Home Blog Page 149

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी मजहर शेरीकर यांची निवड

 


उस्मानाबाद :-  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील मजहर शेरीकर यांची निवड करण्यात आली आहे . खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यालयात सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले. 

 यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख , रविकांत वरपे , कादर खान , खलीफा कुरेशी , पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते , मजहर शेरीकर यांच्यावर महाराष्ट्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेस प्रतिसाद; लातूर, उमरगा येथील स्पर्धकांची बाजी

 


 उस्मानाबाद, दि. 6 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील बेंबळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समिती व जिल्हा बुध्दीबळ संघाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या जलद बुध्दीबळ स्पर्धेस राज्यातील स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत लातूर, उमरगा, पंढरपूर येथील स्पर्धकांनी विजयश्री मिळवला असून आयोजकांच्यावतीने स्पर्धकांना विशेष पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
            शनिवारी श्रीखंडोबा मंदिर परिसरात पार पडलेल्या जलद बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सामुदायिक अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे, हरिश्चंद्र गावडे, डॉ. अविनाश गावडे, नवनाथ कांबळे, जयंती समितीचे अध्यक्ष संतोष लगस, दिनेश हेड्डा, राजाभाऊ गावडे आदी उपस्थित होते. त्यानंतर जलद बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या. खुल्या गटातून संदेश बजाज (लातूर) याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना हरिश्चंद्र गावडे यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे पाच हजार एक रूपयांचे रोख बक्षीस व धनंजय तानले यांच्यावतीने चषक देण्यात आले. 21 वर्षाखालील खुल्या गटातून लातूर येथील प्रथमेश देशमुख याने प्रथम क्रमांक मिळविला असून त्यास प्रशांत दाणे यांच्यावतीने एक हजार एक रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट महिला स्पर्धक म्हणून सौंदर्या डिगोळे, उत्कृष्ट ज्येष्ठ स्पर्धक म्हणून गोकुळ गोरे तर उत्कृष्ट उस्मानाबाद स्पर्धक म्हणून अभिजीत गोरे यांना प्रकाश शेळके यांच्यावतीने सातशे रूपयांची रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली.
खुल्या गटातील द्वितीय क्रमांकासाठी शिवसेना विभागप्रमुख दिनेश हेड्डा यांच्यावतीने चार हजार एक रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांकासाठी माजी सरपंच बाळासाहेब कणसे यांनी तीन हजार एक, चतुर्थ क्रमांकासाठी नामानंद फूड्सच्यावतीने दोन हजार तसेच पाचव्या ते अकराव्या क्रमांकापर्यंतच्या स्पर्धकांसाठी अनुक्रमे श्रीधर गावडे, ज. सद्दाम रोडे, रामभाऊ मोटे, अमर होळकर, अर्जून सोनटक्के, यशवंत डोलारे, परमेश्वर कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या रकमेची बक्षीसे ठेवली होती. 21 वर्षाखालील विजेत्या द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकासाठी अमोल माने, तृतीयासाठी प्रवीण तानले, चतुर्थसाठी सुरज वाघे यांच्यावतीने वेगवेगळ्या रकमेची बक्षीसे विजेत्या स्पर्धकांना देण्यात आली. स्पर्धेत परिक्षक म्हणून डॉ. अमोल गावडे व सोलापूर येथील युवराज पोगुल यांनी काम पाहिले.
            स्पर्धेतील सर्व विजेत्यांना हरिश्चंद्र गावडे, येडशी येथील ज्येष्ठ नागरिक जयप्रकाश तोडकरी, स्पर्धेचे मार्गदर्शक डॉ. अविनाश गावडे, डॉ. अमोल गावडे, प्रकाश शेळके, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष लगस यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेतील विजेते
खुल्या गटात प्रथम ः संदेश बजाज (लातूर), द्वितीय ः धनंजय यसगुडे (बीड), तृतीय ः किरण अंकुशराव (सोलापूर), चतुर्थ ः ज्योतीराज तांदळे (लातूर), उत्तेजनार्थ ः चंदशेखार बसरगीकर, योगेश राठोड, आदित्य गुंडला, अनिल क्षीरसागर, चंद्रकांत पवार, बाबा बादुले, शंकर साळुंखे. 21 वर्षाखालील गट ः प्रथम ः प्रथमेश देशमुख, द्वितीय ः यशराज साठे, तृतीय सर्वेश सोले, चतुर्थ ः अथर्व गावडे, पाचवे ः प्रवीण देशमुख., विशेष बक्षीस ः  उत्कृष्ट महिला स्पर्धक सौंदर्या डिगोळे, उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक स्पर्धक गोकुळ गोरे, उत्कृष्ट उस्मानाबाद स्पर्धक अभिजीत गोरे.

