Home Blog Page 142

आंध्रप्रदेशातून अपहृत 6 व्यक्तींची उस्मानाबाद पोलीसांकडून यशस्वी सुटका


उस्मानाबाद – वांगी (बु.), ता. भुम येथील सुभाष आण्णा पवार याने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याने त्याच्याविरुध्द

उस्मानाबाद व आंध्र्रप्रदेशात गुन्हे दाखल असुन तो सध्या जामीन मुक्त आहे. त्याने आंध्रप्रदेशातील एका कुटूंबातील पाच व्यक्तींचे व त्यांच्याच एका नातेवाईकाचे अपहरन करुन त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले होते. तसेच 2 मेट्रीक टन गांजा आणुन दिल्यावरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी धमकी सुभाष पवार याने त्या अपहृतांच्या नातेवाईकांना दिली होती. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील जीके विधी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 16/2022 हा भा.दं.सं. कलम- 341, 344, 347, 367, 506 सह एनडीपीएस कलम- 28 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

तपासादरम्यान आंध्रप्रदेश पोलीसांचे पथक दि. 26.06.2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यांना तपासादरम्यान भाषेची अडचण जाणवत होती. या पथकाने स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. यावर मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगीतले. यावर कळंब उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकातील पोउपनि- श्री. पुजरवाड यांसह पोलीस अंमलदार- किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांच्यासह आंध्र पोलीसांच्या संयुक्त पथकाने दि. 26- 27 जून दरम्यानच्या रात्री आरोपी सुभाष पवार राहत असलेल्या वांगी (बु.), ता. भुम येथील परिसरात पाळत ठेवली. दरम्यान पोलीसांच्या लक्षात आले की, सुभाष याच्या घरात नमूद अपहृतांना डांबून ठेवले आहे. यावर पथकाने दि. 27 जून रोजी सकाळी सुभाष पवार यास ताब्यात घेतले. तात्काळ पथकाने त्याच्या घरात डांबून ठेवलेल्या पांगी कुटूंबीय गोवर्धन, धनलक्ष्मी, तरुण- वय 4 वर्षे, संदीप- वय 2 वर्षे, यशोदा- वय 14 वर्षे यांसह जेम्मीली नागेंद्र बाबू सर्व रा. एबुलम, जी.के. विधी मंडल, जि. अल्लुरी सितारामाराजु, राज्य- आंध्द्रप्रदेश यांची पथकाने यशस्वी सुटका केली. उस्मानाबाद पोलीसांनी दाखवलेल्या धाडस व सक्रीयतेबद्दल आंध्र पोलीसांच्या पथकाने उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त करुन आरोपी सुभाष आण्णा पवार यासह नमूद सहा व्यक्तींना घेउन आंध्र पोलीस आंध्रप्रदेशकडे रवाना झाले.

चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी ताब्यात



उस्मानाबाद –  येथील रियाज गफुर शेख, व्यवसाय- पत्रकार, वय 43 वर्षे हे दि. 05.05.2022 रोजी 02.00 ते 05.00 वा. दरम्यान घरासमोरील अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या उषाजवळील रियलमी कंपनीचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. यावरुन रियाज शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 66/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाहेकॉ- विनोद जानराव, धनंजय कवडे, पोना- नितीन जाधवर, शैला टेळे,अजित कवडे, काकडे यांच्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील स्मार्टफोनसह जागजी, ता. उस्मानाबाद येथील राम दिलीप मगर यास ताब्यात घेउन पुढील कारवाइकीमी उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २९ जून ते ०३ जुलै, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव


आरोग्य कर्मचाऱ्यांना गाव गुंडापासून सुरक्षा मिळावी  मागणीचे आरोग्य कर्मचारी महासंघाच्या वतीने दिले निवेदन 

उस्मानाबाद – मागील सहा महिन्यापासून जिल्हा रुग्णालय येथे गावगुंडांची गुंडागिरी वाढत चालली आहे रात्री अपरात्री दारू पिऊन गावगुंड रुग्णालय मध्ये येऊन ड्युटीवर असलेल्या कर्मचारी यांना मारहाण करणे नर्सेस ला त्रास देणे कर्मचाऱ्यांना पैश्याची  मागणी करणे आरोग्य सेवेत व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हे अमानवीय कृत जिल्हा रुग्णालय येथे चालू आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आरोग्य कर्मचा-यांना प्रशासनाकडून कसलाही सुरक्षा नाही आरोग्य कर्मचाऱ्यांची अडचणी कुणीही ऐकण्यास तयार नाही. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोणा काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आरोगय सेवा दिली आहे आज त्याच आरोग्य कर्मचा-यांना गाव गुंडापासुन सुरक्षा मागावी लागत आहे. मागील महिन्यात दि. १२ मे रोजी रात्री ११:१५ वाजता एक गांवगुंडने आरोग्य कर्मचारी  बाबा पवार यांना दारु पिऊन विनाकारण माहरहाण केली होती आणि पुन्हा काल सायंकाळी ६:३० वाजता  अशोक बाबुराव सुरडकर या आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्या एक गावगुंडाने ऑन डियुटीवर मारहाण केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे तरी पुढील पंधरा दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी अन्यथा संघटनेच्या वतीने जिल्हाभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जावेद शेख,संजय भुतेकर,बालाजी म्हेत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.