Home Blog Page 176

अवैध धंदे तात्काळ बंद करा छावा संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


उस्मानाबाद – जिल्ह्यातील चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी अठरापगड जातीच्या मावळ्यांची छावा  संघटनेच्यावतीने आज दिनांक २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे 
    दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की उस्मानाबाद जिल्ह्यासह शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात गुटखा अवैध सावकारी दारू जुगार अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात चालू असून या धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे 
   तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे 
   या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राकेश पवार कार्याध्यक्ष अमोल सिरसट, सल्लागार ॲड.आकाश मगर ॲड. योगेश पडवळ,वामन खताळ,योगेश ताटे, संतोष जगदाळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश सातपुते यांचा सत्कार


सलगरा,दि.२०( प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील किलज ग्रामपंचायत येथे किलज येथील विद्युत वीज पुरवठा विभागाचे वरीष्ठ तंत्रज्ञ गणेश सातपुते यांचा त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल वाढदिनानिमित्ताने सत्कार करण्यात आला. गणेश सातपुते यांनी त्यांच्या क्षेत्रात करत असलेल्या कामाचे कौतुक होत असते. सातपुते हे किलज येथील विद्युत विभागाचे मुख्य असून त्यांनी त्यांच्या पथकासह आतापर्यंत गावातील वीजबिले भरपूर प्रमाणात वसुली केली आहेत, आणि एक प्रकारे प्रशासनास सहकार्य केले आहे, त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी मनोज गायकवाड, भरत गवळी, किलज ग्रामसेवक सचिन चौधरी, प्रदीप शिंदे, बब्रुवान शिंदे, आनंद निर्मळे, गौतम गवळी, गणेश कुठार, इराणा स्वामी, प्रकाश गायकवाड, राजेंद्र स्वामी, उत्तम राठोड यांच्या सह गावातील ईतर नागरिक उपस्थित होते.

समता-शिव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


उस्मानाबाद,20(प्रतिनिधी):- विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.

       विरशैव-लिंगायत सामाजिक, शैक्षणिक अर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणा-या कलावंत साहित्यिक,समाज प्रबोधन तसेच साहित्यिक क्षेत्रात कार्य करणा-या कलावंत साहित्यिक,समाज प्रबोधनकार, समाज सेवक व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याचा उचित सन्मान व्हावा तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा वृध्दीगत व्हावी म्हणून राज्य सरकारने या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांनी पुरस्कारासाठी त्यांच्या विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे दि. ०४ फेब्रुवारी-२०२२ पर्यंत सर्व कागद पत्रासह  सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत यांनी केले आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज व पुरस्काराविषयी सविस्तर माहिती या कार्यालयाकडे तसेच महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov .in वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक सांकेतांक क्रंमाक २०१९०३०८२०३९००३५२२ असा आहे.

शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी

 


उस्मानाबाद -महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.

राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शैक्षणिक संस्था जिल्हाध्यक्ष पांडूरंग लाटे,सुधीर पाटील,रामदास कोळगे, गणेश एडके,राजसिंहा राजेनिंबाळकर,प्रभाकर मुळे,विनोद राठोड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.