उस्मानाबाद – श्रीराम जन्मोत्सव, रामनवमीचे औचित्य साधत उस्मानाबाद समर्थनगर येथील श्रीराम मंदिर येथे रामराज्य प्रतिष्ठान उस्मानाबाद आणि कलायोगी आर्ट्स क्लास उस्मानाबाद च्या टीम कडून रामनवमीच्या शुभेच्छा पर रांगोळी साकरण्यात आली आहे, या रांगोळीचा आकार 5 फुट × 8 फुट = 40 चौरस फुट इतका असून ही रांगोळी 15 किलो रंगीत रांगोळी चा वापर करत साकारण्यात आली आहे. या रांगोळी साठी पाच तासांचा कालावधी लागला आहे ही रांगोळी कलायोगी आर्ट्स क्लास चे राजकुमार कुंभार सर यांच्या मार्गदर्शनात त्यांचे विद्यार्थी जय पंडित आणि समृद्धी कुलकर्णी यांच्या सहकार्याने पूर्णत्वास आली आहे , या रांगोळी मध्ये समुद्रात एक हाती धनुष्य एक हाती बाण घेऊन लंकेच्या रोखाने पहात उभे असलेले श्री रामचंद्र भगवान यांची ची रांगोळीतील प्रतिकृती अगदी हुबेहूब आणि मोहक साकारल्याने भाविक भक्तांचे आकर्षण बनली आहे रांगोळी पाहण्यासाठी भावी भक्तांची गर्दी होत आहे.
शुल्क न भरल्याने 15 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना ठेवले परिक्षेपासून वंचित
शांती इंग्लिश स्कुल चा धक्कादायक प्रकार
सोलापूर:न्यू
कोरोनाच्या काळात सर्वच शाळा बंद होत्या अशातच विद्यार्थी सुद्धा दोन वर्ष शाळेत गेलेली नव्हती. परंतु खाजगी शिक्षण संस्थेतील शाळांनी ऑनलाईनच्या नावाने पैसे वसूल करण्याचे काम पालकांकडून केले. काही पालक वर्गांची कोरोनाच्या काळात अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरणे पालकांना कठीण झाले होते.अशातच आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु आजपर्यंतचे कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क भरणार नाही तेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही म्हणून शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देता वर्गाबाहेर ठेवले.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत असून विद्यार्थी आपल्या पालकांसमोर आम्हाला वेगळे बसविले जात असल्याचे डोळ्यातून अश्रू काढून सांगत आहेत.
घडल्या घटनेची माहिती मिळताच शहरातील आम आदमी पालक युनियन चे अध्यक्ष रॉबर्ट गौडर हानी शाळेला भेट देऊन पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.या संबंधी त्यांनी शाळेच्या मुख्यध्यापिकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या प्रशासनाने भेट होऊ दिली नाही.
त्यामुळे त्यांनी थेट प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना या घडल्या प्रकारची माहिती दिली.
त्यानंतर किरण लोहार यांनी सदर तक्रार पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांच्या कडे वर्ग केली आहे.
एककीकडे शिक्षण विभाग व शिक्षण मंत्री फी न भरल्या कारणाने कोणत्याही विध्यार्थ्यांना परिक्षेपासून आणि शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत असतात तर दुसरीकडे मात्र मुजोर शाळा व व्यवस्थापक कडून विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवले जात आहे.घडल्या प्रकारावर शिक्षण विभागाकडून कोणती कारवाई होते तर पहावे लागेल.
जिथे बैठक तिथेच स्वच्छता, इतर ठिकाणी परिस्थिती जैसे थे, प्रशासनाची अशीही बनवाबनवी!
उस्मानाबाद – गेले दोन दिवस ३५ आमदारांची विधिमंडळ अंदाज समिती उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहे. जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये या समितीची बैठक पार पडली. मात्र जिथे बैठक झाली केवळ तिथेच स्वच्छता करण्यात आल्याचे चित्र आहे.
