अवैध मद्य विरोधी कारवाई; मोठा दारु साठा जप्त
जिल्हा विधीज्ञ मंडळाची निवडणूक पडली पार अध्यक्षपदी ॲड. सुधाकर मुंडे
उस्मानाबाद – जिल्हा विधीज्ञ मंडळाची वार्षिक निवडणूक दि ६ जुलै रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष गट अ व ब, सहसचिव गट अ व महिला प्रतिनिधी यांची निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीत सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव गट ब व महिला प्रतिनिधी यांची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे या निवडणुकीत निवड आलेले जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर मुंढे, उपाध्यक्ष गट अ अमोल गुंड,गट ब शिवाजी बाराते, सचिव प्रितीश उंबरे, कोषाध्यक्ष ललित चौधरी, सहसचिव गट अ स्वाती शिंदे(जोगडे),गट ब भैय्याजी साबणे,महिला प्रतिनिधी गट अ प्रतिक्षा मोरे,गट ब वैशाली वाटाणे या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
यात अध्यक्ष पदासाठी उभारलेले उमेदवार ॲड श्रीपत तावरे,ॲड सुधाकर मुंडे हे उभे होते , अध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात एकूण वैध मतदान ५१५ अवैध मतदान ३. अध्यक्ष पदाची उमेदवार यात ॲड सुधाकर मुंडे हे विजयी झाले त्यांना २८९ मते मिळाली. पराभूत उमेदवार यांना २१८ मते मिळाली.यात ५ मते नोटाला मिळाली तर ५ मते बाद ठरविण्यात आली.
यात उपाध्यक्ष गट अ साठी तीन उमेदवार उभे राहिले होते यात ॲड आबासाहेब जाधव , ॲड अमोल गुंड,ॲड. इंद्रजित शिंदे हे उभे राहिले होते ॲड. जाधव यांना १९३ मते तर ॲड. गुंड यांना २७५ व ॲड शिंदे यांना ३५ मते मिळाली तर नोटाला ७ मते मिळाली तर ५ मते बाद ठरविण्यात आली.
उपाध्यक्ष ब गटासाठी उभारलेले उमेदवार ॲड शिवाजी बाराते,ॲड. ज्योती वाघे हे होते ॲड बाराते यांना ३९३ मते मिळाली तर ॲड वाघे यांना ११२ मते मिळाली तर नोटाला १० मते मिळाली.
सहसचिव गट अ उमेदवार ॲड स्वाती शिंदे व ॲड माधवी घोंगडे या होत्या ॲड स्वाती शिंदे यांना २४५ मते मिळाली तर ॲड घोंगडे यांना २३५ मते मिळाली तर नोटाला ३४ मते मिळाली तर १ मत बाद ठरविण्यात आले
महिला प्रतिनिधी गट अ उमेदवार म्हणून ॲड मायादेवी सरवदे ॲड प्रतिक्षा मोरे या उभ्या होत्या ॲड सरवदे यांना १९१ मते मिळाली तर ॲड मोरे यांना २९४ मते मिळाली असून यात नोटाला २१ मते मिळाली तर ९ मते बाद ठरविण्यात आले.
