीत तुळजापुर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.