Home Blog Page 177

दैनिक जनमत १८ जानेवारी E paper २०२२

 

आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी

उस्मानाबाद –

 सुंभा, ता. उस्मानाबाद येथील अजय व सुनिल श्रावण शिंदे उर्फ काळ्या, या दोघा भावांस बेंबळी पोलीसांनी घरफोडीच्या गुन्हा क्रमांक- 210/ 2021 मध्ये अटक करुन उस्मानाबाद न्यायालयात काल दि. 16.01.2022 रोजी सादर केले होते. त्यांस न्यायालयीन कोठडीकामी उस्मानाबाद कारागृहात ठेवण्याचा आदेश झाल्याने कारागृहात भरती करण्यापुर्वी त्यांची उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 13.45 वा. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. यावेळी सुनिलच्या स्वाक्षरी व अंगुलीमुद्रेचा ठसा घेण्याकामी त्याची हातकडी पोलीसांनी काढली असता तो पोलीस हेडकॉन्स्टेबल- अभिमन्यु घोडके यांच्या हातातून आपला हात झटका देउन सोडवून फरार झाला.


भाजयुमोचे काळी रांगोळी काढून निषेधात्मक आंदोलन


उस्मानाबाद – येथील जिल्हाधिकारी कार्यलया बाहेर, विद्यापीठ कायदा सुधारणा  विधेयक राज्य सरकारने मागे घ्यावे या मागणीकरिता भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद युवती विभागातर्फे  काळी रांगोळी काढून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. 

महाविकास आघाडीने जे विद्यापीठ कायदा काळे विधेयक जे साभागृहात पारित केले त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने वेग-वेगळ्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवत आहे. या आधी युवा मोर्चाने लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले, हे काळे विधेयक मागे घ्या या विषयावर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॅाल्स , मेल करून मुख्यमंत्र्यांना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलेत आणि संपुर्ण महाराष्ट्रातुन फोन करून आग्रहाची मागणी केली की विद्यापीठ विधेयक त्वरित मागे घ्यावे. 

विद्यापीठात राजकारण आणु नये, ज्या प्रकारचे तुमचे मनसुबे आहेत की शिक्षणात राजकारण करून स्वताःचे हित साधण्याचे व विद्यापीठ हे राजकीय अड्डा करण्याचा जो मनसुबा आहे तो भारतीय जनता युवा मोर्चा कदापी होऊ देणार नाही.असा इशारा भाजयुमो च्या वतीने देण्यात आला. आज केवळ जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळी रांगोळी काढुन आज आम्ही आमचा विरोध दर्शविला आहे. विधेयक वापस घेण्याकरीता महाविकास आघाडीने त्वरित कारवाही केली नाही तर भविष्यात अधिक उग्र रूप घेईल व जनमाणसाच्या दबावाला तुम्हाला झुकावे लागेल आणि हे काळे विधेयक तुम्हाला मागे घ्यावे लागेल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला ,प्रदेश अध्यक्ष विक्रांत  पाटील महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सुचने नुसार व आमदार राणाजगजितसिंह पाटील ,आ,प्रदेश भाजप सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर ,जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शन व भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर ,यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले याप्रसंगी समन्वयक व उपनगराध्यक्ष अभय इंगळे ,प्रदेश कार्यकारणी सदस्य युवती विभाग पूजा देडे ,युवती जिल्हा संयोजिका पूजा  राठोड ,सरचिटणीस देवकन्या गाडे ,प्रियांका घोलप ,प्रगती जहागीरदार,सरचिटणीस कुलदीप भोसले ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील नाईकवाडी ,चिटणीस प्रीतम मुंडे ,गणेश एडके ,तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी ,कोषाध्यक्ष रोहित देशमुख ,हिम्मत भोसले ,प्रमोद बचाटे ,पपिन भोसले ,श्रीराम मुंबरे ,प्रसाद मुंडे ,प्रसाद राजमाने व इतर युवामोर्चा ,युवती आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते .

प्रणय मोरे याने टाकाऊ वस्तूंपासून साकारला किल्ला

सलगरा,दि.१६(प्रतिनिधी)

लोहारा तालुक्यातील न्यु व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू बनविण्यास सांगितले होते. म्हणुन त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्रणय प्रताप मोरे या सहावीतील विद्यार्थ्याने मुलांमध्ये किल्ल्यांबरोबरच

इतिहासा विषयी आवड व ओढ निर्माण व्हावी, तसेच मोबाईल – टीव्ही, गेममध्ये रमलेल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, त्यांच्यात ओढ निर्माण व्हावी या दृष्टीने शिवनेरी किल्ला तयार केला असून हा किल्ला किराणा दुकानातील तसेच घरातील विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून केला आहे. असे प्रणय चे वडील प्रा. प्रताप मोरे यांनी सांगितले, तसेच त्याने केलेल्या किल्ल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांनी सुद्धा त्याचे कौतुक केले आहे.

