आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
आरोग्य कर्मचाऱ्यांना गाव गुंडापासून सुरक्षा मिळावी मागणीचे आरोग्य कर्मचारी महासंघाच्या वतीने दिले निवेदन
उस्मानाबाद – मागील सहा महिन्यापासून जिल्हा रुग्णालय येथे गावगुंडांची गुंडागिरी वाढत चालली आहे रात्री अपरात्री दारू पिऊन गावगुंड रुग्णालय मध्ये येऊन ड्युटीवर असलेल्या कर्मचारी यांना मारहाण करणे नर्सेस ला त्रास देणे कर्मचाऱ्यांना पैश्याची मागणी करणे आरोग्य सेवेत व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हे अमानवीय कृत जिल्हा रुग्णालय येथे चालू आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आरोग्य कर्मचा-यांना प्रशासनाकडून कसलाही सुरक्षा नाही आरोग्य कर्मचाऱ्यांची अडचणी कुणीही ऐकण्यास तयार नाही. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोणा काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आरोगय सेवा दिली आहे आज त्याच आरोग्य कर्मचा-यांना गाव गुंडापासुन सुरक्षा मागावी लागत आहे. मागील महिन्यात दि. १२ मे रोजी रात्री ११:१५ वाजता एक गांवगुंडने आरोग्य कर्मचारी बाबा पवार यांना दारु पिऊन विनाकारण माहरहाण केली होती आणि पुन्हा काल सायंकाळी ६:३० वाजता अशोक बाबुराव सुरडकर या आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्या एक गावगुंडाने ऑन डियुटीवर मारहाण केली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे तरी पुढील पंधरा दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी अन्यथा संघटनेच्या वतीने जिल्हाभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जावेद शेख,संजय भुतेकर,बालाजी म्हेत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सहाय्यक पोलीस उप निरीक्षकाने जेवण देण्यासाठी मागितली २ हजाराची लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात
उस्मानाबाद – नळदुर्ग येथील भीमा रघुनाथ गायकवाड , वय 53 वर्षे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून २ हजाराची लाच मागून १५०० रुपये स्वीकारल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार या वकील असून त्यांनी
पोलीस स्टेशन नळदुर्ग गु. र. न. 88/2022 गुन्ह्यातील आरोपीतास कोर्ट कामकाजात मदत केली होती सदर आरोपीतास मा. न्यायालय तुळजापूर यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने आरोपींना कारागृहात दाखल करण्यापूर्वी लोकसेवक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर आरोपीस जेवण देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी पंचांसमक्ष 2000 रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 1500 रु लाच रक्कम स्विकारल्याने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.सापळा पथकात – पोअ/ मधुकर जाधव, अर्जुन मारकड, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर ,विष्णु बेळे , विशाल डोके, जाकीर काझी , नागेश शेरकर ला.प्र.वि, उस्मानाबाद.यांनी काम पाहिले.
सलगरा प्रा.आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न
सलगरा,दि.२४ (प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खा.डॉ.पद्मसिंह पाटील व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथे दि.२४ जुन रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व उपचार शिबिराचे आयोजन सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, ग्रा.पं. सदस्य आणि भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या आजारांवरती तपासणी करून उपचार व मोफत औषध वाटप करून शिबिरामध्ये एकूण २५४ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल नेरूळ चे डॉ.अजित निले, डॉ.प्रशांत जयस्वाल, डॉ.हर्षदा मोरगे, डॉ.अनिकेत राघवर्ते, विनोद ओव्हाळ तसेच उस्मानाबाद तेरणा जनसेवा केंद्राचे रवी शिंदे, प्रविण लोहार, सौरभ रोचकरी, विशाल केदार, यांच्यासह प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल वाघमारे, डॉ.अविनाश गायकवाड, डॉ.भिसे, डॉ.जाधव, अनिता अंधारे, शीतल भालेराव, एल.एच.व्ही. रेणके, आवंतिका सुतकर (पिओ), सतीश कोळगे, प्रकाश रेड्डी, बिभीषण लोखंडे, कुणाल मस्के आदींनी परिश्रम घेतले.











































