Home Blog Page 148

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील मोकळ्या जागेत उद्यानाची निर्मिती करा


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीची नगर परिषदेकडे मागणी




उस्मानाबाद – 


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील मोकळी जागा अहिल्यादेवी उद्यानासाठी नियोजित करुन तारेचे कुंपण करण्यात यावे, अशी मागणी सर्व समाज बांधवांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने नगर परिषदेकडे करण्यात केली आहे. याबाबत समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज (दि.8) मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांची भेट घेऊन निवेदन दिले. 



निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कठीण काळानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा जन्मोत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला. उस्मानाबाद शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामजिक उपक्रम राबवून अहिल्या जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वर्षी उस्मानाबाद शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या आमदार निधीतून सुशोभिकरण करुन त्याचे 31 मे रोजी लोकार्पणही झाले आहे. उस्मानाबाद शहराच्या प्रवेशद्वारावर एक देखणा चौक निर्माण झाला आहे. 



या चौकाच्या पुढील आणि मागील भागात नगर पालिकेची मोठी जागा उपलब्ध आहे. जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीमार्फत या रिकाम्या जागेत दोन दिवसांपूर्वी 51 झाडे लावण्यात आली आहेत.



राजमाता अहिल्यादेवींचे कार्य अवघ्या देशाला माहित आहे. देशातील साडेतीन हजार सार्वजनिक आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, तलाव, हिमालयात गरम पाण्याचे कुंड, दळणवळणासाठी रस्ते, पर्यावरण आणि सावलीसाठी वृक्षारोपण, कार्यक्रमासाठी सभागृह, भाविकांचे अपघात टाळण्यासाठी नदीच्या काठावर घाट बांधले. तसेच भुकेलेल्यांसाठी अन्नछत्रे सुरु केली. त्यांच्या कार्याचे स्मरण करुन उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात अजून भर टाकण्यासाठी अहिल्यादेवी चौकात उपलब्ध असलेली रिकामी जागा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या उद्यानासाठी नियोजित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.



या निवेदनावर मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, भाजपा ओबीसी सेलचे डाॅ.गोविंद कोकाटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, गुणवंत काकडे, डाॅ.संतोष पाटील, प्रा.मनोज डोलारे, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.बालाजी काकडे, डाॅ.संजय सोनटक्के, दिनेश बंडगर, इंद्रजित देवकते, संदीप वाघमोडे, अशोक गाडेकर, मध्यवर्ती जयंतीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, संतोष वतने, मुकुंद घुले, नागेश वाघे, रवी देवकते, सचिन चौरे, प्रशांत ढेकणे, शाम तेरकर, बिभीषण लोकरे,  संजय घोडके राजपाल दुधभाते, विनय कापसे, राजाभाऊ पवार, अजित भोरे, विवेक कापसे, शंकर काकडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

या आहेत मागण्या


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील जागा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानासाठी नियोजित करावी.

 या जागेला तात्काळ तटरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करण्यात यावे.


जागेचे लवकरात लवकर सुशोभिकरण करावे.

जागा मोठी असल्याने उद्यानात नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅक, ओपन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी.

जागेचे नियोजन करुन होळकरांचा इतिहास तेथे मांडण्यात यावा.

 विविध प्रकारची झाडे लावून हा परिसर सुशोभित करण्यात यावा.

प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी दिनी अहिल्यादेवी चौकात नगरपरिषदेच्या वतीने रोषणाई करण्यात यावी.


दैनिक जनमत ०८ जून २०२२ E paper

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०८ ते १२ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 उस्मानाबाद -प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक ०८ ते १० जून, २०२२ रोजी हलक्या ते मध्यम पावसाची तर दिनांक ०९ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (४० ते ५० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

जिल्हा मजूर फेडरेशनच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

 

 टक्केवारीचा नेमका सूत्रधार कोण ? सतीश सोमाणी यांचा आरोप

उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) – मजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. त्यासाठी जिल्हा मजूर फेडरेशनचे संस्थेची शिफारस लागते. ते शिफारस पत्र देण्यासाठी फेडरेशनचे चेअरमन २ टक्के कमिशन घेत घेतात. त्यापैकी १ टक्का कार्यालयीन फीससाठी घेतली जात आहे. तर उर्वरित १ टक्का कशासाठी खर्च केला जातो याचा हिशोब दिला जात नाही. त्यामुळे उर्वरित १ टक्का ही रक्कम नेमकी कोणाच्या इशाऱ्यावरून घेतली जात आहे. शिवाय ती कशासाठी खर्च केली जाते. याचा ताळमेळ लागत नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उस्मानाबाद तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.७ जून केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील याच्या वर्चस्वाखाली चालणाऱ्या जिल्हा मजूर फेडरेशनकडून कोणत्याही कामासाठी टक्केवारी घेतली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी आमच्यापर्यंत पोहचलेल्या असून त्या पुराव्यानिशी सादर करणार आहोत. तसेच

शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे वाटप जिल्हा मजूर फेडरेशनच्या शिफारशीनंतर मजूर संस्थाना केले जाते. परंतू या संस्थेकडून फेडरेशनची फीस म्हणून एक टक्का रक्कम घेतली जाते. तर आणखी एक टक्का रक्कम मजूर संस्थेकडून घेतली जाते. ही रक्कम तुम्ही का घेता? म्हणून फेडरेशनकडे विचारणा केली असता त्यांच्या हस्तकाने सांगितले की, फेडरेशनच्या चेअरमन यांना भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे सक्त आदेश आहेत की, पेमेंट घेतल्याशिवाय कामांची शिफारस द्यायची नाही. त्यामुळे भाजपा हा जसा डिजिटल पक्ष बनला आहे तसा डिजिटल भ्रष्टाचारही त्यांनी सुरु केला असल्याचा आरोप सोमाणी यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी काल खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याबद्दल जे वाचाळ वक्तव्य केले. त्याबद्दल सांगायचे तर आ. राणागजितसिंह पाटील यांना वाड्यावरुन रस्त्यावर आणल्याचे दुःख आहे. याआधी ते मुंबईत बसून जिल्ह्याची सुत्रे हलविण्याचे काम करायचे‌. मात्र आता त्यांना वाड्यावरुन वाडी-वस्तीपर्यंत जावे लागत आहे. त्यांच्या वाड्यावर येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांचा पोटशूळ उठला आहे. उलट  खा. राजेनिंबाळकर यांना जनता प्रत्येक कामासाठी नेहमीच मदतीसाठी फोन करते. ते जनतेच्या सेवेसाठी किती वेळ देतात ? हे जनतेला चांगले माहीत आहे. परंतू भाजप नेत्यांचा पोटशूळ उठल्यामुळे ते जनतेला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सत्य जाणून घ्यावे. तसेच भाजपाचे आ. पाटील यांच्या वर्चस्वाखालील मजूर फेडरेशनच्या टक्केवारीची चौकशी करुन कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोमाणी यांनी दिला आहे. या निवेदनावर गुणवंत देशमुख (ढोकी), राजाभाऊ भांगे, धनंजय वीर, विनोद पवार, रवि कोरे आळणीकर, आण्णासाहेब पवार, राजेंद्र तुपे (पळसप), दिनेश हेड्डा, धनंजय इंगळे, ओंकार आगळे, आबा सारडे, श्रीहरी शिवलकर, नितीन भोसले, दत्ता बंडगर, ओंकार सारडे, सोमनाथ मडके, विष्णू नाईकनवरे, सौदागर जगताप, राजाभाऊ पाडुळे, अमोल मुळे, मुकेश पाटील, आकाश पाटील, किरण चव्हाण, शिवलाल कुर्‍हाडे, युवराज गायकवाड यांच्या सह्या आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गोवर्धनवाडी येथील एकाच संस्थेला १ कोटीच्या १४ कामे वाटपाचे पत्र !

