सलगरा प्रा. आरोग्य केंद्रात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर
नागरिकांनी सहभागी होण्याचे उपसरपंच प्रशांत लोमटे यांचे आवाहन
सलगरा,दि.२३(प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खा.डॉ.पद्मसिंह पाटील व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिसानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथे उद्या दि.२४ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व उपचार शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिराचे आयोजन सलगरा (दि.) येथील भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये विविध प्रकारच्या आजारांवरती तपासणी होणार असून उपचार व मोफत औषध वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये या शिबिरासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी सलगरा (दि.) तसेच परिसरातील जास्तीत जास्त सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच प्रशांत लोमटे यांच्या सह भारतीय जनता पार्टी सलगरा (दि.) यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गुटख्यासह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद – स्थानिक गुन्हे शाखेची टीम शासकिय वाहनाने उस्मानाबाद जिल्हयात पेट्रोलिंग करत कोंड येथे गेली असता गावातील चौकात गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की. आरोपी नाम महालिंग नागू कोरे वय ६२ वर्ष रा. कोंड ता.जि.उस्मानाबाद यांनी गुटखा बाळगले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून अचानक पणे जावून छापामारून आरोपीस ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता सदरचे एक आयशर कंपनीचा टेम्पो, एक महिंद्रा कंपनीचे पिकअप च गोडावून मधील माल गुटखा अवैद्य विक्री करीता बाळगल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध कलम ३२८. २७२.२७३.१८८ भादवि प्रमाणे पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोहेकॉ निंबाळकर,पोहेकॉ काझी,पोहेकॉ औताडे,पोहेकॉ जानराव, पोना पठाण,पोन कवडे,पोना काकडे,पोना जाधवर, मपोना टेळे, चालक पोहेकॉ कवडे,चालक पोहेकॉ चौरे, चालक पोहेकॉ अरब यांनी केली.




























