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा येथे अटक

 परंडा पोलीस पथकाची धडाकेबाज कार्यवाही,सायबर सेलची मदत आली पथकाच्या कामी


६०० कि.मी.अंतरावर असणारी पडित व आरोपी दोन दिवसात परंडा पोलीसांच्या ताब्यात



परंडा ( दि.१६ जानेवारी ) : परंडा तालूक्यातील आवारपिंपरी परिसरातील चौधरी वस्ती येथील एका अल्पवयीन मुलीस दि.१० जानेवारी रोजी रात्री लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेहल्या प्रकरणातील आरोपी सावन पवार यांस पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलिसांच्या पथकाने सायबरसेलच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यतील वर्धा थेथे अटक केली आहे.

        अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी परंडा पोलीस स्टेशन येथे  दि. ११ जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन या प्रकरणातील पीडीतेचा व आरोपीचा शोध लावण्यासाठी परंडा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी पोना रमेश सिरसागर व पोना शेवाळे यांचे पथक तयार करून या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी त्यांना महत्वाच्या सुचना देऊन पीडीतेच्या व आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आले.आरोपींची प्राथमिक माहिती काढली असता आरोपी पिडित मुलीसह‌ यवतमाळ जिल्ह्यात असल्याची  पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना माहीती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने यवतमाळ येथे तपास पथक रवाना करण्यात आले. आरोपीच्या लोकेशन वरून पोना रमेश क्षिरसागर व पोना शेवाळे यांनी यवतमाळ येथे पीडीतेचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली. मात्र आरोपी सारखा ठिकाणा बदलत असल्याने आरोपी हाती लागत नसल्याची माहीती पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना पथकाकडून वेळोवेळी दिली जात होती.

        प्रकरण गंभीर असल्याने आरोपीच्या शोधा साठी पोलिस अधिक्षक निवा जैन, अप्पर पोलिस अधिक्षक उपविभागीय पोलिस आधिकारी डंबाळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या नेतृत्वा खाली सहाय्यक पोलिस निरिक्षक एकशिंगे, पोना विशाल खोसे यांच्या संपर्कात राहुन तपास पथकाचे पोलिस नाईक रमेश क्षिरसागर व पोना शेवाळे यांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीच्या लोकेशन वरून त्याच्या सततच्या हालचाली जाणून घेतल्या जात होत्या.दोन दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सावन सुदाम पवार या आरोपीस तिसऱ्या दिवशी वर्धा शहरातून अटक करण्यात पोलिस पथकाला सायबरसेलच्या मदतीने यश मिळाले.आरोपीच्या तपास कामी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोनि एकशिगे,सहायक पोनि हिंगे,सहाय्यक पोनि ससाने,पोना विशाल खोसे, महिला पोना पायाळ, पोकॉ कळसाईन यांचे पथकाला वेळोवेळी मागदर्शन मिळाल्यामुळे ६०० किमी अंतरावर असणाऱ्या या प्रकरणातील आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश मिळाले.या तपास पथकातील प्रमुख पोलिस नाईक रमेश क्षिरसागर हे मुंबई पोलिसात कार्यरत असताना त्यांनी अनेक मिसींग,अपहरण प्रकरणचा तपास लावून आरोपींना परराज्यातुन अटक केलेली आहे.मुंबई येथील तपास कामाचा दांडगा अनुभव रमेश क्षिरसागर यांना या प्रकरणातील पीडीत व आरोपी यांचा शोध घेण्यासाठी कामी आला.


चौकट… परंडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश क्षिरसागर व शेवाळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांस ताब्यात घेतले.पिडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास करण्यात येत आहे.

      सुनिल गिड्डे,पोलिस निरीक्षक,परंडा.


चौकट….. परंडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली आरोपींचा शोध घेण्यात आला.आरोपी सतत ठावठिकाणा बदलत असल्याने अडचणी येत होत्या योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करून सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली.

        रमेश क्षिरसागर,

पो.ना.परंडा.