Home Blog Page 134

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता २३ ते २७ जुलैसाठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून दिनांक २३ व २४ जुलै, २०२२ रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दैनिक जनमत २२ जुलै २०२२ E paper

 

दैनिक जनमत २१ जुलै २०२२ E paper

किलज सोसायटी निवडणूकीत जय मल्हार पॅनलचा दणदणीत विजय

सलगरा,दि.१८(प्रतिनिधी) – 

 तुळजापूर तालुक्यातील किलज येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी चेअरमन वैजिनाथ कोनाळे, दिनकर पाटील, नागेश कुताडे, माजी सरपंच विठ्ठल मर्डे यांच्या नेतृत्वाखालील जय मल्हार परिवर्तन पॅनलने १२ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांना धोबी पछाड केले. एकूण १३ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे वि.जा.भ.जा. गटातून शामराव राठोड हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर माजी पंचायत समिती सदस्य खंडेराव शिंदे, यांच्या नेतृत्वाखालील जय शंभो शेतकरी विकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. 

 

  रविवारी (दि.१७) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. या निवडणुकीत ५३० पैकी ४८९ मतदान झाले. सर्वसाधारण गटात जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे चॉंदसाहेबलाल इनामदार (२२४), लक्ष्मण गिरमल (२२३), प्रविण कुठार (२२७), वैजिनाथ कोनाळे(२३०), राम किनगे (२२९), जयराम राठोड (२३०), अशोक शेळके (२३५) निवृत्ती शिंदे (२२७), तर याच गटातून जय शंभो शेतकरी विकास आघाडीचे मनोहर भोईटे (२०४), सचिन बिडवे (२२१), आण्णाराव मोजगे (२०५), बाळू राठोड (२१५), दगडू शिंदे (२१५), विजय शिंदे (२१४), विवेकानंद सोमवंशी (२१८), माणिक येलूरे (२११) यांना सपशेल पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जाती गटात महादेव गायकवाड (२५०) विजयी झाले तर भिमा गवळी (२२७) पराभूत झाले. इतर मागास प्रवर्ग गटातील शिवाजी सगर (२५२) विजयी झाले तर महेश माने (२२१) पराभूत झाले. महिला राखीव गटात जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास विकास पॅनलच्या गंगाबाई सारणे (२४३) विजयी झाल्या तर कुसूम गायकवाड (२३०) यांचा जय शंभो शेतकरी विकास आघाडीच्या कुसूम शिंदे (२३१) यांनी केवळ एका मतांनी पराभव केला. तर जय शंभो शेतकरी विकास आघाडीच्या शेषाबाई सगर (२१६) यांचाही पराभव झाला.

  सोसायटी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची रंगीत तालीम समजली जाते. त्यामुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विजय खेचून आणण्यासाठी दोन्ही पॅनलमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अखेर जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलने १३ पैकी १२ जागा जिंकून किलज सोसायटीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले आहे.

अवैध गुटखा विरोधी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



उस्मानाबाद –  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी काल दि. 16 जुलै रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक कळंब तालुक्यातील डिकसळ येथे आले  असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, डिकसळ ग्रामस्थ- किसन माधव गायकवाड, वय 65 वर्षे यांनी आपल्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवला आहे. यावर पथकाने किसन गायकवाड यांच्या दुकानात छापा टाकला असता पोत्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखू असा एकुण 24,240 ₹ किंमतीचा माल बाळगलेले आढळले. यावर पथकाने नमूद माल जप्त करुन किसन गायकवाड यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 328, 272, 272 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यात दि. 16 जुलै रोजी 19.48 वा. सु. गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- हुसेन सय्यद, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- रविंद्र आरसेवाड, सहाणे यांच्या पथकाने केली आहे.

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये डिजीटल क्लासरूमचे महिला पालकांच्या हस्ते उद्घाटन

परंडा (भजनदास गुडे  )ग्लोबल मधील प्रत्येक विदयार्थी हा तंत्रज्ञान तसेच डिजीटल जगातही मागे राहिला नाही पाहिजे तसेच मुलांसमोर आलेले प्रत्येक आव्हान मुलांनी यशस्वीपणे स्विकारले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून दि१५ जुलै रोजी माता पालक मेळाव्यासाठी उपस्थित महिलांच्या हस्ते डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.

        उद्घाटन प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव शिवमती आशाताई गोरख मोरजकर,मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवश्री रविदादा मोरे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री गोरख मोरजकर, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी तालुका अध्यक्ष अर्चनाताई भांडवलकर, शिवश्री धर्मराज गटकुळ यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते. 

       कोरोनामुळे दोन वर्षानंतर हि पहिलीच माता पालक बैठक झाली. कोरोना काळात दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे मुलांची झालेली अधोगती कशी भरून काढता येईल,मुलांना अभ्यासासोबत संस्कार कसे देता येतील,मुलांनी नेहमी सकारात्मक विचार करावा यासाठी काय करता येईल,लहान मुलांची मानसिकता पाहून त्यांचे संगोपन कसे करायचे अशा अनेक गोष्टीवर शिवमती आशाताई मोरजकर मॅडम यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले.

        माता पालक मेळावा आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे मुलांना वडिलांपेक्षा आईचा जास्त सहवास असतो. जर आईलाच आपल्या मुलांविषयी प्रगतीचा अहवाल दिला व मुलांचा अभ्यास कसा घ्यायला हवा त्यांना आज काळानुसार मुलांना संस्काराची आवश्यकता किती आहे या विषयी माहिती सांगितली तर मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.असेही सौ. मोरजकर यांनी उपस्थीत माता पालकांना सांगीतले.      कार्यक्रमास उपस्थीत बहुतांशी महिला पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.