Home Blog Page 127

न्यायाधीशांच्या निवासासमोरचा रस्ता निकृष्ट?

 दोन महिन्यातच खडी उखडली!

उस्मानाबाद – शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते झाल्याची ओरड नागरिकांकडून केली जाते. संबंधित कामाचे कंत्राटदार प्रशासनाची भीडदास्त न ठेवता कशी कामे करतात याचा प्रत्यय शहरातील एका रस्त्याच्या कामानिमित्ताने येत आहे. पोलीस मुख्यालय पाठीमागील बाजूने आणि जिल्हा परिषदेच्या लागून समर्थ नगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापूर्वीच झाले होते. आता त्या रस्त्यावरील खडी उखडू लागली असून येत्या काही दिवसात हा रस्ता पुन्हा खड्डामय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर जिल्हा न्यायाधीशांचे निवास आहे. याबाबत नगर परिषदेतील स्थापत्य अभियंता दुबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कामाबाबत मला माहिती नाही मुख्याधिकाऱ्यांना विचारा अशी उडवा उडविची उत्तरे दिली. नगर परिषदेचे  मुख्याधिकारी हरी कल्याण येलगट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराचे कामाचे बिल दिले नसून त्याच्याकडून रस्ता दुरुस्त करून घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

दैनिक जनमत ०१ सप्टेंबर २०२२ E paper

लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत

 




उस्मानाबाद -विघ्नहर्ता गणरायाचे उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी भव्य स्वागत केले.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात गणपतीचे स्वागत करण्यात आले.  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, बस स्थानक परिसर, बसवेश्वर चौक परिसरात कालपासूनच गणपतीच्या मूर्त्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या.  गणेश भक्तांनी सकाळपासून गणेश मुर्त्या खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यासोबत गणपतीस आवश्यक असणारे सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  या गणेश उत्सवात महागाईचे संकट असले तरी गणेश भक्त मनोभावे उत्सव साजरा करण्यात असल्याचे दिसून येते आहे.

यावर्षी गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट नसले तर नागरिकांना महागाईचा झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षी कोरानाचे सावट असल्यामुळे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला नव्हता यावर्षी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले.परंतु यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती पासून ते प्रसाद सजावट व पूजेच्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे यावर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे यातच बाप्पांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादांमध्ये प्रति किलो २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे तर सजावटीच्या साहित्यात १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

तासगाव शहरात रथोत्सवानिमित्त १ सप्टेंबरला वाहतूक मार्गात बदल

 

आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांचे गणेश भक्तांना आवाहन

रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याने तासगाव शहरातील गुरवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे -मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची माहिती

 तासगाव (प्रतिनिधी, दि. ३१)तासगाव शहरातील रथोत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार आहे. तासगाव येथील पारंपारिक रथोत्सव पाहण्याकरीता जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून तासगाव शहरामध्ये बहुसंख्य लहान मुले,‍ स्त्रिया, पुरूष गर्दी करीत असतात. कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरीकांच्या जिवितास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 23.59 वाजेपर्यंत खालील मार्गावरील पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर बिग्रेड या वाहनांखेरीज सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

 सांगली-मणेराजुरी कडून येणारी वाहतूक (विटा/आटपाडीकडे जाणारी) – (१)  कॉलेज कॉर्नर तासगाव – भिलवडी नाका – एसटी स्टॅण्ड – विटा नाका – विटा. (२) कॉलेज कॉर्नर तासगाव – भिलवडी नाका – एसटी स्टॅण्ड – विटा नाका – आटपाडी. विट्याकडून येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ) – विटा – विटा नाका – चिंचणी नाका – चिंचणी चौक – थळेश्वर मंदीर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर तासगाव – सांगली. आटपाडी कडून येणारी (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) – आटपाडी – पुणदी फाटा – वाघमोडे वस्ती चिंचणी –  चिंचणी चौक – थळेश्वर मंदीर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर तासगाव – सांगली.

 पार्कींग पॉईंट – विटा, आटपाडी, चिंचणी कडून येणारे भाविक- कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव (मार्केट यार्ड येथे टू व्हिलर व फोर व्हिलर पार्किंग). सांगली, मणेराजुरी भिलवडी कडून येणाऱ्या भाविकांसाठी फोर व्हिलर पार्किंग व्यवस्था द बुध्दिष्ट सोसायटी कॉलेज कॉर्नर जवळील मैदान व दत्त मंदीर समोरील मैदान येथे  तर टू व्हिलर पार्किंग व्यवस्था क्रिडा संकुल ग्राउंड तासगाव येथे करण्यात आली आहे.

