गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद – लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) गावातील गट क्र. 367 मधील शेतात शेत मालक- शिवशंकर चंद्रकांत साखरे, वय 28 वर्षे यांनी गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची विश्वसनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. यावर ही महिती मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उमरगा विभागाचे पोलीस उपअधीक्षक बरकते यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- औताडे, अमोल निंबाळकर, धनंजय कवडे, पोना- काकडे यांसह तहसील कार्यालय, लोहारा येथील नायब तहसीलदार- महादेव जाधव व दोन पंच यांच्या उपस्थितीत दि. 29.06.2022 रोजी 19.00 वा. सु. नमूद शेतात पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी नमूद शेतातील ऊस पिकात गांजाची 14 झाडे एका ओळीत लावलेली व त्यास पोन, बोंडे असलेली आढळली. ही गांजाची झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली असता त्यांचे वजन 18.27 कि.ग्रॅ. इतके आढळले. यावरुन शिवशंकर साखरे यांच्याविरुध्द लोहारा पो.ठा. येथे गु.र.क्र. 168 / 2022 हा नार्कोटीक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपीक सबस्टान्स ॲक्ट कलम- 20 नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास लोहारा पो.ठा. चे सपोनि- ररवडे हे करत आहेत.
अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई
उस्मानाबाद – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद जिल्हात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर आज दि.29 जुन रोजी कारवाई करण्यात आली. यात मुरुम पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कंटेकुर ग्रामस्थ- विकास दिलीप सातलगे यांच्या राहते घरातून धान्याचे पोत्यामध्ये लपवुन ठेवलेली अंदाजे 35 इंच लांबीची व 01 इंच रुंदिची तलवार जप्त केली आहे. सदर कामगीरी मुरुम पोलीस ठाणेचे प्रभारी सपोनि- डॉ.रंगनाथ जगताप, पोहकॉ- संजय नायकल, सुखदेव राठोड, पोकॉ- बळीराम लोंढे, अरुण वाघमारे खंडु होळकर ,ज्योती पंढरे, आफरीन मुजावर यांच्या पथकाने केली आहे.
तर कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीसांनी सावरगाव (पु.), कळंब येथील अमोल हरीभाऊ पवार यांच्या घरातून एक धारदार तलवार जप्त केली असून ही कारवाई कळंब पो.ठा. चे पोनि- जाधव, पोना- सोनटक्के, वाघमोडे, पोकॉ- जाधव यांच्या पथकाने केली आहे.
त्याबाबत विकास सातलगे व अमोल पवार या दोघांविरुध्द शस्त्र अधिनियम कलम- 4(25), सह म.पेा.कायदा कलम 135 अंतर्गत मुरुम व कळंब पोलीस ठाण्यात आज दि. 29 जून रोजी गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबादसह सोलापुर येथील चोरीच्या मालासह आरोपी ताब्यात
बेंबळी – चिखली , ता.जि.उस्मानाबाद येथील संभाजी शिवाजी सुरवसे हे दि. 01.06.2022 रोजी रात्रौ आपल्या घरात झोपलेले असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीस असलेली खिडकी उघडुन घरात प्रवेश करुन त्यांचे लोखंडी कपाटातील सुवर्ण दागिने व 1,80,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 2,55,000 ₹ किंचा माल घरफोडी करुन चोरुन आहे. यावरुन संभाजी शिवाजी सुरवसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व उस्मानाबाद विभागाचे मा.पोलीस उप अधीक्षक श्री.कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री.मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ-नवनाथ बांगर, पोना- रविकांत जगताप, सुनिल इगवे, पोकॉ- विनायक तांबे, सचिन कोळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे-अक्षय बाळु शिंदे, वय 25 वर्षे, रा. सुंभा, ता.जि.उस्मानाबाद यास काल दि. 28 जून रोजी कोंड, ता.जि.उस्मानाबाद येथुन ताब्यात घेउन वरील नमूद गुन्ह्याच्या अनुशंगाने कसून व कौशल्यपुर्ण तपास केला. यात त्याने गुन्हा केल्याची कबुली देउन त्याच्याकडून गुन्ह्यातील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने तसेच होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकलीही जप्त केली. या मोटारसायकलीच्या इंजन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे माहिती घेतली आसता सदर मोटारसायकल ता.बार्शी जि.सोलापुर येथुन चोरीस गेल्यावरुन तेथील वैराग पो.ठा. येथे गुन्हा क्र. 301/ 2021 भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल आहेत. सदर प्रकरणी सोलापुर जिल्ह्यातील नमूद पोलीस ठाण्यास कळवले असुन पुढिल अधिक तपास करीत आहेत.
