Home Blog Page 168

दैनिक जनमत १५ मार्च २०२२ E paper

 

दीड हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात

 

उस्मानाबाद – दीड हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात अडकली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.राजश्री उत्तमराव शिंदे, वय 40 वर्षे, असे आरोपीचे नाव असून कनिष्ठ सहाय्यक, जि. प.बांधकाम विभाग,उप विभाग भूम जि. उस्मानाबाद या पदावर त्या कार्यरत आहेत.     

याबाबत माहिती अशी की तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या रु.91257/- च्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली.या कारवाई मध्ये सापळा अधिकारी: – प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि . उस्मानाबाद.

मार्गदर्शक – डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद

सापळा पथक – पोअ/ दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके ला.प्र.वि, उस्मानाबाद.

यांनी काम पाहिले.

दैनिक जनमत १४ मार्च २०२२ E paper

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सानुग्रह अनुदानासाठी 14 व 15 मार्चला कागदपत्रांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

 



        उस्मानाबाद,दि.11(प्रतिनिधी):-कोविड-19 आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.हे सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत. अर्ज तपासणी करताना रिजेक्ट झाले आहेत आणि ज्यांना ॲप्लाय GRC असा मॅसेज आला आहे.अशा अर्जदारासाठी दि.4 ते 7 फेब्रुवारी 2022 आणि दि.10 व 11 मार्च 2022 रोजी कागदपत्र तपासणी करण्यासाठी बोलवण्यात आले होते.परंतु जे अर्जदार उपस्थित राहु शकले नाहीत.त्यांनी दि.14 व 15 मार्च 2022 रोजी कागदपत्र तपासणीसाठी अर्जदारांनी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे.

         तांत्रिक अडचणीमुळे दि.14 व 15 मार्च 2022 रोजी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत नातेवाईकांना मोबाईल वर कोणताही वेगळा मेसेज येणार नाही.

                                                                

अवघ्या २० तासात चोरीच्या रकमेसह दोघे अटकेत

 


सलगरा : प्रतिक भोसले

 सलगरा (दि.), ता. तुळजापूर येथील प्रविण अशोक कुंभार हे दि. 06.03.2022 रोजी 02.30 वा. सु. औसा रस्त्यावरील समर्थ हॉटेलसमोर आपला मालवाहू ट्रक क्र. एम.एच. 01 डीआर 8000 हा उभा करुन ट्रकच्या केबीनमध्ये झोपले होते. दरम्यान तीन अनोळखी पुरुषांनी प्रविण कुंभार झोपलेल्या ट्रकच्या केबीनच्या चालक सिटच्या पाठीमागील कप्प्यात ठेवलेली 25,000 ₹ रक्कम चोरुन जवळच उभ्या असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 18 एए 7377 व ट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 9137 मधून औसा रस्त्याने पसार झाले. यावर प्रविण कुंभार यांनी आपल्या ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूपही तुटलेले त्यांना आढळले. यावर प्रविण यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र. 70 / 2022 हा 379, 34 अंतर्गत नोंदवला आहे.


            सदर गुन्हा तपासादरम्यान तुळजापूर पोलीसांनी गतीमान तपास करुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद दोन्ही ट्रक खंडाळा – कार्ला रस्त्यालगत उभे असल्याचे पथकास आढळले. पथकाने त्या ट्रकजवळ जाउन ट्रकमध्ये असलेल्या दोन पुरुषांची विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) उमेश नाना पवार, रा. लोनखस, ता. वाशी 2) ज्ञानेश्वर भागवत शिंदे, रा. रामकुंड, ता. वाशी अशी सांगीतली. पथकाने त्यांच्या ट्रकची तपासणी केली असता वाहनातील इंधन चोरी संबंधीचे साहित्यही त्यांच्या जवळ मिळुन आले. यावर पथकाने त्या दोघांची झडती घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नमूद रकमेपैकी 15,000 ₹ जप्त करुन त्या दोघांना अटक केली असून त्यांच्या उर्वरीत साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.