Home Blog Page 151

तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी साठी प्रयत्नशील – आ. राणाजगजितसिंह पाटील

 

उस्मानाबाद -देशातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, आत्मनिर्भर व्हावं या संकल्पनेतून मोदीजी काम करत असून जगात देशाची उंची वाढवण्याचे कार्य ते करत आहेत. अविरत काम करण्याची मोदीजीं ची कार्यशैली आजवरच्या इतर पंतप्रधानांपेक्षा वेगळी असून तीन दिवसाच्या परदेश दौऱ्यात २५ कार्यक्रम घेऊन आपली कार्यप्रणाली सिद्ध करणारे मोदी जी खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत. कोविड संकटानंतर आलेले संकट समर्थपणे पेलवत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अभिनव योजना सुरु केल्या. या भागातील युवकांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी काटगाव तालुका तुळजापूर येथे भाजपा आपल्या गावी या कार्यक्रमात बोलताना केले.

आत्मनिर्भर शब्द उच्चारताच आपल्या मध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. या योजनेच्या माध्यमातून येथील युवक युवतींना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर व परिसरातील अनेक उद्योजक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या भागांमध्ये उद्योग आणायचे आहेत, रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक असून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यामध्ये सब का प्रयास आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या साथीने या भागाचा चेहरा मोहरा आपण आगामी काळात निश्चितच बदलू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  बुद्धीजीवी सेलचे  सदस्य दत्ता कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, दीपक आलुरे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वडगावे, यशवंत अण्णा लोंढे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, मजूर फेडरेशन चेअरमन नारायण ननवरे, शिवाजी साठे, आनंद कंदले, खंडू पावले,भिवाजी इंगोले, अण्णा सरडे, नागनाथ कलसुरे, अशोक माळी,बाबा बेटकर, गुणवंत कोनाळे, सुधाकर हजारे, यांच्यासह काटगाव परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

जप्त केलेली वाळू व क्रश सॅंडचा 9 जून रोजी लिलाव इच्छुकांनी सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन

 

        उस्मानाबद:दि03(प्रतिनिधी):- येथील सांजा रोड परिसरातील हिरल हॉस्पीटल समोर जप्त करण्यात आलेली 29 ब्रास वाळू आणि  96 ब्रास क्रश सँडचा लिलाव उस्मानाबाद तहसील कार्यालय परिसर येथे दि. 9 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केला आहे. या लिलाव प्रक्रियेत इच्छुकांनी सहभागी व्हावे ,असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे. या लिलावामध्ये एक ब्रास वाळू 600 रुपये प्रती ब्रास या दराने 75000 रुपये (अक्षरी पंच्याहत्तर हजार रुपये मात्र) एवढी हातची किंमत धरुन उक्त ठिकाणी जाहीर लिलावाव्दारे विक्री करणे आहे. तसेच या लिलावाच्या सर्वोच्च बोलीच्या रक्कमेवर 10 टक्के अतिरिक्त रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी म्हणून लिलावधारकाकडून शासनजमा करणे बंधनकारक राहील.

        याबाबत कोणत्याही प्रकारचा हितसंबंध हक्क असणाऱ्या व्यक्तीचा सदरच्या लिलावास काही आक्षेप,उजर किंवा तक्रार इत्यादी असल्यास बात्मी प्रसिध्द झाल्यापासून दिनांक 6 जून 2022 पूर्वी लेखी स्वरुपात या कार्यालयास कागदोपत्री पुराव्यासह सादर करावा.विहीत मुदतीत कुणाचा आक्षेप , उजर किंवा तक्रार प्राप्त न झाल्यास या लिलावास कुणाचाही आक्षेप नाही असे समजण्यात येऊन नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच विहीत मुदतीनंतर आलेले आक्षेप ,उजर किंवा तक्रार विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तरी ईच्छुकानी उक्त लिलावामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन श्री .माळी यांनी केले आहे.            

                                         

अस्वच्छ भोगावती; दीड हजार सह्यांचे निवेदन देऊन वेधले लक्ष

नदीच्या दोन्ही बाजूस कायमस्वरूपी संरक्षित कॅनल पद्धतीचा स्लोप भिंत बांधण्याची मागणी

उस्मानाबाद – शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधून वाहणारी भोगावती नदी स्वच्छ करून नदीच्या दोन्ही बाजूस कायम स्वरुपी संरक्षित कॅनाॅल पध्दतीचा स्लोप भिंती बांधण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांना काॅग्रेस विधी मानवाधिकार यांच्या वतीने निवेदन दिले आहे 

शहरातून वाहणारी भोगावाती नदी ही नगर परिषद उस्मानाबाद यांनी नव्याने घोषित केलेल्या प्रभाग क्रमांक

१,४,५,९,१३,१५,१६ या प्रभागातून वाहते. प्रभाग क्रमांक ९ मधून प्रभाग क्रमांक १३ मध्ये वाहत येत असताना अत्यंत घाण व दुर्गंधी सह वाहत येते प्रभाग क्रमांक १३ मधून दुर्गंधीयुक्त घाणीने भरलेली रोगराई व असणारी व डुक्कर आणि कुत्रे यांचे सुळसुळाट असलेली घाण पाण्याच्या नालीसारखी वाहते पुढे आणखीन घाण होऊन प्रभाग क्रमांक १६ व प्रभाग क्रमांक १५ मध्ये वाहत जाते या नदीत गावातील घाण येऊन मिळते यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत आहे आणि दुर्गंधीमुळे वायू प्रदूषित होत आहे 



वरील प्रभागातील नागरिकांना भोगावती नदीवरील डासांमुळे डेंग्यू मलेरिया सारखे  रोग होत आहेत तसेच प्रदूषित व घाण वासामुळे लोकांना श्वासोच्छ्वासचे विकार होत आहेत त्यामुळे प्रभाग १३ मधील व सभोवतालच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत यामुळे लोकांचे आयुष्यमान कमी होत आहे प्रभाग १३ मधील भोगावती नदीच्या दोन्ही बाजूला शहारातील मोठ्या मोठ्या लोकवस्त्या आहेत शहरातील मूळ बाजार पेठ भाजी मंडई ही या प्रभागात आहे भोगावती नदीच्या घाणी मुळे जल प्रदूषणामुळे व वायू प्रदूषण यामुळे या भागातील लोकांना त्रास होत आहे व लोकांचे आरोग्य बिघडत आहे आणि रोगराई पसरत आहे 


यामुळे उस्मानाबादच्या लोकांच्या संवैधानिक व मूलभूत हक्काचे आणि मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे. अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक १३,१५,१६ मधील वाहणाऱ्या भोगावती नदीच्या स्वच्छतेबाबत नगर परिषदेने कोणतीही योग्य ती तरतूद व कार्यवाही केली नसल्याचे दिसून येते व नगरपरिषद लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते असे जाणवते तरी शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीची विशेषता प्रभाग क्रमांक 13 मधुन वाहणाऱ्या भोगावती नदी ची पूर्णपणे स्वच्छता तात्काळ करण्यात यावी तसेच भोगावती नदीच्या दोन्ही बाजूस कायमस्वरूपी संरक्षित कॅनल पद्धतीचा स्लोप भिंत बांधण्यात यावी तसेच नदीमध्ये वाहत येणाऱ्या किंवा शहरातून नदीत सोडल्या जाणाऱ्या घाणीची पर्यायी सुविधा करावी व दोन्ही संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या बाजूला गांवाहून येणारा बंदिस्त नाल्याच्या बांधण्यात यावे व कायमस्वरूपी स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी  या निवेदनावर ॲड. विश्वजीत शिंदे, शैलेश देव, अग्निवेश शिंदे ,ॲड. जावेद काझी, प्रभाकर लोंढे ,अशोक बनसोडे अभिमान पेठे, डॉ.लतिफ सय्यद, पवनराजे पांचाळ, रिजवान सय्यद रत्नदीप सोनवणे, सिद्धाराम मुळे तसेच या भागातील दिड हजार लोकांनी  स्वाक्षऱ्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याकरीता दिनांक ०४ ते ०८ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची  तर दिनांक ०७ व ०८ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.



लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन

 


उस्मानाबाद – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उस्मानाबाद येथे प्रतिष्ठान भवन भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज (दि.3) अभिवादन करण्यात आले.

मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करीत असताना आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते  केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भूषवित असतानाच या पदांना साजेशी केलेली कामे आजही जनतेच्या स्मरणात आहेत.  3 जून 2014 रोजी नवी दिल्ली येथे एका अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे या लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला. या महान लोकनेत्याच्या पावन स्मृतीला प्रतिष्ठान भवन भारतीय जनता पार्टी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. खंडेराव चौरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जेष्ठ नेते पांडुरंग लाटे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, लक्ष्मण माने, अशोक उंबरे, शेषेराव उंबरे, गिरीष पानसरे, अमोल पेठे, बालाजी पवार, अनिल शिंदे, पुष्पकांत माळाळे, सुनील पंगुडवाले, महेश लांडगे, आदींसह भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा व विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

500/- रु ची लाच मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



उस्मानाबाद

500/- रु ची लाच मागणी केल्याप्रकरणी आरोपी लोकसेवक – श्री.श्रीकांत रामकृष्ण मगर, वय 46 वर्षे, नौकरी – कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, सज्जा – सारोळा ता.जि. उस्मानाबाद यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

तक्रारदार यांचे आईचे मौजे सारोळा येथे असलेल्या शेतात शासनाचे MREGS या योजनेचे अंतर्गत सीताफळ लागवडीसाठी मिळणारे अनुदानाकरीता अर्ज दाखल केल्यानंतर एका मस्टरसाठी 500/- रुपये प्रमाणे जेवढे मस्टर होतील तेवढ्या मस्टरचे पैसे द्यावे लागतील असे म्हणून लाचमागणी केली. या प्रकरणात हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

सापळा अधिकारी – प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.उस्मानाबाद यांनी काम पाहिले तर सापळा पथकात – पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, नागेश शेरकर  ला.प्र.वि. उस्मानाबाद यांचा समावेश होता.