 


चौकशी करुन संबंधितावर गुन्हे दाखल करा – भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे

उस्मानाबाद – सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली उस्मानाबाद पाटबंधारे विभागाकडून गोवर्धनवाडी येथील एकाच संस्थेला नियमबाह्य पद्धतीने १ कोटीच्या १४ कामांचे वाटप करण्याचे पत्र देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. विकासकामांच्या नावाखाली गुत्तेदारी आणि टक्केवारीमधून सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वत:चा आणि स्वकीयांचा आर्थिक विकास करण्यात दंग आहेत. याबाबत आज  भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली (दि.6) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मागील काही दिवसापासून जिल्हयामध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी नियमबाहय पध्दतीने स्वतःसाठी व स्वत:च्या हितसंबंधीतांना शासकीय कंत्राटे व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकिय अधिकारी यांच्यावर दबाव तंत्राचा अवलंब करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी स्थानिक लोक प्रतिनिधीच्या दबावाखाली कार्यकारी अभियंता उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र.1 यांनी  कळंब व उस्मानाबाद तालुक्यातील 104 लक्ष रुपयाची 14 कामे तेरणाकाठच्या गोवर्धनवाडी येथील एकाच मजूर संस्थेस देण्याबाबत शिफारस केली आहे. ही कामे वाटप करत असताना शासन निर्णयाचे पालन केले गेले नाही. एवढ्या मोठ्या रक्कमेची कामे  फक्त एकाच संस्थेला देण्यात अधिकाऱ्याचे प्रयोजन काय? तसेच ऑनलाईन कामांची यादी काम वाटप समितीकडे पाठविणे नियमानुसार बंधनकारक असताना संबंधीत कार्यकारी अभियंता यांनी काम वाटपाचे पत्र ऑनलाईन न पाठवता लोकप्रतिनीधीने सांगितलेल्या व्यक्तीच्या हातात का दिले?  त्यामुळे 1 कोटी पेक्षा जास्त रक्कमेची कामे एकाच संस्थेला देत असतांना प्रशासकिय पातळीवर जिल्ह्यातील इतर पात्र मजुर संस्थावर अन्याय करण्याचे धोरण राबविण्याऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच ज्या उद्देशाने मजुर संस्था निर्माण झाल्या त्या सर्वसामान्य कष्टकरी व ज्याचे हातावर पोट आहे, त्या संस्था व मजुरांना काम मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावा या हेतुलाही एकाच संस्थेला काम वाटप केल्याने हरताळ फसतो याचाही संबंधीत अधिकाऱ्यांनी विचार केला नाही.मागील काही दिवसात शासनाच्या विविध खात्यामध्ये असे प्रकार घडले आहेत, त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती, परंतु आज प्रत्यक्षात हाती आलेल्या कागदपत्रावरुन हे प्रकरण मोठे असुन मागील दोन वर्षात झालेल्या अशा सर्व यंत्रणाकडील प्रकरणाचीही उच्च स्तरीय समिती गठीत करून सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच वेगवेगळया यंत्रणेकडे उपलब्ध असलेली कामे ही योग्य वर्गातील सक्षम मजुर संस्थांना देण्यात देण्याबाबत काम वाटप समिती सदस्य व जिल्हा उपनिबंधक यांना आदेशित करण्याची मागणी केली.सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व हित संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करावी, अन्यथा भाजपा सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तिव्र आंदोलन करेल तसेच लोकशाही व सनदशीर मार्गाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल, असेही भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी यांनी त्वरीत काम वाटपास स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. निवेदनावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, सरचिटणीस नितीन भोसले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,शहराध्यक्ष राहुल काकडे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, एस. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे,सुजित साळुंके,शेषेराव उंबरे, रोहित दंडनाईक,अमोल पेठे, सागर दंडनाईक,मेसा जानराव,स्वप्नील नाईकवाडी,यांची स्वाक्षरी आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन – जिल्हाध्यक्ष नितीन काळे

जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी अधिकार्यांरना अर्वाच्च भाषेत बोलणे, संबंधित अधिकार्याधला काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दडपण आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याची आजपर्यंत चर्चा होती. परंतु तीन ते चार दिवसांपूर्वी अजब किस्सा घडला आहे. पाटबंधारे खात्याचे एस. एस. आवटे नावाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर सत्ताधारी लोकप्रतिनिधीने दडपण आणून कामात समितीच्या माध्यमातून एक कोटी पेक्षाही जास्त कामे वाटप समितीकडे पाठवण्यात आली. काम वाटप समितीच्या माध्यमातून सर्व 14 कामे गोवर्धनवाडी येथील संस्थेला देण्यास सांगीत्लयाचे ही उघडकीस आले आहे. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या खासदार, आमदारांनी केलेल्या या कारनाम्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करुन जिल्हाधिकार्यां ना निवेदन दिले आहे. या कामाची आणि संबंधित अधिकार्या ची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिला आहे.

 कुंपणच शेत खातंय – दत्ताभाऊ कुलकर्णी

सध्या कुंपणच शेत खातंय अशी अवस्था या जिल्ह्याची झाली आहे. जिल्ह्यातील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे, परंतु हे सत्ताधारी अधिकाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने काम करायला प्रवृत्त करत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यानिशी निवेदन दिलेले आहे. आर्थिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी अशा पद्धतीची कामे अधिकाऱ्यांना सांगू नये. 

ज्यांना जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे, त्यांच्याकडून अशा भ्रष्ट पद्धतीच्या कामाची अपेक्षा नाही, असे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

श्री सिध्दीविनायक परिवार, उस्मानाबाद यांना केंद्र सरकारचे मान्यता प्राप्त मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मंजूर

 


 

उस्मानाबाद – सहकार, उद्योग,व्यापार व सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या श्री सिध्दीविनायक परिवार, उस्मानाबाद या संस्थेस केंद्रीय सहकारीता मंत्रालय, दिल्ली यांच्या कार्यालयाकडून “लोटस मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, उस्मानाबाद.” या नावाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. नुकतेच या बाबद चे पत्र संस्थेस प्राप्त झाले आहे.

या वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून हॉस्पिटल उभा करणे तसेच समाजाच्या आवश्यकतेनुसार, समाजातील सर्व घटकांना परवडेल या दृष्टीने वैद्यकीय सेवा पुरवणे, रुग्णांवर आर्थिक बोजा न पडता त्याला योग्य तो उपचार मिळेल या साठी या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाईल.

या संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरात आगामी कालखंडात अद्ययावत असे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभा करण्याचा मानस असल्याचे श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री.दत्ता कुलकर्णी यांनी सांगीतले.

श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्वच उपक्रमांवर समाजाचा विश्वास आहे. त्या विश्वासास पात्र राहूनच वैद्यकीय क्षेत्रात कार्य केले जाईल असाही विश्वास दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 

शिवराज्याभिषेक दिनी 51 झाडांचे वृक्षारोपण

 


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीचा उपक्रम

उस्मानाबाद : जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अहिल्यादेवींच्या 297व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीमार्फत अहिल्यादेवी चौकात 51 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमात मागील पाच सहा वर्षांत पर्यावरण संरक्षणासाठी शेकडो झाडांचे वृक्षारोपण आणि संगोपन केलेले शरदचंद्रजी पवार फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर घोडके आणि कै.चंदरराव दळवी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संभाजी दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करुन दोघांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने वड, चिंच, गुलमोहर, चिकू, पिंपळ, कडुलिंब या देशी झाडांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उर्वरित झाडे लावण्यात आली. याप्रसंगी शेखर घोडके यांनी सर्व झाडांना संरक्षणासाठी लोखंडी जाळी देण्याचे मान्य केले. यावेळी बोलताना प्रा.मनोज डोलारे यांनी सांगितले की, वृक्षारोपण करण्यात येत असलेल्या या नियोजित जागेत लवकरच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आम्हा सर्वांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कार्यक्रमास मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, धीरज मोटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौरे, मुकुंद घुले, डाॅ.संजय सोनटक्के, डाॅ.संतोष पाटील, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, संतोष वतने, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, संदीप वाघमोडे, तानाजी सलगर, विनायक नलावडे, राहुल गवळी, अजय कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सुरेश शिंदे, सचिन चौरे, गणेश सोनटक्के, रवी देवकते, किशोर डुकरे, नितीन डुकरे, विकी अंधारे, प्रसाद तेरकर आदींनी परिश्रम घेतले.

