सकल मराठा समन्वय समिती सदस्यांनी सभास्थळाचा घेतला आढावा
सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची जय्यत तयारी
परंडा येथील कोटला मैदानावर भव्य स्टेज उभारणीचे काम अंतीम टप्प्यात
सकल मराठा महामोर्चाला लाखो मराठा समाजाची गर्दी उसळणार
परंडा (भजनदास गुडे – दि ६ नोव्हेंबर ) सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन ५० टक्के च्या आत कायदयाच्या चौकटीत टिकनारे आरक्षण मिळावे या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने दि ८ नोव्हेंबर रोजी परंडा येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे .
या मोर्चाची सुरूवात सोनारी रोड येथील छत्रपती संभाजीराजे चौकातून होणार आहे तर सभेचा समारोप रूई रोड येथील कोटला मैदानात होणार आहे .
कोटला मैदानावर भव्य असा स्टेज उभारण्यात येत असुन याच स्टेज वरून मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यां पाच मुली उपस्थीत सकल मराठा जनसमुदायाला सकाल मराठा समाजाला शिक्षण व नौकरीसाठी आरक्षणाची कीती गरज आहे याविषयी संबोधीत करणार आहेत.तसेच यांच ठिकाणी सकल मराठा समाजाच्या पाच मुली व पाच महीला च्या हस्ते उपविभागीय अधिकारी यांना सकल मराठा समाजाला आरक्षण मीळावे या मागणीचे निवेदण देणार आहेत.
सभा ठिकाण व परिसरातील साफ सफाई करण्यात आली आहे अभुतपुर्व असा महामोर्चा होणार असल्याने सकल मराठा समन्वय समीती कडून जय्यत तयारी सुरू आहे.त्याचा भाग म्हणूण दि६ नोहेबर रोजी सकल मराठा समन्वय समीतीच्या सदस्यांनी सभास्थळी भेट देऊन ग्राऊन्ड,लाईट,स्टेज,बॅरेकेट, महीला,पुरुषाच्या व पत्रकारांच्या कक्षाची पाहाणी करुन आढावा घेतला.व या महामोर्चात लाखो च्या संखेने मराठा समाज बांधवानी सहभागी व्हावे असे अवाहन समन्वय समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.
तोडणीस आलेला साडेतीन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक
वाकडी शिवारातील घटना
रविद्र अंधारे व दिलीप अंधारे यांच्यावर आर्थीक संकट कोसळले….
परंडा (भजनदास गुडे)परंडा तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या दोन शेतकर्यांच्या मालकीचा असलेला सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावरील तोडणीस आलेला उभा ऊस शॉर्टसर्किट झाल्यामुळे जळून गेला आहे.या रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे यांच्यावर आर्थीक संकट कोसळले आहे.
हे दोन्ही शेतकरी आधीच आर्थिक संकट असताना या ही संकटाला सामोरे जावे लागले आहे.या घटनेची माहिती दोन्ही शेतकऱ्यांनी त्वरित गावकामगार तलाठी यांना दिली आहे.
ऐन हिवाळ्याचे दिवस असताना दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने मोठी आग याठिकाणी निर्माण झाली.या आगीमुळे रविंद्र अंधारे यांचा ८६०३२ जातीचा दोन एक्कर व दिलीप अंधारे यांचा २६५ जातीच दिड एक्कर वरील तोडणीस आलेल्या उसाने त्वरित पेट घेतला.या आगीमुळे अंधारे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
यापूर्वीही अनेक वेळा महावितरण कंयणीच्या अधिकार्यांना, कर्मचाऱ्यांना आमच्या शेतात विद्युत तारांचा एकमेकांना संपर्क होत असल्याने जळीत घटना घडलेल्या आहेत. या तारांचा बंदोबस्त करा,अशी मागणी शेतकर्यांनी वेळोवेळी केली. मात्र त्यांनीही या कामात हलगर्जीपणा केला म्हणून आमचा परिपक्व तोडणीस आलेला ऊस ऐन मौसममध्ये जळून गेल्याने या घटनेला महावितरणचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या शेतकर्यांनी केला आहे.
