श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
तहसीलदार समीर माने यांनी केली श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी च्या पादुकाचे पूजन
करमाळा – प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर कडे निघालेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दोन जुलै शनिवारी दुपारी चार वाजता सोलापूर जिल्ह्यात रावगाव तालुका करमाळा येथे आगमन झाले. यावेळी श्रींच्या पादुका पूजन करमाळा तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले
दोन वर्ष कोरोना कालावधीत खंडित झालेला पालखी सोहळा यावर्षी चालू झाल्याने वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत होते, या पालखी सोहळ्यात 25000 वारकरी समावेशित असून त्यांच्यासोबत छोट्या छोट्या पंचेचाळीस पालक्याचाही समावेश आहे तोफांच्या सलामीत पालखींचे रावगावच्या वेशीवर आगमन होताच सरपंच दादासाहेब जाधव ग्राम विकास अधिकारी रामदास हजारे यांनी पादुका पूजन व संस्थान अध्यक्ष ह भ प भाऊसाहेब महाराज गंभीरे,पालखी चालक ह भ प मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी ह भ प जयंत महाराज गोसावी यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला
वारकऱ्यांची सर्व सोय करण्यात आली असून आरोग्य विभाग महावितरण विभाग पोलीस प्रशासन यांनी चोख नियोजन करून सेवा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या प्रशासनाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून कोरोनाची खबरदारी म्हणून रावगाव अरोग्य उपकेंद्राने सर्वतोपरी औषध उपचार व इतर स्वच्छतेची तयारी केली आहे कोरोना तपासणी बरोबरच वारकऱ्यात जनजागृती केली जात होती महावितरणचे एक पथक गावातच सक्रिय असून वीज अखंडपणे चालू राहावी यासाठी पथक परिश्रम घेत होते पोलीस स्टेशन करमाळा यांच्यावतीने योग्य व सुनियोजन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील याविषयी दक्षता घेतली यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी भोंग ,विस्तार अधिकारी पाटील,गाव कामगार तलाठी अनभूले, तालूकाकृषी अधिकारी संजय वाकडे, सार्वजनिक बांधकाम विभाग जाधव, पाणी पुरवठा विभाग, तालूका अरोग्य अधिकारी,माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य ,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ,गावकामगार पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
घरफोडीतील दागिन्यांसह आरोपी जोडप्याला मुंबईतून अटक
उस्मानाबाद : झाडे गल्ली, उस्मानाबाद येथील श्रीमती रेखा बाळासाहेब पवार या पतीसह बाहेर गावी गेल्याने त्यांच्या वयोवृध्द सासू या घरी एकट्या होत्या. रेखा यांची सासू दि. 19 जून 2022 रोजी 17.00 ते 18.00 वा. दरम्यान घरास कडी लावून बाहेर गेल्या असता त्यांच्या घराची कडी अज्ञात व्यक्तीने उघडून घरातील कपाटातले 370 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले होते. यावरुन रेखा पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 190/2022 हा भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत दि. 20 जून रोजी नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार यांनी घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. सदरचा गुन्हा करणारे आरोपी त्या फुटेजमध्ये घटनास्थळावरुन जा- ये करत अससताना दिसुन आले. त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी- 1) विक्रांत जगन्नाथ सवाईराम 2) सरोजा विक्रांत सवाईराम या दोघा पती- पत्नींस मुंबई येथील रबाळे रेल्वे स्थानकावरुन आज दि. 01 जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने कसुन व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली देउन सदर गुन्ह्यातील सुवर्ण दागिने हे त्यांचे मुळ गाव- शिराळा, ता. वाळवा, जि. सांगली येथील आपल्या घरी ठेवले असल्याचे सांगीतले. यावर पथकाने नमूद गुन्ह्यातील चोरीच्या सुवर्ण दागिन्यांपैकी 310 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आरोपीतांच्या घरातून हस्तगत केले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, महेबुब अरब, पोना- अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- रवी आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.
चोरीच्या तुषारसिंचन संचातील 9 नोजलसह आरोपी ताब्यात
धाराशिव नामांतरावरून राष्ट्रवादीच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
उस्मानाबाद –
मंत्रीमंडळाच्या अखेरच्या बैठकीत उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात यावे असा ठराव मंजूर केला आहे त्यानंतर ठिकठिकाणी याबद्दल तीव्र विरोध होताना दिसत आहे उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या प्रस्तावाला विरोध करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी विरोध न केल्याने राजीनामा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यात प्रदेश सचिव मसुद शेख, शहराध्यक्ष आयाज शेख,कादरखान पठाण,खलीफा कुरेशी,बाबा मुजावर, इस्माईल शेख,असद पठाण,बाबा फैजोद्दीन मोनोद्दीन पठाण,मन्नान काझी,अन्वर शेख,अतीक शेख,मजाज काझी,सरफराज कुरेशी,लईक सरकार,आवेज मोमीन महेमुद मुजावर,जाकेर पठाण,मन्जुंर भाई,ईस्माईल काझी,गयाज मुल्ला,ईलीयास पिरजादे,बीबाल तांबोळी आदी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.


































