Home Blog Page 171

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाविकास आघाडीची सरशी


उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सरशी घेतली असून विरोधकांचा व्हाइट वॉश होईल अशी स्थिती सध्या आहे.

15 पैकी या पूर्वीच 5 जागा महाविकास आघाडीने बिनविरोध काढल्या आहेत. तर मतदान झालेल्या 10 जगेपैकी 5 जागेवर माहविकास आघाडी विजयी



आतापर्यंत पाच जागेवर शिवसेना,काँग्रेस चार, राष्ट्रवादी एका जागेवर विजयी आणखी पाच जागेची मतमोजणी सुरू आहे.


महाविकास आघाडीचे बिनविरोध आलेले उमेदवार

1) सुनील चव्हाण ( काँग्रेस)

2)बापूराव पाटील (काँग्रेस)

3) केशव सावंत (शिवसेना)

4) ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना)

5) मधुकर मोटे  (राष्ट्रवादी)

विजयी उमेदवारांचे नावे 

1) बळवंत तंबारे( सेना)

2)बालाजी पाटील( सेना)

3) नागप्पा पाटील (काँग्रेस)

4)सुरेश बिराजदार ( राष्ट्रवादी)

5)संजय देशमुख(सेना)

दैनिक जनमत २० फेब्रुवारी २०२२ E paper

दैनिक जनमत १९ फेब्रुवारी २०२२ E paper

 

बांधकाम कामगारांना सर्व योजनेचा लाभ लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करु – आ. पाटील

प्रधानमंत्री मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ





उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार असून यांना शासनाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेकांचे अनुदान रखडले असून ती अनुदानाची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी दिले.

उस्मानाबाद येथील सांजा रोड परिसरात शिवाजीनगर भागात भाजपा  कामगार आघाडी व स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रधानमंत्री मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील  कामगारांना मध्यान्ह भोजन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजप कामगार आघाडी तथा स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद भालेराव, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय काशीद, उमानाबाद गुत्तेदार संघटनेचे अध्यक्ष विलास डोलारे, उपाध्यक्ष श्रावण धावरे, कामगार भवन केंद्र प्रमुख उमेश जगदाळे, मनोज देशमुख, अजित नर्सिंगे, जीवन जाधव, मुकुंद पाटील, पुष्पकांत माळाले, रवी पवार आदी उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांनी कामगारांशी हितगुज साधून त्यांच्या अडचणी विषयी चर्चा केली. तसेच मध्यान्ह योजनेचे भोजन‌ स्वतः आ. पाटील यांनी कामगारांना वाढले. तर आनंद भालेराव यांनी दररोज दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत मध्यान्ह भोजनची गाडी ही कामगारांच्या साईटवर जाऊन सर्वाना जेवण देईल व मुक्कामी कामगारांना दुपार व संध्याकाळचे भोजन देखील मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे संघटनेच्यावतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ फेब्रुवारीपासून संपूर्ण जिल्हाभरातील कामगारांचा सर्वे करून त्यांना भोजन त्यांच्या साईटवर जाऊन देण्यात येणार आहे. या सर्व योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील ४० ते ५० हजार कामगारांना भोजन  देण्यात उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.  यावेळी रवी पवार, अंगुल माने, एजाज सय्यद, नेताजी शिंदे, नंदकुमार मनाले, सर्फराज पटेल, समद सय्यद, लहू बनसोडे, संघर्ष बनसोडे, विठ्ठल पाटील, रणजित गुरव  व कामगार व गुत्तेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनजनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

 उस्मानाबाद – जनहित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सन २०२०-२१ आणि २०२१-२२ ची पुर्ण अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम घोषित केल्यानुसार हेक्टरी दहा हजार रूपये प्रमाणे द्यावी,सन २०२०-२१ खरीप,रब्बी,पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी,सन २०२१-२२ चा खरीप विमा शासनाच्या टक्केवारी नुसार जमा करावी,कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सन २०२०-२१-२२ चा सरसकट विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी या मागण्या आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

वाशी तालुक्यात वाळू तस्करी जोमात ; महसूल पथक कोमात

  


तस्करांनी धक्काबुक्की करून ट्रॅक्टर नेला पळवून गुन्हा दाखल

 पारा( प्रतिनिधी ): वाशी तालुक्यातील महसूलच्या पथकावर अवैध वाळू तस्करांनी धक्काबुक्की करून रंगेहात पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर जागेवर  उलटून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी हातोला ते शेंडी रोडवर घडली. याबाबत पथकाने वाशी पोलीस स्टेशन मध्ये दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

             याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी अडीच वाजता वाशी तहसीलदार नरसिंग जाधव यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली की, हातोला ते शेंडी रोडवर  वाळूची वाहतूक होत आहे. तहसिलदारांनी लगेचच एका पथकाला तेथे आदेशित केले. यावेळी पथकाने एक लाल रंगाचे हेड असलेला व विना नंबर प्लेटचा ट्रॅक्टर वाळू घेऊन वाशी कडे जात असलेला रंगेहात पकडला. त्याची चौकशी केली असता ड्रायव्हर चे नाव मोरे असे कळले. हा ट्रॅक्टर तहसील कडे घेऊन जात असताना शिवशक्ती साखर कारखाना जवळ वाशी येथील मंगेश जगताप व दहा ते बारा जणांनी या पथकासोबत हे ट्रॅक्टर सोडून द्या असे म्हणत हुज्जत घालून दमदाटी करून धक्काबुक्की करत हे टॅक्टर पळवून घेऊन गेले. या सर्व घटनेचा व्हिडीओ वाशी तालुक्यातील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे वाळू तस्कर कोणत्या पायरीपर्यंत जाऊ शकतात? यांना अभय कोणाचे? दिवसाढवळ्या मांजरा नदीतून वाळू उपसा करायची आणि राजरोसपणे तालुक्याला नेऊन अवाच्या सव्वा भावाने विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत आहेत.

           या पथकामध्ये मंडळाधिकारी दत्तात्रय गायकवाड, दिगंबर माळी, शिवाजी उंद्रे, तलाठी अशोक राठोड, समीर पुट्टेवाड, राजू माळी, अंकुश साबळे, विनोद सूर्यवंशी, महादेव मोरे, इस्माईल बिरादार, राजेश पडवळ, सरवर सय्यद, नितीन कांबळे, संदीप मोरे हे कार्यरत होते.

          या घटनेबाबत वाशी येथील मंगेश जगताप व दहा ते बारा जणाविरोधत सरकारी कामात अडथळा आणणे, पथकाशी हुज्जत घालणे  अशा आशयाची तक्रार मंडळाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी वाशी पोलीस दिल्यामुळे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउनि निंबाळकर करत आहेत.