पत्नीचे अनैतिक संबंध? पतीची गळफास घेऊन आत्महत्या

 


उस्मानाबाद – पत्नी प्रियकराच्या प्रेमात पडल्याने वेळोवेळी सांगूनही ती ऐकत नसल्याने वैतागून अखेर उस्मानाबाद तालुक्यातील कोंड या ठिकाणी एका विवाहित तरूणाने दि.५ जुन २०२२ रोजी  सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 या घटनेची माहिती मिळताच मयताच्या भावाने ढोकी पोलीस ठाण्यात माहीती दिली  त्यावरून मयताच्या पत्नी व तिचा प्रियकर या दोघांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाती सतीश तिवारी ही महिला ढोकी येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे तिचा विवाह कोंड येथील सतीश कवरसिंग तिवारी यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ते ही झाले आहेत.

 सतीश तिवारी हा  त्याच्या पत्नीसोबत ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या राहत होते पती-पत्नी एकत्र कॉटरमध्ये राहत होते .  त्यांचा प्रपंच सुखामध्ये चालत होता तीन वर्षापासून सतीश व त्याची पत्नी स्वाती या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता हा वाद चारित्र्याच्या संशयावरून होत होता अशी चर्चा सध्या सुरू आहे . दरम्यान 31 मे 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये सतीश हा  गेला असता त्याला त्याच्या क्वार्टरमध्ये ढोकी येथील विवेक देशमुख व स्वाती हे एकत्र असल्याचे रुमध्ये संशयास्पद  दिसले त्यावरून सतीश याने त्या दोघांना जाब विचारला असता त्याला सतीशची पत्नी स्वाती व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांनी मिळुन सतीशला बेदम  मारहाण केली दरम्यान सतीश याने ढोकी पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली आहे.

सतीश तिवारी यांना पत्नी ची वागणूक पसंत पडत नसल्यामुळे तो पत्नीला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती त्याचे ऐकत नसल्याने सतीश याने त्याला हा त्रास सहन न झाल्याने अखेर दि.५/६/२०२२ रोजी  सतीश तिवारी याने त्याच्या कोंड गावांमध्ये जाऊन वैतागून त्याने शेतामध्ये  झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. त्याला म्रत्युस प्रव्रत्त केले.व सतीशची पत्नी स्वाती व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांचे अनैतिक संबंध होते  अशा स्वरूपाची तक्रार सतीश तिवारी याचा भाऊ उमेश कवरसिंग तिवारी याने ढोकी पोलिस ठाण्यांमध्ये रीतसर दिली आहे.ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राऊत यांच्या आदेशावरुन ढोकी पोलीस ठाण्यामध्ये कलम 306 व 34 प्रमाणे स्वाती सतीश तिवारी व विवेक देशमुख या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बुधवार हे करत आहेत.



 दरम्यान घटनेची माहिती वार्‍यासारखी गावांमध्ये पसरल्याने सतीश तिवारी याचे नातेवाईक गावकरी हे घटनास्थळी पोहोचून जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता दरम्यान वातावरण तापले होते ढोकी पोलीस ठाण्यात तात्काळ सतीश तिवारी याची पत्नी व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल करून सतीश च्या पत्नीला ढोकी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणाव निवळला यावेळी घटनास्थळी ढोकी पोलीस  ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक गाडे , क्षिरसागर , गुंजकर , नांदे ,गोडगे आदी पोलीस कर्मचारी पोहचले होते.