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत खंबीरपणे उभे राहिल्या बद्दल खासदार व आमदार यांचा भव्य सत्कार
उस्मानाबाद
महाराष्ट्र राज्यात घडलेल्या नाट्यमय परिस्थितीत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत खंबीर पणे निष्ठेने सोबत राहिल्या बद्दल धाराशिव शहर शिवसेनेच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाकर,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांचा खासदार संपर्क कार्यालय येथे भव्य दिव्य असा हार फेटा घालुन सत्कार करण्यात आला. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालीच धाराशिव शहरात शिवसेना अजुन जोमाने काम करण्याचा यावेळी शिवसैनिकांनी निर्धार केला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,प्रदिप साळुंके,शहरप्रमुख संजय मुंडे,माजी गटनेता सोमनाथ गुरव,युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,नगर सेवक बाळासाहेब काकडे,रवि वाघमारे,राणा बनसोडे,गणेश आसलेकर,माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे,युवा नेते पंकज पाटील,अभिजित देशमुख,बंडु आदरकर,रवि कोरे आळणीकर,भिमा जाधव,विकास मोळवणे,पांडु भोसले,सुरेश गवळी,एच एम देवकते,विजय राठोड,निलेश शिंदे,बालाजी पवार,कष्णा साळुंखे,संकेत सुर्यवंशी,अजित बाकले,शिवयोगी चपणे,शिवप्रतप कोळी,प्रविण केसकर,महेश लिमये,केदार साळुंके,बापु गव्हाने,मनोज पडवळ,सत्यजीत पडवळ,नितिन शेरखाने,पांडुरंग माने,अक्षय नाईकवाडी,बापु थोरात,राकेश सुर्यवंशी,अजय नाईकवाडी,मनोज केजकर,सहयाद्री राजेनिंबाळकर,नरसिंह मिटकरी,सुनिल गायकवाड,मनोज शेरकर,यांच्यासह शहर सिवसेना पदाधिकारी युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूर तालुका शिवसेनेची आढावा बैठक ..!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार तुळजापूर तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सेना, यांची बैठक उद्या दि. ७ जुलै, २०२२ रोजी, दुपारी ठीक २.३० वाजता सर्किट हाऊस, तुळजापूर येथे आयोजित केली आहे. या बैठकीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे मार्गदर्शक असून प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे – पाटील यांची राहणार असल्याची माहिती जिल्हा शिवसेना कार्यालय, धाराशिव यांनी दिली आहे.
आगामी बकरी ईद, एकादशी पार्श्वभुमीवर पोलीसांचे जिल्हाभरात पथसंचलन व बैठका
उस्मानाबाद – समाज विघातक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येत्या दि. 10 जुलै रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन उत्सव साजरे होणार आहेत. या उत्सवांना समाज कंटकांकडून गालबोट लागू नये तसेच त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर, भागांत शिस्तबध्द पध्दतीने पोलीस पथसंचलन करत आहेत. यासोबतच पोलीस ठाणे हद्दीतील सर्व धर्मीय नागरीकांच्या बैठका पोलीस ठाण्यात आयोजीत केल्या जात असून नागरीकांनी सामाजिक सलोखा राखून दोन्ही उत्सव साजरे करावेत असे आवाहन उस्मानाबाद पोलीस दलातर्फे जनतेस केले जात आहे.
चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी 24 तासांत ताब्यात
उस्मानाबाद – शिवाजीनगर, सांजा रोड, उस्मानाबाद येथील किरण हरिभाउ काकडे यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 2987 ही दि. 03.जुलै ते दि. 04.जुलै 2022 रोजी दरम्यानच्या रात्री किरण यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुने किरण काकडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 193/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दि. 05 जुलै रोजी नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, महेबुब अरब, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- रवींद्र आरसेवाड यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेनापुर तांडा, ता. रेनापुर, जि. लातूर येथील ज्ञानेश्वर बालाजी जाधव उर्फ सैराट यांस दि. 05 जुलै रोजी उस्मानाबाद येथील सांजा चौकातून चोरीच्या नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेउन उर्वरीत कारवाईकामी आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद – अवैध गुटखा विक्री, वाहतूक या संबंधी कारवाई करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काल दि. 04 जुलै रोजी उस्मानाबाद शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, काकानगर, उस्मानाबाद येथील जुबेर रज्जाकसाब निचलकर हे आपल्या राहत्या घरात मानवी आरोग्यास हानिकारक असलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहेत. लागलीच पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून निचलकर यांच्या घरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 29,214 ₹ किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला असून निचलकर यांच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 190/2022 हा भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सदर कामगिरी स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, पोना- अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- साईनाथ आशमोड, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.





