 या आदेशाचे उल्लंधन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

अपंग जनता दलाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

उस्मानाबाद – अपंग जनता दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी अपंग जनता दलाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अपंग हक्क अधिनियम २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांचा चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्यासोबत अपंग पुनर्वसन केंद्राची तरतूद करून जिल्ह्यातील गरजू अपंगांना आवश्यक साहित्य मिळवण्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही तरी बाबत पूर्वी सुध्दा पत्रव्यवहार केला आहे,अपंग हक्क हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ९२ व ९३ ब ची कडक अंमलबजावणी करावी अपंगांना स्वयंरोजगारासाठी शासकीय कार्यालयाच्या परिसरात २०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी,अपंगाना विनाअट घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे,जिल्ह्यातील आठ तालुके व सर्व ग्रामपंचायतीने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या स्वनिधी मधून अपंगांसाठी पाच टक्के निधी वाटप करण्याबाबत आपल्या स्तरावर आदेशित करण्यात यावे या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या एकदिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने अपंग बांधवांना उपस्थित होते.

बेंबळी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न




पाडोळी( प्रतिनिधी)

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्या मध्ये आज (दि.२७) शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. 

यामध्ये बेंबळी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या सर्वच्या सर्व गावच्या पोलीस पाटील,  पोलीस कर्मचारी,ग्रामसेवक, कमिटी मधील सदस्य महावितरणचे अधिकारी आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कल्याणजी घेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,  यावेळी आगामी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळानी कायद्याचे पालन करून उत्सव साजरा करणे बाबत ही मार्गदर्शन केले, यावेळी खेड्या पाड्यातून आलेल्या सर्व शांतता कमिटी मधील सदस्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि या बैठकीचा मुख्य उद्देश हा आगामी गणेश उत्सव शांततेत पार पाडणे बाबत सूचना दिल्या, शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करावे, एक गाव एक गणपती करण्यासाठी बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मच्छिंद्र शेंडगे केले आहे, यावेळी मोठ्या संख्येने शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळाचे सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदी लोक उपस्थित होते.

बिलकिस बानो प्रकरणातील ११ आरोपीना गजाआड करा

परंडा तालुका राष्टवादी महीला काँग्रेसची तहसिलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

परंडा (भजनदास गुडे) दि. २७- गुजरात सरकारने बिलकीस बानो यांच्या वर केलेलेल्या अत्याचार प्रकरणातील ११ बलात्कारी आरोपीची सुटका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष वैशाली मोटे यांच्या मागदर्शना खाली परंडा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२७ ऑगष्ट रोजी तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन त्या आरोपीना पुन्हा गजाआड करा अशी मागणी करण्यात आली.

        राष्ट्रपती यांना पाठवीन्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सन २००२ मध्ये गुजरात मध्ये जो नरसंहार झाला त्यापैकी बिलकीस बानो या एका पीडित महिलेवर अन्याय झाला. तिच्यावर अकरा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलींचा खुन करून कुटुंब संपवले.परंतु हिंमत न हारता प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला.मुंबईमध्ये विशेष सी.बी.आय.न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय,आणि सर्वोच्च न्यायालयाने,त्या ११ आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्याय मिळाला असे वाटले होते परंतु देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा दिल्या मात्र त्या सायंकाळ पर्यंत हवेतच विरघळून गेल्या आणि गुजरात सरकारने बिलकस प्रकरणातील ११ बलात्कारी आरोपीची नियमबाह्य सुटका केली.

    हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळीमा फासणारी असून न्यायिक व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी आहे.याची राष्ट्रपती यांनी दखल घेऊन पीडित महिलेस न्याय मिळवून देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

    या निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा स्वाती गायकवाड, उपाध्यक्षा दैवशाला खैरे, मा.नगरशेविक रत्नमाला बनसोडे, रंजना माने,रूपाली लोखंडे, राखीताई देशमुख, मिनाक्षी काळे,राष्ट्रवादी सामाजीक विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बासोडे,वाजीद दखनी, जावेद मुजावर,धनंजय हांडे मा.सरपंच हनुमंत गायकवाड, बाबुराव काळे,अमोल जगताप, शिरू शेख,समीर मदारी, अविनाश आटोळे, श्रीहरी नाईकवाडी,नंदु शिंदे,रुपेश बनसोडे,रंगनाथ ओव्हाळ,दिपक ओव्हाळ,बिभीषण खुणे,घनशाम शिंदे,हुसेन शेख,सलीम हन्नुरे,अजहर शेख,जुबेर पठाण,शरीफ शेख, समीर काझी,पप्पू शेख,अफ्रेर शेख,शाबुदिन सय्यद,मेहबुब काझी,अस्तम मदारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.