समितीतील सदस्यांना वातावरण आल्हादायक वाटावे यासाठी प्रशासनातील अधिकारी धावपळ करत आहेत. मात्र ज्या जनतेसाठी सर्व धावपळ सुरू असते ती कायम नाक दाबून या इमारतीमध्ये फिरते हे कोण दाखवून देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सतत अस्वच्छ असते. इमारतीमधील दुर्गंधी प्रवेश करताच जाणवते मात्र याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. या स्वच्छतेचे लेखापरीक्षण कोण करणार? कैक समित्या येतील जातील, प्रशासनाची अंतर्गत चौकशी करतील मात्र इमारतीचे रुपडे बदलेल की नाही अशी शंका जनतेला आहे.
मेंढपाळाचा मुलगा बनला कृषीअधिकारी
कारी गावच्या तरुणाची यशोगाथा
कारी ( आसिफ मुलाणी)
आई-वडिलांनी मागील ६० वर्षापासून मेंढपाळाचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा चालवला. तीन मुलांचे शिक्षण कसेबसे पूर्ण करून लहान मुलाला कृषी अधिकारी बनविण्याचा पराक्रम उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील मेंढपाळ अंकुश करडे यांच्या कुटुंबांनी करून दाखवला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील राहणारे करडे यांच्या कुटुंबाची ही यशोगाथा.कुटुंबात दोन मुले, दोन सूना, नातवंडे, पत्नी आणि अंकुश करडे असे ०८जण. करडे यांनी मेंढपाळाचा व्यवसाय करून आपल्या मुलांचे शिक्षण केले.मुलगा नितीन करडे यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत तर प्रमिला माणिकराव देशमुख विद्यालयात दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत, राहुरी कृषी विद्यापीठातून एम एस सी ऍग्री ही पदवी मिळवली. डिसेंबर २०२१ मध्ये आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ०१ एप्रिल २०२२ लागला.यातून नितीन करडे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकारी पदी निवड झाली. निवडीबद्दल करडे यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माझ्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवून मी अभ्यास केला परीक्षा दिली. उत्तीर्ण झालेल्या परीक्षेसाठी आई -वडील शिक्षकांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे हे सर्व शक्य झाले. असे नितीन करडे यांनी सांगितले.
कष्टातून मिळालेल्या पैशातून मुलाला शिकवलेल्या कामाचं आज सार्थक झालं. याचा इतका आनंद झाला की तो सांगता येत नाही. अशी प्रतिक्रिया आई छायाबाई करडे यांनी दिली.
तासगाव शहरालगत बाह्यवळण रस्त्याच्या संपादनासाठी निधी मिळण्याची केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आ. सुमनताई पाटील यांची पत्राद्वारे मागणी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० व २६६ निधी मिळावा यासाठी रोहित दादा पाटील यांची मंत्री महोदय यांना साकडे
स्व. आर आर आबा पाटील व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या मैत्रीचा फायदा होण्याची शक्यता मंत्री गडकरी यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले
तासगाव प्रतिनिधी/ राहुल कांबळे
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० व २६६ च्या तासगाव शहराजवळील बाह्यवळण लांबीच्या भूसंपादनासाठी निधी मिळावा यासाठी तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकप्रिय आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
