तुळजाभवानी शाॅपिग सेंटर समोरील रस्ता दुरुस्तीसाठी आमदारांना साकडे
उस्मानाबाद-31 मे
उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारे बसस्थानकासमोरील तुळजाभवानी शॉपिंग सेंटर मधील अंतर्गत रस्ता पूर्णपणे उखडल्याने या ठिकाणी दुचाकी चालवणे तसेच पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्याला दलदलीचे स्वरूप येते त्यामुळे हा रस्ता तात्पुरता का होईना तातडीने दुरुस्त करून द्यावा अशी मागणी तुळजाभवानी शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांनी आमदार कैलास दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बसस्थानकासमोरील श्री तुळजाभवानी शॉपिंग सेंटर येथील रस्ता गेल्या वीस वर्षापासून पूर्णता उखडून गेला आहे मागील पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी खड्ड्यामध्ये मोठे दगड व मुरूम टाकून रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता आता यातील मुरूम निघून गेला असून मोठाले दगड उघडे पडले आहेत यामुळे पायी चालणे तसेच दुचाकी चालवणे म्हणजे कसरत करावी लागते शिवाय धुळीचा ही मोठा त्रास ग्राहक आणि गाळेधारकांना होत आहे याबाबतचे निवेदन आज आमदार कैलास पाटील यांना देऊन याठिकाणी डांबरीकरण अथवा पेवर ब्लॉक टाकावे अशी विनंती केली.
यावेळी आ.कैलास दादा यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. शिवाय कायमस्वरुपी पक्का रस्ता लवकरच केला जाईल असे आश्वासित केले.
यावेळी तुळजाभवानी शॉपिंग सेंटरचे मुकेश नायगावकर व इतर गाळेधारक उपस्थित होते.
उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीचे राज्यपालांना निवेदन
उस्मानाबाद येथे आज आंबेडकरी चळवळीतील शिक्षणप्रेमी विधिज्ञ, साहित्यिक, सामाजिकसह विविध क्षेत्रातील व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी कृती समितीची स्थापन करण्याचा निर्णय झाला. स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.– राजाभाऊ ओव्हाळसचिव, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती
राहुल बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सामजिक न्याय विभाच्या वतीने भव्य सत्कार
परंडा (दि २८ मे)राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोहारा तालुका निरिक्षक पदी नेमणुक झाल्याबद्दल
परांडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात भव्य सत्कार करुन शुभेच्छा दिल्या
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनःश्याम शिंदे,तालुका अध्यक्ष विक्रम जाधव,तालुका संघटक मच्चींद्र दुबळे,तालुका उपाध्यक्ष व पिंपरखेड चे माजी सरपंच नागनाथ थोरात,जिल्हा चिटणीस धर्मराज कांबळे,शहर अध्यक्ष अजय बनसोडे, महिला आघाडीच्या लक्ष्मी ताई सरवदे,लक्ष्मिताई जाधव,पिंपळवाडी- ब्रम्हगाव चे सरपंच भाऊसाहेब ओहाळ,जवळा नि मा.सरपंच नवजीवन चौधरी,बावची ग्रां. पं. सदस्य कानिफनाथ सरपणे, मा.उपसरपंच नवनाथ जाधव , टाकळी चे सरपंच कृष्णा चौधरी, विश्र्वास आप्पा लोकरे,संतोष लोंढे, दत्तु गायकवाड,लक्ष्मण भोसले, गोरख जाधव,भाऊ ओहाळ,सचिन शिंदे, राहुल अर्जुन बनसोडे,भाऊ साळवे, भारत जाधव,ग्रा.पं.सदस्य नवनाथ ओहाळ,अंकुश भोसले,अविनाश बनसोडे,सिद्धांत वाघमारे,वसंत चोळसे,प्रतीक बनसोडे,नागेश ओहाळ,सुमित जकाते,सिद्धार्थ बनसोडे,भुषण बसवंत,अमोल चोळासे,पंकज बनसोडे,रुपेश बनसोडे,गोरख लोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…
सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करा; ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील विविध कारणासाठी नेहमीच चर्चेत असलेली पारा ग्रामपंचायत चा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यावेळी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी चक्क सहा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे तक्रार करुन मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारा येथे सन 2021- 22 साठी अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेसाठी पारा गावच्या लोकसंख्येनुसार पंधरा विहिरींसाठी पंचायत समितीकडून मंजुरी देण्यात येते. परंतु पारा येथील सरपंच व ग्राम विकास अधिकारी स्वतःचा मनमानी कारभार करत शासन निर्णयाप्रमाणे ठराव न दिल्यामुळे यावर