आमच्या झालेल्या ऊस नुकसानीची आम्हाला त्वरित नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणीही अंधारे बंधूंनी केली आहे.या घटनेचा पंचनामा येथील तलाठी यांनी करून तो अहवाल त्वरित परंडा तहसीलदार यांना पाठवून या शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
ऐन दुपारच्या वेळेत अचानक लागलेल्या या आगीमुळे येथील शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाली.शेजारील या भागातील शेतकर्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.अन्यथा शेजारील शेतकर्यांच्या वीस ते पंचवीस एक्कर वरील उसालाही आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते.परंतु पुढील अनर्थ शेतकऱ्यांच्या सर्तकतेमुळे टळला.
———————————–
अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांना आमच्या शेतातील या लोंबलेल्या तारांचा बंदोबस्त करा म्हणून मागणी केली.मात्र बिल घ्यायला पुढे आणि काम करायला मागे या निष्काळजी धोरणामुळे आमचा तोडणीस आलेला ऊस जळाला.या घटनेची आम्हाला मुबलक भरपाई न मिळाल्यास आम्ही न्यायालयात महावितरणच्या विरोधात दावा ठोकणार असल्याचेही रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या शेतकर्यांनी सांगितले.
आत्मा अंतर्गत १८० महिलांना भाजीपाला बियाणे वाटप
सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले)
तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे ‘स्वयम शिक्षण प्रयोग’ संस्था, तुळजापूर कृषी विभाग व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत भाजीपाला प्रक्रिया उद्योग यावर आधारित दि.३ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
‘स्वयम शिक्षण प्रयोग’ या स्वयंसेवी संस्थेने आता पर्यंत आरोग्य, शुद्ध पाणी, स्वच्छता, अपारंपारिक ऊर्जा, सेंद्रीय शेती आणि ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये संस्थेने विविध उपक्रम राबवलेले आहेत. आता हि संस्था सेंद्रिय शेती या उपक्रमावर काम करत असून संस्थे मार्फत मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील गावांमध्ये बैठका घेऊन सेंद्रिय शेतीविषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचे काम चालू आहे. या मध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी महिला गटांना पोषण आहार परसबाग साठी भाजीपाला बियाण्याचे गावोगावी वाटप करण्यात येत आहे. त्या मध्ये महाबीजचे दहा ग्राम वजनाचे दहा प्रकारचे परसबागेसाठी उपयोगात येणारे भाजीपाला बियाणे मिनी किट तालुक्यातील आत्माअंतर्गत स्थापित विविध गावातील शेतकरी महिला गटांना देण्यात आले. सदरील भाजीपाला बियाणे मिनी किटमध्ये मेथी, पालक, कारले, कोथिंबीर, भेंडी, काकडी, राजमा, दोडका इत्यादी प्रकारचे भाजीपाला बियाणे उपलब्ध आहेत. प्रकल्प संचालक आत्मा उस्मानाबाद कार्यालयामार्फत सदर बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे सेंद्रीय शेती या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये बोलताना मान्यवरांनी उपस्थितांना सेंद्रीय शेती विषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. वर्षा मरवाळीकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव लोंढे, स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या गोदावरी क्षिरसागर आणि अर्चना कोळी, सलगरा पोस्टमन अर्चना जाधव यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे शिबिर आयोजित करण्यासाठी रागिणी सोनटक्के आणि जरीना पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.
बार्शी-कुर्डूवाडी रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले
रिधोरे (अतुल गवळी):- बार्शी-कुर्डवाडी रोडवर शेंद्री स्टेशन व साक्षी पेट्रोलियम,रिधोरे यांच्यामध्ये आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले.हा प्रकार हॉटेल शिवराय जवळ घडला आहे. ऊसाला पहिला २५००रुपये व अंतिम दर ३१०० रुपये मिळावा अशी ऊस दर संघर्ष समितीने मागणी केली आहे.मात्र साखर कारखानदारांनी कारखाना सुरू होऊन जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटून देखील ऊस दराविषयी आपली भूमिका जाहीर केली नाही.काल देखील उपप्रादेशिक साखर आयुक्तालय, सोलापूर यांच्या नियोजनाखाली मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व ऊस दर संघर्ष समिती व साखर कारखानदार यांच्यामध्ये नियोजन भवन,सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला बऱ्याचशा कारखानदारांनी अनुउपस्थिती दाखवली.त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.सुरुवातीला ऊस दर संघर्ष समितीने गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत नंतर आता गनिमी काव्याचे शत्र उचलले आहे व आंदोलन सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आजची ही घटना घडली आहे.































