500 रूपयांची लाच घेताना कृषी विस्तारअधिकारी चतुर्भुज

सोलापूर : माढा पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यास अकाउंट नंबर दुरुस्तीसाठी अवघ्या ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संदीप रामदास गावडे (वय ४५) असे या पकडण्यात आलेल्या कृषी विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात दुपारी 4च्या दरम्यान झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे जिल्हा परिषद सेस डीबीटी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी मशीन अनुदान मिळण्यासाठी पंचायत समिती कृषीविभाग येथे अर्ज सादर केला होता. त्याचा पाठपुरावा करत असताना आलोसे संदीप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती कृषी विभाग यांनी अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगून सदर अकाउंट नंबर दुरुस्ती करण्यासाठी हजार रुपयाची मागणी करुन तडजोडीअंती पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत चालू होती.
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी संजीव पाटील, पोलीस उपाधिक्षक,एसीबी सोलापुर, उमाकांत महाडीक पो.नि. एसीबी सोलापुर, पो.ना अतुल घाडगे, पो. कॉ. स्वप्निल सन्नके, पो.कॉ गजानन किणगी एसीबी सोलापुर यांच्या पथकाने केली.

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन नागरिकांनी आपल्या मालमत्तेचा कायदेशीर उपभोग घ्यावा



 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन

          उस्मानाबद,दि02(प्रतिनिधी):- नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहिती व अफवांवर विश्वास न ठेवता कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन आपल्या मालमत्तेचा कायदेशीर उपभोग घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या संबंधीत महसूल कार्यालयाशी संपर्क साधावा व आपल्या शंकेचे निरसन करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-4 नुसार गांव पातळीवरील गाव नमुने 1 ते 21 तलाठी दप्तर अद्ययावत करण्याबाबत दिशानिर्देश आहेत. त्यानुसार वेळोवेळी शासन स्तरावरुन या नमुन्यामध्ये अद्यायावती करण्याचे कामकाज पार पाडले जाते. गांव नमुना 1 क चे सुधारीत 1-क मधील 1 ते 16 भाग करण्यात आलेले असून त्यामध्ये प्रतिबंधीत सत्ता प्रकाराच्या मिळकतीच्या नोंदी वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतात. सदरील गांव नमुना नंबर 1 क मध्ये अद्ययावत नोंदी घेण्यासंदर्भात शासनाकडून सतत पाठपुरावा सुरु असल्याने याबाबत देवस्थान जमिनी, इनाम व वतन जमिनी, वक्फ जमिनी, सिलींग कायद्यातील जमिनी, कुळास प्राप्त जमीनी म.ज.म. 1966 अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमीनी, भूसंपादीत जमीनी, सरकारी व वन जमीनी, आदिवासी खातेदारांच्या जमीनी, या प्रतिबंधीत किंवा नियंत्रित सत्ता प्रकारांच्या जमीनीचा समावेश आहे.

महसूल व वन विभाग यांचा शासन निर्णय दि. 17 मार्च 2012 व शासन परिपत्रक दि. 11 जानेवारी 2021 च्या पत्रान्वये सर्व महसूली अधिकारी यांनी गावांचे अधिकार अभिलेखातील धारणाधिकाराची जुन्या अभिलेखाआधारे पडताळणी करुन संगणकीकृत गाव नमुना 1 क व गाव नमुना 7 अद्यावत करण्याबाबत विशेष मोहिम राबविणेचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा महत्वकांक्षी ई-चावडी आज्ञावली विकसीत करण्यात येत असून त्याची पूर्व तयारी म्हणून सर्व महसूली अभिलेखे अद्यावत करण्याबाबत निर्देश पुणे येथील जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख यांचे पत्र दि. 21 जानेवारी 2022 व्दारे दिलेले आहेत. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयामध्ये महसूली अभिलेखाचे अद्यावतीकरण करण्याचे काम सुरु आहे .जुन्या अभिलेखांची पडताळणी करुन उपरोक्त 1-क व गांव नमुना 7 मधील नोंदी अद्ययावत करण्यात येत आहेत . या  वेगवेगळया कायद्याअंतर्गत हस्तांतरणास प्रतिबंध या अटी व शर्तीवर वाटप करण्यात आलेल्या जमिनी आहेत. या प्रतिबंधित सत्ता प्रकारातील जमीनी विविध कायद्याअंतर्गत हस्तांतरण करण्यासाठी बाजार मुल्याच्या किंवा आकारणीच्या ठराविक रक्कम भरणा करुन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच प्रतिबंधित सत्ता प्रकाराच्या जमीनी वर्ग-1 करण्याबाबत सुध्दा सुधारणा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ६१ गट, प्रारूप आराखडा जाहीर

लेखी हरकती मागविण्यासाठी ८ जून पर्यंत मुदत

उस्मानाबाद – जिल्हा परिषदेत आता ६१ गट असणार आहेत.याबाबत प्रारून प्रभाग रचनेचा आराखड जाहीर झाला असून ८ जून पर्यंत लेखी हरकती सादर करता येणार आहेत.