झालेल्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती वाशी यांनी दिलेल्या चौकशी अहवालामध्ये मासिक सभा दि.5/7/2019सिंचन विहिरी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे बाबत ठरावात 152लाभार्थी निवडीची यादी असून संगणकीकृत यादीत 223सिंचन विहिरीसाठी निवड केलेली लाभधारकांची यादी जोडली आहे. संगणक यादीतील नावे मूळ इति वृत्तातील अनु क्रमांकानुसार लिहिले नाहीत. तसेच नियोजन विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक म. ग्रा. रो.2012/प्र. क्र.30/रोहयो दि.17/12/2012 वैयक्तिक विहिरी संदर्भात सुधारित सूचनांनुसार परिशिष्ट कलम 1(4) मधील तरतुदीनुसार ठराव सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी दिलेला नसल्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशी यांनी सिंचन विहिरीचे सर्व प्रस्ताव रद्द केलेले आहेत. यामुळे पारा येथील पंधरा लाभार्थी शेतकऱ्यांचे फसवणूक करून पंचेचाळीस लाख रुपये एवढ्या शासन अनुदानास नुकसान केलेले आहे. या झालेल्या नुकसानीस सर्वस्वी सरपंच व ग्राम विकास अधिकारी हे जबाबदार असल्यामुळे या दोघांवर कारवाई करून बडतर्फ करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भराटे, महेश खोले, उद्धव शेळके, आशाबाई भराटे, प्रियंका शिनगारे, आशाबाई काळे यांनी केली आहे. याची माहितीस्तव प्रत ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद, गट विकास अधिकारी वाशी यांना देण्यात आली आहे.
कवठेमंहाकाळ विकास सोसायटी वर महाकाली शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
कवठेमहांकाळ, दि २७ (तानाजी शिंगाडे)
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमंहाकाळ विकास सोसायटी च्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे ,आमदार सुमनताई पाटील, अनिताताई सगरे ,यांच्या नेतृत्वाखालील महाकाली शेतकरी विकास पॅनल ने आठच्या आठ जागेवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजी करत विजयी रॅली काढली. व जल्लोष साजरा केला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की कवठेमंहाकाळ विकास सोसायटीची निवडणूक ही अपक्ष उमेदवारांनी चर्चेची केली होती. परंतु अजितराव घोरपडे यांचे नेतृत्व आणि माजी चेअरमन दिलीप झुरे यांचे काम या मुळे कवठेमंहाकाळ विकास सोसायटी वरती महांकाली शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला.
एकूण 13 जागेपैकी पाच जागा या बिनविरोध झाल्या होत्या. तर आठ जागांसाठी निवडणूक लागली होती माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आमदार सुमनताई पाटील सुरेश भाऊ पाटील आणि अनिता ताई सगरे, शांतनु सगरे या सर्वांनी एकत्रित येत महांकाली शेतकरी विकास पॅनल आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते.
त्याच्या विरोधात अपक्षांनी मोट बांधत शेतकरी विकास पॅनल चे आठ उमेदवार रिंगणात उभे केले होते .
आज मतमोजणी व मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाकाली शेतकरी विकास पॅनलचे आठच्या आठ उमेदवार निवडून आले.
या 13 पैकी आठ उमेदवार हे माजी मंत्री घोरपडे यांचे आहेत. तर आर आर पाटील गटाचे चार उमेदवार असून एक सगरे गटाचा उमेदवार आहे.
या कवठेमंहाकाळ विकास सोसायटी साठी बाराशे 22 मतदान झाले. त्यापैकी माजी चेअरमन दिलीप देशमुख यांनी 1031 एवढी विक्रमी मते घेतली. तर दुसऱ्या नंबर वरती तुकाराम संभाजी पाटील यांनी 950 मते घेतली तर दुसऱ्या नंबर वरती तुकाराम आबा पाटील यांनी 905 मते घेतली या तिन्ही उमेदवारांचे मताधिक्य पाचशे ते सहाशे च्या घरात आहे.
एकूणच कवठेमंहाकाळ विकास सोसायटी वर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आठ जागा आपल्या गटाकडे खेचत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
तर आमदार गटाला ही चार जागा मिळाल्या आहेत.आणि सगरे गटाला एक जागा मिळाली आहे.
विजयी उमेदवार असे- दिलीप भानुदास झुरे
(1031) ,
तुकाराम संभाजी पाटील(950),
तुकाराम आबा पाटील(908),
निखिल घाडगे(799),
अशोक पाटील (665),
बाळासाहेब पाटील
(799),
बंडू सूर्यवंशी(734),
दिनकर जाधव(866)
बिनविरोध उमेदवार असे– सुनील माळी,सुलोचना माळी,प्रकाश माने,काका बंडगर,पुष्पा पाटील.























