इको व्हिलेज येथे रोप वाटप व वार्षिक वृक्ष संवर्धन बक्षीस वितरण

 


भूम( वसिम काजळेकर ) :- मराठवाड्याचे महाबळेश्वर (हाडोंग्री ) येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त हाडोंग्री येथील इको व्हिलेज (ध्यान केंद्र ) येथे रोप वाटप व वार्षिक वृक्ष संवर्धन बक्षीस वितरण सोहळ्याच आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटिल (हाडोंग्रीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य बाळासाहेब पाटिल(हाडोंग्रीकर )यांनी आयोजन केल होत. या मध्ये उदघाटक म्हनून भूम उवविभागीय आधिकारी रोहिणी नऱ्हे तर अध्यक्ष म्हनून भूम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत ढवळशंक, प्रमुख पाहुणे म्हनून भूम न.प.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक तानाजी चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये  मान्यवरांकडून जमिनीचे वाळवंटीकरन,पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती अश्या शेती निघडीत विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजीवनी पाटिल, अमेय पाटिल, गावच्या तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य परीसरातील शेतकरी व  सर्वच स्थरातील नागरिक उपस्थित होते.



 पर्यावरण दिनानिमित्त शेतकऱ्यांनी  सेंद्रिय खताचा वापर वाढवून  पालेभाज्याउगवाव्यात जेने करून नागरिकांचे रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि  सोबतच आपल्या शेतीचे भविष्यात होणारे वाळवंटिकरण थांबेल.

आदित्य पाटिल (हाडोंग्रीकर )अध्यक्ष इको विलेज, ध्यान केंद्र.


माळीन गावासारखी दुर्दैवी भूसखलनाची घटना देशी प्रकारच्या वृक्षांची लागवड करुन आनी जोपासून होनारी घटना टाळू शकतोत.आनी पर्जन्यमान देखील वाढेल.

रोहिणी नऱ्हे उपविभागीय अधिकारी भूम

44 लाख 35 हजार रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न




उस्मानाबाद – 
उस्मानाबाद नगर परिषद बांधकाम विभागाच्या वतीने विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विकासनगर येथे 44 लाख 35 हजार रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, मा.नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या हस्ते आज (दि.5) करण्यात आले. 

उस्मानाबाद शहरातील विकासनगर येथे अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नालीच्या कामासाठी नागरिकांमधून अनेक वर्षापासून मागणी होत होती. या कामाकरिता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रभागाचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील, मा.नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांचे आभार व्यक्त केले. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रभागातील लोकप्रतिनिधीसह ठेकेदारानेही लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी उस्मानाबाद शहरासह उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघात विकासकामांना निधी कमी पडणार नाही असे यावेळी सांगितले. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून लवकरच शहराचे रुप पालटल्याचे दिसून येईल, असेही ते म्हणाले.


