Home Blog Page 145

तुळजापूर शहरात भीषण अपघात दोन जण जागीच ठार

तुळजापूर, दि.15 (प्रतिनिधी) :

तुळजापूर शहरात उस्मानाबाद रोडवर बुधवार (दि.15 ) रोजी दुचाकी वाहनास कंटेनरने धडक दिल्याने दोन्ही जण जागीच ठार झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद कडून तुळजापूरकडे येणारा कंटेनर नंबर जी.जे. 36 व्ही. 4933 हा येत असताना आपसिंगा रोडहुन दोन चाकी वाहनावर गाडी नंबर एम.एच. 25 ए.टी. 7111 हे शहराकडे येत असताना कंटेनरची धडक बसल्याने दोघे जण जागीच ठार झाले. विशेष म्हणजे यातील एकास जवळपास पन्नास फूट रोडवर घासलेले त्यामुळे त्या व्यक्तीचे अशी अवस्था झाली की, त्याची ओळख लवकर पटली नाही. कैलास पवार व दत्ता जगताप हे दोघेही रा.तुळजापूर येथील असून ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली. अपघात घटनेची वार्ता कळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्यांनी या घटनेचा पंचनामा केला व प्रत्यक्षदर्शीकडुन सविस्तर माहिती घेतली.  उस्मानाबादहुन येणाऱ्या वहानासाठी सोलापूर लातूरकडे जाणारे रस्ते बायपास असूनही अनेक जड वाहने शहरातून जातात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरात अपघात घडतात नावालाच बायपास रस्ता झाला अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.

सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचास कंटाळून,ग्रामस्थ शिवाजी कोळी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

 


उस्मानाबाद :वेळोवेळी तक्रार देऊनही ग्रामसेवक ही कारवाई करत नसल्यामुळे तसेच  गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश देऊन पण गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्यामुळे या जाचास कंटाळून तुळजापूर तालुक्यातील एका नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्या वर कारवाई करण्याबाबत आत्मदहन करण्यात आले .वेळीच पोलीसांनी सदर आत्मदहन करते यांना ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टाळला .

            याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की तुळजापूर तालुक्यातील आरोळी बुद्रुक येथे घर क्रमांक 380 जागेची फेरफार नोंद व जागे समोरील अतिक्रमण काढण्याबाबत सदर अर्जदार यांनी 2017 पासून ते 2022 पर्यंत संबंधित ग्रामसेवक गटविकास अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी यांना वेळोवेळी लेखी स्वरूपाचे तक्रारी अर्ज दिले होते .यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक सात जून रोजी तक्रारदार शिवाजी कोळी यांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होतात .संबंधित ग्रामसेवक की यांनी सदर जागेची नोंद न घेतल्यामुळे व अतिक्रमण न कडल्यामुळे  सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचास कंटाळून  तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील ग्रामस्थ शिवाजी कोळी यांनी आज दिनांक ,१५ जून २०२२,रोजी दुपारी १:३०. वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करत आहे असे शिवाजी कोळी यांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले,तर वेळीच पोलिस प्रशासन यांनी शिवाजी कोळी यांना आत्मदहन करत असताना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला,संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवाजी कोळी यांनी केले आहे. आत्मदहन करते यांना वेळीच पोलीसांनी ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला सदर आत्मदहन असल्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .सदर आत्मदहन करते यांना आनंद नगर पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू आहे .

सलगरा येथील जि.प. शाळा सुरू, विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत


सलगरा,दि.१५ (प्रतिक भोसले)

आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८३९ शाळांची घंटा आजपासून वाजली आहे. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच ६ लाख ९४ हजार १६८ पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी वितरीत करण्यात आले. त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून करण्यात आले. सध्या विस्तार अधिकारी हे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हद्दीतील सर्व शाळांना भेटी देत आहेत. अशीच भेट सलगरा जिल्हा परिषद शाळेस काक्रंबा बीटचे विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे यांनी दिली. जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली. तेथील शालेय कामकाज, कार्यालयीन कामकाज या सह विवीध विषयांवर चर्चा केली. तसेच शिक्षकांच्या काही अडीअडचणी असतील त्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी योग्य आणि चांगले नियोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ कशी वाढवता येईल,  हे बघितलं पाहिजे असे ते बोलताना म्हणाले. विशेष म्हणजे आज पहिला दिवस असल्याने पोषण आहारात गोड पदार्थ सुद्धा देण्यात आले ज्या मध्ये बालुशाही आणि गोड भात देण्यात आला. त्या मुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस हा गोड झाला आहे. ज्या मुळे विद्यार्थ्यांमध्ये पहिल्याच दिवशी शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने गोड पदार्थ वाटप करण्यात आले होते. 

पाठ्यपुस्तकांचा विचार केला असता प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी २७५ पुस्तके, तर प्राथमिक साठी २३६ पुस्तके आली होती.  पुस्तके वाटप करताना सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र माळी, तात्या केदार, मुख्याध्यापक शेख जे.बी., कांबळे व्ही.टी., वाघमोडे एस. एन., तनपुरे जी.बी., क्षिरसागर आर.एन. श्रीम. शेख ए.बी., श्रीम. पवार व्ही.बी., श्रीम. डावरे पी.एस., श्रीम. आसलकर एस.एस., श्रीम. गुंड एम.बी., गाडेकर पी.एस., सनगुंदी बी.एच. कर्मचारी श्री खटके (पाटील) यांच्या सह विदयार्थी उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर डी.व्ही., सालपे एम.एम., इंगळे एस. बी., चव्हाण पि.डी., ठाणंबिरे बी.आर., श्रीम पोपळभट के.सी., श्रीम भक्ते, श्रीम लोभे, श्रीम ढवारे, श्रीम. बिराजदार आदी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सरपंच, ग्रामसेवकावर अपहाराचा आरोप, चौकशीसाठी उपोषण

 


उस्मानाबाद – तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून कामे न करता ५ लाखापर्यंत चे निधी उचलला आहे. याची चौकशी करण्यात यावी यासाठी किरण रणदिवे ह्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत.

 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायत मधील चौदाव्या वित्त आयोगातून विकास कामे न करता त्या कामाची कृती आराखड्यामध्ये सुध्दा  कुठलाही उल्लेख नाही. १४ व्या आयोगाच्या खात्यावर शिल्लक रक्कम पाहून त्या कामाचे अंदाजपत्रक न बनविता व कुठल्याही प्रशासकीय मान्यता न घेता नेक्सा सोलर पाॅवर  या कंपनीच्या नावावर दि २८ जुलै २०२१ ते २ सप्टेंबर २०२१ पर्यंत धनादेश द्वारे रुपये ५ लाखांपर्यंत चे व बिल सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केलेला आहे. याबाबत गटविकास अधिकारी तुळजापूर यांना अर्जाद्वारे कळविले होते त्यांनी सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही गेल्या पंधरा वर्षापासून असेच प्रकार होत आहेत नवीन सरपंच आल्यापासून तेही मागील सरपंचा प्रमाणे कामे न करता निधी हडप करत आहेत त्यामुळे हिप्परगा ताड विकासापासून वंचित राहिले आहे तरी अपहाराबाबत समितीने मिळून योग्य ती चौकशी करून अपहार करणार्‍या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती करवाई करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात येत असून त्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणापासून रोखण्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते बोलू शकतात मग उपमुख्यमंत्री का नाही? राष्ट्रवादीचा सवाल

उस्मानाबाद

संतांची भूमी असलेल्या श्रीक्षेत्र देहू येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. 14 जून रोजी झालेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्यापासून रोखणार्‍या भाजपाचा उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र शब्दांत निषेध करुन जोरदार घोषणा दिल्या. केंद्र सरकारने प्रोटोकॉलच्या नावाखाली जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. 

संत तुकाराम महाराजांची भूमी श्रीक्षेत्र देहू येथे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत शिळा लोकार्पण कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी देणे अपेक्षित होते. परंतु त्यांना भाषण करण्यापासून रोखण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. 