आंध्रप्रदेशातून अपहृत 6 व्यक्तींची उस्मानाबाद पोलीसांकडून यशस्वी सुटका
उस्मानाबाद – वांगी (बु.), ता. भुम येथील सुभाष आण्णा पवार याने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याने त्याच्याविरुध्द
उस्मानाबाद व आंध्र्रप्रदेशात गुन्हे दाखल असुन तो सध्या जामीन मुक्त आहे. त्याने आंध्रप्रदेशातील एका कुटूंबातील पाच व्यक्तींचे व त्यांच्याच एका नातेवाईकाचे अपहरन करुन त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले होते. तसेच 2 मेट्रीक टन गांजा आणुन दिल्यावरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी धमकी सुभाष पवार याने त्या अपहृतांच्या नातेवाईकांना दिली होती. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील जीके विधी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 16/2022 हा भा.दं.सं. कलम- 341, 344, 347, 367, 506 सह एनडीपीएस कलम- 28 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान आंध्रप्रदेश पोलीसांचे पथक दि. 26.06.2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यांना तपासादरम्यान भाषेची अडचण जाणवत होती. या पथकाने स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. यावर मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगीतले. यावर कळंब उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकातील पोउपनि- श्री. पुजरवाड यांसह पोलीस अंमलदार- किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांच्यासह आंध्र पोलीसांच्या संयुक्त पथकाने दि. 26- 27 जून दरम्यानच्या रात्री आरोपी सुभाष पवार राहत असलेल्या वांगी (बु.), ता. भुम येथील परिसरात पाळत ठेवली. दरम्यान पोलीसांच्या लक्षात आले की, सुभाष याच्या घरात नमूद अपहृतांना डांबून ठेवले आहे. यावर पथकाने दि. 27 जून रोजी सकाळी सुभाष पवार यास ताब्यात घेतले. तात्काळ पथकाने त्याच्या घरात डांबून ठेवलेल्या पांगी कुटूंबीय गोवर्धन, धनलक्ष्मी, तरुण- वय 4 वर्षे, संदीप- वय 2 वर्षे, यशोदा- वय 14 वर्षे यांसह जेम्मीली नागेंद्र बाबू सर्व रा. एबुलम, जी.के. विधी मंडल, जि. अल्लुरी सितारामाराजु, राज्य- आंध्द्रप्रदेश यांची पथकाने यशस्वी सुटका केली. उस्मानाबाद पोलीसांनी दाखवलेल्या धाडस व सक्रीयतेबद्दल आंध्र पोलीसांच्या पथकाने उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त करुन आरोपी सुभाष आण्णा पवार यासह नमूद सहा व्यक्तींना घेउन आंध्र पोलीस आंध्रप्रदेशकडे रवाना झाले.
चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी ताब्यात
उस्मानाबाद – येथील रियाज गफुर शेख, व्यवसाय- पत्रकार, वय 43 वर्षे हे दि. 05.05.2022 रोजी 02.00 ते 05.00 वा. दरम्यान घरासमोरील अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या उषाजवळील रियलमी कंपनीचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. यावरुन रियाज शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 66/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाहेकॉ- विनोद जानराव, धनंजय कवडे, पोना- नितीन जाधवर, शैला टेळे,अजित कवडे, काकडे यांच्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील स्मार्टफोनसह जागजी, ता. उस्मानाबाद येथील राम दिलीप मगर यास ताब्यात घेउन पुढील कारवाइकीमी उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.









































