Home Blog Page 133

२० हजाराची लाच स्वीकारणारा पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


उस्मानाबाद – 

लोहारा पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे , वय 35 वर्षे हे २० हजाराची लाच स्वीकारताना   लाचलुचपत प्रतिबंधक विभागा जाळ्यात सापडले आहेत. याबाबत माहिती अशी की,तक्रारदार  यांचे विरुद्ध पो. स्टे. लोहारा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी यातील लोकसेवकाने तक्रारदार यांच्याकडे  दिनांक 03.08.2022 रोजी 25000/- रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 20,000/- रुपयांची मागणी करून दिनांक 04.08.2022रोजी  20,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली.  सापळा अधिकारी म्हणून प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले ,विष्णू बेळे , जाकेर काझी यांनी काम पाहिले.सदरची कारवाई लोहारा ते जेवळी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ आज दि.4/8/22 रोजीचे 10:55 वाजता करण्यात आली असून यासंबंधाने पो स्टे लोहारा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

दैनिक जनमत ०४ ऑगस्ट २०२२ E paper

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता ०३ ते ०७ ऑगस्ट साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या (तुरळक ठिकाणी मुसळधार) पावसाची शक्यता आहे.


खा. संजय राऊत यांच्या घरावर ई डी चा छापा


शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या घरावर ई डी ( अंमलबजावणी संचालनालय) ने छापा मारला असून आज सकाळी (३१ जुलै) पासून त्यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरासमोर शिवसैनिक देखील जमले असून त्यांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच संजय राऊत यांनी तीन वेगवेगळे ट्विट केले असून ते देखील चर्चेत आहेत. 



खा. संजय राऊत गेल्या काही काळात केंद्र सरकार विरोधात जोरदार टीका करत आहेत. महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. शिवसेनेतील बंडा नंतर देखील ते शिवसेनेची बाजू भक्कम पाने मांडत आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तानाट्या संदर्भात सुनावणी आहे. तत्पूर्वीच खा. संजय राऊत यांच्या घरावर धाड पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता ३० जुलै ते ०३ ऑगस्ट साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर इतर दिवशी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


सोयाबीन पिकातील विषाणूजन्य पिवळा केवडा (Soybean Yellow Mosaic Virus) रोगाचे व्यवस्थापन

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पीक ३० ते ४० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहे, याच बरोबर सतत ढगाळ वातावरण व अधून मधून लख्ख सूर्यप्रकाश असे वातावरण असल्याने गवतांचा प्रादुर्भाव होत आहे. कोणत्याही पिकांची पेरणी करताना एक सुयोग्य अंतर शिफारशीत केले जाते, जेणेकरून पिकामध्ये हवा खेळती राहील परंतु ज्या क्षेत्रामध्ये ही जागा गवताने व्यापली आहे अश्या क्षेत्रात, किंवा बांधावर गवत जास्त असेल अशा क्षेत्रात रस शोषणाऱ्या किडींचा उदा. पांढरी माशी, मावा, तुडतुडे इ. प्रादुर्भाव जास्त होतो.  या किडी विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.


लक्षणे:-

सोयाबीन च्या पानावर लहान शिराच्या बाजूला पिवळे- हिरवे असे एक-आड -एक चट्टे पहावयास मिळतात, कालांतराने असे पान वाळून जाते.

रोगाची लागण:-

विषाणूजन्य रोगांमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे रोगाची लागण आणि त्याचा प्रसार होण्याचे मध्यम ओळखणे व त्याचे नियंत्रण करणे.

शिवारातील एखाद्या झाडावर वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ असे झाड उपटून नष्ट करावे. जेणेकरून अश्या झाडावरील पांढरी माशी इतरत्र जाऊन रोगाचा प्रसार करू नये. असे प्रादुर्भावग्रस्त झाड रोगाच्या लागणीस कारणीभूत ठरते. सोयाबीन मधील विषाणूजन्य पिवळा केवडा या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडी मार्फत होतो,त्यामुळे पांढरी माशी च्या नियंत्रण करण्यासाठी खालील उपाययोजना करावी.

व्यवस्थापन :

१) पीक २०-२५ दिवसांचे असताना सुरुवातीस ५% निंबोळी अर्काची फवारणी केल्यास पांढरी माशी पानावर स्थिरावत नाही.

२) पांढरी माशी पिवळ्या रंगाला आकर्षित होत असल्याने प्रति हेक्टरी २० ते २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

शेजारी ऊसाचे क्षेत्र असेल तर ऊसाच्या बाजूने जास्त पिवळे चिकट सापळे लावावेत.

३) रासायनिक कीटकनाशकांमध्ये थायमिथोक्झांम २५% डब्लू जी ४० ग्रॅम   कीटकनाशकाची प्रति एकर २०० लिटर पाणीतुन फवारणी करावी.


डॉ. श्रीकृष्ण झगडे,

शास्त्रज्ञ, पीक संरक्षण

कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर