Home Blog Page 144

उस्मानाबाद जिल्ह्यकरिता दिनांक १८ ते २२ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक १८ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दैनिक जनमत १७ जून २०२२ E paper

इम्पिरिकल डाटाचे चुकीच्या पद्धतीने संकलन समर्पित (बाठीया) आयोगाच्या विरोधात निदर्शने

 


उस्मानाबाद –

ओबीसींच्या इम्पिरिकल डाटाचे चुकीच्या पद्धतीने संकलन करण्यात येत असून त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. समर्पित  सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओ.बी.सी. ची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलीत होणे अपेक्षित होती, परंतु आयोग योग्य पद्धतीने माहिती संकलीत न करता सॉफ्टवेअर व्दारे आडनावानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलीत करीत आहे. ही समस्त ओ.बी.सी. समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअर वर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थीतीची माहिती जमा कर म्हणजे ओ.बी.सी समाजाचे भविष्यातील याचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. समिर्पीत आयोगा व्दारे चुकीच्या पध्दतीने होणारे चुकीचे “कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व बी.एल.ओ., तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर “यांच्या मार्फत योग्य ती माहिती संकलीत करून शासना मार्फत मा. सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष महादेव माळी ,आबासाहेब खोत प्रदेश सचिव ,रॉबीन बगाडे तालुका अध्यक्ष, उस्मानाबाद ,शहानवाज सय्यद शहराध्यक्ष.. उस्मानाबाद,ओबीसी महासभा प्रदेश सचिव सचिन चौधरी,

संतोष भाकरे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दत्तात्रेय पवार – तालुकाध्यक्ष ओबीसी सेल,लक्ष्मण राऊत ओबीसी तालुकाध्यक्ष , प्रकाश बालकुंदे उपाध्यक्ष ओबीसी, दिलीप राऊत तालुका संघटक इत्यादी उपस्थित होते.

अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रीका धारकांना 30 जून पर्यंत आधार नोंदणी करणे बंधनकारक:गणेश माळी

 




उस्मानाबाद,दि.15(प्रतिनिधी):-शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डधारकांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. यासाठीची शासनाकडून डेडलाईन 30 जुन ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत आधार नोंदणी न केल्यास रेशन मिळण्यास अडचणी निर्माण होणर आहेत. तालुक्यातील 22 हजार 699 लाभार्थ्यांची नोंदणी करणे अद्याप शिल्लक आहे. ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केली नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपले रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधुन शिधापत्रीकेला आधारकार्डची नोंदणी करण्याचे आवाहन उस्मानाबाद तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

उस्मानाबद तालुक्यातील एकूण 22 हजार 699 लाभार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करणे बाकी असल्याने दि.15 जून 2022 रोजी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांची बैठक घेऊन सर्व रास्तभाव दुकानदार यांना 30 जून पर्यंत आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्याकरीता तहसील कार्यालय, उस्मानाबाद येथे  संगणक व ऑपरेटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांनी आपले प्रलंबित असलेले लाभार्थ्यांचे आधार संकलन करुन आधार सिडींग करुन घेण्यात यावी. लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

 याबाबत जिल्हा पुरवठा निरीक्षक सचिन काळे आणि पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांनी ज्यांचे आधार सीडिंग झालेले नाही अशा लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधून आपले आधार कार्डची छायांकित प्रत जमा करावी, असे आवाहन केले. तसेच शंभर टक्के आधार सीडिंग करण्यात आलेल्या रास्तभाव दुकानदार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पुरवठा विभागातील अव्वल कारकुन निशिकांत भोज, महसूल सहाय्यक संतोष सरगुले व इतर कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

२२ लाखांची बेहिशोबी मालमत्ता ; कळंबच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

 



उस्मानाबाद – वैशाली नेमगोंडा पाटील, तत्कालीन तहसिलदार, तहसिल कार्यालय कळंब, जि. उस्मानाबाद यांनी २२,०४,३३७/- रुपये (२९%) बेहिशोबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वैशाली पाटील ह्या तहसिलदार या पदावर तहसिल कार्यालय कळंब येथे कार्यरत असताना त्यांचे विरुध्दचे प्राप्त तक्रारीतील उघड चौकशी क्रमांक ४१/ उबाद / २०१६ मधील माहे ०३ /२००८ ते दि.३०.०६.२०१६ या परिक्षण कालावधीत त्यांनी त्यांना सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळालेल्या उत्पन्नापेक्षा २२,०४,३३७/- रुपये (२९%) बेहिशोबी मालमत्ता ( अपसंपदा) संपादित करुन गुन्हेगारी स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे सदर उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे कळंब येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास श्री. अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद हे करीत आहेत.

उस्मानाबाद -कळंब मतदारसंघातील चार ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अकरा कोटींचा निधी मंजूर


आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील चार ठिकाणच्या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी 11 कोटी 70 लाख 78 हजार रुपयांचा निधी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मंजूर केला आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार कैलास घाडगे पाटील साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -1 अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील एक आणि कळंब तालुक्यांतील तीन अशा एकूण चार रस्त्यांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी ते मांडवा या 7.10 किमी लांबीच्या रस्त्यासाठी पाच कोटी 10 लाख 43 हजार रुपयांचा, राज्यमार्ग ते सात्रा या 2.50 किमी लांबीच्या रस्त्यासाठी एक कोटी 90 लाख 99 हजार रुपयांचा, राज्यमार्ग ते कोकाटेवस्ती या 3 किमी लांबीच्या रस्त्यासाठी दोन कोटी 64 लाख 16 हजार रुपयांचा तर उस्मानाबाद तालुक्यातील जवळा ते गुळवेवस्ती या 2.30 किमी लांबीच्या रस्त्यासाठी दोन कोटी पाच लाख 20 हजार रुपये निधी ग्रामविकास विभागाने मंजूर केला आहे. या निधीतून या चारही गावांसाठी मंजूर रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. 

उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील साहेब यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब यांच्या समवेत मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे उस्मानाबाद -कळंब मतदारसंघातील रस्त्यांच्या या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन मा. मुख्यमंत्री ठाकरे साहेब व मा. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब यांनी विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तुजारपुरातील महिलेचा अनैतिक संबधातून ओढणीने गळा आवळून खून..वाघवाडी रोडवरील बांदल मळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह



इस्लामपूर (प्रतिनिधी)

इस्लामपूर शिवपुरी रोडवरील बांदल मळ्यात आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान एका मोकळ्या शेतात महिलेचा मृतदेह असल्याचे इस्लामपूर पोलिसांना समजताच इस्लामपूर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटना स्थळी धाव घेतली तर शेतातील लिंबाच्या झाडाखाली 28वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्तेत मृतदेह आढळून आला महिलेचे तोंड मातीमध्ये दाबून गळा ओढणीने आवळला होता.तर महिलेच्या मानेचे हाड पूर्ण पणे मोडले होते.पोलिसांनी जलद गतीने तपास यंत्रणा राबवून महिलेची माहिती घेतली असता मयत महिला ही वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथील असल्याचे समजले तर हा खून अनैतिक कारणातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.तर मृतदेहा जवळ एक वाईरीची पिशवी मध्ये एक साडी परकर टॉवेल मिळून आले आहे तर ही घटना मंगळवारी रात्री घडलेली असावी असा अंदाज वेक्त केला जात आहे. यावरून इस्लामपूर पोलिसात बलात्कार करून खून केलेचा अज्ञात वेक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून उत्तरीय तपासासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाच्या सुशोभिकरणासाठी आ. कैलास पाटील यांच्या आमदार निधीतून २५ लाखांचा निधी

 

उस्मानाबाद – राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाच्या सुशोभिकरणासाठी मागील दहा वर्षांपासून विविध पध्दतीने मागणी करण्यात येत होती.  उस्मानाबाद कळंब  आमदार  कैलास घाडगे पाटील यांनी या चौकाच्या सुशोभिकरणासाठी तब्बल 25 लक्ष रूपये निधी स्थानिक आमदार निधीमधून दिला. उस्मानाबाद शहराचे मुख्य प्रवेशव्दार असललेल्या चौकाच्या  सुशोभिकरण कामाचे 26 जुन 2022 रोजी भुमी पुजन करण्यात येणार आहे. या कामासाठी सातत्याने राजर्षी शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थाने यश आलेले आहे व या कामास सुरूवात होत आहे. स्मारक समितीच्या वतीने आमदार श्री. कैलास (दादा) घाडगे पाटील यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

या निधीचे पत्र घेताना एम. डी. देशमुख सर, महादेव माळी, पृथ्वीराज चिलवंत, भालचंद्र कोकाटे, राहुल काकडे, राम मुंडे प्रदिप सुर्यवंशी, शुभम मुंडे, अदित्य पाटील, बिलाज रजवी, महेश उपासे, अभिजीत सुर्यवंशी, आनंद जगताप, राहुल गवळी, आकाश मुंडे, संदिप पवार, अभिजीत सुर्यवंशी, राहुल जगताप, निलेश जाधव, बालाजी तांबे, राजसिंह राजे निंबाळकर, सोमनाथ गुरव, स्वप्नील शिंगाडे, ओम सुर्यवंशी आदि समितीचे सदस्य उपस्थित होते.