तासगाव तालुक्यातील अहमदनगर दौंड- फलटण विटा- तासगाव -कुमठे फाटा म्हैसाळ रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० म्हणून घोषित झाला आहे सदर रस्त्याच्या तासगावातील बाह्यवळण मार्गाची एकूण लांबी ०/०० ते २/२०० ( A ) ( भाग-कॉलेज कॉर्नर ते भिलवडी रस्ता) ही लांबी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६६ मध्ये समाविष्ट झालेले आहे त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रुपये ४० कोटी रुपयांची आवश्यकता आहे तसेच सदर रस्त्याची लांबी ( कि.मी.२/२०० ते ७/६५०) ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० मध्ये समाविष्ट झालेले आहे सदर रस्त्याची रस्त्याच्या कि.मी.२/२०० ते ३/६०० ( B) ( भाग भिलवडी रस्ता ते विटा रस्ता) अशी एकूण १.४० कि.मी. लांबीच्या भूसंपादनासाठी अंदाजे रू.३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर उर्वरित कि.मी.३/६०० ते ४/२०० ( C) ( भाग विटा रस्ता ते भिवघाट रस्ता) एकूण ०.६०० कि.मी. लांबीच्या भूसंपादनासाठी अंदाजे १२ कोटी रुपये कि.मी.४/२०० ते ५/१५० एकूण ०.९५ कि.मी.( D)(देवघाट रस्ता ते चिंचणी रस्ता) यांच्या भूमी संपादनासाठी अंदाजे २० कोटी रुपये ची आवश्यकता आहे उर्वरित कि.मी.५/१५० ते ७/६५० ( E,,) ( भाग चिंचणी रस्ता ते मनेराजुरी रस्ता )एकूण २.५० कि.मी. लांबी असून त्याच्या भूसंपादनासाठी रुपये ५० कोटींची आवश्यकता आहे. तासगाव शेरा लगत बाह्यवळण ची भूसंपादनासाठी एकूण रुपये १५२ कोटीची आवश्यकता असून सदर निधी उपलब्ध करून द्यावा व तासगाव शहर बायपास रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे अशी या पत्रात विनंती करण्यात आले आहे. दिल्ली येथे महाराष्ट्रातील प्रशिक्षणासाठी आमदार दाखल झाले आहेत तेथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी महाराष्ट्रातील दिल्ली येथे एक वजनदार मंत्री असणारे आणि आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामधील जनतेच्या मनामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडे तासगाव शहरालगत असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या निधीसाठी पत्र द्वारे मागणी केली सदरचे पत्र तासगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते रोहित दादा पाटील यांनी समक्ष भेटून मंत्री महोदयांना भेटून त्याचा पाठपुरावा केला त्यास अतिशय उत्तम प्रतिसाद देत मंत्रिमहोदयांनी तातडीने निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.सध्या तासगाव शहरा वर प्रचंड वाहतुकीचा ताण आहे. बायपास रस्त्यासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध झाला तर विटा भागातून तसेच आटपाडी कडून येणारे सर्व वाहने बाह्यवळण मार्गे पुढे कराड व सांगली,मिरज कोल्हापूर कर्नाटकाकडे कडे जाऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जास्तीत जास्त लवकर पाठपुरावा करून निधी उपलब्ध झाल्यास तासगावकर नागरिकांच्या मनामध्ये समाधान निर्माण होईल असे म्हटले तर वावगे ठरू नये. तासगाव शहरातील प्रचंड वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समिती करणार जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी, नगरपालिकेने केली स्वच्छ्ता
उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्वेदिक आयोग समिती येणार आहे. नवीन शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याने त्याअनुषंगाने ही पाहणी असणार आहे.
दरम्यान गेले अनेक दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात अस्वच्छता निर्माण होती. कोरोना सारख्या काळात ज्या रुग्णालयात कित्येक रुग्णांचे उपचार केले आहे त्या इमारतीकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्वच्छतेबाबत लक्ष दिले नव्हते. रुग्णालयात ठीकठिकाणी गुटखा खाऊन थूंकलेल्या भिंती अस्वच्छता पहावयास मिळत होती. याबाबत दैनिक जनमत ने वृत्त प्रसारित केले होते याची दखल प्रशासनाने घेतली.
जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत मागील दोन ते तीन दिवसांपासून नगरपालिकेच्या वतीने सफा सफाई चे काम चालू केली असून तपासणीत कुठलीही त्रुटी राहू नये याची काळजी घेत असल्याची प्रतिक्रिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली.















































