Home Blog Page 167

दैनिक जनमत २२ मार्च २०२२ E paper

 

एस. टी.चे विलनीकरण करून, दुखवट्यातील संपूर्ण पगार देऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्या

आम आदमी पक्षाची मागणी



उस्मानाबाद –


आम आदमी पार्टीच्या वतीने बारा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करून दुखवट्यातील  संपूर्ण पगार देऊन निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे या मागणीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्राची वाहिनी लालपरी म्हणजे एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर असे एकूण 92 हजार कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातील एकूण 59 महामंडळा यापैकी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा अतिशय अल्प वेतन मध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे. या कारणास्तव त्यांना समान हक्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शासनाने गरजेचे आहे परंतु आपले परिवहन मंत्री यांनी सदरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या हेतूने नवीन कर्मचारी सेवा वर्षे एक ते दहा यांना पाच हजार रुपये दहा ते वीस सेवेत असलेले लोकांना चार हजार रुपये व वीस वर्षाच्या सेवे पुढील लोकांना अडीच  हजार रुपये वेतन वाढ

 केले आहे तुटपुंजी वेतन वाढ करून परिवहन मंत्रांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे व वेतनातील फरक बघितला तर ज्येष्ठांना कमी वेतन वाढ देऊन त्यांची अवहेलना केली आहे तोडफोडीचे धोरण अवलंबून एक प्रकारचे आंदोलन चिगळण्याचा प्रयत्न परिवहन मंत्र्यांनी केलेला आहे तरी इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना लाख रुपये पगार व एसटी कर्मचाऱ्यांना 22 ते 25 हजार लोकशाहीमध्ये अन्यायकारक असून मागील पाच महिन्याच्या आंदोलनामध्ये 60 हजार कर्मचारी घरी बसून आहेत वरील कर्मचारी गरीब असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे निलंबन करण्यात आले आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे व 118 कर्मचारी हे मयत झाले असून त्यापैकी अनेकांनी आत्महत्या केलेले आहे सदरच्या आत्महत्या होण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे तरीपण आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याला मान्यता म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण करावे व दुखवट्यातील त्यांचा संपूर्ण पगार तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा व निलंबनाच्या केलेल्या कार्यवाही तात्काळ परत घ्यावा. असे मागण्या निवेदनात आहेत या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अजित खोत, मुन्ना शेख, कमलाकर ठवरे, तानाजी पिंपळे, शहाजी पवार, आकाश कांबळे, उस्मान तांबोळी, माया जाधव, नामदेव वाघमारे, प्रेम कुमार वाघमारे, करण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


दैनिक जनमत २१ मार्च २०२२ E paper

 

रंगपंचमी साहित्य खरेदीत ग्राहकांचा निरुत्साह

 


उस्मानाबाद – जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी ही उत्साहात साजरी केली जाते.लागोपाठ दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट आले होते प्रशासनाने रंगपंचमी साजरी करणाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले होते. मात्र यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

दोन दिवसांवर आलेल्या रंगपंचमी सणाचा उत्साह आता सगळीकडे दिसायला लागला आहे होळीचा सण आणि त्यानंतर पाच दिवसांनी येणारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी उस्मानाबाद शहरवासीयांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे 

शहरातील बाजारपेठेत रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध रंगीबेरंगी रंग बाजारात उपलब्ध झाले आहेत शहरातील बाजारपेठेत पिचकाऱ्या, बंदूका, विविध रंग खरेदीसाठी करण्यासाठी नागरिक येत आहेत बाजारपेठेतील विक्रेते म्हणत आहेत की रंगपंचमीच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रतिसाद अल्प प्रमाणात आहे म्हणेल तेवढी गर्दी झाली नाही मात्र पूर्वी पाच ते सहा दिवसांपासून रंगपंचमीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे आता मात्र रंगपंचमीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरवली आहे

लोकसेवकास धाक दाखवणा-यावर गुन्हा दाखल



सलगरा,दि.१७ (प्रतिनिधी)

सलगरा दिवटी येथे विज बिल थकबाकी वसुली करण्यासाठी शाखा कार्यालय तुळजापुर ग्रामीण – अंतर्गत जनमित्र ज्ञानेश्वर भास्कर काटे, गणेश संभाजी सातपुते, श्रीकांत राम गायकवाड, अजय सुरेश कुंभार, मनोज महादेव गायकवाड हे सर्वजण मिळून दि.14 मार्च रोजी 11.15 वा.सु. विजबिल वसुली करण्यासाठी सलगरा येथे विजबिल वसुलीचे काम करत होते. दरम्यान प्रल्हाद बाजीराव लोमटे या ग्राहकाचे विज बिल विचारणेसाठी त्यांचे घरासमोर गेले असता त्यांचे शेजारी राहणारे नितीन आनंदराव लोमटे यांनी तेथे येऊन थकबाकीच्या वादातुन महावितरण पथकातील वरिष्ठ तत्रंज्ञ – वाल्मीक कांबळे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीव पुर्वक प्रतिबंध केला. अशा मजकुराच्या वाल्मीक कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 353, 323, 504, 506 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबादमध्ये राजकीय होळी, भाजपने केले सरकारविरोधात आंदोलन

 

उस्मानाबाद  आघाडी सरकारची होळी करुन भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवार, दि. 17 मार्च 2022 रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, शेतकर्‍यांचे जगणे मुश्किल करणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. कमिशन एजंट महाविकास आघाडीच्या नावानं बोऽ बोऽऽ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले की, दसर्‍याच्या दिवशी रावणाचे दहन करतो, त्याचप्रमाणे आपण दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आज महाराष्ट्रावर महाविकास आघाडी सरकारचे संकट दूर व्हावे म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो. हे सरकार भ्रष्टाचार्‍यांना आणि देशद्रोह्यांना पाठीशी घालत आहे. परकीय शक्तीला येथे सहारा देण्याचे काम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार करत आहे. सर्वसामाान्यांवर अन्याय करणार्‍या, शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या  महावसुली सरकारच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.


प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे झालेल्या या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, दाजीअप्पा पवार, नरेंद्र वाघमारे ,शेशेराव उंबरे ,संदीप इंगळे, प्रीतम मुंडे,राज निकम, श्रीराम मुंबरे, मेसा जानराव, उदय देशमुख, मोहन मुंडे, प्रसाद मुंडे, वैभव हांचाटे, अमोल पेठे, सुनिल पंगुडवाले, मनोजसिंह ठाकुर, अर्जुन पवार, नरसिंग लोमटे, जगदिश जोशी, विशाल पाटील, ज्ञानेश्वर सुळ, अमित कदम, सागर दंडनाईक, स्वप्निल नाईकवाडी, सुजित साळुंके, अजय यादव, सार्थक पाटील, अजय उंबरे,मनोजसिंह ठाकूर, सायासराव मुंडे,ऋषीकेश शिंदे, तात्याराव शिंदे, आदींसह भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.