Home Blog Page 169

विजेच्या शाॅर्टसर्किटमुळे ऊस पेटून मोठे नुकसान

 



रिधोरे- (अतुल गवळी)

तांदुळवाडी.ता.माढा येथील श्री. भगवान विश्‍वनाथ कदम यांच्या शेतात असलेल्या विजेचा पोलवरील कटपॉईंटवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे,भगवान विश्‍वनाथ कदम,प्रकाश श्रीरंग गवळी,पोपट लंकेश्वर,दत्तात्रय निवृत्ती गवळी,दत्‍तात्रय रघुनाथ खबाले,सिद्धेश्वर श्रीरंग बचुटे यांच्या शेतातील ऊसाला आग लागल्याने जवळपास दहा ते बारा एकर जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.भर दुपारच्यावेळी कडक उन्हात आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं होतं.आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी कसरत करत व प्रयत्नांची पराकाष्ठा करून जवळपास ८० ते ९०एकर ऊस आगीपासून वाचविण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले आहे.

ऊस वाचविण्यासाठी अमोल गवळी,मदन गवळी,प्रदीप गवळी,विष्णू अनपट,अतुल गवळी,सोनू परबत,सदानंद गवळी,पांडुरंग गवळी,बाळासाहेब गवळी,महादेव गवळी,प्रकाश कदम,तेजस परबत,बाळासाहेब कदम, निखील भोसले,संकेत गवळी,पिंटू कदम,अजित खबाले, शिवाजी गवळी,समाधान गवळी,लिंगराज शेटे,आदि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुढील अनर्थ टळला.

एकीकडे महावितरण विज बिलाचा तगादा लावत आहे.तर दुसरीकडे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर झालेल्या पिक नुकसानीची भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

परंडा शहरातील पानटपरी फोडून १५ हजार रुपयांची चोरी

 

परंडा (दि ६ मार्च)  परंडा शहरातील जुनी भाजी मंडई येथिल विजय चौतमहाल यांची पानटपरी अज्ञात चोरट्याने फोडून टपरीतील १५ हजार रुपयाची रोख रक्कम चोरली आहे हि घटना दि ६ फ्रेबुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

      या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय चौतमहाल यांची जुनी भाजी मंडई येथे पाण टपरी असून विजय चौतमहाल यांनी टपरी मधील बरणीत १३ हजार ५०० रुपये ठेवले होते व गल्ल्यात १ हजार ५०० रूपये ठेवले होते . चौतमहाल यांनी नेहमी प्रमाने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास टपरी बंद करून घरी गेले होते .दि ६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयाने टपरीचा सिलिंगचा पत्रा व प्लायवुड कापून टपरी मधील रोख रक्कम १५ हजाराची चोरी केली .टपरी समोरील दुकानदार संदिप पवार व नितीन पवार यांना चौतमहाल यांच्या टपरी ची खिडकी उघडी दिसल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी विजय चौतमहाल यांना माहिती दिल्याने चौतमहाल यांनी टपरी जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे दिसून आले .

    चौतमहाल यांच्या फिर्यादी वरून परंडा पोलिसात अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करन्यात आला आसुन पुढील तपास महिला पोलिस हवालदार शबाना मुल्ला करीत आहे.

दैनिक जनमत ०६ मार्च २०२२ E paper

वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून मानधन थकीत, आंदोलनाचा इशारा

 

उस्मानाबाद – वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून मानधन थकले असून जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. परिपत्रक क्र. ५३६ प्रमाणे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करुन ऑक्टोबर २०२१ पासून आजपर्यंतचे पेमेंट कामगारांच्या बँक खात्या जमा करण्यात यावे. वरिष्ठ कार्यालयाकडून आपणांस कोर्ट केस मधील जॉब सिक्युरिटी प्राप्त झालेल्या कंत्राटी कामगारांना तात्काळ कंत्राटदारांकडून पुढील नियुक्ती आदेश देण्यात यावा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वीज कंत्राटी कामगारांसाठी ईएसआयसी पॉलीसी चालू झाली असल्यामुळे नवीन कंत्राटदार / एजन्सीकडून पॉलीसी चालु करण्यात यावी,दि.०१ जानेवारी २०२२ पासून शासनाने निर्धारित केलेली किमान वेतनवाढ त्वरीत लागू करण्यात यावी.कामावर कार्यरत जुने व अनुभवी कंत्राटी कामगारांना तात्काळ नियुक्ती आदेश नवीन एजन्सीकडून देण्यात यावेत,

नवीन कंत्राटदारांकडून / एजन्सीकडून प्रति कंत्राटी कामगार रु.२०,०००/- प्रमाणे नियुक्तीसाठी (ऑर्डरसाठी) घेतले जात आहेत. तसेच नवीन बिगर अनुभवी (बोगस आय.टी.आय. प्रमाणपत्र ) कामगारांकडून ३०-४० हजार रुपये घेवून ऑर्डर देण्यात येत आहेत. तरी तो भ्रष्टाचार त्वरीत थांबविण्यात यावा,सर्व वीज कंत्राटी कामगारांचा विमा व पी.एफ. मुदतीत भरण्यात यावा.महावितरणच्या सांधिक कार्यालयाकडून निर्गमीत झालेल्या २३८८० परिपत्रकाप्रमाणे कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने देण्यात यावीत.मागील कंत्राटदार डी.एम. दहिफळे यांच्या एजन्सी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना अद्याप पर्यंत कामावर घेतलेले नाही. तरी त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे.

 नवीन कंत्राटदारांना उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलेल्या कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या यादी संघटनेस देण्यात यावी,या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील उपळकर, जिल्हा सचिव सचितानंद भराटे, जिल्हा कोषाध्यक्ष मारुती गुंड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे काक्रंबा येथे स्वच्छता अभियान


सलगरा,दि.१ (प्रतिनिधी) : 

पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान  राबविण्यात आले.

म्हणुन त्याच पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे आज दि.१ मार्च रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, काक्रंबा येथे घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शासकीय कार्यालये, रुग्णालये, स्मशानभूमी, शाळा, यांचा समावेश होता. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत अभियान पार पडले. या अभियानात हजारो श्रीसदस्यांनी कोरोना नियमांचे पालन करत हातात ग्लोज, मास्कचा वापर करत अभियान यशस्वी केले. या वेळी या अभियानातून ५० ते ६० टन कचरा जमा करून श्री सदस्यांनी कचऱ्याची विल्हेवाट  लावली.