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख,जिल्हा उपाध्यक्ष कादर खान,वाजिद पठाण,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील,उस्मानाबाद कळम विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण,उद्योजक जिल्हा अध्यक्ष ॲड.विवेक घोगरे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे,शहराध्यक्ष अयाज शेख,शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे,नंदकुमार गवारे,शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल,अनिकेत पाटील, राजकुमार पवार,अतुल आदमाने,मा.नगरसेवक खलिफा कुरेशी, मैनुद्दीन पठाण,इस्माईल शेख,बाबा मुजावर, शेखर घोडके,मीनील काकडे,जयंत देशमुख,मृत्युंजय बनसोडे,अमोल सुरवसे, अभिजीत व्हटकर,मजहर शेरकर,अजय कोळी, सौरभ देशमुख, आकाश वाघमारे,अमित बनसोडे, वैभव मोरे नारायण तुरुप,प्रेमचंद मुंडे,राजपाल दूधभाते,रणवीर इंगळे बिलाल तांबोळी,अतिक काजी,लईक सरकार, महेश नलावडे,महमूद मुजावर,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महिला, युवक व विविध कक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्रातील जनतेचा अवमान

महाराष्ट्राची अस्मिता असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषणापासून रोखण्यात आले.  केंद्राच्या प्रोटोकॉलच्या नावाखाली झालेला त्यांचा अवमान हा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा अवमान आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. 

– अमित शिंदे

– उस्मानाबाद-कळंब विधानसभा अध्यक्ष


शिष्टाचाराची पायमल्ली

विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला भाषणाची संधी दिली जाते परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करण्यास मज्जाव करणे म्हणजे संविधानाची आणि शिष्टाचाराची पायमल्ली झालेली आहे. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत सुद्धा विमानतळावर असाच प्रकार घडला आहे. या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध करत आहे.

नितीन बागल

जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस



राजीव गांधी नगर मधील कामांबाबत नगरपरिषदेने घेतली हमी, उपोषण मागे

 


उस्मानाबाद – राजीव गांधी नगर येथील नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी तसेच ही कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप करत दलित महासंघाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि १४ जून पासून आमरण उपोषणाला बसले होते.

 हे आमरण उपोषण मागे घेण्याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी येलगट्टे यांनी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तूपसुंदरे यांची भेट घेऊन हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्यात येईल व नगरपरिषद प्रशासन योग्य ती हमी घेईल अशी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेतले आहे.


आंदोलन कशासाठी हे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा 


राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

 


उस्मानाबाद
गत दोन महिन्यापासुन जिल्हयात विविध ठिकाणी सामुहीक धाड सत्र आयोजीत करुन अवैध मद्य निर्मीती केंद्रावार कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयातील अधिकारी सतर्क राहुन सदर मोहिमेत भरीव कामगीरी करीत आहेत. यातच दिनांक. 13 जून  रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे रुईभर ता. जि. उस्मानाबाद व मौजे चिखली ता.जि. उस्मानाबाद येथील 1 ) गोराबा बंकट चव्हाण, वय 52 वर्षे, 2) प्रशांत शामसिंग रसाळ वय 38 वर्षे 3) तानाजी वसंतराव जठार वय 46 वर्षे. 4) ज्ञानदेव गणपती जाधव वय 60 वर्षे हे त्यांचे फायदेसाठी अवैध रित्या गोवाराज्य निर्मीत व फक्त गोवाराज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारु व बनावट देशी दारु विनापरवाना देशी/विदेशी दारुची चोरटी त्याचे हॉटेल शेतकरी मौजे रुईभर ता.जि. उस्मानाबाद व मौजे चिखली ता.जि. उस्मानाबाद येथे विक्री करीत असल्याची खात्रीलायक बातमी मीळाली नुसार श्री.टि.एस. कदम, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक उस्मानाबाद/लातुर, श्री.पी.जी. कदम दुय्यम निरीक्षक, श्री. आर. आर. गिरी जवान श्री.एम.पी.कंकाळ,जवान, श्री. व्ही. आय. चव्हाण जवान यांचेसह गुप्त माहिती मिळालेल्या ठिकाणी प्रो. गुन्हेकामी छापामारुन झडती घेतली असता वरीलप्रमाणे नमुद चारही आरोपी यांचे ताब्यातुन प्रो. गुन्हयाचा नमुद एकुण रु.1.82 140/ रुपये किंमतीचा देशी/विदेशी मद्याचा मुद्देमाल मिळुण आला.
जप्त मुद्देमाल :