भूमिपूजन सोहळ्यास शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे,शहरप्रमुख संजय मुंडे, युवक नेते पंकज पाटील, मा.नगरसेवक बाळासाहेब काकडे, रोहित निंबाळकर, नगर अभियंता श्री.विधाते, हनुमंत देवकते, रहेमान काझी, कुणाल धोत्रीकर, गणेश राजे दशरथ भालेकर रमेश ढवळे सुखदेव भालेकर गोविंद कौलगे दिपक गणेश अजय सुपेकर  पांडू आण्णा भोसले, नितीन शेरखाने  सुमित पाटील, आकाश खटके नितीन इंगळे अभिजीत कोळी संदीप शिंदे आकाश राठोड, अशोक रुपदास, संदीप शिंदे, सत्यजीत पडवळ महेश लिमये अमोल जाधव, संदेश ढवळे, शुभम ढवळे, बापू शिंदे, आशिष साळुंके, अशोक रुपदास, विठ्ठल रुपदास,शहाजी राठोड, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, विकासनगर येथील महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.तुळजाभवानी देवीजींची अभिषेक पुजेचे ऑनलाईन पासची सुरुवात




एका पासचे 50 रुपये शुल्क, एका पासवर 5 व्यक्तींना घेता येईल अभिषेक पुजेचा लाभ


तुळजापूर, दि. 5 (प्रतिनिधी) : 

कोव्हीड-19 च्या पाश्वभूमिवर बंद करण्यात आलेले श्री.तुळजाभवानी मातेची अभिषेक पुजा श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थेच्या वतीने 11 दिवसापुर्वी तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेली होती. त्यानंतर अभिषेक पुजेचे ऑनलाईन पध्दतीने पास वितरीत करण्याचा निर्णय मंदीर संस्थानच्या वतीने घेण्यात आला असून, त्यानुसार अभिषेक पुजेचे पास मंदीर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने उपलब करुन देण्यात आले आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी सदर संकेत स्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री.तुळजाभवानी देवीजींची विधी व न्याय विभाग तसेच पुरातत्व विभाग यांचेकडून प्राप्त होणा­ऱ्या निर्देशाचे अनुपालन करणेचे अधीन राहून दि. 24 मे 2022 रोजीपासून तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या अभिषेक पुजेचे ऑनलाईन पध्दतीने पास दि. 6 जून पासून वितरीत करण्यात येत आहे.

सदरचे वितरीत करण्यात येणारे अभिषेक पुजेचे पास मंदीर संस्थानचे अधिकृत https://shrituljabhavani.org या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने उपलब करुन देण्यात येत असून, सर्व भाविक-भक्तांनी सदर संकेत स्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घ्यावा.

श्री.देवीजींचे अभिषेक पुजेचे एका पासची शुल्क रक्कम रुपये 50 अशी असून, सदर एका पासवर कमाल 5 व्यक्तींना अभिषेक पुजेचा लाभ घेता येईल. तरी सर्व भाविक-भक्तांनी सदर संकेत स्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.  मंदीर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अभिषेक पुजा पास सुरु केल्याबद्दल पुजारी वर्ग, देवी भक्तांबरोबर शहरवासियांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

जनक भोसले हा सभासद; तो माझा कार्यकर्ता:- अभिजीत पाटील




 प्रत्येक अन्यायग्रस्त सभासदांचा व कामगारांचा सन्मान परत मिळवून देणार


मगरवाडी(प्रतिनिधी)

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणूकीचे बिगुल वाजले असून दि.३जून पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन भगिरथ भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती. गेली दोन वर्षांपासून विठ्ठल कारखाना बंद अवस्थेत आहे. शेतकऱ्याची ऊस बील, कामगार पगार व वाहतूक ठेकेदाराची देणी दिली नसल्याने शेतकरी सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यावेळी दाते मंगल कार्यालय येथे विचार विनिमय बैठक सुरू असताना रोपळे येथील ऊस उत्पादक सभासद जनक भोसले यांनी शेतकऱ्यांची बीले कधी देणार?  कामगारांचे पगार कधी देणार? अशी विचारणा केली.यावेळी विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके,कल्याणराव काळे व संचालक मंडळाच्या समोरच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ केली होती.यावर अभिजीत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.प्रत्येक सभासद शेतकरी हा कारखान्याचा मालक असतो आणि विठ्ठलच्या प्रत्येक सभासद शेतकरी व कामगारांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

     आपल्या हक्काच्या बिलासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याला विनाकारण शिवीगाळ व मारहाण झाल्याने त्याचाच निषेध करत रोपळे येथील गावकऱ्यांनी गावबंदीची हाक दिली आहे.त्यामुळे भालके व काळे गटाची मोठी कोंडी झाल्याचे बोलले जात आहे


