Home Blog Page 170

दैनिक जनमत ०१ मार्च २०२२ E paper

 

राज्यपालांना जोडे मारून केला वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादी आक्रमक

 


उस्मानाबाद – राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या वरील केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि बहुजन समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन करण्यात आले.  तसेच राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली तसेच राष्ट्रपतींनी या वक्तव्याची दखल घेऊन कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे अशी मागणी करण्यात आली. तसेच यापुढे अशी वक्तव्ये आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पृथ्वीराज चीलवंत, रणवीर इंगळे, सचिन शेंडगे, मृत्युंजय बनसोडे, महादेव माळी, बाबा मुजावर, नामदेव वाघमारे आदी उपस्थित होते.

दैनिक जनमत २८ फेब्रुवारी २०२२ E paper

वैफल्यग्रस्त तरुणाची सासूरवाडीत आत्महत्या…!

 


२२ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वनखात्याच्या हद्दीतील वृक्षावर आढळला


आजरा(प्रतिनिधी)-

आजरा तालुक्यातील प्रकार आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील स्वप्निल मारुती दिवटे या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वनखात्याच्या हद्दीतील वृक्षावर आढळला. चार-पाच दिवसापूर्वी त्याच्या घटस्फोटाबाबतची चर्चा होऊन तसा करारनामाही झाला होता. कौटुंबिक वैफल्यातून सदर प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की स्वप्निल हा चार दिवसापासून बेपत्ता होता. याबाबतची वर्दी आजरा पोलिसात वडील मारुती दिवटे यांनी दिली होती. नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान आज त्याची दुचाकी पेरणोली वझरे मार्गावर उभा केलेल्या स्थितीत आढळली. त्याच्या शोधार्थ यमेकोंड येथील काही मंडळी आली असता त्याच्या सासुरवाडी पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वन विभागाच्या हद्दीत त्याचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबतचे वृत्त आजरा पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अधिक चौकशी केली असता स्वप्निल याचा पेरणोली येथील एका मुलीसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. वर्षभरापासून सदर मुलगी माहेरी रहात होती. अखेर चार दिवसापूर्वी या दोघांचाही घटस्फोट घेण्याचा निर्णय त्यांच्या पालकांसमक्ष घेण्यात आला होता. तसा करारनामाही वकिलांकडून करून घेण्यात आला होता. यानंतर स्वप्नील अस्वस्थ होता. पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. स्वप्निल याच्या पश्चात आई,वडील व  चार बहिणी असा परिवार आहे.

युक्रेन मध्ये नातेवाईक अडकले असल्यास तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून माहिती कळविण्याचे आवाहन

  


उस्मानाबाद –

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युक्रेन या देशाविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. या परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक युक्रेन या देशामध्ये अडकले आहेत अशा नागरिकांनी त्याबाबतची माहिती तात्काळ जवळच्या तहसिल कार्यालयात संपर्क करुन कळवावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास आपत्ती व्यवस्थापन कक्ष क्रमांक (02472) 225618/227301 या क्रमांकावर संपर्क करुन कळवावी. जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल

तसेच याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री), +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905 आहे व फॅक्स नंबर +91-11-23088124 हा आहे व तेथील ई-मेल आयडी situationroom@mea.gov.in हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी नागरिक युक्रेन या देशामध्ये अडकले असतील तर त्यांचे नातेवाईकांनी वरील नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.