1) विदेशी मद्य इम्पेरिअल ब्ल्यु 180 मी.ली. क्षमतेच्या 96 बॉटल गोवाराज्य निर्मीत 2) विदेशी मद्य रिअल – 7 चे 750 मी.ली. क्षमतेच्या 04 बॉटल गोवाराज्य निर्मीत

3) देशी दारु स्पेशल संत्रा 180 मी.ली. क्षमतेच्या 2448 बॉटल बनावट देशी दारु
 4) आयबी, मॅकडॉल नं-1, व रॉयलस्टॅगची बनावट लेबल

5) आयबी, मॅकडॉल नं-1, व रॉयलस्टॅगची एकुण 310 बनावट बुच

वरील प्रमाणे गोवाराज्य निर्मीत व गोवाराज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारु व बनावट देशी दारू विनापरवाना देशी/विदेशी दारुची अवैधारित्या आयात करुन विक्री करिता जवळ बाळगलेले विदेशी मद्याचे एकुण 53 बॉक्स (541 बॉटल) मद्यसाठा मिळुण आला आहे. सदर साठयाची एकुण किंमत रु.1,82,140/- ऐवढी आहे. सदर मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात मिळुण आलेला आरोपी व इतर यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65-(अ) (ड) (ई),81,83,90 व 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा तो कोणला विक्री करणार होतो याचा तपास केला जात आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली श्री.टि.एस. कदम, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ.प.उस्मानाबाद/लातुर, श्री.पी.जी.कदम दुय्यम निरीक्षक, श्री. आर. आर. गिरी, जवान श्री. एम.पी. कंकाळ, जवान, श्री. व्ही. आय. चव्हाण जवान यांचे पथकाने केली आहे.
सदर प्रकरणांचा पुढील तपास श्री.टि.एस. कदम, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक उस्मानाबाद/ लातुर हे करित आहेत.

उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १५ ते १९ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून दिनांक १५ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुला, मुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

 


उस्मानाबाद (प्रतिनिधी)-

कोरोना काळात आई किंवा वडीलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुला, मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. याची नाव नोंदणी सुरू असून पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षणासह सर्व प्रकारच्या भौतिक गरजा विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येणार आहेत.

राज्यात कोविडमुळे अनाथ झालेल्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागवण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आई किंवा वडील तर काही जणांना दोघांनाही गमवावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासोबतच पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही संघटना दत्तक घेणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. एका कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना पुनर्वसन वसतिगृहात पाठविण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील इच्छुकांनी संघटनेचे अॅड. शांतीलाल कोचेटा, कंचनमाला संगवे, अॅड. रोहन कोचेटा, पत्रकार उपेंद्र कटके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिशा समितीच्या बैठकीत खासदारांचे निर्देश

सोमवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्या कंचनमाला संगवे यांनी याची माहिती दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना उपक्रमासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक गावाच्या ग्रामसेवकांनी गावात माहिती देऊन अशा विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. संबंधितांनीही ग्रामसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पत्र ग्राह्य

कोरोनात अनाथ झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नोंदणी शासनदरबारी नाही. तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदी झाल्या नाहीत. यामुळे आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळात पालकांचा मृत्यू झाल्याचे पत्र दिले तरीही ते ग्राह्य धरणार असल्याचे संगवे यांनी बैठकीत सांगितले. याबाबत अंतिम निर्णय संघटनेने राखून ठेवला  आहे.