*चौकट:–*

 

तुम्ही विठ्ठल कारखान्याची विचार विनिमय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सभासद असलेले जनक भोसले यांनी त्याच्या बिलासंदर्भात व त्यांच्या नावावर काढलेल्या बोगस कर्जावर विचारा केली हा त्यांना अधिकार नाही का? तो कुठल्या घटनेत लिहिलेला आहे? सभेमध्ये जनक भोसलेंनी सभासद या नात्याने आपले हक्काचे बिल मागितले तो अधिकार त्याला नाही का?

तो कार्यकर्ता कोणाचा यावर न बोलता त्यांची अडचण सोडवायला हवी.जर तुम्हाला एखादी भूमिका मान्य नाही तर तुम्ही सभासदाला अशी एकेरी वागणूक देत असाल तर विठ्ठल परिवाराचा सभासद कदापिही तुम्हाला माफ करणार नाही.


-अभिजीत पाटील

अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी जफर शेख याची निवड

 


उस्मानाबाद –  अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबाद जिल्हा  अध्यक्ष  पदी जफर शेख याची निवड झाली त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री शोएब खाटीक  यांच्या हास्ते देण्यात आले

जफर शेख मागील काही वर्षापासून सामाजिक कार्य तसेच प्रसिध्दी माध्यमातून सामाजिक उपक्रमाव्दारे कार्य करत आहेत. या कार्याचा आढावा व मुल्यांकन करून अल्पसंख्याक विकास मंडळ उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  पदी जफर शेख याची निवड  करण्यात आली आहे.

चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी ताब्यात



उस्मानाबाद – उतमी (का.), ता. उस्मानाबाद येथील भगवान बोंदर यांची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 8707 ही दि. 20.04.2022 रोजी 23.00 वा. सु. उस्मानाबाद येथील सुनिल प्लाझा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुन बोंदर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 121 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पोना- सय्यद, चव्हाण, सोनवणे, पोकॉ- आरसेवाड, कोळी, सहाणे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारधी पिढी, उस्मानाबाद येथील परमेश्वर चंदर काळे उर्फ सुरेश यांस दि. 02 जून रोजी नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे

तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी साठी प्रयत्नशील – आ. राणाजगजितसिंह पाटील

 

उस्मानाबाद -देशातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, आत्मनिर्भर व्हावं या संकल्पनेतून मोदीजी काम करत असून जगात देशाची उंची वाढवण्याचे कार्य ते करत आहेत. अविरत काम करण्याची मोदीजीं ची कार्यशैली आजवरच्या इतर पंतप्रधानांपेक्षा वेगळी असून तीन दिवसाच्या परदेश दौऱ्यात २५ कार्यक्रम घेऊन आपली कार्यप्रणाली सिद्ध करणारे मोदी जी खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत. कोविड संकटानंतर आलेले संकट समर्थपणे पेलवत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अभिनव योजना सुरु केल्या. या भागातील युवकांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी काटगाव तालुका तुळजापूर येथे भाजपा आपल्या गावी या कार्यक्रमात बोलताना केले.

आत्मनिर्भर शब्द उच्चारताच आपल्या मध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. या योजनेच्या माध्यमातून येथील युवक युवतींना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर व परिसरातील अनेक उद्योजक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या भागांमध्ये उद्योग आणायचे आहेत, रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक असून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यामध्ये सब का प्रयास आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या साथीने या भागाचा चेहरा मोहरा आपण आगामी काळात निश्चितच बदलू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  बुद्धीजीवी सेलचे  सदस्य दत्ता कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, दीपक आलुरे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वडगावे, यशवंत अण्णा लोंढे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, मजूर फेडरेशन चेअरमन नारायण ननवरे, शिवाजी साठे, आनंद कंदले, खंडू पावले,भिवाजी इंगोले, अण्णा सरडे, नागनाथ कलसुरे, अशोक माळी,बाबा बेटकर, गुणवंत कोनाळे, सुधाकर हजारे, यांच्यासह काटगाव परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.